स्पर्धापरीक्षांसाठी प्रभावशाली टेक्नॉलॉजीकल सोल्युशन 'ऑनलाईन तैयारी’

स्पर्धापरीक्षांसाठी प्रभावशाली टेक्नॉलॉजीकल सोल्युशन 'ऑनलाईन तैयारी’

Friday April 15, 2016,

5 min Read

लहान असताना परीक्षेच्या वेळी मार्गदर्शिका आणि अन्य अभ्यासाच्या साहित्यांची हमखास उजळणी व्हायची. इंटरनेटचं माध्यम किंवा शैक्षणिक स्टार्टअप्स प्रचलित नसतानाची ही गोष्ट! अनेकजण मार्गदर्शिकांच्या पुस्तकांमध्ये तोंड घालून बसलेले दिसायचे. दुसरीकडे स्पर्धा परीक्षा म्हटल्या तर त्यासाठी लाखोंनी पुस्तक उपलब्ध आहेत. अनेक पुस्तकांची पारायणं यावेळी केली जातात. पण योग्य पुस्तक शेवटपर्यंत सापडत नाही हा नेहमीचा अनुभव! मात्र आता 'ऑनलाइन तैयारी'सारख्या व्यासपीठामुळे आणि अॅपमुळे शैक्षणिक मदत मिळणं अतिशय सोपं झालं आहे. यामध्ये परीक्षार्थींना बँक, दहावी, प्रशासकीय सेवा, एनडीए, गेट, रेल्वे किंवा सरकारी नोकऱ्यांसाठी आवश्यक त्या अभ्यासक्रमांचे अनेक महत्त्वाचे पर्याय उपलब्ध आहेत.

ग्रामीण भारत ऑनलाइन शिक्षणाकडे वळेल का ?

"दरवर्षी तब्बल तीन करोड लोक विविध परीक्षा देतात. सरकारी परीक्षांसाठी त्यांच्या स्थानिक भाषांमध्ये जेवढे साहित्य उपलब्ध आहे त्यावर अभ्यास करून ते या स्पर्धा परीक्षांना बसतात. ऑनलाइन तैयारी हेच संगणिक अंतर दूर करते. ज्यामध्ये मोबाइलवर देखील स्पर्धा परीक्षांसाठी अत्यावश्यक अभ्यास मार्गदर्शन अत्यंत सुलभ पद्धतीने उपलब्ध आहे." ऑनलाइन तैयारीचे सह-संस्थापक आणि सीईओ विपिन अग्रवाल सांगत होते. विपिन यांना ही कल्पना २०१४ मध्ये सुचली. ते त्यावेळी नेस्कॉमचे सल्लागार म्हणून काम करत होते. तेव्हा नेस्कोमचं काम हे राष्ट्रीय डिजीटल साक्षरता धोरण राबवणे हे होते आणि यामागचे उद्दिष्ट्य होते ते म्हणजे भारतीयांना संगणकाचा वापर करता यावा. गुरगाव जवळच्या एका छोट्याश्या खेड्यात त्यावेळी विपिन गेले असता त्यांनी पाहिलं की लोक संगणकावर काम करण्यास फारसे इच्छुक नव्हते. त्यावेळी झालेल्या संभाषणादरम्यान, अनेकांनी आजचे युवा सरकारी नोकरीच्या संधी गमावत आहेत कारण त्यांना ऑनलाईन शिकता येत नाही, असा सूर आळवला . "मला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की अनेक जण स्मार्टफोन वापरत होते पण त्यांना संगणक वापरून स्वत:ला शिक्षणाची संधी देणं काही जमत नव्हतं. आय.आय.टी मधील माझे एक सहकारी भोला मीना हे सुद्धा एका छोट्या खेड्यातून आले होते. ते सुद्धा अशाच प्रकारच्या समस्येवर तोड शोधत होते. तेव्हा मग आम्ही एकत्रित यावर तोडगा काढायचं ठरवलं आणि ‘ऑनलाइन तैयारी’ची मुहुर्तमेढ रोवली गेली. " विपिन सुरुवातीपासूनचा प्रवास सांगत होते. 

भाषेची ताकद वापरता येऊ शकेल?

