गावपातळीवर प्रत्येक महिलेला आत्मनिर्भर करण्यासाठी धडपडणाऱ्या मोरमबाई तंवर

गावपातळीवर प्रत्येक महिलेला आत्मनिर्भर करण्यासाठी धडपडणाऱ्या मोरमबाई तंवर

Monday November 16, 2015,

3 min Read

त्यांना शिकायची इच्छा होती पण घरची स्थिती तशी नव्हती की त्यांना शिकता यावे. त्याचवेळी मोरमबाई तंवर यांनी मनात ठरवून टाकले होते की, त्या इतर मुलींसोबत तसे होऊ देणार नाहीत. आज मोरमबाई तंवर राजस्थानच्या झालावाड जिल्ह्याच्या मनोहरथाना पंचायत समितीच्या अध्यक्षा आहेत. हा त्यांच्याच प्रयत्नांचा परिणाम आहे की, त्यांच्या पंचायतीमधील सर्व गांवे स्वच्छता आणि त्यासोबतच महिलांच्या शिक्षण आणि त्यांना आत्मनिर्भर करण्यावर जोर देत आहेत.

मोरमबाई नऊ भावंडात सर्वात मोठ्या आहेत, त्यांचे वडील शेतीवाडीचे काम करत असत. त्यामुळे घरची आर्थिक स्थिती बेताची होती. सन २००५ मध्ये त्या आठव्या वर्गात होत्या त्यावेळी लग्न झाल्याने त्यांना शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागले. महत्वाकांक्षी मोरमबाई यांना घरात रिकामे बसणे माहितीच नाही. त्यामुळे त्या ‘लिटरसी इंडिया’ नावाच्या सेवाभावी संस्थेसोबत काम करु लागल्या. तेथे त्यांनी प्रथम शिलाईचे शिक्षण घेतले आणि नंतर संगणकाचे! मोरमबाईंनी जे काही केले ते मनापासून मन लावून केले. तेंव्हाच तर त्यांची ही धडपड पाहून ‘लिटरसी इंडिया’ने त्यांना इतर महिलांना शिलाई आणि संगणकाची माहिती देण्याचे काम दिले. अशाप्रकारे मोरमबाई महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी त्यांना संगणक शिकवू लागल्या.

image


मोरमबाईंचे जीवन सरळपणाने चालले असताना त्यांना समाजासाठीही खूपकाही करण्याची आस होती. एक दिवस त्यांना समजले की, पंचायत कार्यालयात डेटा ऑपरेटर होण्यासाठी दहावीची परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे त्यासोबतच संगणकाचे प्रमाणपत्र असणारा अभ्यासक्रमही पूर्ण केला पाहिजे. त्यानंतर त्यांनी खुल्या शाळेतून दहावीची परिक्षा दिली आणि ती उत्तीर्ण केल्यावर पंचायतीमध्ये डेटा ऑपरेटर या पदासाठी अर्ज केला. सुमारे वर्षभर नोकरी केल्यानंतर त्यांना घरगुती कारणामुळे नोकरी सोडावी लागली. पंचायत समितीमध्ये नोकरी करण्याच्या काळात आणि नंतरही त्यांनी महिलांना शिलाईची तसेच संगणकाची माहिती देण्याचे काम सोडले नाही. हे काम त्यांनी नियमित सुरू ठेवले होते.

image


वर्तमानपत्र वाचण्याची आवड असणा-या मोरमबाई यांनी एक दिवस बातमी वाचली की, जिल्ह्यात पंचायत निवडणूक होणार आहे. त्यासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण हवा. मग काय? मोरमबाई यांना अश्याच संधीची प्रतिक्षा होती जेणेकरून त्यांना समाजाच्या भल्यासाठी काम करता येईल. त्यांच्या मते त्यांनी निवडणूक अर्ज भरला आणि जानेवारी २०१५च्या निवडणूकीत दहा हजारपेक्षा जास्त मतांनी विजयी झाल्या. त्यानंतर फेब्रूवारी महिन्यात मुख्यसमितीच्या निवडणूकीत विजयी होऊन त्या पंचायत अध्यक्षा झाल्या आहेत.

image


मोरमबाईंचे म्हणणे आहे की, त्यांनी ही निवडणूक काही पदे मिळवण्यासाठी नाही तर सरकारी योजनांची माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी लढवली आहे. आज मोरमबाईंच्या देखरेखीत स्वच्छता अभियानांतर्गत शौचालयांची कामे होत आहेत. त्यामुळे फार थोड्या कालावधीत त्यांच्या देखरेखीखाली सव्वीस पंचायतीपैकी दोन पंचायतीनी शंभर टक्के कामे पूर्ण केली आहेत, तर इतर पंचायतीमध्ये कामे वेगात सुरू आहेत. त्यासाठी त्या महिलांना जागृत करण्याचे काम करतात. याशिवाय त्या शाळा आणि आंगणवाडीच्या कामावर विशेष लक्ष देतात.

image


त्या म्हणतात की, त्यांचे लक्ष या गोष्टींवर राहते की, त्यांच्या भागातील शाळा अंगणवाड्या वेळेवर सुरू झाल्या पाहिजेत आणि योग्य प्रकारे चालवल्या पाहिजेत. त्याशिवाय ज्या महिलांची आधारकार्ड तयार झाली नाहीत त्यांना त्या मदत करतात. त्यासोबतच त्या महिलांना पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेसाठी जागृत करतात. त्यांचे म्हणणे आहे की, महिलांचा विकास झाला तरच या भागाचा विकास होणार आहे.