१०वी उत्तीर्ण मेकॅनिकने बनविली पाण्यावर चालणारी कार, ‘मेक इन इंडिया’साठी नाकारले विदेशी प्रस्ताव ...

१०वी उत्तीर्ण मेकॅनिकने बनविली पाण्यावर चालणारी कार, ‘मेक इन इंडिया’साठी नाकारले विदेशी प्रस्ताव ...

Friday April 29, 2016,

7 min Read

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी म्हटले होते की, वर्गातल्या सर्वात पाठीमागे बसणा-या विद्यार्थ्यामध्ये देखील देशातील हुशार प्रतिभावान व्यक्ती मिळू शकतो. कदाचित तुम्हाला ‘स्लम डॉग मिलीनियर’ सिनेमात हॉटेलात काम करणारा तो मुलगादेखील आठवत असेल, ज्याने एका टीव्ही रियलिटी कार्यक्रमादरम्यान आपल्या आयुष्यातील अनुभवाच्या बळावर कार्यक्रमात विचारलेल्या कठीणात कठीण प्रश्नांचे उत्तर देऊन सहजरीत्या करोडपती बनतो. ही कहाणी फिल्मी आहे, मात्र ख-या आयुष्यात देखील अनेक असे लोक असतात, जे कुठल्याही चांगल्या शिक्षणाव्यतिरिक्त असे काहीतरी करून दाखवितात, जे पाहून जगातील लोक देखील अचंबित होतात. कारण की, ज्ञानाचा एकमेव आणि अंतिम स्रोत केवळ जाड जाड पुस्तके, मोठमोठ्या प्रसिद्ध संस्था आणि त्यात शिक्षण घेणारे विद्वान शिक्षकच नसतात. अनेकदा रोजच्या अनुभवामुळे शिकलेल्या आणि समजलेल्या गोष्टी ज्ञान प्राप्त करण्याच्या दुस-या पद्धतींवर देखील भारी पडतात. शिक्षणतज्ञ देखील हे मान्य करतात की, व्यावहारिक ज्ञान हे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे.

image


मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यात राहणा-या १०वी उत्तीर्ण ५४वर्षीय एक कार मेकँनिक रईश महमूद मकरानी यांनी हे तथ्य खरे सिद्ध करून दाखविले आहे. मकरानी यांच्या दोन आविष्काराने त्यांना देश- प्रदेश सहित संपूर्ण जगात प्रसिद्ध केले आहे. पेट्रोल व्यतिरिक्त पाण्यावर चालणारी कार आणि मोबाईलवरून कार हाताळण्याच्या त्यांच्या तंत्राने जगभरातील वैज्ञानिक आणि अभियंत्यांना अचंबित केले आहे. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर जे काम अभियंते करू शकले नाहीत, त्याला केवळ एका १०वी पास मेकँनिकने करून दाखविले आहे. या यशानंतर अनेक देशातील प्रसिद्ध कंपन्यांनी त्यांना तंत्र विकण्यासाठी किंवा त्यांच्या देशात येऊन सेवा देण्याचा आग्रह केला आहे. मात्र मकरानी यांनी त्यांचा प्रस्ताव नाकारला. ते त्यांच्या तंत्राचा वापर पंतप्रधानांच्या ‘मेक इन इंडिया’ अभियानाअंतर्गत केवळ देशवासी आणि देशासाठी करू इच्छितात. त्यांनी आपल्या यशस्वी आविष्काराबाबत आणि त्याच्या नंतरच्या संपूर्ण घटनास्थळाबाबत युवर स्टोरीला विस्तृतपणे सांगितले. 

image


मध्यप्रदेशची राजधानी भोपाळपासून जवळपास २००किमी अंतरावर असलेल्या सागर जिल्ह्याच्या सदर बाजारात अनेक वर्षांपासून रईश महमूद मकरानी यांचे कुटुंबीय राहतात. गाड्यांची दुरुस्ती करण्याचा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. मागील ५० वर्षापासून हिंद मोटर नावाने त्यांचे गँरेज सुरु आहे, जे रईश मकरानी यांच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. जवळपास ३५ वर्षापूर्वी शिक्षणादरम्यान १२वी मध्ये नापास झाल्यानंतर मकरानी आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून आपल्या या वडिलोपार्जित गँरेजचे काम पाहू लागले. आपल्या कामाला ते अशा समर्पित भावनेने आणि प्रामाणिकपणे करू लागले की, काम आणि मोटरगाड्यांचे त्यांना कधी वेड लागले ते माहितच पडले नाही. नव नव्या गाड्यांची माहिती करून घेणे आणि त्यांच्या तंत्राला समजणे, ही त्यांची आवड होती. ते एखाद्या अनुभवी डॉक्टरप्रमाणे गाड्यांच्या इंजिनचा आवाज ऐकून आणि त्याला पाहून कुठलीही खराबी असेल तर ते क्षणातच ठीक करतात. मकरानी यांची चार मुले देखील त्यांच्या या व्यवसायात साथ देतात. मकरानी आपले वडील सईद मकरानी यांना आपले उस्ताद मानतात. 

