गुरूजींनाच शिकवण्याच्या नव्या कल्पना शिकवणारे ‘गुरूजी’!

गुरूजींनाच शिकवण्याच्या नव्या कल्पना शिकवणारे ‘गुरूजी’!

Saturday October 31, 2015,

4 min Read

मागील दोन दशकात जगभरात शिक्षणाच्या सुधारणांबाबत खूपच चर्चा झाली आहे. ते आधिक चांगले देता यावे यासाठीही खूपच प्रयत्न करण्यात आले. भारतातरही शिक्षणाचा प्रचार-प्रसार यावर खूप अधिक लक्ष दिले जात आहे. शिक्षणाचा विकास व्हावा यासाठी सरकारने खूपच चांगली पावले उचलली आहेत; त्याजोडीला अनेक स्वयंसेवी संस्था देखील यासाठी प्रयत्नशील आहेत. असाच एक प्रयत्न समाजसेवक शिवानंद सालगेन यांनी देखील चालवला आहे.

शिवानंद यांना जाणवले की, आजच्या शिक्षणाच्या घसरत्या दर्जाबद्दल केवळ शिक्षकांनाच दोष देता येणार नाही. चांगल्या शिक्षण व्यवस्थेसाठी सरकार आणि शिक्षणसंस्था दोघांना मिळून प्रयत्न करावा लागेल. तेंव्हाच आमच्या देशातील शिक्षण व्यवस्था सुधारू शकेल. त्यानंतर शिवानंद आणि त्यांच्या सहका-यांनी या दिशेने संशोधन करण्यास सुरूवात केली. ते अनेक शाळांमधून गेले आणि त्यांनी शिक्षकांशी चर्चा केल्या. शिकवण्याच्या पध्दतींबाबत विस्ताराने चर्चा केल्या. भरपूर माहिती घेतल्यावर आणि मोठ्याप्रमाणात विचार विनिमय केल्यानंतर त्यांनी ‘गुरूजी’ ची सुरुवात केली. शिवानंद ‘गुरूजी’चे सहसंस्थापक आहेत.

‘गुरुजी’ हा एक असा खिलाडूपणाचा(गेमीफाइड) मंच आहे, ज्याच्या मदतीने शिक्षकांना त्यांचे विषय अधिक चांगले आणि रूचीपूर्ण पध्दतीने शिकवण्यासाठी मदत मिळते आहे. हे आयुध शिक्षकांसाठी खूपच फायद्याचे असल्याचे सिध्द होत आहे. हे आयुध (टूल) ऍंड्रॉईड आणि टँबलेट बेरुड सोल्यूशन आहे. ज्यामध्ये शिक्षकांना एक विषय निवडायचा असतो आणि त्यानंतर संपूर्ण धड्याचा नियोजन आराखडा समोर येतो. या आराखड्यामध्ये लिखित शिक्षण सामुग्रीशिवाय चित्र, ऑडिओ आणि व्हिडीओ यांचा समावेश आहे. हे शिक्षकांवरच अवलंबून असते की, ते कोणत्या आयुधासोबत जास्त चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना शिकवू शकतात. यातून शिक्षकांचे काम तर सुलभ होतेच आहे सोबतच मुलांनाही शिक्षणाचा वेगळा आणि रूचेल असा अनुभव मिळतो आहे.

'गुरूजी' चे शिवानंद

'गुरूजी' चे शिवानंद


‘गुरूजी’चे उदिष्ट त्या शाळांपर्यंत पोहोचण्याचे आहे, जेथे मोठ्या प्रमाणात गरीब मुले शिक्षण घेत आहेत. शिवानंद यांची इच्छा आहे की, गुरूजी त्या ठिकाणी पोहोचावे जेथे तंत्रज्ञान या आधी कधीच पोहोचले नाही. जिथे इंग्रजी बोलले जात नाही. शिवानंद मानतात की, जर ते या कार्यात म्हणजे अशा ठिकाणांपर्यंत आपल्या सेवा देऊ शकले तर संपू्र्ण भारतात त्यांना यश मिळण्यात कोणीच रोखू शकणार नाही.

