घरातच तयार केले ग्लोबल उत्पादन ʻ हॅप्पीफॉक्सʼ

घरातच तयार केले ग्लोबल उत्पादन ʻ हॅप्पीफॉक्सʼ

Thursday October 29, 2015,

5 min Read

गेल्या काही वर्षात भारतात उद्योजकता वाढीस लागली आहे. बहूराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आपले नशीब आजमवण्याऐवजी कमी वयातच युवा उद्योगधंद्याच्या मार्गावर चालत आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये पायाभूत सुविधा, जनसंपर्क, माध्यमे यांच्यातील सकारात्मक बदलांमुळे इकोसिस्टममध्ये जबरदस्त सुधारणा झालेली आहे. अशाच एका कमी वयाच्या शालीन जैन या युवकाने तर कमालच केली. वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी शालीन यांनी आपल्या छंदापायी अशा एका उत्पादनाची निर्मिती केली, ज्याला संपूर्ण जगाने डोक्यावर घेतले. शालीन यांनी महाविद्यालयात शिक्षण घेताना २००० साली चेन्नई येथे 'टेनमाइल्स' (आत्ताचे हॅप्पीफॉक्स) नावाने ग्राहकांच्या सोयीसाठी 'कस्टमर सपोर्ट आणि हेल्पडेस्क सॉफ्टवेअरची' निर्मिती केली. १९९९ साली वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी शालीन यांनी टेक्नॉलॉजी स्टार्टअप क्षेत्रात काम केले होते. ज्या ठिकाणी १०० पेक्षा जास्त कर्मचारी काम करत होते. शालीन सांगतात की, ʻमी आमच्या कंपनीत सर्वात कमी वयाचा कर्मचारी होतो आणि भरपूर मेहनतदेखील करत होतो. तेव्हा मी शक्य व्हायचे तेवढ्या वेळेस महाविद्यालयातील वर्गात गैरहजर राहायला लागलो. कारण मला वर्गात बसण्यात अजिबात रस नव्हता.ʼ मात्र त्यांनतर वर्गातील हजेरी कमी होत असल्याने शालीन यांना त्यांची अंशकालीन नोकरी सोडावी लागली, असे ते सांगतात. एका आठवड्यात शालीन यांना दुसऱ्या कंपनीत नोकरी मिळाली. मात्र नोकरीचे ठिकाण घरापासून दूर असल्याने शालीन यांनी ती नोकरी नाकारली. शालीन सांगतात, ʻत्या वेळेस माझ्याकडे स्टार्टअपसाठी एकमेव मार्ग होता आणि अखेरीस २००१ साली मी टेनमाइल्सची निर्मिती केली. माझे कार्यालयदेखील नव्हते. माझी झोपण्याची खोली हेच माझे कार्यालय होते.ʼ त्यानंतर टेनमाइल्सचे रुपांतर हॅप्पीफॉक्समध्ये झाले, जे कस्टमर सर्विस सेगमेंट क्षेत्रात सर्वाधिक गतीने विकास करणारे उत्पादन होते. शालीन यांची उद्योग क्षेत्रातील यशस्वी कारकीर्द जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्याशी ईमेल आणि स्काईपद्वारे संपर्क साधला. तेव्हा त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील आणि जीवनातील विविध पैलू आम्हाला उलगडून दाखवले.

