शेतकऱ्याचा मुलगा ते ४०० दशलक्ष ग्राहकांपर्यंत इंटरनेट टीव्ही सेवा पुरवणारे उदय रेड्डीं

शेतकऱ्याचा मुलगा ते ४०० दशलक्ष ग्राहकांपर्यंत इंटरनेट टीव्ही सेवा पुरवणारे उदय रेड्डीं

Saturday April 16, 2016,

5 min Read

४३ वर्षांचे उदय रेड्डी हे 'यप' टिव्हीचे संस्थापक आणि सीईओ. 'ओवर द टॉप लाइव्ह टीव्ही' आणि 'केच अप' टीव्ही प्रणालीत यप टीव्ही जगभरातील निरनिराळ्या टीव्ही ब्रांड मध्ये अग्रेसर मानला जातो. या कंपनीचं मुख्यालय जॉर्जियामधल्या अटलांटा इथं आहे. दर महिन्याला पाच दशलक्ष ग्राहक या सेवेकडे आकृष्ट होतायत. त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास निश्चितच सोपा नव्हता.

तेलंगणामधल्या हनामकोंडासारख्या छोट्याश्या गावात उदय रेड्डी यांचा जन्म झाला. मुलभूत साधनांची सुद्धा जिथे वाणवा होती अशा वातावरणात ते वाढले. कदाचित उदय यांनी देखील कधी स्वप्नात विचार केला नसेल की एक दिवस ते तंत्रज्ञाना आड लपलेली वाट शोधून काढून त्यांच्या मदतीने देशवासियांना त्यांच्याच संस्कृतीशी आणि मुळाशी पुनर्भेट घडवून आणेल. त्यांना खरं तर व्हायचं होत प्रशासकीय अधिकारी, गावाच्या विकासासाठी काम करणं हे त्याचं स्वप्न होतं. विशेषत: आरोग्य आणि शिक्षण या विभागात त्यांना खूप काही बदल घडवून आणायची इच्छा होती. उदय आपल्या आठवणी सांगत होते. " हनमकोंडामधल्या शासकीय कनिष्ठ महाविद्यालयात शिकताना मला प्रशासकीय सेवेत जायचं होतं. माझ्या कुटुंबाला हे मान्य होतं. ग्रामीण भारतासमोरील आव्हानं पहातच मी मोठा झालो आणि मला या समस्या दूर करायच्या होत्या. मी इलेक्ट्राॅनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या विषयात अभियांत्रिकी पदवी घेतली. कँपस मुलाखतीदरम्यान सीमेन्स कंपनीने माझी मुलाखत घेतली आणि माझी नोकरी सुरु झाली. प्रशासकीय सेवेत भरती होण्यासाठी परीक्षेचा अभ्यास करण्यापूर्वी मी वर्षभर नोकरी करण्याचा निर्णय घेतला. पण टेलिकॉम क्षेत्रातील माझी रुची वाढत गेली आणि मी हे क्षेत्र सोडूच शकलो नाही.” 

image


१९९५ मध्ये उदय यांना नॉर्टेल कंपनीत नोकरी लागली आणि त्यांच्या आयुष्याचा कायापालट झाला. या काळात भारतामध्ये टेलिकॉम क्षेत्राचा उदय झाला. वायरलेस नेटवर्कचं जाळं पसरण्यास हळूहळू सुरुवात झाली होती. उदय सांगतात त्यावेळी ते संपूर्ण जगाचा दौरा करत असत. त्यांनी सिंगापूर, मलेशिया आणि ऑस्ट्रेलिया या ठिकाणी काम केलं. " नोर्टेलसाठी विक्री संचालक म्हणून मी काम करत असे. पुढील अकरा वर्षात मला लॅटिन अमेरिकन आणि सर्बियन बाजारपेठांच्या कार्यप्रणालीचा अंदाज आला. माझ्या अभ्यासासाठी हा सोनेरी काळ होता." उदय सांगत होते.

व्यवसाय करण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. २००६ मध्ये त्यांनी यप टीवी युएसए इंक सुरु केलं तेव्हा ही कल्पना अमेरिकन बाजारपेठेसाठी सुद्धा नवीन होती. अन्य देशात राहणाऱ्या भारतीयांसाठी भारतातील करमणुकीच्या कार्यक्रमांना मुकावं लागत असे. बातमीसुद्धा त्यांना त्यांच्या भाषेत मिळत नसत. ही सांस्कृतिक दरी त्यांना मिटवायची होती आणि भारतीयांना त्यांच्या मुळांशी जोडायचं होतं. उदय आपल्या व्यवसायाच्या उदयाची कहाणी सांगत होते. 

image


" मी माझं कार्यालय एका तळघरात स्थापन केलं. ब्रॉडबँड तंत्रज्ञान आजच्या इतकं तेव्हा प्रसिद्ध नव्हतं. स्मार्ट टीव्ही किंवा स्मार्ट फोन्स सुद्धा तितके वापरात नव्हते. म्हणजे खरंतर मी कालच्याही पुढे जाऊन हा व्यवसाय सुरु केला होता. मी व्यवसायातही बाजारातून कर्ज उचललं नाही तर माझ्या बचतीतून माझ्या व्यवसायात गुंतवले. मला इंटरनेटच्या माध्यमातून लोकांना लाइव्ह प्रक्षेपण दाखवायचं होतं. म्हणजे एखादा कार्यक्रम बघायचा राहिला तर तो मला नंतर का बघता येऊ नये, या कल्पनेतून माझ्या व्यवसायाचा उगम झाला. या सर्व प्रश्नांची उत्तर शोधताना मी हा यप टीव्हीचा व्यवसाय सुरु केला

उदय यांचा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. त्यांच्या कंपनीच्या धोरणात मक्तेदारी बसत नव्हती. त्यांना आपले ग्राहक जपून ठेवणं सुद्धा आव्हान होतं आणि त्यांच्याकडे निधीसुद्धा उपलब्ध नव्हता. त्यांची कल्पना नाविन्यपूर्ण होती आणि अनेकांच्या आकलनाबाहेरची होती, त्यामुळे त्यांच्यासाठी बाजारपेठ म्हणावी तेवढी विस्तारलेली नव्हती. २०१० त्यांची जमीन विकली आणि मित्रमंडळींकडून कर्जाने पैसे घेतले. यानंतर मात्र त्यांच्या व्यवसायाने खरी कास धरली. यप टीवीला त्याचे ग्राहक मिळू लागले.

