पंचवीस हजार डॉलरचे काम सोडून झाले गुराखी! ,‘कश्मीरइंक’च्या बाबर यांनी पश्मीना कारागीरांच्या कल्याणासाठी रात्र-दिवस केला एक!

पंचवीस हजार डॉलरचे काम सोडून झाले गुराखी! ,‘कश्मीरइंक’च्या बाबर यांनी पश्मीना कारागीरांच्या कल्याणासाठी रात्र-दिवस केला एक!

Thursday November 12, 2015,

9 min Read

मृत्यूशी सामना

आपल्या उद्यमशिलतेचे समाधान शोधण्याआधी बाबर एक गुराखी बनले होते, जेणेकरून त्यांना त्या समाजासमोरच्या अडचणी जवळून समजून घेता याव्या, ज्यांचे रक्षण करण्याची ते जबाबदारी घेणार होते. या प्रयत्ना दरम्यान ते जवळपास आपल्या जीवावरच उदार झाले होते. बाबर सांगतात की,“ मला माहिती मिळाली की लेहच्या बाहेरच्या भागात लोकर देणा-या मेंढ्यांवर हिमबिबट्यानी हल्ला केला आहे. त्यावेळी सायंकाळचे चार किंवा पाच वाजले होते आणि मी घटनास्थळापासून सुमारे ६०-७० किमी. दूर होतो. घटनास्थळी गेल्यावर मला माहिती झाले की, हल्ल्याच्या ठिकाणी जाण्यासाठी अजून दीड किमी पायी चालावे लागणार होते. सायंकाळ गडद होत असताना मी चालायला सुरुवात केली आणि बिबट्याशी सामना करायचा झाला तर माझ्या खिश्यात केवळ एक स्विस नाइफ होता. पण त्या प्रसंगी माझ्या आवडीचे हत्यारच माझ्या जीवनातील सर्वात मोठी चूक नव्हती तर ती होती चौदाहजार फूटांच्या उंचीवर धावणे. लगेचच माझा श्वास कोंडला आणि मी जोरात श्वास घेत बेशुध्द पडलो.”

बाबर यांचे नशिब बलवत्तर होते त्यामुळे तेथून जाणा-या गुराख्यांच्या झुंडीचे लक्ष यांच्यावर गेले आणि त्यांनी त्यांना वाचविले. खरेतर त्या दिवशी त्यांचा समूह त्यांच्यापासून दूर गेला पण त्यांनी बाबर यांना जीवदान दिले. दुस-या दिवशी दिल्लीच्या एका रुग्णालयात डोळे उघडल्यानंतर लोकर कमावणा-या गुराख्यांच्या उदरनिर्वाहाच्या आणि जीवनाच्या भल्यासाठी त्यांचा संकल्प अधिक दृढ झाला.

image


माणसाच्या ज्ञानातून सर्वांगसुंदर कपडा

आपला उभरता उद्योग, ‘कश्मीरइंक’ची सुरुवात करण्याच्या विचारात अफजल बाबर सांगतात की,“ हा एक असा प्रवास आहे जो वेगवेगळ्या धाग्यात गुंफला गेला आहे. हा त्या समुदायाचा प्रवास आहे जे शतकानुशतके पश्मीना मेंढ्यांचे रक्षण करत आले आहेत. एक असा कपडा ज्याची शुध्दता सा-या जगात सर्वाधिक मानली जाते आणि जी विलासी समजली जाते. एक असे स्थान जे पर्यावरणाच्या बदलांच्या गंभीर बदलातून जाते आहे. एक असे राज्य ज्याला गोंधळ आणि दहशतवादासाठी ओळखले जाते. हे एका कॉर्पोरेट कारकिर्दीला सोडून वस्तुस्थितीच्या कारणास्तव रक्षणाच्या एका मिशनमध्ये झोकून देत आणि पश्मिना नावाच्या पूर्णतेला वाचवण्यासाठी माझ्या आपल्या प्रवासाबद्दल आहे. आणि या सा-या प्रक्रियेदरम्यान त्या समाजाला जास्तीत जास्त सहकार्य करण्याचा प्रयत्न आहे ज्याने निस्वार्थीपणाने मानवाला आतापर्यंतचे सुंदर वस्त्र दिले आहे.

image


‘पश्मीना’ या शब्दाची उत्पत्ती एक फारसी शब्द ‘पश्म’ पासून झाली ज्याचा अर्थ आहे लोकर. खरी पश्मिना लोकर हिमालयातील चंगथंगी मेंढ्यापासून प्राप्त होते. कारण या मेंढ्या थंडीतच वाढवल्या जातात त्यामुळे काळानुसार स्वत:चा बचाव करण्यासाठी यांना सुरक्षात्मक त्वचा आणि लोकर वाढवण्याचे वरदान मिळाले आहे

माझ्या मनात हा विचार भारताच्या पश्मीना उद्योगाशी जोडलेल्या समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणाची गरज शोधताना आला, कारण हे मुळात भारताचे आणि मुख्यत: विलासीतेचे उत्पादन आहे.”

image


एक गुराखी बनण्यासाठी सिलीकॉन व्हँलीच्या जीवनशैलीचा त्याग

एक हँकर अशी आपली ओळख असताना बाबर माहिती सुरक्षा सल्लागाराच्या रुपात काम करताना अठरा ते पंचवीस हजार अमेरिकी डॉलर्स प्रतिमाह मिळवत होते. बाबर सांगतात की,“ आपल्या त्या कामादरम्यान बराचसा मोफतचा प्रवास आणि वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याचा आनंद घेत होतो. मला वाटते मी खूप भाग्यवान होतो कारण त्यावेळी मोठ्या प्रमाणात माहिती सल्लागार नव्हते आणि ९/११च्या घटनेमुळे जागतिक पातळीवर धोक्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्याकाळात कार्यरत माहिती सल्लागारांचा तो आपल्या जीवनातील सर्वात छान काळ असावा.”

image


काश्मीर खो-यातील या मूळ रहिवासी असलेल्या व्यक्तीने संघर्षापासून दूर राहण्यासाठी आणि एका चांगल्या जीवनाच्या शोधात खूप आधीच आपली जन्मभूमी सोडली होती. या निर्णयाने त्यांना खूप यशस्वी देखील बनविले. बाबर सांगतात की,“एक कार्यकर्ता आणि गुराखी बनण्याआधी मी भारत, अमेरिका, यूके आणि मध्यपूर्वेत मेस्किकोच्या सोबत तांत्रिक विश्लेषक, व्यापार सल्लागार आणि एक हँकर म्हणून काम केले होते. माझ्याजवळ अमेरिकेच्या पीएमआयच्या पीएमपी प्रमाणपत्रासहित पंचवीस पेक्षा जास्त हाय एंड बिजनेस आणि संगणक प्रमाणपत्र आहेत”.

आपले उच्चवेतन आणि सिलीकॉन व्हँलीच्या जीवनशैलीत ते त्या जीवनाचा आनंद घेत होते ज्याला भारतात अभिजात मानले जात होते. परंतू पैश्यांशिवाय यशाला काही किंमत नसते याचे एक चांगले उदाहरण देत काश्मीरच्या पश्मीना वस्तुस्थिती तंत्राच्या संरक्षणासाठी स्वत:ला समर्पित करण्याच्या उद्देशासाठी सर्वकाही सोडले. बाबर सांगतात की, “ सन २००९ मध्ये हा प्रवास सुरू करण्याच्या वेळी खो-यातील दयनीय स्थितीबाबत माझा पवित्रा अधिक शहामृगी होता.” परंतू आता जेंव्हा प्रत्येक दिवशी ते सत्याचा सामना करत आहेत, त्यांना वाटते की, जम्मू-काश्मीरला दहशतवादापेक्षा जास्त धोका पर्यावरणातील बदलांचा आहे.

