इमेज कंसल्टिंगने बनवा आपली पर्सनालिटी आणि यशस्वी व्हा

इमेज कंसल्टिंगने बनवा आपली पर्सनालिटी आणि यशस्वी व्हा

Wednesday January 27, 2016,

2 min Read

फर्स्ट इम्प्रेशन इज दी लास्ट इम्प्रेशन असं म्हटलं जातं. जोवर आपण आपल्याबद्दल काही सागू इच्छितो त्याअगोदरच समोरचा आपल्याबद्दल त्याचं मत बनवतो. तुमचा पेहराव, बोलण्याचा ढंग, बॉडी लॅग्वेज यासारख्या गोष्टी तुमचं व्यक्तिमत्व ठरवत असतात. आज यशस्वी होण्यासाठी आकर्षक व्यक्तिमत्व असणं फार महत्त्वाचं आणि गरजेचं झालंय. खाजगी आणि व्यवसायिक जीवनात यशस्वी होण्यासाठी आकर्षक व्यक्तिमत्व फार महत्त्वाची भूमिका बजावतात. चांगलं व्यक्तिमत्व असल्यानं आपला स्वत:वरचा विश्वास वाढतो. आपल्यातला आत्मविश्वास बळावण्यासाठी, आपले व्यक्तिमत्व अधिक प्रभावशाली बनवण्यासाठी तत्पर आहे 'इमेज कंसल्टेंट्स...'

image


मानसी लाल-सावंत अशीच एक इमेज कंसलटेंट आहेत. ज्यांनी इमेज कंसल्टिंग पार्टनर्स नावाची कंपनी सुरु केली. संस्थापक असण्याबरोबरच मानसी चीफ ट्रेनरही आहे. मानसीच्या मते जीवनात यशस्वी होण्यासाठी तुमच्या योग्यतेबरोबरच तुमची पर्सनालिटी अर्थात व्यक्तिमत्व छाप पाडणारं असलं पाहिजे. मानसी सांगते, “आपल्या भारतीयांमध्ये पुढे जाण्याची क्षमता आहे. पण जसं एका चांगल्या प्रोडक्टला चांगल्या पॅकींगची गरज असते त्याचप्रमाणे एका योग्य अतिशय हुशार व्यक्तीला चांगलं व्यक्तिमत्व असणं गरजेचं आहे. सध्याच्या जगात त्याकडे जास्त पाहिलं जातं.”

image


दुसऱ्यांचे व्यक्तिमत्व फुलवण्याच्या ध्यासानं मानसी या क्षेत्राकडे वळली. पण हा प्रवास तेवढा सोपा नव्हता. दोन मुलं आणि कुटुंबाच्या जबाबदारी असताना मानसीनं नऊ महिन्याचा इमेज कंसल्टिंगचा सर्टिफिकेट कोर्स केला आणि मेरिट ग्रेडने उत्तीर्णही झाली. अनेकांना जिथं फक्त पास क्लास मिळतो तिथं मानसीला मेरीट ग्रेड मिळाल्यानं तिचा आत्मविश्वास दुणावला. दहा वर्ष मानसीनं एचआरमध्ये काम केलं होतं. त्या पगारातून केलेल्या बचतीतून तिनं आपल्या या नव्या कंपनीची स्थापना केली. यात तिच्या कुटुंबाचा वाटा फार मोठा होता. आज मानसीचं स्वत:चं ऑफिस आहे, सपोर्ट स्टाफ आहे. सध्या मानसी स्वत:च ट्रेनिंग देते. २०१६ मध्ये ती काही ट्रेनर्सला रोजगार देऊ शकेल असं तिला वाटतंय.

image


मानसी सांगते विकसित देशांमध्ये अशाप्रकारची ट्रेनिंग प्रचलित आहे. पण भारतात हा सध्या उदयोन्मुख व्यवसाय आहे. येत्या काळात संपूर्ण दक्षिण पूर्व आशियात याची व्याप्ती वाढणार आहे. हे निश्चित. मोठ्या मोठ्या कंपन्यांना इमेज कंसल्टेंटसची आवश्यकता असते. फिल्म प्रोडक्शन कंपन्यांकडे स्वत:चे इमेज कंसल्टंट असतात. पण याबाबत लोकांमध्ये अधिक जागरूकता नाही.

image


समजा तुम्हाला नोकरीच्या मुलाखतीसाठी जायचंय... त्यासाठी आपण काय कपडे घालावेत, तुमची बॉडी लॅग्वेज कशी असावी, कसं बोलावं, किती बोलावं, हे सर्व आपल्याला माहित असेल तर जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही. यासाठीच इमेज कंसल्टेंटची आवश्यकता भासते.

image


मानसी सांगते, इमेज कंसल्टिंग विश्वासाचा व्यवसाय आहे. यासाठी आवश्यक आहे की आपल्या क्लायंटचा आपल्यावर विश्वास असला पाहिजे. सध्या मानसीकडे अनेक जण क्लायंट म्हणून येतात. भविष्यात त्याची संख्या वाढेल असा तिचा विश्वास आहे. जर तुम्हाला दुसऱ्याचं व्यक्तिमत्व खुलवायचंय तर इमेज कंसल्टिंग हा आपल्यासाठी चांगला व्यवसाय आहे. यासाठी गरज आहे ती फक्त मेहनतीची आणि स्वत:वरच्या विश्वासाची.. अग्रेसर राहण्याचा हा मार्ग आहे.

आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा