शिक्षणाला सहज आणि मनोरंजक बनवते “परवरिश, द म्युजियम स्कूल”!

शिक्षणाला सहज आणि मनोरंजक बनवते “परवरिश, द म्युजियम स्कूल”!

Saturday January 09, 2016,

5 min Read

संग्रहालय असे ठिकाण असते, जेथे एखाद्या देशाची कला-संस्कृती आणि इतिहासाला खोलपर्यंत ओळखले जाऊ शकते, त्याला पाहिले आणि समजले जाऊ शकते, मात्र कधी कुणी विचारही नसेल केला की, संग्रहालयाचा उपयोग शिक्षणासाठी देखील होऊ शकतो. भोपाळमध्ये राहणा-या शिबानी घोष यांनी आपल्या शहराच्या विभिन्न संग्रहालयाला केवळ शिक्षणानेच जोडले नाही तर, त्यांच्या मदतीने त्यांनी हजारो मुलांचे भविष्य देखील साकार केले आहे. आज शिबानी घोष “परवरिश, द म्यूजियम स्कूल” मार्फत गरीब आणि झोपडपट्टी भागात राहणा-या मुलांना चांगल्यात चांगले शिक्षण देण्याचे काम करत आहेत. हेच कारण आहे की, एकेकाळी या शाळेत शिकलेली मुले आज अभियंता आणि दुस-या क्षेत्रात आपले नाव कमावित आहेत.

image


शिबानी घोष जेव्हा बीएडचे शिक्षण घेत होत्या, तेव्हा त्यांनी बघितले की, जी शिक्षण व्यवस्था आणि कौशल्य त्या शिकत होत्या, ते खूप चांगले आहे. मात्र त्याचा वापर अधिकाधिक शाळेत होत नाही. तेव्हा त्यांनी विचार केला की, बीएडचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर जर त्या एखाद्या शाळेत शिकविण्याचे काम करतील, तर त्या हे ज्ञान दुस-या मुलांपर्यंत पोहोचवू शकणार नाहीत आणि त्या त्याच पद्धतीत बांधल्या जातील, ज्याप्रकारे आतापर्यंत मुलांना शिकविले जाते. त्यामुळे त्यांनी विचार केला की, त्या अशा मुलांना साक्षर करण्याचे काम करतील, जे गुणवत्तेच्या शिक्षणापासून दूर आहेत. शाळा सुरु करण्यापूर्वी शिबानी देशाच्या विविध भागात गेल्या. त्यांनी पॉंडेचेरीच्या अरविंद आश्रम आणि दुस-या शाळेच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाची माहिती करून घेतली. तेव्हा त्यांना वाटले की, भोपाळमध्ये असलेल्या संग्रहालयाला शिक्षणाचे साधन बनविले जावे.

image


आपली शाळा सुरु करण्यापूर्वी शिबानी यांनी भोपाळच्या विभिन्न भागात सर्वेक्षण केले. येथे त्यांनी पहिले की, या झोपडपट्टी भागात राहणारी मुले शाळेत जात नाहीत. त्या जागी ते दुस-यांच्या घरी नोकरी करत असत, कारण असे करून ते आपल्या कुटुंबाचे आर्थिक ओझे थोडे कमी करू इच्छित होते. सर्वेक्षणा दरम्यान त्यांनी मुलांशी संवाद साधला आणि त्यांना सांगितले की, त्या झोपडपट्टीच्या बाहेर एखाद्या चांगल्या ठिकाणी त्यांना शिकवतील, जेणेकरून ते भविष्यात आपली चांगली कारकीर्द घडवू शकतील. त्यासाठी काही मुले तयार तर झाली, मात्र त्या मुलांना एक चिंता देखील होती की, यामुळे त्यांचा रोजगार बंद तर होणार नाही. त्यामुळे शिबानी यांनी त्यांना आश्वासन दिले की, असे होणार नाही आणि ज्या मुलांना काम करायचे आहे, ते सोबतच शिक्षण देखील करू शकतील. त्याचा खूप सकारात्मक प्रभाव पडला आणि सुरुवातीलाच चाळीस मुले त्यांच्यासोबत शिकण्यासाठी तयार झाली. त्यासाठी त्यांनी मुलांना शिकविण्यासाठी संध्याकाळी ३वाजेपासून ५वाजेपर्यंतचा वेळ निश्चित केला. सोबतच भोपाळच्या ५संग्रहालयासोबत हात मिळविला. या संग्रहालयांमध्ये विभागीय विज्ञान केंद्र,मानव संग्रहालय, स्टेट म्युजियम, नॅशनल हिस्ट्री म्युजियम आणि आदिवासी म्युजियम सहभागी होते.

image


याप्रकारे सप्टेंबर, २००५पासून “परवरिश, द म्युजियम स्कूल”ची सुरुवात झाली. युअर स्टोरीला शिबानी सांगतात की, “सुरुवातीला आम्ही एक बस भाड्याने घेतली, जी विभिन्न भागात जाऊन मुलांना एकत्र करत असे आणि त्यांना संग्रहालयात नेण्या–आणण्याचे काम करत असे. त्यादरम्यान मुलांना संग्रहालयात फिरण्यासाठी सोडले जायचे. ज्यानंतर मुलांच्या मनात जे प्रश्न उपस्थित व्हायचे, त्यांना तेथेच सोडविले जायचे.” शिबानी यांचे म्हणणे होते की, आमची इच्छा होती की, प्रश्न मुलांकडून यावेत की असे का होते? कसे होते? या दरम्यान आम्ही अभ्यासाबाबत कुठलीही चर्चा केली नाही आणि केवळ त्यांच्या प्रश्नाची उत्तरे दिली.”

