मुंबईतल्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेसाठीसुद्धा ऑनलाइन तिकीट ! 'ट्रॅफलाइन'च्या संस्थापकांनी सोडवली परिवहन व्यवस्थेची एक समस्या !

मुंबईतल्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेसाठीसुद्धा ऑनलाइन तिकीट ! 'ट्रॅफलाइन'च्या संस्थापकांनी सोडवली परिवहन व्यवस्थेची एक समस्या !

Friday April 22, 2016,

5 min Read

दिल्लीतील वाहतुक समस्येवरील उतारा म्हणजे सम-विषम नियम. आता दिल्लीपाठोपाठ हा नियम मुंबईत सुद्धा लागू करणार अशी चर्चा सुरु आहे. मात्र तत्पूर्वी पुढच्यास ठेच मागचा शहाणा, या उक्तीप्रमाणे दिल्लीमध्ये या नियमानंतर नेमक्या कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं याचा शहानिशा होणं गरजेचं आहे. ही वाहतुक व्यवस्था वापरात आणण्याकरिता दिल्लीकरांचा नकारच होता, कारण सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेलाही हा अधिभार सहन करता येण्याजोगा नव्हता. ऑटो आणि बसेसची कमतरता, गर्दी, तिकिटांसाठी लांबच लांब रांगा, त्यातच मेट्रोच्या स्वत:च्या वेगळ्या समस्या असं काहीसं चित्र या नियमानंतर दिल्लीत निर्माण झालं. त्यामुळेच हा नियम लागू झाल्यावर मुंबईत निदान तिकिटांसाठी लांब रांगांची समस्या उद्भवू नये आणि या लोकांच्या हिताच्या नियमाचा अडथळा लोकांना वाटू नये यावर 'रीडलर' या स्टार्टअप कंपनीचं काम सुरु आहे.


सुधारित स्टार्टअप: 

ट्रॅफलाइन (युवरस्टोरीने यापूर्वी या अॅपची माहिती दिली आहे.) या वाहतुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या स्टार्ट-अपच नवं अपत्य आहे रिडलर! ट्रॅफलाइनला तब्बल २ दशलक्ष लोकांनी डाउनलोड केलं, ज्यामुळे त्यांना रस्त्यावरील वाहतुकीची इत्यंभूत आणि अचूक माहिती मिळते. 'बर्डस आय सिस्टम' या ट्रॅफाईनच्या पालक कंपनीतर्फे गोळा केलेल्या माहितीच्या आधारावर रिडलरची संकल्पना रुजली.

" ट्रॅफलाइनच्या माध्यमातून आम्ही जेव्हा सार्वजनिक दळणवळण माहिती प्रवाश्यांना पुरवत होतो त्याचवेळी प्रवाशांना रोजच्या प्रवासात सहन कराव्या लागणाऱ्या अडचणींबाबात आमची सतत चर्चा होत असे. त्याचवेळी आमच्या डोक्यात ही कल्पना आली की विनारोकड प्रवास करणं हे प्रवाश्यांसाठी अत्यंत सुलभ ठरू शकतं. ज्यामुळे त्यांना दररोज सामना कराव्या लागणाऱ्या लांबच लांब रांगा, पाकीटमारी किंवा तिकीटांसाठीच्या किचकट प्रक्रिया यांना कायमचा अलविदा करून अस्तित्वात असणाऱ्या संपूर्ण वाहतूक व्यवस्थेचा कायापालट करता येईल," रवि खेमानी, ट्रॅफलाइन आणि रिडलरचे संस्थापक आणि सीईओ सांगत होते.


