दिव्यांग मुलांचे आयुष्य आनंदमय होण्यासाठी सोनाली यांनी सोडली पत्रकारितेची नोकरी !

दिव्यांग मुलांचे आयुष्य आनंदमय होण्यासाठी सोनाली यांनी सोडली पत्रकारितेची नोकरी !

Wednesday March 23, 2016,

5 min Read

विकासासोबतच समाजात अपंग लोकांबद्धल विचार बदलले आहेत. परंतु, अद्यापही एक मोठा घटक असा आहे की, जो शारीरिक अक्षमतेमुळे चालणे, बसणे, खाणे आणि बोलण्यात असमर्थ लोकांना आपल्या मधीलच एक समजत नाही. त्यात अनेकदा कुटुंबाची उदासीनता देखील सामील होते. मात्र काही लोक असे असतात, जे या विचारांना बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषकरून मुलांना अपंग समाजासोबत जोडण्यासाठी, त्यांना सर्व सुख देण्यासाठी आपले सर्व काही अर्पण करतात. अपंग मुलांना प्रवाहाच्या दिशेने जोडण्याचे सर्वात महत्वाचे काम शिक्षणाचे आहे. अशातच शारीरिकरित्या कमजोर असलेल्या मुलांना साक्षर करण्याचा प्रयत्न करत आहेत, मुंबईच्या सोनाली श्यामसुंदर. ज्यांच्यासाठी ही मुले अनमोल आहेत. 

image


सोनाली श्यामसुंदर यांचे शाळेतील शिक्षण राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी झाले. कारण, वडिलांची सरकारी नोकरी. नोकरीमुळे अनेकदा त्यांची बदली होत होती, मात्र पदवीचे शिक्षण त्यांनी मुंबईच्या रुईया महाविद्यालयातून केले. त्यानंतर त्यांनी हिंदुस्तान टाईम्स आणि फ्री प्रेस जर्नल मध्ये एक पत्रकार म्हणून काम देखील केले. त्या दरम्यान त्या अपराध आणि सामाजिक क्षेत्रांची पत्रकारिता करायच्या. 

image


सोनाली यांनी युवर स्टोरीला सांगितले की, “पत्रकारिता करताना जर मला कुणी गरीब आणि आजारी भेटले तेव्हा, मी आपले काम संपवून त्यांची विचारपूस करायला जात होती, असे असूनही हे काम मी माणुसकीच्या नात्याने करायची. मात्र माझ्या कार्यालयातील वरिष्ठांचे म्हणणे होते की, पत्रकारिता केल्यानंतर आपले काम संपते, त्यामुळे कुणालाही सहानुभूती दाखविणे चुकीचे असते. असे असूनही हे काही वर्षापर्यंत सतत सुरु होते, पुन्हा एक दिवस मी निश्चय केला आणि स्वतःची नोकरी सोडली.” 

नोकरी सोडल्यानंतर त्या ‘प्रेरणा’ आणि ‘मासूम’ यांसारख्या स्वयंसेवी संस्थेसोबत सामील झाल्या. या दोन्ही संस्था सामाजिक कार्य करत होत्या. आपल्या कार्यादरम्यान त्यांनी एखादी स्वयंसेवी संस्था कशी चालविली जाते, हे शिकले आणि या क्षेत्रातदेखील त्यांनी काम कसे करावे याचे प्रशिक्षण घेतले. त्याव्यतिरिक्त त्या आपल्या साप्ताहिक सुट्टीत समाजसेवक प्रकाश आमटे यांच्याकडे जात होत्या, ज्या स्वतः एक स्वयंसेवी संस्था चालवायच्या. हळू हळू सोनाली यांची आवड सामाजिक कार्यात वाढू लागली आणि त्यांनी निश्चय केला की, त्या सामाजिक क्षेत्रातच काम करतील. आपले काम सुरु होण्यापूर्वी सोनाली यांनी बीएमसी (मुंबई महानगर पालिका) आणि विभिन्न संस्थांसोबत मिळून अपंगांवर संशोधन केले. त्या दरम्यान त्या बीएमसी शाळेत येणा-या अपंग मुलांना भेटल्या. त्यांना पाहून सोनाली यांनी विचार केला की, त्यांच्यासाठी खूप काही करण्याची गरज आहे. जेव्हा त्या अपंगांसाठी काम करण्याबाबत विचार करत होत्या, तेव्हा त्यांचा विवाह झाला, मात्र अशा मुलांसाठी काम करण्याची इच्छा त्यांच्या मनात अद्यापही कायम होती. 

image


image


एके दिवशी त्यांनी अपंगांसाठी काम करण्याची इच्छा आपले कुटुंब आणि पतीला सांगितली. कुटुंबाने सोनाली यांची इच्छा मान्य केली. कुटुंबाच्या सहयोगाने सोनाली यांनी २०११मध्ये उर्मी फाउंडेशनची स्थापना केली. त्यांनी बीएमसीच्या विशेष शाळांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यात त्या अपंग मुलांना शिक्षित करण्याचा प्रयत्न करतात. त्या सांगतात की, “बीएमसीकडे संसाधन खूपच मर्यादित असतात, सोबतच अशा मुलांचे अधिकाधिक आई-वडील आपल्या मुलांना ओझे समजतात. ते लोक आपल्या मुलांना खूपच खराब परिस्थितीत शाळेत आणतात. तेव्हा आम्ही अशा मुलांना स्वच्छतेबाबत सांगतो. कारण मुलांना या साधारण गोष्टी देखील माहित नसतात. जसे स्वच्छतागृहात कसे जायचे, आंघोळ कशी करावी, अन्न कसे खायचे. कारण यातील काही मुले तर चमचा देखील योग्य पद्धतीने पकडू शकत नाहीत.” 