हळू हळू जेव्हा मुले त्यात रुची घ्यायला लागली, तेव्हा संग्रहालय दाखविण्यासोबतच त्यांना शिकविणे देखील सुरु केले आणि त्या मुलांचा प्रवेश नियमित शाळेत करायला लागलो. कारण तोपर्यंत त्या मुलांच्या आई वडिलांना देखील समजले होते की, त्यांची मुले शिक्षणात रुची दाखवत आहेत. ज्यानंतर संग्रहालयामार्फत शिबानी आणि त्यांचा गट संग्रहालयाद्वारे त्यांना शिक्षण देण्याचे काम करायला लागल्या.

image


शिबानी यांनी आपल्या जवळ येणा-या मुलांना नँशनल ओपन शाळेतून १०वी आणि १२वीच्या परीक्षा देऊ केल्या. ज्यानंतर आज त्यांच्याकडे शिक्षण घेतलेली अनेक मुले केवळ महाविद्यालयात शिकतच नाहीत तर, काही मुले अभियांत्रिकीचे शिक्षण देखील घेत आहेत. यातील काही मुले अशीही आहेत, ज्यांनी आपला व्यवसाय सुरु केला आहे. शिबानी यांचे म्हणणे आहे की, त्यांचा मुख्य उद्देश शिक्षणासोबतच त्यांचा विकास करणे देखील आहे. त्यामुळे त्यांच्याकडे येणा-या मुलांना ते विभिन्न प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे काम करायला लागले. जेणेकरून त्यांनी शिकवलेली मुले केवळ अभ्यासातच नव्हे तर, कौशल्यात देखील अव्वल रहावीत. हेच कारण आहे की, मागील दहा वर्षादरम्यान बाराशे मुले त्यांच्या पर्यवेक्षणात शिक्षण घेऊन आपले आयुष्य साकार करत आहेत.

image


सध्या जवळपास दीडशे मुले त्यांच्याकडे शिक्षण घेत आहेत. ही शाळा सातही दिवस असते. विशेष बाब ही आहे की, शिक्षणाचे कामकाज तेच लोक सांभाळू शकतात, ज्या मागासवर्गीय भागातून ही मुले येतात. शिबानी यांच्या मते, झोपडपट्टीत भागात राहणा-या १०मुली ज्यांनी शिक्षण घेतले आहे, त्या या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलतात. तर संग्रहालय त्यांचे स्वयंसेवक सांभाळतात. मुलांना पुस्तकी ज्ञान चांगल्या पद्धतीने समजवण्यासाठी हे लोक संग्रहालयात मुलांना त्याच गँलरीत घेऊन जातात, जो विषय ते शिकत आहेत. हे लोक पुस्तकी ज्ञानापेक्षा वेगळी प्रात्यक्षिके करून त्या गोष्टीला समजावितात. त्यामुळे मुले कुठल्याही गोष्टीला जलद आणि सहजरित्या समजतात. उदाहरणासाठी नर्मदा नदीची काय कहाणी आहे, किंवा आदिवासी लोकांचा इतिहास किती जुना आहे, किंवा चुंबकीय गुरुत्वाकर्षणामुळे प्रत्येक वस्तू पृथ्वीवर पडते. मात्र धूर आकाशात का उडतो? या प्रकारच्या सर्व प्रश्नांची उत्तरे संग्रहालयात शिक्षणादरम्यान मुलांना दिले जातात.

image


आज ‘परवरिश, द म्यूजियम स्कूल’ मध्ये शिक्षण घेणारी अनेक मुले दूरचित्रवाणीच्या विविध कार्यक्रमात आपल्या अभिनयाची कला दाखवत आहेत, नृत्यस्पर्धेत सहभागी देखील झाले आहेत. शाळेत मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे कार्यकलाप केले जाते. याप्रकारे कधी एकेकाळी या शाळेत शिकणारा एक तरुण अरुण म्हात्रे नावाचा एक विद्यार्थी आज अभियंत्याचे शिक्षण घेत आहे. त्याची आई दुस-यांच्या घरी घरकाम करत आहे, तर त्याचे वडील एका कंपनीत शिपाई आहेत. शिबानी घोष यांचे म्हणणे आहे की, “आमची योजना या कामाला दुस-या शहरात देखील पसरवण्याची आहे, त्यामुळे आम्हाला अशा संस्थांचा शोध आहे, ज्या आप-आपल्या शहरात मुलांच्या शिक्षणाला संग्रहालयासोबत जोडतील.

लेखक: हरीश बिश्त

अनुवाद : किशोर आपटे.