image


सार्वजनिक-खाजगी भागीदारीचं सामर्थ्य 

परदेशात मात्र अशा सेवा शासकीय वाहतूक संस्थाच सुरु करतात आणि त्या त्यांच्याच मालकीच्या असतात. मात्र सार्वजनिक- खाजगी भागीदारी म्हणजे लोकसहभागातून मुलभूत विकास साधणे, हे पूर्वीपासून आजमावलेलं आणि यशस्वी ठरलेलं असं भारतीय अर्थशास्त्रातील सूत्र आहे. रिलायन्स मुंबई मेट्रो हे त्याचं ताजं उदाहरण आणि याचप्रमाणे रिड्लर सारखे पाहिलं पाउल हे सरकारच्या 'डिजिटल इंडिया' या महत्त्वाकांक्षी दृष्टीकोनाला बळ देणारं ठरणार आहे. या अॅप्लिकेशनवर तिकीट बुकिंग करणं हे अतिशय सोपं आहे, अंतर निवडायचं आणि पे यू मोबाईल वाॅलेट द्वारा पैसे जमा करायचे. हे टिकीट त्यानंतर वाहकाला आपण दाखवू शकतो.

या स्टार्टअपनं तीन आवृत्ती सुरु केल्या. ज्यातील पहिली म्हणजे सार्वजनिक परिवहन व्यवस्थेविषयी माहिती देणं, दुसरी आहे ती म्हणजे परिवहन व्यवस्था आणि वाहतुकीविषयी अचूक माहिती देणं, आणि नवी आवृत्ती आहे ती म्हणजे ऑनलाइन तिकीट. रिडलर सध्या अॅण्ड्राॅइडवर उपलब्ध आहे आणि आयओएसवर लवकरच याची सुरुवात होईल.

सप्टेंबर २०१५ मध्ये सुरुवातीलाच या स्टार्टअपनं जेव्हा मुंबई मेट्रोसाठी आपली सुविधा दिली आणि अॅण्ड्राॅइड अॅपद्वारे रिचार्ज म्हणजे पुन्हा पैसे भरण्याची सोय उपलब्ध करवून दिली तेव्हा त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला. "मुंबई मेट्रो मध्ये ही सुविधा पुरवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे येथील प्रवासी हे अन्य वाहतूकीचा वापर करणाऱ्या प्रवाश्यांपेक्षा तांत्रिकदृष्ट्या अधिक साक्षर आणि अनुकुलता पाहणारे असतात." रवि म्हणतात.

या स्टार्टअपचं लक्ष्य आहे ते म्हणजे दररोज प्रवास करणारे आणि स्मार्टफोन वापरणारे प्रवासी." आमचा ‘युजकेस’ हा प्रवाशांना विविध वाहतुकीच्या साधनांमधून प्रवास करताना विना रोकड प्रवास करण्याची सोय करून देतो. सध्या आम्ही आमच्या या उत्पादनाची वाहतुकीच्या विविध साधनांमध्ये जाहिरात करत आहोत त्याचप्रमाणे बीटीएल एक्टिवेशन म्हणजे बिलो द लाइन एक्टिवेशन (ज्याचा अर्थ थेट ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी वापरण्यात आलेली वितरण पद्धती )" रवि सांगत होते.

image


आव्हाने:

कंपनीसमोर सर्वात मोठं आव्हान होतंंं ते म्हणजे विविध वाहतुक संस्थांमधील नोकरशहांशी जुळवून घेणं." आमचा बराचसा वेळ आणि साधनसामुग्री त्यांना या डिजिटल फायद्याविषयी समजावून सांगण्यात खर्च झाली." रवि सांगतात. गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये रिडलरनं नवी मुंबई महापालिकेच्या वाहतूक सेवेतील बसेस साठी ई-तिकिटिंग सेवा सुरु केली.

भागीदारीविषयी बोलताना नवी मुंबईचे वाहतुक व्यवस्थापक शिरीष अराडवड म्हणतात," आमच्या प्रवाश्यांना प्रवास करताना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. तुडुंब गर्दीने भरलेल्या बसमध्ये प्रवाश्यांचं नियोजन करणं वाहकालासुद्धा अत्यंत कठीण जातं. प्रवाश्यांकडे अनेकदा सुट्टे पैसे नसतात. त्यामुळे रिड्लरचा हा तोडगा महापालिकेनं प्रवाश्यांना सर्वोत्तम सुविधा देण्याच्या वचनाला सहाय्यक ठरत आहे." आता रिडलरनं बेस्ट बसच्या पाससाठी रिचार्जसुद्धा सुरु केलं आहे. मुंबईतील बेस्ट बस सेवा ही अशी परिवहन संस्था आहे जी अहोरात्र गर्दीने फुललेली असते.