भारतात ज्याकाळी स्टार्टअपचा ट्रेंडदेखील अस्तित्वात नव्हता, त्याकाळी शालीन यांनी स्वतःच स्टार्टअप सुरू केलं. शालीन यांना या कामासाठी ज्या गोष्टीने प्रेरणा दिली त्याबाबत बोलताना ते सांगतात की, "चेन्नई येथील सर्वात चांगले प्रोग्रामर माझ्या शेजारी राहत होते. माझ्यासाठी एक ऐप कोड तयार करण्यासाठी मी त्यांना राजी केले. ते मला फक्त आठवड्याच्या अंती मदत करायचे. माझ्या पहिल्या कल्पनेला उत्पादनस्वरुपात मूर्तरुप देण्यासाठी त्यांनी मला मदत केली. विशेष म्हणजे त्यांनीदेखील त्यांच्या महाविद्यालयीन वयात एक कंपनी सुरू केली होती आणि माझ्यासारखे काहीतरी करण्याची त्यांची इच्छा होती", असे ते सांगतात. एक तंत्रज्ञ म्हणून आपल्या या प्रवासाबाबत बोलताना शालीन सांगतात की, "मला एक असे उत्पादन निर्माण करायचे होते, जे मोठ्या बाजारपेठांना आकर्षित करेल. हॅप्पीफॉक्स पासून ते २००१ सालचे आमचे पहिले उत्पादन स्क्रीनस्विफ्टपर्यंत आम्ही अनेक यशस्वी उत्पादने तयार केली आहेत. मी बनवलेल्या प्रत्येक उत्पादनासोबत मी पुढे जात राहिलो. दिवसागणिक जी उत्पादने आम्ही तयार करत गेलो, ती पहिल्यापेक्षा चांगली होत गेली. आमच्या सुरुवातीच्या यशामुळे अनेक चांगले, हुशार लोक आमच्यासोबत काम करण्यात रुची दाखवायला लागले, असे शालीन सांगतात. झोपण्याच्या खोलीपासून सुरू करण्यात आलेल्या या कंपनीला ग्लोबल बनविणे, माझ्यासाठी एक स्वप्नवत अनुभव आहे. येथे बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आणि साध्य करण्यासारख्या आहेत, असे शालीन सांगतात. एक उद्योजक म्हणून मी हेच शिकलो आहे की, एखाद्या कंपनीची सर्वाधिक महत्वाची गुंतवणूक म्हणजे तिथे काम करणारे लोक आणि संस्कृती आहे. यात सुधारणा केल्याशिवाय तुम्ही प्रगती करू शकत नाही," असे ते सांगतात. सुरुवातीच्या काळातील संघर्ष आणि आव्हानांच्याबाबतीत विचारले असता शालीन सांगतात की, "महाविद्यालयात शिकत असताना वर्गातील किमान हजेरी पूर्ण करण्यासाठी मला माझी अंशकालीन नोकरी सोडावी लागली होती. नोकरी सोडल्यानंतर काही दिवसांमध्येच माझ्याकडे माझ्या सोयीनुसार मी करू शकेन, अशा नोकरीची संधी आली. मात्र ते कार्य़ालय माझ्या घरापासून लांब होते. महाविद्यालयीन आयुष्यात मी एवढ्या लांब प्रवास करुन नोकरी करू शकत नव्हतो. मात्र यामुळेच मला माझ्या आवडीचे काम टेनमाइल्स नावाने सुरू करण्याची संधी मिळाली. हे ऐकायला निश्चितच विचित्र वाटेल, मात्र हेच खरे आहे, असे शालीन सांगतात. शालीन पुढे सांगतात की, माझ्यासमोर जे सर्वात अशक्यप्राय आव्हान होते ते म्हणजे माहिती तंत्रज्ञानाच्या त्या युगात माझ्या प्रोडक्ट स्टार्टअपसाठी लोकांची भरती कशी करायची. यासाठी हुशार, हरहुन्नरी लोकांची भरती करण्यासाठी मला बरीच मेहनत घ्यावी लागली, असे शालीन सांगतात. संगीताची आणि पियानो वाजवण्याची आवड असलेले शालीन सांगतात की, मला संगीताची आणि पियानो वाजवण्याची आवड आहे. या छंदामुळे मी खुप चांगल्या लोकांना आयुष्यात भेटलो. मी त्यांच्यासोबत एक अल्बमदेखील बनविला. अशाच एका हौशी माणसासोबत मी एक अल्बमचीदेखील निर्मिती केली. मात्र काही कारणास्तव तो प्रकाशित होऊ शकला नाही. आम्ही संगीत कंपन्यांच्या चकरादेखील मारल्या. कदाचित ९८-९९ साली आमच्याकडे iTune असते. तर हे चित्र वेगळे असते. मात्र आम्ही संगीताच्या काही धुन तसेच माहितीपटाकरिता संगीत तयार केले आणि ते विकले. यामुळे आम्हाला स्टार्टअप चालवण्याबाबत शिकण्यास मिळाले. उच्चमाध्यमिक वर्गादरम्यान हे शिकल्याचा आनंद होत असल्याचे शालीन सांगतात. गेल्या वर्षी हॅप्पीफॉक्स कंपनी अमेरिकेत स्थलांतरीत झाली. चेन्नईवरुन अमेरिकेत स्थलांतरीत झाल्यानंतर संस्थेत कोणत्याप्रकारचा बदल तुम्ही पाहत असल्याचे विचारले असता शालीन सांगतात, हॅप्पीफॉक्स एक कस्टमर सपोर्ट आणि हेल्पडेस्क सॉफ्टवेअर आहे. जो स्टार्टअप आणि व्यवसायासाठी योग्य आहे. टेनमाइल्स मधुन निघालेले सर्वाधिक वेगाने वाढणारे हे एक उत्पादन आहे. आमचे सर्वाधिक ग्राहक हे अमेरिकेतील आहेत. त्यामुळे कंपनी तिथे स्थलांतरीत करणे स्वाभाविक असल्याचे शालीन सांगतात. आमच्या ग्राहकांना चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी आम्ही एका वर्षापूर्वीच अमेरिकेला स्थलांतरीत झालो. आता आम्ही बऱ्याचवेळा आमच्या ग्राहकांना थेट भेटतो. त्यामुळे आमच्या उत्पादनावर आणि बाजारातील रणनीतीवर चांगला फरक पडला आहे, असे शालीन सांगतात. वास्तविक पाहता भारतात स्टार्टअप इकोसिस्टममध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये मोठ्या घडामोडी होत आहेत. मीट अप्स, ब्लॉग एण्ड रिसोर्सेज, को शेयरिंग वर्कस्पेस, अवॉर्डस, मिडीया अटेंशन, वेंचर फंडींग आणि बऱ्याच कार्य़क्रमांमुळे आज स्टार्टअप सुरू करण्यास प्रोत्साहन मिळाल्याचे शालीन सांगतात. नव्या उद्योजकांना तुम्ही काय सल्ला द्याल, असे विचारले असता शालीन म्हणाले की, स्वतःचे स्टार्टअप सुरू करण्यासाठी अजिबात घाबरू नका. शक्य तेवढ्या लवकर त्याची विक्री सुरू करा. उत्पादन बाजारात येण्यापूर्वीच त्याच्या विक्रीवर काम करण्यास सुरुवात करायला हवी. त्यामुळे तुम्हाला जलदगतीने विस्तार करण्यास मदत मिळेल. जर तुमची मानसिक तयारी असेल, तर ग्लोबल मार्केटचा विचार करा, असे शालीन सांगतात. ʻथिंक ग्लोबल एंड एक्ट लोकलʼ, असा सल्ला देताना शालीन सांगतात की, तुमच्या स्टार्टअपच्या कस्टमर सपोर्टमध्ये सर्वांना भागीदार बनवा.

image