आज पाच खंडांमधील लक्षावधी ग्राहक यप टीव्हीची सेवा वापरतात. प्रत्येक महिन्याला पाच दशलक्ष ग्राहकांची वाढ त्यात होत राहते, अगदी गर्दीच्या काळात तर महिन्याला २० दशलक्ष ग्राहक अशी नोंद होते. ओटीटी क्षेत्रात यप टीवी नवनवीन पायंडे कायम करीत आहे. संपूर्ण जगभरात ४०० दशलक्ष घरात आज यप टीवी पोहचला आहे आणि आजमितीस ७.५ दशलक्ष ग्राहकांनी हे अॅप डाऊनलोड केलं आहे. यामुळे भारतात करमणूक या प्रवर्गातील दुसऱ्या क्रमांकावर आवडीचं असणारं अण्ड्राॅइड प्लेस्टोअर आहे. यप टीवी हा सर्वाधिक डाउनलोड केला जाणार स्मार्ट टीवी अॅप सुद्धा मानला जातो. २०१५ सालचा अत्यंत मानाचा समजला जाणारा रेड हेरिंग हा पुरस्कार सुद्धा रेड्डी यांच्या कंपनीने पटकावला. यामध्ये नाविन्यपूर्ण शोधांच्या निकषावर जगभरातल्या १०० कंपन्या निवडल्या जातात. 

image


 दोन वाहिन्यांपासून सुरु झालेल्या या यप टीव्हीवर आज २०० भारतीय दुरचित्र वाहिन्या, ५००० चित्रपट आणि १३ भारतीय भाषेतील तब्बल १०० मालिका पाहता येतात. त्यांच्या संग्रहात सध्या २५,००० तासांच्या करमणुकीचा साठा यादीकृत आहे. त्याचबरोबर या व्यासपीठावर दररोज मागणी असणाऱ्या तब्बल ५००० तासांच्या सामग्रीचा समावेश नव्याने होत राहतो. उदय अत्यंत अभिमानाने आपली कहाणी सांगतात पण अद्यापही आपला प्रवास संपला नसल्याचं विनम्रतेन कबुल करतात. ते म्हणतात : “इतक्या दूरवर आलो याचा अभिमान आहेच पण अजूनही बराच पल्ला मला गाठायचा आहे. मी इथंवर पोचायला खूप कष्ट घेतले आहेत. माझा ५०% वेळ माझ्या कुटुंबियांपासून दूर गेला आहे. आपण आजही स्टार्टअप संस्कृतीवर विश्वास ठेवतो आणि आपल्या यशाला डोक्यावर चढू देत नाही. चिकाटी हा यश मिळवण्याचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. एका वाहिनीला तर मला आमच्याबरोबर येण्यासाठी तब्बल आठ वेळा भेटावं लागलं. तर आणखी एका वाहिनीनं तब्बल एक वर्ष घेतलं फक्त होकार द्यायला. पण एकदा का आमची नाळ जुळली की ती कायमचीच !

यप टीवी भारतात दर दिवशी पाच रुपये इतक्या अत्यल्प किमतीपासून आपली सेवा नियमितपणे देत आहे. सध्या भारताबाहेर राहणाऱ्या भारतीयांसाठी पहिल्या क्रमांकाचा इंटरनेट पे टीव्ही व्यासपीठ आहे. उद्योजकांसाठी त्यांचा संदेश आहे तो म्हणजे ,' 'लक्ष्य'. एखादी यशस्वी कंपनी घडवण्यासाठी उदय यांच्या मते तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बाजारपेठेच आकलन, नव्या तंत्रज्ञानाला आत्मसात करण्याची तयारी आणि लोकांचं व्यवस्थापन. " आज तंत्रज्ञान अतिशय पुढारलं आहे. तुम्हाला व्यवसायासाठी अमेरिकेत जाण्याची गरज नाही. उद्योजक जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असला तरी तो संपूर्ण जगात एका ठिकाणाहून पोहचू शकतो." उदय सांगत होते.


image


उदय यांना त्यांच्या लहानपणीच्या प्रशासकीय सेवेत दाखल होउन ग्रामीण भारताच्या कायापालटाच्या स्वप्नाविषयी विचारलं असता ते म्हणतात, ” आता माझं स्वप्न अधिक व्यापक झालं आहे. भारतात त्यांचा व्यवसाय वाढवत असतानाच तेलंगणा मधील विणावांका या गावात टेली मेडिसिन या माध्यमातून मोफत आरोग्य सेवा पुरवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. त्याचप्रमाणे शिक्षणदेखील तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वस्त आणि प्रत्येकाला परवडेल अशा पद्धतीनं पोचवण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. या ठिकाणचा प्रयोग यशस्वी झाल्यास ते संपूर्ण जगभरात आरोग्य सेवा आणि शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था करण्याच्या तयारीला सुद्धा लागले आहेत.

लेखक : सौरव रॉय

अनुवाद : प्रेरणा भराडे