तुमचा कचरा देखील उचलतात आणि पर्यावरणाचे रक्षण देखील करतात, तुम्ही पण माहिती करून घ्या कोण आहेत ते?...

तुमचा कचरा देखील उचलतात आणि पर्यावरणाचे रक्षण देखील करतात, तुम्ही पण माहिती करून घ्या कोण आहेत ते?...

Saturday December 19, 2015,

3 min Read

स्वच्छ ठिकाणी रहायला कोणाला आवडणार नाही? मात्र ज्याप्रकारे कचरा वाढत आहे, त्याचप्रकारे जवळील भागाला स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवणे देखील कठीण होत आहे. अशातच दिल्लीत एनसीआर भागात या कच-याला योग्य ठिकाणी नेण्याची व्यवस्था करत आहे ‘सफाई सेना’. या सफाई सेनेचे जवान केवळ कचराच उचलत नाहीत तर, पर्यावरणाचे देखील रक्षण करतात. ‘सफाई सेनेत सामील लोक त्या कच-याची विल्हेवाट न लावता, त्याला पुन्हा एकदा उपयोगात आणतात. ‘सफाई सेनेत जवळपास १२ हजार लोक आहेत, जे मागील ७ वर्षापासून घर, दुकान, कार्यालय आणि कारखान्यांमधून कचरा उचलून त्याला योग्य ठिकाणी नेत आहेत. ‘सफाई सेने’च्या या कामात ‘चिंतन’ नावाची एक स्वयंसेवी संस्था त्यांची मदत करते. ही संघटना केवळ सफाई सेनेच्या सदस्यांना त्यांच्या कामाचे प्रशिक्षणच देत नाहीत तर, विभिन्न प्रकारच्या गरजा देखील पूर्ण करते.

image


दिल्ली एनसीआर मध्ये सार्वजनिक स्वच्छतेसाठी वेगवेगळ्या महानगरपालिका आहेत, मात्र जर सफाई सेना नसती तर, हे काम किती कठीण होऊ शकते. या गोष्टीला वेगवेगळ्या ठिकाणी बनलेल्या महापालिकाच चांगल्या जणू शकतात. ज्यांचे काम ही सेना खूप सहज करून टाकते. सफाई सेना कचरा वेचणारे, घरी घरी जाऊन कचरा गोळा करणारे, फेरीवाले, दुसरे छोटे विक्रेते आणि विभिन्न प्रकारचे फेरवापर करणा-यांचा दिल्ली एनसीआर मध्ये एक गट आहे. सफाई सेनेतील सदस्य सर्वात पहिले कचरा उचलतात, त्यानंतर वेगवेगळ्या भागात घेऊन जाऊन त्यांना वेगवेगळे करतात. त्यानंतर जो ओला कचरा असतो, त्यापासून खत बनवतात आणि सुक्या कच-याला फेरवापर करणा-यांकडे पाठविले जाते.

image


‘सफाई सेना’ जो कचरा एकत्र करते, त्यातील जवळपास २० टक्के कचरा असा असतो, ज्याचा पुन्हा वापर केला जाऊ शकत नाही. ज्याला ते लोक महानगरपालिकेकडे सोपवितात. दिल्ली एनसीआरमध्ये सफाई सेने जवळ १२ हजार लोक आहेत, जे वेगवेगळ्या ठिकाणावरून घाण उचलण्याचे काम करतात. दिल्ली एनसीआर मध्ये २० संकलन केंद्र आहेत, कच-याचे ६ जागांवरच खत तयार करण्याचे हे काम करतात. त्यात तीन बाय सहाचा एक खड्डा असतो, ज्यात कचरा टाकला जातो. ज्यानंतर त्याचे सुकी पाने आणि गवत यांच्यासोबत मिश्रण केले जाते. कच-याला गवत आणि पानांमध्ये मिश्रित केल्यानंतर त्यात पाणी टाकून ३० दिवसांसाठी ठेवले जाते आणि प्रत्येक दुस-या दिवशी त्या मिश्रणाला ढवळले जाते. त्यानंतर १५ दिवस त्याला सुकविले जाते. ज्यानंतर त्याला पिसून खतामध्ये टाकण्यायोग्य बनविले जाते. सध्या हे जे खत बनवितात, त्यांची विक्री खूप कमी होते, त्यासाठी बहूतेकवेळा हे लोक मोफत मध्येच खत त्या लोकांमध्ये वाटतात, जेथून ते कचरा उचलण्याचे काम करतात, जेणेकरून लोक आपल्या घरात ठेवलेल्या कुंड्या मध्ये त्याचा वापर करू शकतील.

image


सफाई सेनेचे कर्मचारी प्रत्येक आठवड्यात एक बैठक देखील करतात, ज्यात आपल्या कामासोबत समाजात आपली ओळख बनविण्याव्यतिरिक्त शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या विषयांवर चर्चा देखील होते. सफाई सेनेचे अधिकाधिक सदस्य १८ वर्षापासून ते ४५ वर्षापर्यंत असतात. गरज पडल्यास हे आपल्या सहका-याची आर्थिकरित्या मदत करतात. त्या व्यतिरिक्त सफाई सेनेचे सदस्य नियमित स्वरुपात स्वच्छतेसाठी मोहीम चालवितात. हे विभिन्न रेल्वे स्टेशन, आरडब्ल्यू आणि शाळा या ठिकाणांवर ते आपली मोहीम चालवितात. हे शाळेत जाऊन मुलांना सांगतात की, कच-याला कशाप्रकारे ठेवले पाहिजे, ज्यामुळे मुलं स्वस्थ राहतील, तर रेल्वे स्टेशन किंवा दुस-या सार्वजनिक ठिकाणाची हे साफसफाईच करत नाहीत तर, लोकांकडून शपथपत्र देखील भरून घेतात की, ते कच-याला केवळ कचरा कुंडीतच टाकतील, जेणेकरून स्टेशन आणि शहर स्वच्छ राहू शकेल.

image


सफाई सेनेचे सचिव जयप्रकाश चौधरी बिहारचे राहणारे आहेत. वर्ष १९९४ मध्ये जेव्हा नोकरीचा शोध घेण्यासाठी ते दिल्लीला आले तेव्हा, त्यांनी कचरा उचलण्याचे आणि वेचण्याचे काम सुरु केले. त्यानंतर ते स्वयंसेवी संघटना ‘चिंतन’ मध्ये सामील झाले. वर्ष २००८ मध्ये चिंतन च्या मदतीनेच सफाई सेनेची स्थापना करण्यात आली, ज्यात त्यांची मोठी भूमिका होती. जयप्रकाश यांच्या मते, “आमची संस्था मागील सात वर्षापासून घरा-घरापासून ते कचराकुंडीपर्यंत कचरा उचलण्याचे काम करत आहे. मात्र आम्हाला याबाबतची तक्रार आहे की, सफाई सेनेला जे अधिकार मिळणे गरजेचे होते, ते आतापर्यंत मिळालेले नाहीत आणि या गोष्टीची चर्चा हे प्रत्येक आठवड्याच्या बैठकीत देखील करतात.”

जयप्रकाश चौधरी यांना या गोष्टीचे दु:ख आहे की, ज्या घरातून ते कचरा उचलतात, त्याच घरातील लोकच त्यांना ओळखत नाहीत, तर अशातच सरकार त्यांना कशी ओळखेल. असे असूनही ते आपल्या कामात कधीच निष्काळजीपणा करत नाहीत.

image


लेखक : हरिश बिश्त

अनुवाद : किशोर आपटे.