...उदयोन्मुख महिला कॉमेडी क्वीन्स : ऋचा आणि सुमुखी

...उदयोन्मुख महिला कॉमेडी क्वीन्स : ऋचा आणि सुमुखी

Monday October 26, 2015,

6 min Read


“ तू एक महिला असूनही कोणालाही हसवू शकते? ” या आणि अशा प्रतिक्रिया ऐकतच भारताच्या उदयोन्मुख विनोदी कलाकार ऋचा कपूर आणि सुमुखी सुरेश यांनी आज या पुरूष प्रधान समाजात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

“आता महिला फक्त स्वयंपाक करत नाहीत तर कॉमेडीच्याक्षेत्रात इतरांना त्या हसवू देखील शकतात हा विचार करुन बरं वाटतं.”

ऋचा आणि सुमुखी यांच्यावर उधळण्यात आलेल्या स्तुती सुमनांपैकी हे एक उदाहरण आहे. सुमुखीबाबत तर एक वेगळीच गोष्ट घडली. लग्नासाठी एका मुलाची माहिती आली होती आणि त्यात कुटुंबातील सगळ्यांचं मनोरंजन करणारा सदस्य हवा असं लिहिलं होतं.

हा अशा मार्गावरचा प्रवास होता ज्यावर क्वचितच महिलांनी पाऊल ठेवलं असेल. त्यांच्या यशाबाबत जाणून घेण्याची इच्छा असलेल्या महिलांना त्या सांगतात की, महिला लोकांना हसवू शकत नाही असा आतापर्यंतचा समज होता आणि तो समज खोटा ठरवण्याचा आम्ही निर्धार केला.

या प्रवासात काही वेगवेगळे लोक भेटले पण त्यांच्यात काहीतरी साम्य होतं.

ऋचा आणि सुमुखी यांची ओळख एका केंद्रीय स्तरावरील ‘द इम्प्रूव्ह’ या एका सामान्य विनोदी कार्यक्रमात झाली. सुमुखी जेव्हा या कार्यक्रमात सहभागी झाली तेव्हा ऋचाला या कार्यक्रमात सहभागी होऊन दोन वर्ष पूर्ण झाली होती.

“ आम्ही दोघींनी यात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आणि मग आम्ही वेगवेगळ्या असलो तरी आमच्यात खूप काही साम्य असल्याचं जाणवलं,” असं सुमुखी सांगते.

“आम्हाला इथं आमच्यातील खूप मोठ्या क्षमतेची जाणीव झाली. ही क्षमता आम्ही दोघींनी सारख्याच अनुभवांमधून कमावली होती,” असं ऋचा म्हणते.

जेव्हा सुमखी ऋचाला पहिल्यांदा भेटली तेव्हा ऋचा लहान मुलांसाठी नाट्यानुभव कार्यशाळा आयोजित करण्याच्या तयारीत होती. सुमुखीने पहिली कार्यशाळा आयोजित करण्यात तिची मदत केली. सुमुखी म्हणते की, “ यामुळे आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की, एक टीम म्हणून आम्ही चांगलं काम करु शकतो. निधी जमवण्यासाठी आम्हाला मदत झाली ती आमचे मित्र केनेथ सेबिस्टियन आणि प्रतीक प्रजोश यांची..त्यांचे आम्ही खूप आभारी आहोत. त्यानंतर आम्ही स्वत: विनोदी नाटक लिहून रंगमंचावर सादर करण्याचा निर्णय घेतला.”

भरपूर नाटकांचे प्रयोग केल्यानंतर त्यांनी यू ट्यूबवर ‘स्केच इन द सिटी’ नावाने एक अधिकृत वाहिनी सुरू करण्याचा निर्णय घेतला.

ऋचा आणि सुमुखी या दोघीही खूप बोलक्या आहेत. खरंतर अनेक बाबतीत त्या भिन्न आहेत. पण तरीही काही बाबतीत त्यांचे सूर जुळतात आणि दोघीही एकाच विषयाबाबत गंभीर आहेत. दिवसभराचं काम संपल्यानंतर संध्याकाळी त्या फोनवर नवनवीन कल्पनांवर चर्चा करतात. “दिवसाचा वेळ वाचवण्यासाठी आम्ही स्वप्नांच्या माध्यमातून एकमेकींच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो,” असं दोघीही आपल्या खास हसतमुख शैलीत सांगतात.