ग्राहकांच्या फायद्यासाठी

ऑनलाइन तिकिटिंगचा परीघ अद्याप विस्तारला नसला तरी रिडलरला भारतातल्या सर्व सार्वजनिक परिवहन व्यवस्थेपर्यंत स्वत:चं अस्तित्व पोहोचवायचं आहे आणि यासाठी त्यांनी स्थानिक रेल्वे ,मेट्रो आणि बस विभागांशी करार केले आहेत. ज्यामुळे त्यांना संपूर्ण यादी, वेळापत्रक, बातम्या, उशीर होण्याचं कारण आणि सुमारे २० शहरांच्या उद्घोषणा यांची माहिती मिळते. यामध्ये मुंबई, बेंगळूरू, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, हैद्राबाद, चंदिगढ, जयपूर, पुणे, बेल्लारी, अहमदाबाद, भोपाळ, भुवनेश्वर, भावनगर, इंदोर, विजयवाडा, लुधियाना, वडोदरा आणि नागपूर अश्या शहरांचा समावेश आहे.

रिडलरला मुंबईतल्या दररोज प्रवास करणाऱ्या ११.५ दशलक्ष प्रवाश्यांपर्यंत हे माहितीपूर्ण आणि गरजेच अॅप पोहोचवायचं आहे. आजवर सुमारे १.५ दशलक्ष प्रवाश्यांनी ट्रॅफलाइन अॅप डाउनलोड केलं आहे तर १ दशलक्ष प्रवाश्यांनी रिड्लर अॅप डाऊनलोड केल आहे. त्यांच्या ग्राहकांमध्ये पुन्हा पुन्हा हे अॅप वापरणारे ग्राहक तर आहेतच, पण दर महिन्याला २०० टक्क्यांनी वाढ होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

या स्टार्टअपला मेट्रिक्स पार्ट्नर्स आणि क्वोलकोम वेन्चर्स कडून नोव्हेंबर २०१५ मध्ये निधी मिळाला आणि सिड फंडिंगच्या माध्यमातून (सीआयआयइ आणि इंडियन अंजेल नेटवर्क यांच्याकडून) (सिड फंडिंग म्हणजे सुरूवातीचं भांडवल जे स्वत:च्या किंवा मित्र, नातेवाईक यांच्या पैशातून उभारण्यात येतं) सुद्धा त्यांना निधी मिळाला होता. व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने त्यांच्या योजनांमध्ये बेस्ट आणि अन्य वाहतूक मंडळामध्ये प्रवेश मिळवणं. " वाहतुकीच्या सर्व गरजांसाठी आम्हाला एकछत्री अॅप बनवायचं आहे." रिड्लरचे सीइओं ब्रिजाज वाघानी सांगत होते.

एकीकडे मुंबईमध्ये सम-विषम सूत्र राबवण्याचा विचार महाराष्ट्र सरकार करत असतानाच विना रोकड प्रवास आणि डिजीटायझेशन हे या नियमांसाठी मोठा आधार ठरणार आहेत. सरकारनं स्थानिक रेल्वे तिकिटांसाठी (युटीएस) सारखे अॅप निर्माण केले आहेत पण बस सेवेचा यात समावेश नाही. ही कमतरता आता यशस्वीपणे भरून निघेल.

यासारख्या आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

असा एक स्टार्टअप जो 'कारपूलिंग' मार्फत रस्त्यावर गाड्यांची संख्या कमी करण्यासाठी तत्पर आहे

दिल्लीमधील सम विषम योजना ही पर्यावरणासाठी ठरू शकते एक वरदान

'एम-इंडिकेटर'द्वारे मुंबईकरांच्या घरोघरी पोहोचलेले सचिन टेके

लेखिका - बिन्जल शाह

अनुवाद : प्रेरणा भराडे