उबेरचे सहसंस्थापक 'ट्रॅविस कॅलानिक' यांच्याकडून यशस्वी उद्यमी बनण्यासाठीच्या नऊ उपाययोजना

उबेरचे सहसंस्थापक 'ट्रॅविस कॅलानिक' यांच्याकडून यशस्वी उद्यमी बनण्यासाठीच्या नऊ उपाययोजना

Wednesday February 03, 2016,

5 min Read

 

image


दिल्लीमध्ये भारत सरकारने स्टार्टअप इंडियाच्या शुभारंभ समारंभात उबेरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक ट्रॅविस कॅलानिक यांचे टाळ्यांच्या गडगडात स्वागत केले. ते या समारंभामध्ये ‘ ए गीक गाईड टू बिकमिंग एन आंत्रप्रेन्योर’ टॉक मध्ये बोलण्यासाठी आले होते.

१) एक चांगले गीक बना - गीक ( Geek) म्हणजेच फक्त विज्ञान किंवा संगणकामध्ये विलक्षण रुची असलेला किंवा झपाटलेला. ट्रॅविस यांनी आपल्या प्रेझेंटेशनची सुरवात एका अशा चित्रफितीद्वारे केली ज्यामध्ये एक बालक संगणकासमोर बसलेला आहे. " मी लहानपणापासूनच संगणक वेडा होतो आणि लहानवयातच कोडींग सुरु केले. माझे वडील सिविल इंजिनिअर होते. माझ्यासाठी गीकप्रमाणे मोठे होणे नक्कीच सोपे नव्हते.

२) अशा गोष्टींचा शोध घ्या ज्याप्रती तुम्ही भावुक असाल :-

उबेरच्या स्थापनेविषयी ट्रॅविस यांनी सांगितले की, "आम्हाला पॅरिसमध्ये प्रवासादरम्यान टॅक्सी मिळाली नाही". त्यांनी एक असा बाजार बघितला जो बऱ्याच काळापासून बदलला नव्हता. न्यूयॉर्कमध्ये पण तेवढीच संख्या असलेल्या टॅक्सीला ६० वर्षापासून लाइसेन्स मिळाले होते. कॅबच्या मालकांनी एक लॉबी करत कृत्रिम कमतरतेचे कारण निर्माण केले. गोष्टी बऱ्याच बिघडल्या आणि या व्यवसायात कुणीच येऊ शकले नाही. ड्राईव्हरला टॅक्सी चालविण्यासाठी १५० डॉलर द्यावे लागायचे तेव्हा त्यांनी टॅक्सी चालविण्याचा परवाना मिळावायचा व तो टॅक्सी चालवू शकायचा. चालक पैसे कमवू पहात होते तर ग्राहक कमीत कमी वेळेत एका जागेहून दुसरीकडे जाऊ इच्छित होते, जे अशक्य होते आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन उबेरची स्थापना झाली जी चालकांबरोबरच ग्राहकांसाठी सुद्धा सोपी झाली.

३)समस्या कितीही कठीण असली तरी तुम्हीच त्याचे उत्तर शोधा

उबेरच्या आपल्या भूमिकेविषयी सांगतांना ट्रॅविस यांनी ही गोष्ट उजेडात आणली, " मी उबेर मध्ये प्राॅब्लेम सॉल्वरचा चीफ आहे. ज्याप्रकारे गणिताच्या शिक्षकांना किचकट गणित सोडवण्यात मजा येते त्याच प्रकारे आम्ही समस्या सोडविण्यासाठी उत्सुक असतो’’. त्यांनी विस्तारपूर्वक पुढे सांगितले की कशाप्रकारे उबर हॉट मॅप्सचा (नकाशे) वापर करतो. जे कारला ट्रॅक आणि राईडर पॅटर्नची भविष्यवाणी करून कॅब चालकांना योग्य वेळेत, योग्य ठिकाणी पोहचण्यासाठी मदत करतील. त्यांनी सांगितले की, "युजर्सला चांगला अनुभव देण्यासाठी आम्हाला हे जाणून घेतले पाहिजे की त्यांची मागणी काय आहे आणि ग्राहक कोणत्या वेळेत टॅक्सीची मागणी करत आहे. या सगळ्या गोष्टी १५ मिनिट अगोदर झाल्या पाहिजे. या प्रकारे आपले आगमन वेळेच्या अपेक्षेपेक्षा कमीत कमी स्तरापर्यंत आपण नेऊ शकतो? उबेर यांनी मागणी तसेच तिच्या पूर्वीच्या समस्यांना दूर करण्यासाठी त्यांच्या मूल्यात मोठ्या प्रमाणावर बदल केला आहे ज्यामुळे जास्त मागणीच्या बरोबरीने वेळेत ठराविक प्रमाणात टॅक्सी हजर राहू शकते. ट्रॅविस यांना वाटते की,’’ जेव्हा तुम्ही एखाद्या समस्येच्या समाधानानंतर संतुष्ट होत असाल तर तुम्ही चांगले उद्यमी बनू शकत नाही, कारण आव्हान हे नेहमी मोठे असले पाहिजे. व्यवसायामध्ये आम्ही व इतर कंपन्या आव्हान स्वीकारण्याच्या प्रयत्नात आहेत. जसे गुगल आणि टेस्ला विनाचालक कारच्या समस्या समाधानाच्या प्रयत्नात आहे.

