मज्जातंतूंच्या आजारावर उपचारासाठी सायक्लॉप्स कंपनीने तयार केलं नवं तंत्रज्ञान

मज्जातंतूंच्या आजारावर उपचारासाठी सायक्लॉप्स कंपनीने तयार केलं नवं तंत्रज्ञान

Sunday December 13, 2015,

3 min Read

देशात आरोग्य आणि औषध विषयक तंत्रज्ञानाची अनेक स्टार्ट्अप्स सुरु झाली आहेत. पण प्रत्यक्षात आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी त्यातील मोजकेच स्टार्टअप्स उपयुक्त असल्याचं डॉक्टर वीरेन शेट्टी सांगतात. शेट्टी हे नारायण ह्रदयालय हॉस्पिटलचे धोरणविषयक संचालक आहेत. अनेक स्टार्टअप्स हे एका संकल्पनेतून जन्माला येतात आणि त्यांच्याकडे परिपूर्ण उपाययोजना असल्याचा त्यांचा दावा असतो. तसंच इतरांचं ऐकून घ्यायलाही ते तयार नसतात. एका तासाच्या संभाषणात ते जवळपास ८० टक्के वेळ स्वत: बोलतात आणि इतरांचं काहीही ऐकत नाहीत. त्यामुळे खुल्या मनानं ऐकणं गरजेचं असतं असं डॉक्टर शेट्टी सांगतात.

हीच दरी मिटवण्यासाठी डॉ. डी.आर श्रीनिवास, रवी नायर आणि उद्योजक निरंजन सुब्बाराव यांनी सायक्लॉप्समेडची सुरुवात केली. हे वैद्यकीय तंत्रज्ञानावर एक आधारित ऍप आहे. यामध्ये चक्कर येण्यासारख्या मज्जातंतूच्या आजारांवर आय ट्रॅकिंग तंत्रज्ञान वापरून उपचार केले जातात.


image


जवळपास एक दशकभर डॉ. श्रीनिवास वारंवार मज्जातंतूचे आजार असणाऱ्या रुग्णांवर उपचार करत आहेत (इएनई). ईएनई सर्वसामान्यपणे अगदी प्रचलित अशा स्थितीत आढळणाऱ्या लोकांचा एक गट आहे. पण त्यांच्यावर उपचार मात्र होताना दिसत नाहीत. जगभरातील जवळपास १०० दशलक्षापेक्षाही जास्त लोकांना चक्कर किंवा फीट येण्याचा दीर्घकालीन आजार आहे. हा एक सर्वसामान्य इएनई आहे.

डॉक्टरांच्या समोर झटका येणं आणि लगेचच ती समस्या समजून घेऊन त्यांच्याकडून समोरच निदान होणं हे अगदी अपवादानं घडतं. त्यामुळेच उपचार हे रुग्णांनी दिलेल्या माहितीवर आणि वैद्यकीय निदानावरच आधारित असतात.

पण अशा प्रकारे मिळालेली माहिती ही मूळ झटका येतो त्यासारखी नसते. अनेकदा रुग्णांकडून मिळालेली माहिती ही गोंधळलेल्या मनस्थितीत दिलेली असते आणि वैद्यकीय निदानही मूळ झटक्यासारखे नसते.

बहुतेकदा झटका कशा प्रकारचा आहे हे समजून घेण्यासाठी डॉ. निरंजन यांना रुग्णांची घरं आणि कार्यालयं यांच्यामध्ये कसरत करावी लागते. निरंजन श्रीनिवास यांच्यासोबत एका शस्त्रक्रियेबाबतच्या प्रकल्पात काम करत होते. त्यावेळेस दोघांमध्ये या विषयावर चर्चा झाली.

रुग्णांकडून मिळालेल्या माहितीवर अवलंबून न राहता १०० टक्के अचूक माहिती कशाप्रकारे मिळवता येईल यावर ते दोघं विचार करत होते. त्यातूनच त्यांना हॉल्टर हार्ट मॉनिटर अर्थात हॉल्टर ह्रदय नियंत्रकाची कल्पना सुचली. रुग्ण हे उपकरण त्यांच्या घरीही घेऊन जाऊ शकतात.

जेव्हा रुग्णाला झटका येईल त्यावेळच्या नैसर्गिक स्थितीमधली माहिती घेता येऊ शकेल अशा उपकरणावर काम सुरू आहे. हे उपकरण चष्म्याच्या स्वरुपात असेल. त्याला आयट्रॅकिंग कॅमेरा आणि अन्य काही सेन्सॉर्स असतील. हे उपकरण क्लाऊड बेस्ड वातावरणात काम करेल, असं निरंजन सांगतात.

वैद्यकीय तंत्रज्ञान हार्डवेअर स्टार्टअप असल्यानं नमुन्यासाठी स्रोत आणि प्रयोगशाळा मिळवणं आवश्यक आहे पण अत्यंत अवघडही आहे. त्यामुळेच डॉ. रवी नायर यांनी या टीमची ओळख आयआयटी कानपूरच्या माजी विद्यार्थ्यांशी करून दिली. हे विद्यार्थी नुकतेच अमेरिकेत काही वर्ष काम करून भारतात परतले होते. त्यांनी नमुन्यांसाठीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

यावर्षीच्या जानेवारीमध्ये सायक्लॉप्सचं ऍप औपचारिकरित्या बाजारात आलं असलं तरी दोन वर्षांपासून या संकल्पनेवर टीमचं काम सुरु होतं. डॉ. श्याम वासुदेव राव उद्योगक्षेत्रातले मान्यवर आहेत आणि आमचे मार्गदर्शकही आहेत. संगणक क्षेत्रात व्हिजन आणि इमेज प्रोसेसिंगमध्ये प्रचंड अनुभव असलेल्या टीमनं खूप मदत केली. हेच तंत्रज्ञान आमच्या उत्पादनाचा कणा आहे, असं निरंजन सांगतात.


image


नमुन्यांचे एका आठवड्यात प्रमाणीकरण होणार आहे. त्यानंतर वैद्यकीय भाग एप्रिल 2016 मध्ये सुरु होईल. ही टीम बंगळुरुच्या बीएमएस कॉलेजच्या सेंटर फॉर बायोमेडिकल इनोव्हेशन्स इथं वसलेली आहे. आम्ही सध्या आमची कोअर टीम बनवण्याच्या प्रक्रियेत आहोत. सध्या आम्ही अगदी थोड्याशा भांडवलावर काम करत आहोत आणि त्यातून आमचं उत्पादन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे आम्ही सध्या मॉडेल बाहेरून मागवत आहोत, असं निरंजन सांगतात. निधीची संकल्पना उत्पादनाची विक्री आणि क्लाऊडचं सदस्यत्व यांच्यावरच काम करणार आहे. सुरुवातीला उत्पादन सुरु करण्यासाठीचा निधी टीमनं बंगळुरुच्या एका विख्यात सर्जनकडून मिळवला होता.

लेखक- सिंधू कश्यप

अनुवाद – सचिन जोशी