वडिलांनी आणि समाजाने रोखले, तरीही जिवंत ठेवली कलेची जिद्द, आज मुलांचे आयुष्य साकार करत आहेत, शारदा सिंह!

वडिलांनी आणि समाजाने रोखले, तरीही जिवंत ठेवली कलेची जिद्द, आज मुलांचे आयुष्य साकार करत आहेत, शारदा सिंह!

Saturday April 02, 2016,

4 min Read

देशाची प्रतिष्ठीत शिक्षण संस्था बनारस हिंदू विद्यापीठ (बीएचयू) मधून त्यांनी दर्शनशास्त्र यातून पीएचडी केले. सुवर्णपदक प्राप्त केले. नोकरी मिळाली. चांगला पती मिळाला. सासरी सगळे पसंत करणारे भेटले. आयुष्याने प्रत्येक आनंद पदरात पाडला, मात्र त्यांच्या मनात नेहमी पासूनच एक खंत होती. ही खंत होती, त्यांच्यातील लपलेली कला. ज्याला त्यांनी अनेक वर्षांपासून स्वतःच्या मनात दाबून ठेवले होते. मात्र आज कलेमुळे त्या गरीब मुलांचे आयुष्य साकार करत आहेत. मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळे बनारस मधील अर्धा डझन गावांपेक्षा अधिक गावांचे चित्र पालटले आहे. कालपर्यंत गावातील गल्ल्यांमध्ये जी मुले काहीही काम नसताना नुसती फिरायची, ती आज यशाचे नवीन धडे गिरवत आहेत. गावातल्या या मुलांना नवी ओळख देत आहेत, बनारसच्या आदित्यनगर येथे राहणा-या शारदा सिंह. 

image


बनारसचे संस्कृती आणि कलेसोबत जवळचे नाते आहे. अनेक काळापासून येथील कलेला संपूर्ण जग ओळखते. त्याची छाप शारदा सिंह यांच्यावर देखील आहे. जेव्हा त्या आठ वर्षाच्या होत्या, तेव्हा त्यांचे मन कलेकडे वळले. काही दिवसातच को-या कागदावर कुंचला घेऊन रंग भरता भरता त्यांचे हात अशाप्रकारे वळायला लागले, की त्यांचे आणि जणू चित्रकलेचे खूप जुने नाते आहे. हळू हळू ‘पेंटिंग’ शारदा सिंह यांची ओळख बनली. मात्र, दुर्देवाने त्यांच्या या कलेला त्यांचे कुटुंबीय समजू शकले नाहीत. कुटुंब मोठे होते. घरात मुलांना जास्त महत्व दिले जात होते. मुलींना अनेक बंधने होती. त्यांना बीएचयू मध्ये प्रवेश घ्यायचा होता, मात्र घरातल्या लोकांना कदाचित हे मंजूर नव्हते. वडिलांनी त्यासाठी स्पष्ट नकार दिला. 

image


त्या वाक्याची आठवण काढत, शारदा सिंह सांगतात की,“असे नव्हते की माझे वडील माझ्या शिक्षणाच्या विरोधात होते. ते प्रत्येक प्रकारे सक्षम होते. यासाठी जर कुणी जबाबदार असेल तर, त्या समाजाच्या जुन्या प्रथा. त्या काळात कला आणि संगीताचे शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य मुलींना नव्हते. त्याचा परिणाम माझ्या कुटुंबावर देखील झाला.”

शारदा सिंह यांना फाईन आर्ट्समध्ये प्रवेश मिळाला नसला तरी, त्यांनी आपल्या आतील कलेच्या जिद्दीला नेहमी जिवंत ठेवले. शिक्षणा सोबतच पेंटिंग करणे देखील सुरु ठेवले. पीएचडी केल्यानंतर त्यांनी नोकरी देखील केली, मात्र त्यांचे मन एक वर्षाच्या आतच त्याने भरले. पतिची साथ मिळाल्यावर त्यांनी कलेला आपली कारकीर्द बनविण्याचा निर्णय घेतला. बीएचयु फाईन आर्ट्सचे प्राध्यापक एस. प्रणाम सिंह यांच्या प्रेरणेने त्यांनी पहिल्यांदा आपल्या पेंटिंगला रविंद्रपुरी येथील एका कलादालनात जगासमोर ठेवले. लोकांनी शारदा यांच्या या प्रतिभेची खूप प्रशंसा केली. त्या काळात त्यांच्या तीन पेंटिंग एक लाख रुपयात विकल्या गेल्या. त्यानंतर यशाची जी क्रमबद्धता सुरु झाली, ती आजही कायम आहे... 

