‘मेडिको’च्या माध्यमातून एका क्लिकवर आरोग्यसुविधा आटोक्यात

‘मेडिको’च्या माध्यमातून एका क्लिकवर आरोग्यसुविधा आटोक्यात

Sunday November 22, 2015,

4 min Read

आरोग्याची काळजी वाहणारे एक नवे आकाश आत विस्तारते आहे. आरोग्याशी निगडित प्रश्नांची उत्तरे, समस्यांचे समाधान डिजिटल माध्यमातून देण्याच्या सेवा-व्यवसायाला गेल्यावर्षी जगभरात जवळपास ७ हजार ५०० ‘स्टार्टअप’ मिळाले. इतरत्र इतक्या मोठ्या संख्येने लोक या नव्या व्यावसायिक क्षेत्रात पडताहेत म्हटल्यावर भारतातही हे वारे ओघाने आलेच. इथेही वैद्यकीय व्यावसायिक आणि ग्राहकांना एकमेकांच्या जवळ आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत नवनवे ‘स्टार्टअप’ उभे राहिले. हे सगळेच ‘स्टार्टअप’ प्रभावीपणे आपले काम बजावत असताना आरोग्य क्षेत्रातील पुरवठ्याच्या (सेवा) पातळीवरील समस्या काही संपुष्टात आलेल्या नव्हत्या. बाजारातील हीच समस्या आणि हीच उणीव हेरून ती दूर करण्याच्या उद्देशाने श्रीवाल्सन मेनन आणि रमण शुक्ला यांनी ‘मेडिको’ हे वेब आधारित व्यासपीठ सुरू केले. ॲअॅपच्या माध्यमातून ते मोबाईलवरही आणले.

श्रीवाल्सन सांगतात, ‘‘आरोग्याची काळजी वाहणारा आणि लोकांच्या दृष्टीने कल्याणकारी ठरणारा असा ‘प्लॅटफॉर्म’ आम्ही सुरू केला. हॉस्पिटल्स (रुग्णालये), डायग्नोस्टिक सेंटर्स (निदान केंद्रे), फार्मसीज् आणि कल्याण केंद्रांची माहिती ग्राहकांना उपलब्ध करून देणे तसेच या सगळ्या सुविधांशी ग्राहकांचा थेट संपर्क करून देण्यात मदत करणे या माध्यमातून आम्ही सेवा सुरू केली. ग्राहकाला तो राहात असलेल्या भागापासून अगदी सोयीच्या अंतरावर या सुविधांपैकी कुठलीही सुविधा मोजून दोन क्लिकवर उपलब्ध होईल, अशी व्यवस्था आम्ही करून दिलेली आहे.’’

image


श्रीवाल्सन यांनी २० वर्षांहून अधिक काळ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात घालवली आहेत. ‘मेडिको’ हा ‘स्टार्टअप’ सुरू करण्यापूर्वी ते ‘आयबीएम’चे ते इथले व्यवस्थापक होते. कामकाजाचा भाग म्हणून आठवड्यातून चार दिवस त्यांना प्रवास करावा लागे. सततच्या प्रवासाचा प्रकृतीवर विपरित परिणाम होतो आहे, हे त्यांच्या पुढे लक्षात आले आणि त्यांनी नवा विचार सुरू केला.

आरंभ…

श्रीवाल्सन सांगतात, ‘‘मुंबईतच एकदा माझ्यावरच आणीबाणीचा प्रसंग गुदरला. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे मला मिळाली नाहीत. कारण रात्र झालेली होती. मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत मला या औषधांसाठी चार तास वाट बघावी लागली. आता औषधे उपलब्ध नव्हती किंवा अगदी त्यावेळीही औषधे मिळूच शहत नव्हती, असाही भाग नव्हता. अगदी अवेळीही औषधे उपलब्ध करून देणाऱ्या सेवेबद्दल मलाच काही माहिती नव्हती म्हणून मला ताटकळावे लागलेले होते.’’

रमण शुक्ला हे गेली तीन वर्षे श्रीवाल्सन यांचे सहकारी आहेत. तंत्रज्ञान विकासाच्या क्षेत्रातला दहा वर्षांचा अनुभव त्यांना आहे. एकदा त्यांच्या मित्राच्या पालकांना त्यांच्या घरीच विशेष शुश्रुषेची आवश्यकता होती, पण रमण यांनाही अशी सेवा त्या मित्राला मिळवून देणे अवघड गेले होते.

