एका साध्या इव्हेंटमुळे निर्माण झालेल्या छंदाचा ‘विवाह फोटोग्राफी’ मध्ये नावलौकिक

एका साध्या इव्हेंटमुळे निर्माण झालेल्या छंदाचा  ‘विवाह फोटोग्राफी’ मध्ये नावलौकिक

Friday December 04, 2015,

3 min Read

‘द फोटो डायरी’ ची संपादक व संचालिका मोनिशा आजगावकर सांगते की, “ कॉलेजच्या दिवसात माझ्याकडे नोकिया ६६०० फोन होता आणि या फोनच्या कॅमे-या द्वारे शूटिंग करायला मी खूप आतुर असायची. मी जे जे कॉलेज ऑफ आर्ट्स मध्ये प्रवेशानंतरच फोटोग्राफी क्षेत्राशी निगडीत माहिती मिळवणे व शिकणे यास सुरवात केली”. मोनिशा मुंबई स्थित एक व्यावसायिक फोटोग्राफ्रर आहे व तिने फोटोग्राफीच्या संदर्भातील सर्व कला आत्मसात केल्या आहे.

मोनिशा सांगते की, “ जे जे कॉलेज मध्ये ती फोटोग्राफी बद्दल फारशी शिकू शकली नाही कारण तो एक अर्धवेळ अभ्यासक्रम होता. नवनवीन शिकण्यासाठी शाळा व महाविद्यालय हे सगळ्यात चांगले व योग्य माध्यम आहे, परंतु काही व्यावसायिक अनुभवच आपल्याला धंदेवाईक होण्यासाठी मदत करतात. आपण कुठल्याही व्यवसायात तेव्हाच निष्णात होतो जेव्हा आपण त्या व्यवसायात स्वतः उतरतो. मग त्यासाठी लागणारे कौशल्य असो, संबधित लोक असो वा आपले स्थापित संबंध असोत हे सर्व आपल्या व्यावसायिक अनुभवाचाच एक भाग असतात. मी या व्यवसायात सदैव नवीन शिकण्यास आग्रही असते”. मोनिशा हे सांगायला विसरत नाही की त्यांना नेहमी वाटते, कॅमेराचा कोन किंवा प्रकाश योजनेचे काम स्वतः केले असते तर परिणाम आधिक चांगला दिसला असता.


image


या प्रवासादरम्यान आलेले प्रत्येक आव्हान आणि संकट तिला शूटिंग आणि फोटोग्राफी करण्यापासून अडवू शकले नाही. ब्लू फ्रॉग हा त्यांचा शूटिंगचा पहिलाच कार्यक्रम होता. मोनिशा सांगते की, ‘‘संगीताशी एकरूप झाल्याने अंतकरणातून एक प्रेरणा मिळते जी मला पुढे जाण्यासाठी प्रेरित करते.

मोनिशाची फोटोग्राफी क्षेत्रात येण्याची मुळीच इच्छा नव्हती आणि ती माहीम मधल्या डीजे रुपारेल कॉलेज मध्ये मानस शास्त्राचे शिक्षण घेत होती. त्या दरम्यान तिला जाणीव झाली की आपले या विषयाच्या अभ्यासक्रमात मन रमत नाही, तिने लगेच प्रवेश रद्द करण्याचा निर्णय घेतला. या नंतर एक वर्षभर घरी बसून तिने नवनवीन क्षेत्र शोधण्याच्या कामात स्वतःला व्यस्त केले.


image


अशा प्रकारे मोनिशाने फोटोग्राफी क्षेत्रात पाउल टाकले.

मोनिशा सांगते की, “मला एक मुलगी खूप आवडली आणि मी तिच्याबरोबर संगीत कार्यक्रमांमध्ये जाण्यासाठी उत्सुक असायची. तिला प्रभावित करण्याच्या उद्देशामुळे मी तिच्या मागे कॅमेरा घेऊन फोटो काढायला गेली, पण हे एका घटने पुरतेच मर्यादित होते. पण परिणामी मी माझ्या फोटोग्राफीच्या छंदाशी एकरूप होण्यात यशस्वी झाले. अशा प्रकारे कॅमेरा हाताळत मी रोलिंग स्तोनेस, पेज थ्री पार्टी आणि फॅशन शोच्या फोटोग्राफीला प्रारंभ केला. एका मित्राच्या लग्न समारंभातल्या फोटोग्राफीमुळे मी मॅरेज फोटोग्राफीच्या क्षेत्रात पदार्पण केले.” मोनिशाने त्या कॅथलिक लग्नाच्या फोटोग्राफी नंतर ‘द फोटो डायरी’ ची स्थापना केली.

संगीताबद्दल नेहमीच प्रभावित असलेल्या मोनिशाला फोटोग्राफीची आवड होती. फोटोग्राफीच्या निमित्ताने अनेक कलाकारांना भेटण्याची संधी, संगीत व फोटोग्राफी विषयी जाणून घेण्याची जिज्ञासा तिला पुढे जाण्यासाठी प्रेरित करीत असे. अनेक संगीत कार्यक्रम शूट केल्यानंतर पण तिची आवड ‘एनएचसात’ हाच कॅमेरा तिला आवडतो. या व्यतिरिक्त तिने दिल्लीतील ‘टेन हेड्स फेस्टिव्हल’ आपल्या कॅमेरात शूट केले आहे.


image


शिक्षणाचा काळ

एक फोटोग्राफर च्या ढंगात मोनिशा सांगते की, आपल्या आठवणींना उजाळा देण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे त्या क्षणाला आपल्या मनात साठवून ठेऊन त्यात विलीन होणे. या व्यतिरिक्त तिचे मानणे आहे की, फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीच्या पद्धतीत दिवसेंदिवस बदलाव येत असतात. या क्षेत्रातल्या नाविन्यपूर्ण गोष्टी शिकण्याच्या ती प्रयत्नात असते.

मोनिशा सांगते की, “ लग्न समारंभातील क्षण हा अवर्णनीय आणि मौल्यवान असतो म्हणून मी अत्यंत जबाबदारीने ते क्षण आपल्या लेन्स मध्ये साठवून ठेवण्याच्या प्रयत्नात असते, अमिताभ बच्चन यांच्या वजीर चित्रपटा दरम्यान आलेला अनुभव खूप रोमांचक होता. माझ्यासाठी एवढया मोठ्या व्यक्ती बरोबर शूट करण्याचा क्षण हा अविस्मरणीय होता. त्यांच्या कडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या पण अनुभव ही एक अशी शिदोरी आहे की ती व्यक्तीला तिच्या कामात निष्णात बनवते.

‘’द फोटो डायरी’’ च्या विस्ताराची योजना

मोनिशाने लग्न समारंभ, संगीत कार्यक्रम आणि फॅशन शूटच्या क्षेत्रात निपुणता मिळवली आहे. ‘द फोटो डायरी’ ही नावाजलेल्या फोटोग्राफी कंपन्यांमधील एक आहे की जी एकाच मंचावर लग्नाअगोदरच्या व लग्ननंतरच्या फोटोग्राफी व व्हिडीओग्राफी इ. सुविधा पुरविण्यात निष्णात आहे. मोनिशा पुढे सांगते की ती जास्तीत जास्त लग्नाचे फोटोग्राफी व व्हिडीओग्राफी करण्यास आतुर आहे. कारण या क्षेत्रात नवीन कला गुणांना भरपूर वाव आहे.

लेखकः सास्वती मुखर्जी

अनुवाद : किरण ठाकरे