image


पर्यावरणाचे बदल दहशतवादापेक्षाही वाईट आहेत

सन २००९ मध्ये पडलेल्या भयंकर दुष्काळामुळे चंगथंग येथील तसोकर तलाव जवळपास सुकलाच होता. त्यानंतर वर्ष २०१०मध्ये आलेल्या भयंकर पूराने कहरच केला. त्यानंतर सन२०१२मध्ये पडलेल्या दुष्काळ आणि बर्फामुळे चंगथंगमध्ये सुमारे पंचवीस हजाराच्यापेक्षा जास्त मेंढ्या काळाच्या जबड्यात समावून गेल्या. सन २०१४ मध्ये आलेल्या पूरात काश्मीर जवळपास नष्टच झाले आणि कित्येक दिवसांपर्यंत या भागाचा देशाशी संपर्क नव्हता. अशी अनेक कारणे होती त्यामुळे आपल्या उदरनिर्वाहासाठी पश्मीनाशी जोडलेले समुदाय अपरोक्षपणाने दबावाखाली येत राहिले आहे. त्यामध्ये राजकीय अस्थिरता, यांत्रिक मागांमधील स्पर्धा, पर्यावरणीय बदलांचा हिमालयाच्या क्षेत्रावरील प्रभाव, शुध्द पश्मीनाला मागे टाकणारे नकली पश्मीनाचे धागे, मजूरांच्या योग्य मोबदल्याचा अभाव, गुराख्यांच्या संख्येतील कमी, मेंढ्यांची कमी होणारी संख्या, चीनमधून सतत सुरू असलेली स्पर्धा या सारखी अनेक कारणे आहेत.

image


काश्मीर, कैश्मीयर आणि पश्मीना

image


पश्मीना सोबत भारताचे संबंध शतकांपूर्वीच्या एका अश्या कहाणीशी आहे ती वारंवार सांगणे बाबर यांना खूपच आवडते. ते सांगतात की,“ चौदाव्या शतकाच्या शेवटी प्रसिध्द कवी आणि विव्दान मीर सैयद अली हमादानी यांनी सर्वात आधी काश्मीरी मेंढ्याच्या लोकरीशी काश्मीरची ओळख करून दिली. तेंव्हापासून शब्द ‘कैश्मीयर’ निर्माण झाला. काश्मीरमध्ये विणकामाच्या उद्योगाला स्थापन करण्यात हमादानी यांचे मोलाचे कार्य राहिले आहे. याशिवाय काश्मीरचे शासक जैन-उल-अबीदीन यांनी देखील एक महत्वाची भूमिका पार पाडली आहे. त्यांनी विणकरांना तुर्कस्थान आणि अधिक उच्चप्रतीच्या तंत्राशी ओळख करून दिली.

image


एकीकडे इथे पश्मीन्याची सुंदर शाल मिलान आणि पँरिसच्या बाजारात दोन लाख डॉलरपेक्षा जास्त किंमत मिळवते तर दुसरीकडे या पश्मीना मेंढ्यांचा सांभाळ करणा-या निर्धन गुराख्यांना आणि एकच एक शॉल तयार करायला महिनोंमहिने लागणा-या मेहनती कारागिर आणि महिला या भागातील प्रतिकूल पर्यावरणाशी आणि अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत आपले जीवन जगत आहेत. त्यांना त्यांच्या कलेच्या योग्य किमतींची माहितीच नाही आणि शतकांपासून दलाल त्यांचे शोषण करत आहेत. जेंव्हाही आपातस्थितीत वर चर्चा केलेल्या संकटाची स्थिती येते तेंव्हा त्यांना आपले अस्तित्व वाचविण्यासाठी अजून अडचणींचा सामना करावा लागतो.

image


जेंव्हा बाबर यांनी या क्षेत्रात पाऊल ठेवले तेव्हा त्यांना दिसले की, लडाख, बसोहली आणि काश्मीरच्या हिमालयीन पट्ट्यात पसरलेल्या पश्मीनाच्या वस्तुस्थितीतील तंत्राशी जुळलेले लोक मोठ्या गतीने कमी होत आहेत. ते सांगतात की,“जगाला छान पश्मीना लोकर देणा-या पश्मीना मेंढ्या अठरा हजार फूटांपेक्षा जास्त विषम पर्यावरणीय परिस्थितीत आणि शून्य ते तीस डिग्री कमी तापमानात आढळतात. आणि अन्नाच्या शोधातील या गुराख्यांचा समूह एकमेव असा समूह आहे जो या परिस्थितीत जिवंत राहण्यासाठी स्वत:ला शारिरीक आणि मानसिकरित्या बदलण्यात सफल झाला आहे.” त्यांना अपेक्षा आहे की उद्योगाला त्यांच्यात आधिक आर्थिक समज विकसित करून त्यांना विषम परिस्थिती असतानाही या अनोख्या व्यवसायात टिकून राहण्यासाठी मदत करतील. बाबर सांगतात की, “मला भरोसा आहे की आपला समाज आणि पश्मीना मेंढ्या नावाच्या या छान आणि सुंदर प्रजातीसाठी माझी काही जबाबदारी आहे. मला केवळ इतकेच माहित आहे की, ज्या लोकांसाठी मी काम करतो आहे ते स्वबळावर लढण्यास सक्षम नाहीत आणि मी आता काहीच केले नाहीतर खूप उशिर होणार आहे.”