image


पेट्रोल नव्हे तर पाण्यावर चालणारी कार बनविली

सध्या मकरानी आपल्या पाण्यावर चालणा-या कारमुळे देश आणि जगात चर्चेत आहेत. डिस्कवरी आणि बीबीसी पासून देशातील प्रमुख वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रात त्यांच्या या आविष्कारावर प्रकाशझोत टाकला आहे. पाण्यावर चालणारी त्यांची कार ट्रॉयल रन मध्ये पूर्णपणे यशस्वी झाली आहे. सरकारी संस्थांपासून खासगी संस्थांनी त्यांच्या कारला पारखले आणि त्यांच्या कारला भविष्याची कार म्हणून घोषित केले आहे. रईश मकरानी यांना याचे प्रमाणपत्र देखील मिळाले आहे. मकरानी यांनी युवर स्टोरीला सांगितले की, “मी या कारला बनविण्यासाठी वर्ष २००५ पासून प्रयत्न करत होतो, मात्र मला अपेक्षित यश २०१२ मध्ये मिळाले. त्यांनतर मी सलग या कारला अपग्रेट करत होतो. मी आपला हा प्रयोग कारच्या ८०० सीके इंजिनवर केले आहे. आम्ही कारला पाणी आणि कँल्शियम कार्बाइड पासून चालविण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही मिश्रणाने एसीटीलीन नावाचा वायू निर्माण होतो, ज्यामुळे कार चालते. पेट्रोल इंजिनमध्ये फेरबदल झाल्यानंतर एसीटीलीन पासून चालणारे इंजिन बनविले. नंतर कारमध्ये मागच्या बाजूला एक सिलेंडर लावण्यात आले आहे. त्यात पाणी आणि कॅल्शियम कार्बाइडला मिसळून एसीटीलीन निर्माण केले जाते. काही वेळातच एसीटीलीन बनताच कार चालायला लागते.”

image


या कारमध्ये चार लोक बसू शकतात. याला चालविण्यात प्रती दहा किमी जवळपास २०रुपयाचा खर्च येतो, जो सध्याच्या पेट्रोल, डीजेल, सीएनजी एलपीजी आणि एथनॉल पासून चालणा-या कारपेक्षा खूप स्वस्त आहे. फॉर्मूल्याला पेटेंट करण्यासाठी त्यांनी २०१३ मध्ये इंटलेक्चुअल प्रॉपर्टी ऑफ इंडियाच्या मुंबई स्थित कार्यालयात याचिका देखील सादर केली होती, जेथून त्यांच्या कारला पेटेंट मिळाले आहे. 

image


चीन आणि दुबई येथून मिळाला कारच्या निर्माणात सहयोगाचा प्रस्ताव

मकरानी यांच्या या यशानंतर त्यांना चीन आणि दुबईच्या वाहन निर्माता कंपन्यांनी कार निर्माण करण्यात मदत करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यांनी सांगितले की, चीनच्या सियाग शहरातून इलेक्ट्रिक वाहन बनविणारी कंपनी कोलीयोचे एमडी सुमलसनने या फॉर्मूल्यावर मिळून काम करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. कंपनीने मोठ्या स्तरावर पाणी आणि कार्बाईडच्या मदतीने एसीटीलीन बनवून त्याला इलेक्ट्रिक एनर्जी लिक्विड फ्युलमध्ये बदलण्याचे देखील म्हटले आहे. मकरानी २६ मे २०१५ ला चीनला गेले होते. जवळपास ११दिवसा पर्यंत ते चीनमध्ये राहिले. मात्र त्यांनी चीनी कंपनीला भारत आणि विशेषकरून सागरमध्ये निर्मिती करून सर्वात पहिले त्याचे अनावरण करण्याची अट ठेवली होती. त्यानंतर कंपनीने त्याला याबाबत विचार करण्यासाठी वेळ मागितला होता. रईस यांच्यानुसार याआधी २०१३ मध्ये दुबईची इन्व्हेस्टमेंट कंपनी लस्टर ग्रुपनेदेखील या फॉर्मूल्यावर काम करण्यासाठी सहयोग करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र भारतात राहून फॉर्मूला तयार आणि अनावरण करण्याच्या गोष्टीबाबत सहमती बनत नव्हती. 

image


गँसवेल्डिंग करताना सूचली कल्पना

रईश मकरानी यांच्या मते, “मला गँसवेल्डिंग करताना पाण्याने कार चालविण्याची कल्पना सूचली. गाडीच्या इंजिनच्या पिस्टनला चालविण्यासाठी आग आणि करंट पाहिजे. वेल्डिंगमध्ये देखील कँल्शियम कार्बाईड आणि लिक्विडमिळून आग निर्माण होते. मी आपल्या पेट्रोलकारच्या इंजिनमध्ये थोडा फेरबदल केला आणि गाडीच्या फ्युअलटँकमध्ये पेट्रोल व्यतिरिक्त पाणी आणि कँल्शियम कार्बाइडचा पाईप लावला. त्यानंतर गाडी सुरु करून पाहिले आणि इंजिन सुरु झाले. सुरुवातीस त्यात गतीबाबत समस्या होत्या, ज्या मी दूर केल्या.”

