अशक्याला शक्य करून दाखवणा-या, देशाच्या पहिल्या ‘ब्लेड रनर’ किरण कनोजिया!

अशक्याला शक्य करून दाखवणा-या, देशाच्या पहिल्या ‘ब्लेड रनर’ किरण कनोजिया!

Thursday December 24, 2015,

4 min Read

अशक्य हा शब्द कदाचित त्यांच्यासाठी बनलेलाच नाही. पराभवाचे तोंड पाहणे हे तर त्यांना माहितच नाही आणि थांबणे त्यांनी कधी शिकलेच नाही. हो, आम्ही बोलत आहोत, भारताच्या पहिल्या महिला ब्लेड रनर किरण कनौजिया यांच्याबद्धल. ज्यांनी स्वतःच्या बळावर आणि धैर्याने देशात नाव कमाविले, तसेच लोकांना कठीण परिस्थितीला तोंड देऊन त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रेरित केले.

किरण फरीदाबाद येथे राहणा-या आहेत, त्यांनी एमसीए केले आहे आणि त्या हैदराबादमध्ये इंफोसिस कंपनीत काम करत आहेत. वर्ष २०११ मध्ये जेव्हा त्या आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी हैदराबादहून आपल्या घरी फरीदाबाद येथे येत होत्या तेव्हा, पलवेल स्टेशनकडे दोन बदमाश लोकांनी त्यांचे सामान हिसकावण्याचा प्रयत्न केला, किरण यांनी त्यांच्याशी संघर्ष केला. मात्र त्या दरम्यान किरण खाली ट्रॅकवर पडल्या, त्यानंतर त्यांना त्वरित रुग्णालयात नेण्यात आले, जेथे उपचार करताना डॉक्टरांना त्यांचा पाय कापावा लागला.

image


हे खूपच दु:खद क्षण होते. कारण किरण यांनी हार पत्करली नाही, त्यांना आयुष्यभर कुणाची दया नको होती. त्यांनी मनातल्या मनात विचार केला की, जे झाले ते आता बदलू शकत नाही, मात्र येणा-या भविष्याला त्यांना स्वतः घडवायचे होते आणि स्वतःच्या कमजोरीलाच आपले शस्त्र बनवायचे होते आणि देशातच नव्हे तर, जगभरात नाव कमवायचे होते.

किरण नेहमीपासूनच आपल्या तंदुरुस्तीबाबत खूपच खबरदारी बाळगायच्या. त्या एरोबिक्स करायच्या. ६ महिन्याच्या अंतरानंतर जेव्हा त्या उठल्या, त्या पुन्हा पडल्या आणि त्यांना पुन्हा रुग्णालयात घेऊन जाण्यात आले, जेथे त्यांच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली आणि डॉक्टरांनी त्यांना सांगितले की, आता त्यांना धावणे, पळणे यापासून लांबच राहिले पाहिजे. या शब्दांना किरण यांनी एका आव्हाना सारखे घेतले, त्यानंतर जेव्हा त्या आपल्या घरी पोहोचल्या तेव्हा त्या जुन्या सर्व गोष्टी विसरल्या होत्या आणि नव्या पद्धतीने आपल्या आयुष्याला वळण देऊ इच्छित होत्या. कारण किरण त्यांच्या घरातील सर्वात मोठ्या होत्या. त्यामुळे कुटुंबाप्रती त्या आपल्या जबाबदारीला समजत होत्या. त्या पुन्हा नोकरी करण्यास गेल्या जेथे त्यांच्या सहका-यांनी त्यांची पूर्ण मदत केली. त्यांनी कृत्रिम पायाचा प्रयोग करण्यास सुरुवात केली, ज्यात त्यांना सुरुवातीस त्रास देखील झाला. हैदराबाद मध्ये त्यांना आपल्या सारख्या अनेक व्यक्ती भेटल्या. किरण दक्षिण पुनर्वसन केंद्रात गेल्या, जेथे त्यांनी पाहिले की, लोक धावण्यासाठी ब्लेडचा (कृत्रिम पाय) वापर करत होते. तेथील डॉक्टरांनी त्यांचे मनोबल वाढविले आणि त्यांना ब्लेडचा वापर करण्यास सांगितले. ब्लेडला लावल्यानंतर किरण यांनी पहिले की, त्या आता सहजरित्या धावू शकत होत्या. त्यानंतर तेथील अन्य लोकांनी एक गट बनविला आणि एकमेकांना प्रोत्साहित करू लागले. हे सर्व जेव्हा एकत्र मॅराथॉनसाठी निघाले तेव्हा, त्यांना बघून लोकांनी देखील त्यांचे खूप मनोबल वाढविले. त्या पाच किलोमीटरने सर्वांचा आत्मविश्वास वाढविला.