बदलती विचारसरणी

दोन महिला लोकांना कशा हसवू शकतात असं जेव्हा लोक विचारतात तेव्हा ऋचा आणि सुमुखी यांना खूप राग येतो. लोकांची ही समजूत खोटी ठरवण्यासाठी त्या प्रत्येक कार्यक्रमात चांगलं प्रदर्शन करतात आणि त्यामुळेच प्रत्येक कार्यक्रम हा अखेरचा कार्यक्रम असल्यासारखाच सादर करतात.

सुरूवातीला कार्यक्रम, तांत्रिक बाबी, हास्यशैली आणि प्रत्येक स्वभावाच्या प्रेक्षकाला कसं हसवता येईल याबाबत त्या चिंतीत असत. यश किंवा अपयश या दोन्हीसाठी त्या मानसिकदृष्ट्या तयार होऊनच रंगमंचावर उतरल्या.

तसं पाहिलं तर काही आव्हानं कायम असतातच उदा. संध्याकाळी उशिरापर्यंत सराव करणे, लोकांना सामोरं जाणं आणि स्वत:ची ओळख तयार करणं. पण त्यांच्यासाठी या आव्हानांचा सामना करण्याची कलाच महत्त्वाची होती. त्यामुळेच कदाचित त्यांना भीती वाटली नाही.

आम्ही रंगमंचावर आणि रंगमंचापासून दूर असलो तरी सतत सुधारणा केल्या. आम्ही अपमानही पचवले. या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा कामावर लक्ष देण्याच्या आमच्या विचारांमुळे आम्ही ध्येयापासून ढळलो नाही आणि धोका पत्करण्याचीही आमची सदैव तयारी राहिली. आम्ही ट्रॅफिक सिग्नलवर झाडू विकणे, रस्त्यांवर नकला करणे, भिंतींवरुन उड्या मारण्यापासून ते भव्य कार्यक्रमांपर्यंत सगळ्यांना खूप हसवलं.

अशी झाली सुरूवात

सुमुखी

नागपूरमध्ये लहानाची मोठी झालेली सुमुखी स्वत:ला एक गोंधळलेली व्यक्ती संबोधते. ती सांगते की, शाळेत तिला सर्वजण लठ्ठ् म्हणून चिडवायचे. ती म्हणते की तिच्या जीवनात अशी एकही उत्सवाची रात्र आली नाही जी तिच्य़ा लक्षात राहील. घरात सगळ्यात छोटी असल्याने ती एका आश्रितासारखं जीवन जगत होती.

फोटो

image


२००६ मध्ये नाटकात काम करणाऱ्या सुमुखीने पदवी शिक्षणादरम्यान पहिल्यांदाच चेन्नईमध्ये आपल्यामधील कलेचा वापर करण्यास सुरूवात केली. विनोदामधील तिच्या प्रवासाची सुरूवात इम्प्रूव्ह कलाकार म्हणून झाली. त्यानंतर स्केच कॉमेडी आणि शेवटी स्टँड्प कॉमेडीपर्यंत ती पोहोचली.

कॉलेजमधील एका कार्यक्रमात ५ मिनिटांच्या एकपात्री प्रयोगापासून ते सत्यजीत रे आणि इस्मत चुगताईंच्या ६ लघुकथांचं संकलन असलेले ‘रेटेल’ या आपल्या पहिल्या व्यावसायिक नाटकात सुमुखीने एका ८० वर्षांच्या विचित्र अफगाणी यात्रेकरुची भूमिका साकारली. त्याचवेळी तिला जाणीव झाली की ती आता कोणतीही भूमिका करु शकते आणि एक विनोदी कलाकार म्हणून काम करु शकते.

सुमुखीसाठी तिचे वडीलच हिरो होते. ते एक गंमतीशीर व्यक्ती होते आणि सुमुखीला त्यांनी कायम पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं.

ऋचा

दुसरीकडे ऋचाला लहानपणापासूनच देशभरात फिरण्याची आणि दर दोन ते तीन वर्षात नवनवीन लोकांना भेटण्याची संधी मिळाली. एका आंतरविद्यालयीन नाट्यमहोत्सवाच्या माध्यमातून तिने रंगमंचावर पहिलं पाऊल ठेवलं. “ याच स्पर्धांमुळे मला माझ्यामधील कलेची आणि क्षमेतची जाणीव झाली याचं मला आश्चर्य वाटतं. हीच ती वेळ होती जेव्हा वाटलं की व्यासपीठावर असणं हे एक वरदान आहे. शेकडो लोकांपुढे उभं राहण्याचा आनंद मला मिळाला आणि प्रत्येक सादरीकरणाआधी मनात निर्माण होणारी भीतीही मी अनुभवली.