‘ऑनलाईन तैयारी’मध्ये समस्येच्या मुळापर्यंत जाऊन सोडवण्याचा प्रयत्न केला जातो मग त्यासाठी यापूर्वी कधीही न वापरण्यात आलेलं व्यवसायाचं प्रारूप वापरावं लागलं तरी! त्यांनी जेंव्हा सुरुवात केली तेंव्हाच त्यांना कळून चुकलंं की संपूर्ण भारतभर शिक्षण पोहोचवण्यासाठी मोबाइल हे सर्वोत्तम आणि सोपे साधन आहे. त्याचबरोबर त्यांना हेही माहित होत की अभ्यासक्रम त्यांना त्या-त्या भागातील स्थानिक भाषेत पोहोचवावा लागणार आहे. विपिन पुढे सांगतात की त्यांना अश्या पद्धतीचं प्रारूप बनवायचं होतं की ज्यामुळे भारतीयांना मोठा फायदा होईल. भारतातील विविध स्पर्धापरीक्षांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी या अभ्यासक्रमाचा मोठ्या प्रमाणात वापर करता येईल. या टीमनं विद्यार्थ्यांना काय हवे याचा सखोल अभ्यास केला आणि वापरण्याजोगं सोपं असं प्रारूप तयार केलं.

‘ऑनलाईन तैयारी’ हे शैक्षणिक संदर्भांसाठी व्यवहारातील बाजारपेठ म्हणून काम करतं. सध्या हे अॅप इंग्लिश, हिंदी आणि मराठी भाषेत उपलब्ध आहे आणि लवकरच अन्य भाषांचाही यात समावेश केला जाणार आहे. या अॅपचे एक वापरकर्ते नरेंदर कुमार यांनी त्यांना या अॅपचा फायदा पोलीस स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी झाल्याचं सांगितलं. या अॅपचे त्यांनी आभारही मानले.

१५ वर्षांची सोबत :

या चमूतील सारेच जण एकमेकांना तब्बल १५ वर्षांपासून ओळखतात. आयआयटी कानपूरच्या दिवसांपासुनचे ते मित्र आहेत. भोला आणि विपिन पुढे जाऊन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरी करु लागले पण ते एकमेकांच्या संपर्कात होते. काही काळानंतर त्यांनी एकत्र येऊन ही एज्युटेकची संकल्पना मांडली. या दोघांनी आयआयटी आणि आयआयएममधले आपले संपर्क वापरत सुरुवातीची आपली टीम बांधायला सुरुवात केली. ‘ऑनलाईन तैयारी’पूर्वी विपिन एका कंपनीचे उपाध्यक्ष आणि उद्योजक अशा दोन्ही भूमिका वठवून झाले होते. तर भोला यांनी पहिल्यावहिल्या टॅक्सीसेवेच्या अॅपची सुरुवात केली होती आणि मायक्रोसॉफ़्टच्या भारतीय केंद्राचे ते तंत्रप्रमुख होते. " आमच्याबरोबर निशी माथुर, अमित जैस्वाल आणि राजवीरदेखील आहेत आणि या सर्वांनी विविध कंपन्यांमध्ये आपापल्या सहकाऱ्यांना प्रमुख म्हणून मार्गदर्शन केलं होतं. निशित यांचा अनुभव वित्त आणि धोरण या खात्यात आहे तर अमित यांनी जीवनसाथी आणि शाईन या कंपन्यांमध्ये तांत्रिक टीमचं नेतृत्व केलं होतं. राजवीर हे रामको सिस्टम्समध्ये विक्री खातं सांभाळत होते. " विपिन आपल्या सहकाऱ्यांची माहिती देत होते.


image


वाढ:

डिसेंबरपर्यंत या अॅपमधून अडीच दशलक्ष इतकी माहिती डाऊनलोड करण्यात आली आहे. तर दररोज अडीच लाख युजर्स या अॅपला भेट देत असतात असा दावा कंपनी करत आहे. सुरुवातीला त्यांनी एमविपी म्हणजे व्यवहार्य उत्पादन बाजारात आणलं आणि त्यांनतर जसा प्रतिसाद येईल त्याप्रमाणे ते पुढे त्यात बदल करत गेले. ‘ऑनलाईन तैयारी’ची मोठमोठ्या प्रकाशकांशी भागीदारी आहे ज्यामध्ये एस.चांद, उपकार, अरिहंत आणि करियर लाँचरसारख्या प्रकाशनगृहांचा समावेश आहे. या संघाने नुकताच पाच कोटींचा निधी ‘५०० स्टार्टअप्स’मधून मिळवला. ज्यात मोहनदास पै, टंडेम कॅपिटल, ग्लोबेस्टर, एट कॅपिटलचे विक्रम चच्रा आणि इक्झोगोचे संस्थापक अलोक बाजपेयी प्रमुख आहेत.