image


आपल्या कलेला जगासमोर ठेवल्यानंतर शारदा सिंह यांनी गरीब मुलांना देखील यात सामील केले. काही साथीदारांच्या मदतीने त्यांनी बनारसच्या अर्धा डझन पेक्षा अधिक गावांच्या जवळील मुलांना यात सामील केले. शारदा सिंह आज आपल्या घरात गरीब मुलांना पेंटिंगच्या छोट्या छोट्या गोष्टी समजवायच्या. गरीब मुलांना कलेसाठी प्रेरित करतात. त्यांच्या प्रयत्नांचाच परिणाम आहे कि, आज ही मुले कलेच्या क्षेत्रात आपले नाव उज्वल करत आहेत. मोठमोठ्या मंचावर या गरीब मुलांच्या पेंटिंगला लोक पसंत करत आहेत आणि विकत घेत आहेत. मग ते सुबह – ए- बनारस चे मंच असो किंवा स्वदेशी मंच असो. ही मुले जेथेही गेली, आपल्या कलेने सर्वाना खुश केले.

image


शारदा सिंह या मुलांना विशेष पद्धतीने बनारसची लुप्त पावणारी भित्तीचित्र शिकवितात. ही एक अशी कला आहे, जी बनारस आणि त्याच्याजवळील भागात अनेक काळापासूनची आहे. मात्र काही वर्षांपासून ही परंपरा तुटताना दिसत आहे. शारदा सिंह यांच्या प्रयत्नांचाच परिणाम आहे की, पूर्वांचलची ही कला पुन्हा एकदा जिवंत होत आहे, या सोबतच गरीब मुलांच्या पालन पोषणाचे नवे माध्यम मिळाले आहे. शारदा आता मुलांच्या या कलेला विपणनाच्या नवनव्या पध्दतीने जोडत आहेत, जेणेकरून ही मुले स्टार्टअप करू शकतील. दिल्लीच्या मेहता आर्ट गँलरीसोबत शारदा यांनी समन्वय साधला आहे. त्यामार्फत मुलांच्या या पेंटिंग्जचे ऑनलाइन प्रदर्शन भरवले जाईल. यासोबतच शारदा स्वतः एक संकेतस्थळ लवकरच उघडणार आहेत, जेणेकरून या मुलांच्या पेंटिंग्ज विकल्या जाव्यात. शारदा सांगतात की, मागील दिवसात सुबह- ए- बनारस च्या मंचावर या मुलांच्या पेंटिंग्ज विकल्या गेल्या, तेव्हा अस्सी घाटावर येणारे विदेशी पर्यटक देखील अचंबित झाले. या पर्यटकांनी मुलांच्या पेंटिंग्जला विकत घेतले. 

image


युवर स्टोरीसोबत संवाद साधताना शारदा सांगतात कि, “जर या मुलांना बाजारात सामील केले तर, परिस्थितीत सुधार येईल. या मुलांमध्ये कला आहे तर, मात्र त्यांना ओळख निर्माण करून देणारा कुणीच नाही. माझा प्रयत्न आहे कि, या मुलांनी गावातील गल्ल्यांमधून निघून जगातील फलकावर आपली जागा बनवावी.”

शारदा लखनौयेथील ललित कला अकादमीत या मुलांच्या पेंटिंग्ज लावायला जात आहेत, जेणेकरून राज्य सरकार या मुलांच्या प्रतिभेला समजतील. शारदा स्वतः देखील एक शानदार चित्रकार आहेत. दिल्ली, मुंबई, जयपूरसहित अनेक शहरांमध्ये त्यांच्या पेंटिंग्जचे प्रदर्शन लागले आहे. येणा-या काळात शारदा यांच्या चित्रांचे प्रदर्शन फ्रांसमध्ये भरणार आहे. 

image


कलेच्या या क्षेत्रात मुलांची भागीदारी वाढविण्यासाठी त्यांनी एक संस्था देखील बनविली आहे. अभ्युदय नावाची ही संस्था मुलांना कलेच्या छोट्या छोट्या गोष्टी समजाविण्यासोबत शिक्षणासाठी देखील जागरूक करत आहेत. शारदा गावागावात फिरत आहेत. गरीब मुलांना आपल्या संस्थेत सामील करत आहेत. या कामात त्यांचे पती आणि त्या भागातील प्रसिद्ध कॉर्डियोलॉजिस्ट डॉ. समशेर सिंह त्यांची खूप साथ देत आहेत. शारदा यांची हीच इच्छा आहे की, समाजाच्या बंधनामुळे अजून कुणाची कला मरू नये, खरच शारदा सिंह यांचे लहानसे मात्र मजबूत पाउल आज समाजाला बदलण्यासाठी खूपच फायदेशीर ठरत आहे.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

कला जोपासण्यासाठी शिस्तबद्धता महत्वाची :आयना गुंजन

भारतीय संदर्भातल्या प्रतिमांसाठी फक्त Pickapic.in

रांगोळीचे माहेरघर जुचंद्र गावच्या रांगोळीची कहाणी...


लेखक :आशुतोष सिंह

अनुवाद : किशोर आपटे