फोटो

image


ऋचा ही इंग्रजीची शिक्षिका आहे, ती सध्या साहित्यामध्ये पीएचडी करत आहे. त्यानंतर ती पुन्हा शिकवण्याकडे वळणार आहेत, पण, “ रंगमंचावर माझं कायम प्रेम राहिल” असं ती सांगते.

जीवनातील अनेक कठीण प्रसंगांना तोंड देताना ऋचाने आपल्या हास्य कलेचा वापर केला. तेव्हापासून हसणं आणि हसवणं ही तिची सवयच झाली. “ माझ्या कठोर स्वभावामुळे मी काहीच करु शकणार नाही असं मला अनेकांनी सांगितलं. पण अखेर लोकांनी त्यालाच एक कला म्हणून स्वीकारलं आणि मी हजारो लोकांसमोर सादरीकरण करु शकले.”

आपल्या आरामदायी जीवनातबून बाहेर पडण्यासाठी ऋचाने काही सवयी लावून घेतल्या, उदा. कार्यशाळांमध्ये सहभागी होणे, त्यावर चर्चा करणे तिला आव्हानात्मक वाटायचे. “ मी याच प्रक्रियेतून आजही काहीतरी शिकत असते. मला वाटतं की मी अजूनही धोका पत्करु शकते. एक अनोळखी अशी वेदना आहे जी जाणून घेण्यासाठी मी सर्वशक्ती पणाला लावते. ”

तिला आपलं कुटुंब आणि मित्रांकडून कायम प्रोत्साहन मिळालं.

आपल्या देशात लोक जेवढं हसले पाहिजे तेवढं हसत नाही आणि स्वत:वर हसणं तर अजिबातच नाही.

सुमुखीच्या मते देश हसतोय पण जास्तीत जास्त लोक हे पत्नी, महिला, त्यांच्याशी संबंधित गोष्टी, प्रेयसी आणि कपडे यावरील विनोद किंवा अश्लील विनोदांवर हसत आहेत. “ हे थांबवणं गरजेचं आहे, आम्ही एक छोटीशी सुरूवात केली आहे. या देशात ज्या गोष्टी कधीही सांगितल्या गेल्या नाहीत आणि काही असामान्य मुद्द्यांवर विनोदांच्या माध्यमातून चर्चा होईल, अशी आम्हाला आशा आहे. आम्ही पुढे जाऊ अशी अपेक्षा आहे.” असं सुमुखी म्हणते.

ऋचाला वाटतं की एक देश म्हणून आपल्याला अनेक गोष्टी जाणून घेण्याची गरज आहे. जे विचार आपल्याला काळजीत टाकतात ते समजून घेणं आवश्यक आहे. ती म्हणते, “ ऐकणं आणि समजून घेणं गरजेचं आहे. संवेदनशीलतेच्या गोष्टी आता जुन्या झाल्या आहेत. या संवेदनशीलतेला जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला लिंगभेद आणि वयाचे अंतर या मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल.”

ऋचा आणि सुमुखीला वेगवेगळ्या मुद्यांमुळे प्रेरणा मिळाली. ऋचासाठी तिचं पंजाबी कुटुंब आणि आपली पुरूषसत्ताक संस्कृती प्रेरणास्रोत आहे तर सुमुखीला खेळ आणि राजकारणात रस आहे.

अशी आली हिंमत

“पुढे व्हा आणि आपल्या आतील मूर्ख व्यक्तीला बाहेर काढा, स्वत:ला समजवा की आता नाही तर कधीच नाही”, असं ऋचा सांगते.

“रंगमंचावर भीती वाटणं ही प्रत्येक कलाकारासाठी गमतशीर बाब असते आणि तिच तुम्हाला बांधून ठेवते. आपल्यात लोकांना हसवण्याची कला आहे असा स्वत:वर विश्वास ठेवा”, असं सुमुखी सांगते. तर आपल्या जोडीसाठी ऋचा गाण्यातून संदेश देते, “ जोपर्यंत आम्ही आमच्या लक्षाबाबत जागरूक आहोत अडचणी कमजोर पडू लागतात. अशाच प्रसंगातून आपल्यातून सुप्त शक्ती व्यक्त होतात. प्रत्येक वेळी आपल्याला स्वतःलाच आपले स्वतःचे सर्वात मोठे आयुध व्हावे लागेल. स्वतःची शक्ती स्वतःच बनवी लागेल. !”

    Share on
    close