५०हजार गुराखी, तीन लाख शेतकरी आणि दोन लाख पश्मीना मेंढ्या

स्थितीशी सामना करण्यासाठी ‘कश्मीरइंक’च्या रुपाने संचालित होत असलेला पश्मीना गोट प्रकल्प तीन सत्रांच्या दृष्टिकोनातून काम करतो आहे. बाबर सांगतात की, “ या योजनेचा मूळ विचार पश्मीना पारंपारीक तंत्रात न्यायासाठी लढणे आणि पन्नास हजार गुराखी, तीन लाख शेतकरी आणि महिला तसेच दोन लाख पश्मीना मेंढ्याच्या जीवनाला सुधारण्याचा आहे. आमच्या प्राथमिकतेच्या यादीत सर्वात आधी पश्मीना मेंढ्याचा क्रमांक लागतो. दुसरा या उद्योगाला संपवणा-या नकली पश्मीनाबाबत लोकजागृती करणे आणि तिसरे पश्मीना उद्योगासाठी एक किरकोळ रास्त व्यावसायिक व्यासपीठ तयार करणे आहे जे या परंपरेत जोडलेल्या गुराखी, कारागीर आणि विणकरांचे प्रतिनिधित्व करेल.”

image


दलालांची हकालपट्टी करणे

दलालांना मधून हटवून जगभरातील शुध्द पश्मीन्याच्या शोधासाठी येणा-यांना सरळ या समाजाशी संपर्क घडवून त्यांनी वास्तवात सुरुवातीलाच प्रभाव दाखवला आहे. यावर सहमती देताना बाबर म्हणतात की,“आम्ही त्यांना सरळ लिलावात भाग घेणे आणि सर्वाधिक मुल्य देणा-यांना आपले उत्पादन विकण्यात मदत करतो. आम्ही पश्मीनाची शुध्दता आणि ते खरेदी करताना घ्यायची काळजी याबाबत शंभरपेक्षा जास्त देशात जागतिक जागृती निर्माण करत आहोत. त्यामुळे लाखो लोकांचे जीवन सुधारण्यास मदत मिळणार आहे. आम्ही या गुराखी, अन्नाचा शोध घेणारे आणि कारागिरांना सरळ फँशन विश्वाची ओळख करून देतो जेणकरून त्यांना त्यांच्या मेहनतीचे उचित मुल्य मिळावे.”

बाबर सांगतात की, त्यांच्या माहितीनुसार जगात ते एकमेव पश्मीना कार्यकर्ता आहेत आणि त्याचमुळे ते आपल्या राज्यात खूपच लोकप्रिय झाले आहेत. ते सांगतात की,“हे न सांगता समजण्यासारखे आहे की माझा सर्वात जास्त विरोध या क्षेत्रातील पश्मीना व्यापारी करतात. मला काहीही करताना थांबविण्यासाठी त्यांनी आपल्या टाचांपासून शेंडीपर्यंतचा जोर दिलेला आहे. हा एक असा उद्योग आहे ज्यात बहुतांश व्यवहार रोखीने होतात आणि त्यांना मोठ्या नावांनी प्रभावित केले जाते. अशावेळी माझ्या कामाचा सर्वाधिक प्रभाव दलालांवर पडतो आहे. मी कायदेशीर नोटिसा आणि खटल्यांच्या माध्यमातून अनेक व्यापा-यांवर धाक बसविला आहे आणि सारेच आता आक्रमक पवित्रा दाखवतात.”