या गुंतवणुकीबद्दल विक्रम सांगतात. ”भारतामध्ये येत्या काही दिवसात तब्बल ३५० दशलक्ष ग्राहक आपल्या स्मार्टफोनमधून आपल्या स्थानिक भाषांचा वापर मोठ्या प्रमाणात करू लागतील. त्यामुळे स्थानिक भाषांवर लक्ष केंद्रित करून ‘ऑनलाइन तैयारी’ ही नवनव्या ग्राहकांना सेवा पुरवण्यासाठी सज्ज आहे. पुढील वर्षांच्या शेवटापर्यंत ही टीम तब्बल १५ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचेल आणि भारतातल्या अनेक स्थानिक भाषांमध्ये हे अॅप उपलब्ध असेल. " आम्ही एक आधुनिक व्यासपीठ लोकांना देऊ इच्छितो की ज्यामध्ये प्रत्येकजण स्वत: शिकू शकेल आणि नवनव्या शिक्षण पद्धती आत्मसात करू शकेल आणि त्यांना जे काही हवं आहे ते सर्व त्यांना एकाच व्यासपीठावर मिळू शकेल." विपिन आपल्या योजना सांगत होते .

युवर स्टोरीच्या मते :

ब्लुमबर्गच्या निष्कर्षानुसार, भारत हा शिक्षणाच्या क्षेत्रात उत्क्रांतीच्या वाटेवर आहे आणि इ-लर्निंग च्या बाजारपेठेमुळे ही क्रांती तब्बल १८ टक्क्यांनी अधिक वाढणार आहे, जी वैश्विक सरासरीपेक्षा अधिक आहे, त्याचप्रमाणे भारत हा इ-लर्निंग स्व:अभ्यासक्रम करण्याच्या मार्गकक्षेतही आघाडीवर आहे.

भारतातलं ऑनलाईन शिक्षण क्षेत्र हे २०१७ मध्ये ४० अब्जाचा आकडा पार करेल. आयबीईएफच्या रिपोर्टनुसार भारतात २०२२ पर्यंत ५०० दशलक्ष कुशल कामगार तयार होतील. एप्रिल २००० ते जानेवारी २०१५ या कालावधीत या क्षेत्रातली परदेशी गुंतवणूक १०७१ दशलक्ष इतकी होती. आज स्थानिक भाषेची मागणी अधिक आहे. भारतात आज ७८० भाषा बोलल्या जातात आणि ८६ वेगवेगळ्या लिपी आहेत. यातल्या २९ भाषा लक्षावधी लोक वापरतात आणि २२ भाषा या भारताच्या राज्यघटनेनुसार अधिकृत भाषा म्हणून मानल्या गेल्यात. इंटरनेटवरचा ऑनलाईन अभ्यासाचा ५६ टक्के मजकूर हा इंग्रजी भाषेत आहे. तर भारतीय भाषांमधला मजकूर हा फक्त ०.१ टक्के इतकाच आहे. असे समजू की मोबाईल इंटरनेटचा वापर हे इंग्रजी समजू शकणारेच करतात. तर भारतात आजही १०० ते १६० दशलक्ष युजर्स असे आहेत ज्यांना या मजकुराचं आकलनंच होत नाही. भारतीय भाषांवर लक्ष केंद्रीत करुन इनशोर्ट्स आणि आता स्नॅपडीलसारख्या कंपन्यासुद्धा विविध भाषांमधून संवाद साधत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात मोठे बदल होणार हे निश्चित!

यासारख्या आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित :

शिक्षणक्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या स्मितिन यांचे 'स्मार्टस्टेप्स'

शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवण्याकरता सात आकडी पगाराकडे पाठ फिरवणारा अवलिया

दर्जेदार शिक्षणाच्या शोधात ‘मायक्लासरुम’!

लेखिका : सिंधू कश्यप

अनुवाद : प्रेरणा भराडे