आपला हा कार्यक्रम आणखी व्यापक करण्यासाठी शिवानंद यांनी सन २०१२मध्ये बांदी पुरी, कर्नाटक आणि मधुमलाई तमिळनाडू येथून आपला प्रायोगिक प्रकल्प सुरु केला. तमिळनाडू मध्ये त्यांनी पन्नास शाळांमधून काम केले. तेथे त्यांनी वेगवेगळ्या विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत कार्यशाळा घेतल्या. याशिवाय त्यांनी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्याचा स्वयंसेवी संस्था, शिक्षक आणि सरकारच्या मदतीने कन्नड आणि तमिळ भाषेत अनुवाद करुन घेतला.

'गुरुजी' सह स्वाध्याय

'गुरुजी' सह स्वाध्याय


हा प्रकल्प खूपच यशस्वी झाला. त्याची दोन कारणे आहेत. एकतर शिक्षकांनी सहजपणाने नविन तंत्रज्ञान स्वीकारले, आणि दुसरे कारण हे झाले की, ते इतके सरळ आणि उपयोगी होते की, शिक्षकांना ते वापरण्याची सवयच लागली. त्यानंतर ‘गुरूजी’ने महाराष्ट्र, राजस्थान, पॉंडिचेरी मध्येही आपला कार्यक्रम केला आणि हजारपेक्षा जास्त शिक्षकांशी संपर्क केला.

‘गुरूजी’चे जे साहित्य आहे त्याला सहा निकषांतून तयार करण्यात आले आहे. ज्यात मूलभूत विचार म्हणजे स्टक्चर्ड थिंकींग, कारणमिमांसा (रिझनिंग), समस्यांचे समाधान, संवाद (कम्युनिकेशन),सहयोग(कोलेबरेशन) आणि रचनात्मकता यांचा समावेश आहे. परंतू कसे? ते पुस्तक सांगत नाही. तर सहा प्रमाणकांनुसार बनविले आहे. हे साहित्य शिक्षकांना मदत करते की ते विद्यार्थ्यांपर्यंत कोणताही विषय सहजपणे कसा समजावून सांगू शकतील.

शिवानंद विद्यार्थ्यासोबत

शिवानंद विद्यार्थ्यासोबत


त्यांचा प्रकल्प ‘स्कूल इन द क्लाऊड’ ला २०१३मध्ये ‘टेड प्राइज अॅवार्ड’ देऊन गौरविण्यात आले आहे. ‘स्कूल इन द क्लाऊड’ प्रकल्प एक अभिनव प्रकारचा प्रकल्प ठरला आहे जो स्वाध्यायाचा खूपच प्रभावी मार्ग ठरला आहे.

शिवानंद मानतात की, शिक्षण स्वत: पासून असले पाहिजे. यासाठी आमच्याकडे असे एखादे तंत्र हवे ज्याद्वारे विद्यार्थ्यांना स्वत:लाच शिकता आले पाहिजे. असे असले तरी शिक्षक देखील तितकेच आवश्यक आहेत कारण ते विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करत असतात. आणि त्यांचे शिक्षण सुलभ होण्यास मदत करत असतात.

आतापर्यंत ‘गुरूजी’ची सर्वात मोठी उपलब्धी आहे की, त्यांनी शाळेतील मुलांची पटसंख्या वाढली आहे. त्यांचा चमू पुढील वर्षीपर्यंत आणखी हजार शाळांपर्य़त पोहोचू इच्छितो. त्यासोबतच त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात विशेषत: अफ्रिकेत पाऊल ठेवायचे आहे.

आतापर्यंत ‘गुरूजी’ने आपल्या कार्यासाठी अनुदान आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थाकडून मिळणा-या आर्थिक मदतीद्वारे कार्य चालविले आहे. ज्यातून ते कार्य तर करत आहेत परंतू त्यांचा कोणताही फायदा मिळवत नाहीत. मात्र भविष्यातील योजना साकारण्यासाठी त्यांना पैश्यांची गरज आहेच त्यासाठी आता ‘गुरुजी’चा विचार आहे की, ते काही असेही काम करतील ज्यातून त्यांना आर्थिक फायदा देखील होईल आणि‘गुरुजी’चा आणखी विस्तार करणे देखील शक्य होईल.