श्रीवाल्सन सांगतात, ‘‘येत्या २०२० पर्यंत आरोग्यसुविधेचा भारतातील बाजार २८० बिलियन डॉलरपर्यंत भिडेल, अशी स्थिती आहे. सध्याच तो शंभर बिलियन डॉलरच्या आसपास आहे. आणि सध्याही तो आणखी वाढायला वाव आहे. काही खाचा काही खळगी तेवढी भरून काढण्याची वेळ आहे, हे मार्केट बुम झालेच म्हणून समजा.’’ ‘मेडिको’ सध्या बंगळुरूत काहे. कार्यक्षेत्रही बंगळुरू हेच आहे. ‘मेडिको’कडे १५०० आरोग्यसेवा पुरवठादारांची नोंदणीकृत यादी आहे. आतापर्यंत शंभरावर व्यवहार ‘मेडिको’ने केलेले आहेत.

१७ ऑक्टोबर २०१५ रोजी हा व्यावसायिक उपक्रम सुरू झाला. ‘मेडिको’ वेबवरून ८०० पर्यंत युजर्सनी त्याचा लाभ घेतलेला आहे. वेबपेजला भेट देणाऱ्यांची संख्या १२ हजारांवर गेलेली आहे. ॲअॅपवरून ‘मेडिको’ची सेवा मिळवणाऱ्यांची संख्या दोनशेवर गेलेली आहे. प्राधान्यकृत यादी, ‘पे पर क्लिक’, ‘डिल्स मार्जिन’ (व्यवहारनिहाय नफा), ‘बी२बी’ व्यावसायिकांसाठी मोहिमा आदी माध्यमातून ‘मेडिको’ला महसूल मिळतो.

भविष्यातील योजना

आगामी वर्षात देशातील जवळपास २० शहरांतून आणि ७ राज्यांतून ‘मेडिको’ला आपल्या सेवा सुरू करायच्या आहेत. श्रीवाल्सन सांगतात, ‘‘इंग्रजीशिवाय प्रादेशिक भाषांमध्येच आम्हाला सेवा पुरवायच्या आहेत. वैद्यकीय गरजा आणि आरोग्य सुविधा पुरवणारे हे अशा स्वरूपाचे प्रादेशिक भाषांतील पहिलेच व्यासपीठ असेल. डिसेंबर २०१५ पर्यंत मुंबईत आमचा उपक्रम सुरू झालेला असेल.’’

Playstore/iOS ॲअॅपच्या माध्यमातून ‘मेडिको’ला ५००० ग्राहक मिळवायचे आहेत. कंपनीने त्यासाठी योजनाबद्ध कार्यक्रमही आखलेला आहे. डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यातच बहुदा Medikoe iOS हे ॲअॅप सुरू झालेले असेल. ‘सीएमएस कॉम्प्युटर्स लिमिटेड’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मेनन यांचे त्यासाठी ‘मेडिको’ला मोलाचे सहकार्य लाभलेले आहे.

२०१२ मध्ये आरोग्य सुविधा क्षेत्र ७९ बिलियन डॉलरपर्यंत जाईल, हे अपेक्षित होते. आता २०१७ पर्यंत ते १६० बिलियन डॉलरपर्यंत जाईल, असा होरा आहे. २०२० पर्यंत ते २८० बिलियन डॉलरला भिडलेले असेल. आजही हे भारतातील एक मोठे व्यावसायिक क्षेत्र म्हणून मानले जाते आहे. महसूल आणि रोजगार दोघांच्या निर्मितीत आरोग्य सुविधा क्षेत्राने आघाडी घेतलेली आहे.

आरोग्य सुविधांच्या शोधात असणाऱ्यांसाठी ‘मेडिको’ एक वरदान ठरते आहे. ‘मेडिको’ची स्पर्धा Practo आणि Lybrate या कंपन्यांशी आहे. आरोग्यसुविधांसाठी पेड ॲअॅप मार्केट ३३.८ टक्के सीएजीआरच्या जवळपास आहे. आरोग्यसुविधा ॲअॅप बाजारामध्ये जपान आणि भारत या आशिया खंडातील ताकदीने उदयाला येत असलेल्या शक्ती आहेत. भारतात एक हजार लोकांमागे असलेले डॉक्टरांचे प्रमाण ०.६ टक्के आहे. आरोग्य सुविधेत यामुळेच एक मोठी पोकळी आहे. मोठी दरी आहे. ती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भरून काढण्याचे कार्य या नव्या व्यवसाय क्षेत्राच्या माध्यमातून घडते आहे. आरोग्यसुविधेतील पुरवठ्याचा अभाव हा शोधण्याच्या अगदी पलीकडे गेलेला आहे. तो आवाक्यात आणण्याचे कार्यही यातून साधते आहे.

लेखक : सिंधू कश्यप

अनुवाद : चंद्रकांत यादव