४) विश्लेषक व कल्पक बना

ट्रॅविस यांचे मानणे आहे की जादू तेव्हा होते जेव्हा तुम्ही रचनात्मकतेबरोबर विश्लेषणात्मक क्षमतेचा मिलाफ करतात. ते सांगतात की कम्प्युटर कोणतीही गणना करू शकतो. पण तेच रचनात्मकतेशिवाय केलेल्या गणनेचा काहीच अर्थ नाही. जेव्हा दोन्ही गोष्टी बरोबरीने होतात तेव्हा आनंद मिळतो व ते गेम चेंजर ठरू शकते. उबरच्या काही रचनात्मक पैलूबद्दल बोलतांना ट्रॅविस यांनी उबर आईसक्रिमचे उदाहरण दिले, जिथे त्यांनी आईसक्रिमचे वितरण ड्रोनच्या माध्यमातून उबेर चॉपर्सने केले. 'फादर्स डे' च्या निमित्त कंपनीने हेलिकॉपटर उड्डाणची सुविधा पुरवली.

५) धारणा व सत्यता यामधील फरक ओळख

ते सांगतात की," कल्पना आणि वास्तव यांच्यात नेहमी एक मोठा फरक असतो आणि तेच अंतर नवप्रवर्तकासाठी एक खेळाचे मैदान असते जेथे जादू होऊ शकते’’. ट्रॅविस मानतात की जो गर्दीचा पाठपुरावा करतो तो कधीच त्याच्या पुढे जाऊ शकत नाही तसेच जो आपले स्थान प्रस्थापित करू शकतो त्याच्यात काही तरी वेगळे करण्याची धमक असते".

ते गंमतीत सांगतात की,"अशा गोष्टी करा ज्या प्रवाहाच्या विरुद्ध किवा विपरीत असतील. परिस्थितीशी जुळवून घ्या, लवचिक बना भले ही लोकांनी तुम्हाला वेडे समजू द्या. जेव्हा जग नायगारा धबधब्यावर दोरीने चढण्याच्या कठीण गोष्टीला पुष्टी देऊ शकतात, तसेच उद्यमी अशक्य गोष्टी आत्मसात करू शकतात, कारण ते विशेष कौश्यल्यातून पार पडलेले असतात.

६) जादू

ट्रॅविस सांगतात की, "नोकरीवर योग्य व्यक्तीचे चयन करून भविष्यात डोकावून आपल्या टीमला उत्तेजित करणे. स्टीव्ह जॉब्स यांच्या कडे आईफोनचे पेटंट होते आणि त्यांनी स्मार्ट फोनचे भविष्य तेव्हा बघितले जेव्हा कुणी याचा विचार पण केला नव्हता. जादू करण्याचा सगळ्यात चांगला उपाय म्हणजे लोकांना आनंदी करणे किंवा त्यांना आर्थिक मदत करणे, त्यांची आर्थिक बचत करणे किंवा त्यांच्या पैशाचे योग्य मुल्यांकन करणे.

७) आपले मत योग्य पद्धतीने मांडणे

कंपनीला आपल्या तांत्रिक बाबींवर तसेच उत्पादनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. ग्राहकांशी संलग्न रहाण्याचा चांगला उपाय म्हणजे आपली मते पटवून देणे. यानंतर ट्रॅविसने एक व्हिडीओ चित्रफित दाखवली. ज्यामध्ये एका टॅक्सी चालकाच्या नजरेतून जग दाखविले ज्यामध्ये नित्यक्रमातील काही चमत्कार सामील होते.

८) अशक्यप्राय असे काहीच नाही

ट्रॅविस सांगतात की अशक्य गोष्ट करणे म्हणजे उद्यमिता आहे. त्यांनी आपल्या स्टार्टअपच्या पूर्वीचे उदाहरण दिले. जिथे ते आणि त्यांचे सहयोगी वरकला, तिरुवनंतपूरमला निघाले. तिथे रूम बुक करून काही आठवडे समुद्रकिनारी घालवले. त्यांनी असे का केले यासाठी ते सांगतात की, "आम्ही असे साहस करू शकत होतो. सारे जग वैश्विक होत आहे. सागरी किनारा, बीजिंग आणि बंगळूरु, साहस केल्याशिवाय कोणतीच गोष्ट शक्य नाही जसे कि उबरने चीन मध्ये घुसून अशक्य अशी गोष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. एक असा बाजार जिथे कोणत्याही परदेशी कंपन्यांचा जम बसला नाही".

९) एका चॅम्पिअनची मानसिकता

ट्रॅविस यांनी उद्योजकांना सांगितले की तुम्ही तुमच्या क्षेत्रात सर्वस्व पणाला लावा. कमतरता ठेवली तर अपयशी व्हाल. त्यांनी सांगितले जर आपल्याकडे उर्जा असेल तर ठेच लागून सुद्धा सावरण्याची जिद्द असणाऱ्यांसाठी अशक्य असे काहीच नाही.

लेखक : एस इब्राहीम

अनुवाद : किरण ठाकरे