मकरानी सांगतात की, ते सुरुवातीपासूनच वेगळे काहीतरी करण्याचा विचार करत होते. पेट्रोल, डीझेलचे वाढते भाव आणि त्यांचा मर्यादित पुरवठा यामुळे देखील ते पाण्यापासून कार चालविण्यासाठी प्रेरित झाले होते. असे असूनही या आविष्कारानंतर अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले की, जगात पिण्याच्या पाण्याचे संकट आहे, तर अशातच पाण्यापासून चालणा-या कारमुळे समस्या निर्माण होईल. मकरानी या प्रश्नावर उत्तर देताना म्हणतात की, याप्रकारच्या चिंतेचे काही कारण नाही.

“माझी कार पिण्याच्या पाण्यामुळे चालणार नाही, तर ती दुषित पाण्यामुळे देखील चालू शकते. आंघोळ करणे, कपडे धुणे आणि इतकेच काय तर नाल्यातील पाण्याने देखील कार चालू शकते.” 

image


आतापर्यंत १२ पुरस्कारांनी सन्मानित

रईश मकरानी आपल्या या यशासाठी आतापर्यंत १२ विभिन्न पुरस्कारांनी सन्मानित झाले आहेत. पहिल्यांदा वर्ष २०१३मध्ये मध्यप्रदेश विज्ञान भवनने त्यांच्या कामाला नावाजले आणि त्यांना सन्मानित केले. जागतिक पर्यावरण दिवस २०१५च्या प्रसंगी देखील त्यांना विज्ञान मेळाव्यात त्यांच्या या आविष्कारामुळे सरकारने त्यांना सन्मानित केले. अशाप्रकारे त्यांच्या नावावर एकूण १२पुरस्कार आहेत. मात्र, ते या सन्मानामुळे संतुष्ट नाहीत. त्यांचे म्हणणे आहे की, “मला खरा आनंद तेव्हा मिळेल, ज्या दिवशी त्यांची कार देशातील लोकांच्या कामी येईल. मेक इन इंडिया मार्फत सरकार या कारला बनवेल.” 

मकरानी सरकारी उदासीनतेमुळे थोडे दु:खी देखील आहेत. ते सांगतात की, देशात प्रतिभेची कमतरता नाही, मात्र सरकार त्याचा उपयोग करू शकत नाही. देशातील प्रतिभावान तरुणांना काम करण्याची संधी मिळत नाही. अखेर तो निराश होऊन, किंवा आपली कल्पना एखाद्या देशाबाहेर विकतो किंवा विदेशात जाऊन काम करायला लागतो. ते सांगतात की, मला खूप त्रास होतो, जेव्हा आपल्या देशातील एखादी व्यक्ती दुस-या देशात जाऊन एखादे मोठे काम करते. मकरानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप मोठे प्रशंसक आहेत. ते त्यांची ‘मन कि बात’ खूप लक्ष देऊन ऐकतात. त्यांना आशा आहे की, पंतप्रधानांच्या ‘मेक इन इंडिया’ मुळे त्यांच्या स्वप्नांना देखील एक दिवशी पंख लागतील. 

मकरानी यांचा एक दुसरा महत्वाचा आविष्कार

मकरानी यांनी केवळ पाण्यावर चालणारी कारच बनविली नाही तर, त्यांनी वाहन चोरीच्या समस्येला दूर करण्यासाठी देखील एक अनोखा आविष्कार केला आहे. त्यांनी एक असे डिवाईस आणि मोबाईल अॅपची निर्मिती केली आहे, ज्यामुळे तुम्ही आपली कार आपल्या मोबाईलने बंद आणि चालू करू शकता. हजारो किमी दुरून देखील तुम्ही हे काम सहजरीत्या करू शकतात. त्या व्यतिरिक्त तुम्ही आपल्या कारमध्ये बसलेल्या लोकांचा संपूर्ण संवाद देखील एेकू शकतात. कार चोरी झाल्यावर या डिवाइसमुळे केवळ कारचे ठिकाणच माहित पडत नाही तर, त्याला बंद देखील केले जाऊ शकते. त्यामुळे कारला शोधणे आणि चोराला पकडण्यात मदत मिळेल.

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

इंदौरमधल्या दाम्पत्यानं तयार केलं आहे जगातलं सर्वात किफायतशीर 'एयर कंडीशनर' भारतातल्या या ‘पॉवरकपल’ची अनोखी कहाणी

बारावी उत्तीर्ण व्यक्तीने केवळ दहा हजारात निर्मित केला एक टन एसी, विजेचा वापर १०पटीने केला कमी!

भर उन्हाळ्यातही वितळणार नाही आईसक्रीम, थंड राहणार पाणी

लेखक : हुसैन तबिश

अनुवाद :किरण ठाकरे


image