तीन अशिक्षित महिलांनी उभारली करोडोंची कंपनी, १८ गावातील ८००० महिलांना बनविले स्वावलंबी

तीन अशिक्षित  महिलांनी उभारली करोडोंची कंपनी, १८ गावातील ८०००  महिलांना  बनविले स्वावलंबी

Friday April 01, 2016,

4 min Read


कठोर परिश्रमाच्या साथीने मोठ्या संकटांवर सहज मात करता येते. राज्यस्थानच्या धौलपुरच्या तीन अशिक्षित स्त्रियांनी या उक्तीवादाला योग्य दिशा दिली आहे. सावकाराच्या व्याजाने कंटाळलेल्या या स्त्रियांनी दुध विकून आज करोडोंची उलाढाल करणारी एक कंपनी उभारली आहे. त्यांच्या या यशाचे मूलमंत्र शिकण्यासाठी व्यवस्थापन शाळेचे विद्यार्थी त्यांच्या गावाला भेट द्यायला येतात.

image


या मनोरंजक गोष्टीची सुरवात ११ वर्षापूर्वी सुरु झाली जेव्हा धौलपुरच्या करीमपुर गावात लग्न करून तीन स्त्रिया अनिता, हरीप्यारी व विजय शर्मा यांचे आगमन झाले. हलाखीची आर्थिक परिस्थिती व नवऱ्यांचा नाकर्तेपणामुळे या तिघी मैत्रिणी झाल्या व कौटुंबिक जबाबदारी पेलण्याचा त्यांनी निर्णय घेतला. ६-६ हजार रुपयांवर सावकारी कर्जावर त्यांनी म्हशी विकत घेतल्या. एका गावकऱ्याने सांगितले की तुम्ही जर म्हैस पाळली तर गवळी (दुध विकत घेणारा व्यापारी) घरी येऊन दुध विकत घेईल. पण झाले उलटे. त्या कर्जाच्या या दलदलीत बुडत गेल्या. गवळी रोज कारणं सांगून दुध घेऊन जाण्यास नकार देऊ लागला, दबाव आणून त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा किंमतीत दुध खरेदी करू लागला. कधी दुधात चरबी कमी तर कधी दुधात पाणी जास्त तर कधी डेअरी वाले पैसे देत नाही अशा अनेक सबबी सांगू लागला. गवळी त्यांना निम्मीच रक्कम देत असे, परिस्थिती हाताबाहेर जातांना बघून तिघी मैत्रिणी स्वतः दुग्धालयात जावून दुध देऊ लागल्या. हळूहळू त्यांनी एक जीप भाड्याने घेऊन जवळपासच्या गावातील दुध गोळा करून दुग्धालय केंद्रात जमा करू लागल्या ज्यामुळे त्यांना आर्थिक नफा होऊ लागला. अनिता सांगतात की,’’ तेव्हा आम्ही दिवसरात्र काम करू लागलो. पहाटे तीन वाजेपासून आम्ही १००० लिटर दुध गोळा करायचो. स्त्रियांना गवळ्या ऐवजी आम्ही चांगली किंमत द्यायचो त्यामुळे सगळ्याजणी आम्हाला विश्वासाने दुध विकू लागल्या’’. इथूनच त्यांनी यशाचा पहिला स्वाद चाखला. दुधाची वेळेत ने-आण करून त्यांचे वेळेत पेमेंट करायचे यामुळे त्यांच्या कडे दुधाच्या खरेदीची मागणी वाढू लागली तेव्हा त्यांनी स्वतःचे संकलन केंद्र उघडले. आता प्रत्येक जागेवरून स्त्रिया यांच्या केंद्रावर दुध आणून विकत असे. हरीप्यारी सांगतात की," जेव्हा दुधाचे कलेक्शन जास्त झाले तेव्हा आम्ही त्यांच्या योग्य नियोजनासाठी व धंद्याच्या व्याप्तीसाठी सरकार व एनजीओ शी संपर्क साधला व सरकारच्या मदतीने आम्ही एक स्वयं सहायता ग्रुप बनवला. आमची मेहनत बघून अनेक लोक आमच्या मदतीला येवू लागले".