image


सोनाली आपल्या कामाबद्धल युवर स्टोरीला सांगतात की, “आम्ही बीएमसीसाठी अभ्यासक्रम तयार करतो, ज्याला बीएमसी अपंगांसाठी बनलेल्या शाळेत लागू केले आहे. त्याव्यतिरिक्त शिक्षण आणि सामाजिक कार्यात काम करण्यासाठी आमचा गट आहे, ज्यात शिक्षक आणि चिकित्सक दोन्ही आहेत. आम्ही झोपड्यांच्या भागात जातो, जेथे ‘व्हील चेयर’ देखील जाऊ शकत नाही, तेथे अशा लोकांना आम्ही स्वच्छतेबाबत आणि शिक्षणाबाबत सांगतो.” 

image


ज्या स्लम भागात चालण्यासाठी देखील व्यवस्थित जागा नसेल तेथील अपंग मुले शिकण्यासाठी शाळेत तरी कसे येतील. या समस्येला दूर करण्यासाठी उर्मी फाउंडेशनने या ठिकाणांवर बीएमसी आणि दुस-या लोकांच्या मदतीने अभ्यास केंद्र उघडले आहे. मुंबई मध्ये उर्मी फाउंडेशनची चार केंद्र आहेत. वाशी नाका मध्ये दोन, लालडोंगर, स्वास्तिक चेंबरमध्ये एक एक केंद्र आहे. तर बीएमसीमार्फत येणारे केंद्र जे दादर, चेंबूर, घाटकोपर आणि सायन मध्ये आहे, त्यात देखील उर्मी फाउंडेशन आपल्या सेवा देत आहे. सोनाली यांचे म्हणणे आहे की, बीएमसीने मुलांना शिकविण्यासाठी आपले कर्मचारी ठेवले आहेत. आम्ही आमच्या विशेष गटासोबत मिळून अपंग मुलांच्या शिक्षणात त्यांची मदत करतो. 

image


सोनाली आपल्या कामाच्या पद्धतीबाबत सांगतात की,“सर्वात पहिले आम्ही मुलांना पारखतो, की त्यांना किती आणि कशाची माहिती आहे. त्यामुळे आम्ही या मुलांचे पाच पद्धतीने आकलन करतो. जसे एजुकेशनल, पर्सनल, सोशल, रिक्रिएश्न आणि प्री – वोकेशनल. त्यामार्फत मला माहित पडते मुलगा शारीरिकरित्या किती गतिमान आहे, मुलगा किती बोलू शकतो, तो किती आत्मनिर्भर आहे आणि तो खाणा खुणांना समजतो की नाही.”

त्यानंतर सोनाली आणि त्यांचा गट एजुकेशन थेरपी मार्फत पहिल्या वर्गापासून पाचवी पर्यंतच्या मुलांच्या अभ्यासक्रमाची तयारी करतात. सर्वात पहिले त्या अपंग मुलांना अंकांचे ज्ञान देतात आणि त्यानंतर त्यांना बेरीज वजाबाकी शिकविली जाते. प्रत्येक सहा महिन्यात हे लोक बाहेरून या मुलांना पडताळण्यासाठी बोलवितात आणि बघतात की, मुलांमध्ये किती विकास झाला आहे. हा अहवाल हे लोक बीएमसीला देखील पाठवायचे. 

image


सोनाली ऑक्युपेशनल थेरपीमार्फत मुलांना दैनिक कार्य आणि आणि पेन्सील पकडणे इत्यादी शिकवते. आर्ट थेरपी मध्ये मुलांना एका जागी बसविणे शिकविले जाते. अखेर मुलांना टीच थेरपी मार्फत अक्षर ज्ञान शिकविले जाते. विशेष बाब ही आहे की, हे सर्व सहा वर्षाच्या मुलांना शिकविले जाते आणि त्यानंतर या मुलांचा दाखला बीएमसी शाळेत केला जातो. हे सर्व असूनही जी अपंग मुले त्यांच्या केंद्रापर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्यांच्याकडे ते आठवड्यात १-२ दिवस त्यांच्या घरी जातात आणि त्यांना शिकविण्याचा प्रयत्न करतात. 

image


निधीबाबत इतके म्हणणे आहे की, त्यांचे नियमित स्रोत देखील नाही. हे आपल्या संस्थेचे काम सामान्य लोक आणि नातेवाईकांकडून मिळणा-या निधीने खूप मुश्कीलने चालवत आहे. सध्या त्यांच्या संस्थेत १३सदस्य आहेत. भविष्याच्या योजनांबाबत त्यांचे म्हणणे आहे की, मुंबईच्या स्लम मध्येच बीएमसीच्या मदतीने आपल्या कामाचा विस्तार करू इच्छितात. त्या व्यतिरिक्त राज्याच्या दुस-या भागात देखील जिल्हा परिषद मार्फत गावात या प्रकारचे केंद्र उघडणार आहे.

संकेतस्थळ : www.urmifoundation.com

अशाच प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

अंधाने उघडली गरिबांसाठी शिक्षणाचे कवाडे

‘डोरस्टेप स्कूल’ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणारी शाळा, साक्षरतेला प्रत्येक स्तरावर पोहोचविण्याचा आगळा वेगळा प्रयत्न! 

शिक्षणाला सहज आणि मनोरंजक बनवते “परवरिश, द म्युजियम स्कूल”!




लेखक : हरिश

अनुवाद : किशोर आपटे