image


त्या दिवसानंतर किरण यांनी हळू हळू धावण्याचा सराव सुरु केला. त्या धावायला लागल्या. आता त्यांच्यासाठी गोष्टी थोड्या सहज झाल्या. हैदराबाद रनर्स ग्रुपचे लोक देखील त्यांची खूप मदत करायचे. पहिले त्या पाच किलोमीटर धावल्या, काही वेळेनंतर त्यांनी आपले लक्ष्य वाढविले आणि १० किलोमीटर पर्यंत धावायला लागल्या. त्यानंतर त्यांनी आपले लक्ष्य २१ किलोमीटर केले. त्या स्वतः सोबतच प्रतिस्पर्धा करायला लागल्या आणि स्वतःला अजून मजबूत बनवायला लागल्या. सकाळी जाऊन सराव करणे आता किरण यांची दिनचर्या झाली होती आणि त्यांना यातून खूप आनंद मिळत होता.

किरण सांगतात की, त्यांनी आपला एक पाय गमविला असला तरी, त्या गोष्टीने त्यांना खूप मजबूत व्यक्ती बनविले. आयुष्याकडे बघण्याची त्यांची नजर आता खूप सकारात्मक झाली आहे. आता त्या आयुष्य खुल्या मनाने जगू इच्छितात आणि आता त्या केवळ स्वत:साठीच नाही तर, अन्य लोकांना प्रेरित करून त्यांच्या आयुष्यात देखील बदल आणू इच्छितात.

image


आज किरण भारताच्या पहिल्या महिला ब्लेड रनर आहेत. त्यांनी मुंबई, हैदराबाद, दिल्ली सहित अनेक शहरांमध्ये होणा-या मॅराथॉन शर्यतीत भाग घेतला आहे. त्या सांगतात की, या पूर्ण प्रवासात त्यांना सर्वांचे सहकार्य मिळाले. त्यांच्या कुटुंबातील असो, त्यांचे मित्र असो किंवा ते लोक असोत ज्यांना त्या कधी ओळखत नव्हत्या. मात्र, त्यांना धावताना पाहून त्यांच्याकडे येतात आणि त्यांना शुभेच्छा देतात.

किरण आता आपल्या सारख्याच लोकांना मदत करतात, त्या त्यांना प्रगती करण्यासाठी प्रेरित करतात आणि त्यांचे मनोबल वाढवतात.

image


धावण्या व्यतिरिक्त त्या पूर्णवेळ नोकरी देखील करत आहेत आणि दोन्ही गोष्टींना खूप चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत. किरण सांगतात की, जिंकणे आणि हरणे केवळ आपल्या डोक्यात असते, जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवू आणि आयुष्याला सकारात्मकरित्या घेऊ तेव्हा जीवन जगणे कठीण होणार नाही. आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल.

image


किरण येणा-या काळात वेगवेगळ्या प्रदेशात जाऊन विभिन्न मॅराथॉन शर्यतीत आणि पैराऑलंपिक्स मध्ये भाग घेऊ इच्छितात आणि पदक जिंकून देशासाठी काहीतरी करू इच्छितात. किरण सांगतात की, त्या मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत आणि ब्लेड्स आणि प्रशिक्षण खूपच महाग असते. त्यासाठी त्या प्रायोजक किंवा सरकारकडून मदतीची आशा करतात. जेणेकरून असे लोक परदेशात जाऊन देशाचे नाव मोठे करू शकतील. किरण अशा एकमेव महिला नाहीत, तर त्या एक आशा आहेत. किरण लाखो लोकांना आयुष्य जगण्यासाठी मनोबल वाढवत आहेत. त्या पराभव न स्वीकारण्याचे दुसरे नाव आहे, जर तुम्हाला त्यांची मदत करायची असेल तर, कुणीही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून त्यांची मदत करू शकता.

https://www.generosity.com/sports-fundraising/kiran-kanojia-for-marathon

लेखक: आशुतोष खंतवाल

अनुवाद : किशोर आपटे.