दुसरे धोके

जरी दलाल विखुरलेले असले तरी या नाजूक उदयोगासाठी ते सर्वात मोठा धोका आहेत. भारतीय हातांनी तयार करण्यात आलेल्या पश्मीन्याला टक्कर देण्यासाठी चीनने बाजारात यंत्र आणि यंत्रमागावर तयार केलेल्या पश्मीन्याची बरसात केली आहे. खंत व्यक्त करताना बाबर सांगतात की, “आमचा पश्मीना चिनी पश्मीन्याच्या तुलनेत खूपच उत्कृष्ट आहे. सोबतच काश्मीरी कशिदाकारीला जगात तोड नाही. सोंजीच्या कठीण कामानंतर एक अत्यंत कठीण पश्मीना शॉल तयार करण्यास एक ते सात वर्ष लागतात. ही कला यंत्र आणि यंत्रमागांशी जितकी अधिक स्पर्धा करत चालली आहे तितकीच ती दुर्लभ होत चालली आहे. आणि त्यामुळे ती अनुपलब्ध होत असल्याने तिच्या किमती आकाशाला भिडतात,”

ते गुराख्याच्या जीवनात सुधारणांसाठी तंत्रज्ञान आणि विज्ञानाची मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. बाबर सांगतात की,“मी भटक्या गुराख्यांसाठी एक असे एप्लीकेशन तयार केले आहे जे त्यांना लोकर तयार होताच हिमालयाच्या उंचावरील भागात पोहोचण्यास मदत करेल. ज्यामुळे हवामान, किंमती लिलाव, आणिबाणीतील औषधोपचार याबाबतचे मोबाइल अलर्ट मिळवू शकतात. त्याच्या मदतीने ते केवळ आपल्या परिवारांच्या नाहीतर जागतिक खरेदीदारांच्या संपर्कात राहतील. मी या विचाराच्या योजनेसाठी आयआयटीच्या काही लोकांची मदत घेत आहे. त्यानंतर माझा विचार विणकरांना आणि कारागिरांना एक असे व्यासपीठ मिळवून देण्याचा आहे जे आंतरराष्ट्रीय बाजारातून डिझाइनची माहिती घेण्यास मदत करु शकेल. त्यामुळे ते अशी उत्पादने बनविण्यात यशस्वी होतील जी बाजारात अधिक किंमतीना विकली जाऊ शकतील.”

आतापर्यंतचा प्रवास

बाबर यांचा आतापर्यंतचा प्रवास आव्हानात्मक राहिला आहे, पण त्यांच्या प्रयत्नाला आता यश येताना दिसते आहे. त्यांनी ‘काश्मीरइंक’ ला आपल्या व्यक्तिगत बचतीतून बूटस्ट्रँप केले होते परंतू आता काही गुंतवणूकदार या उभरत्या उद्योगाच्या विस्ताराची योजना आखण्यास उत्सूक आहेत. बाबर सांगतात की,“आम्ही काही गुंतवणूकदारांशी चर्चांच्या अंतिम टप्प्यात आहोत.” याशिवाय काही खूपच प्रतिभावान लोक ‘काश्मीरइंक’च्या लवकरच समोर येणा-या व्यवस्थापकीय संघात सदस्य म्हणून पहायला मिळतील. ‘काश्मीरइंक’ला आतापर्यंत एक दशलक्ष अमेरिकी डॉलरच्या मागण्या प्राप्त झाल्या आहेत. त्यांच्या सिग्नेचर पश्मिना शॉल दोन लाख डॉलर्सना विकल्या जात आहेत.

भविष्यातील योजना

आपल्या स्टार्टअपच्या भविष्याबाबत विचारणा केली असता बाबर खूप सकारात्मक आणि निश्चयी दिसतात. ते म्हणतात की,“माझा यावर विश्वास आहे की दुनिया खुल्या मनाने आमचे स्वागत करण्यास तयार आहे. आतापर्यंत कुणीही कधीही असा प्रयत्नदेखील केला नाही. पश्मीना नेहमीच महाराजे-महाराण्यांच्या परीधानांमध्ये व्यक्तिगत संग्रहात एक किमती हिस्सा म्हणून राहिले आहे, जे एका पिढीकडून दुसरीकडे येत राहिले आहे. आमचे उत्पादन विलासीता, फँशन आणि परंपरा यांचे मूळ आहे. लवकरच आम्ही जगभरातील मोठ्या देशात आपली उत्पादने पोहोचविण्यात यश मिळवू”.

उद्यमितेबाबत त्यांचा दृष्टीकोन आदर्शवादी विचारांनी ओतप्रोत आहे. पण ते निराशावादाची रेवडी उडवत आपल्या समविचारी लोकांना सरळ सल्ला देतात की, “ उद्योजकता समस्या सोडवण्याचे नाव आहे आणि तरूणांना मोठी पावले टाकली पाहिजेत, या पुढे या सहभाग घ्या.”