image


आर्थिक नियोजनाच्या पूर्ती साठी त्यांनी प्रदान संस्थांच्या मदतीने स्त्रियांचा एक स्वयं सहायता समूह बनवून कर्ज घेतले. त्यानंतर १ ऑक्टोबर २०१३ मध्ये एक लाखाच्या उत्पन्नाने त्यांनी सहेली प्रोडुसर नावाची एक उत्पादन कंपनी बनवली. मंजली फाउंडेशनच्या तांत्रिक मदतीने करीमपूर गावात दुधाचा प्लांट लावला यासाठी नाबार्ड कडून त्यांनी चार लाख रुपयांचे कर्ज घेतले. आपल्या कंपनीचे शेअर्स ग्रामीण स्त्रियांना विकण्यास प्रारंभ केला.आज कंपनीच्या ८००० ग्रामीण स्त्रिया सभासद असून त्या कंपनीला दुध पण देतात. कठोर परिश्रमाने फक्त अडीच वर्षात कंपनीची उलाढाल दीड करोडची झाली. कंपनीला सरकारने ५ लाख रुपये प्रोत्साहनाच्या रुपात दिले आहे जे कर्जाच्या रुपात इतर स्त्रियांना देऊन गवळ्याच्या जाळ्यातून मुक्त करून, कंपनीला दुध देण्यासाठी प्रेरित करण्याचे निर्देश दिले गेले. विजय शर्मा यांनी सांगितले की,’’प्रारंभी त्यांना घराच्या बाहेर जाण्यास बंधन होते त्याच आता मोकळ्या हवेत श्वास घेऊन जयपूर व दिल्लीपर्यंत जातात. स्वतःला तर रोजगार मिळालाच पण इतरांना पण त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. आज कुणासमोर पैशासाठी हात पसरावा लागत नाही. आज आमचे कुटुंब आदर्श कुटुंब बनले आहे’’.

image


अशा प्रकारे स्त्रियांना मिळतो लाभ

गावात गवळी २०-२२ रुपये प्रती लिटर स्त्रियांकडून दुध विकत घेतात, तेच कंपनी ३०-३२ रुपये लिटर मध्ये विकत घेते. ज्यामुळे दुध देणाऱ्या प्रत्येक स्त्रीला सुमारे १५०० रुपये मासिक उत्पन्न होते. या शिवाय शेअर्सप्रमाणे कंपनीच्या नफ्यामध्ये भागीदारी मिळते. कंपनीला दुध विकणाऱ्या कुसुमदेवी सांगतात की,’’ कंपनीशी करार करून दुधाचा व्यापार चारपटीने वाढला आहे. कंपनीकडून आगावू रक्कम मिळते ज्यामुळे त्यांनी आपल्या मुलीचा १२वी मध्ये प्रवेश घेतला आहे व तिला जयपूरमध्ये शिक्षणासाठी पाठवू इच्छिता आणि हे सगळे कंपनीशी केलेल्या करारामुळे शक्य झाले आहे.

असे काम करतात स्त्रिया

सुमारे १८ गावातील स्त्रिया कंपनीच्या सभासद आहे. प्रत्येक गावातील स्त्रियांच्या घरी दुध संकलन केंद्र बनवले आहे. जिथे स्त्रिया स्वतः दुध देऊन जातात. गावाला ३ क्षेत्रात विभाजित करून वेगवेळ्या गाड्या दुध गोळा करून करीमपुरच्या प्लांट पर्यंत पोहचवतात. प्लांटवर २० हजार रुपये मासिक वेतनावर उच्च शिक्षित ब्रजराजसिंह यांना मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त केले आहे. महिलांच्या कंपनीत काम करणारे ब्रजराजसिंह सांगतात की,’’ या तीन स्त्रीयांमुळे पुरुषांची मानसिकता बदलली आहे आहे. काही पुरोगामी पुरुष आपल्या स्त्रियांना बाहेर जाण्यास बंदी घालत असे पण आता ते सुद्धा स्वतः त्यांना इथे घेऊन येतात’’.

म्हणतात ना आरंभ हा कुठून तरी होत असतो तसेच या तीन मैत्रिणींच्या अडचणींनी एक असे रूप घेतले की आज एका घटनेने त्यांचेच नाही तर आजूबाजूच्या १८ गावातील स्त्रियांचे आयुष्य बदलले आहे. हे एक सत्य आहे घरातील स्त्री आनंदी व आत्मनिर्भर असेल तर पूर्ण कुटुंब सुखी आणि संपन्न बनते.   

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

चार अशिक्षित आदिवासी महिलांच्या ‘घुमर’ स्वयंसेवी गटाने बनविली कोट्यावधींच्या उलाढालीची कंपनी! जंगलातून सीताफळ आणून विकणा-यांची कामगिरी !

आठवी शिकलेल्या शीला यांनी बंजारा समाजाच्या स्त्रियांना बनवले आत्मनिर्भर 

शिकवणीच्या पैशांनी सुरु केलेल्या ‘फिटवर्कस’ने ५०० स्त्रियांना दिले फिटनेसचे प्रशिक्षण



लेखिका : रिम्पी कुमारी

अनुवाद : किरण ठाकरे           

    Share on
    close