मनपसंत केक न मिळाल्यामुळे पती-पत्नीने सुरु केले स्वतःचे बेकरी उत्पादन

मनपसंत केक न मिळाल्यामुळे 
पती-पत्नीने सुरु केले स्वतःचे बेकरी उत्पादन

Sunday May 08, 2016,

3 min Read

जे खाण्याचे शौकीन असतात ते आपल्या आवडीच्या पदार्थांसाठी काहीही करू शकतात. मनपसंत खाण्यासाठी माणूस कोसो दूर प्रवास करतो, नव्या ओळखी बनवतो व नव्या विचारांना दिशा देतो. खवैय्येगीरीच्या या शौकाने तन्मय शंकर व ज्योती शंकर यांना नवीन व्यवसाय करण्यासाठी प्रेरित केले. Thebakerymart.com ची कहाणी एक अशीच रोमांचकारी आहे. एक दिवस ज्योती व त्यांच्या पतीने जवळच्या दुकानातून केक ऑनलाईन ऑर्डर केला पण तो केक त्यांच्या पसंतीला उतरला नसल्यामुळे ते दोघेपण नाराज झाले. पण याच कारणामुळे त्यांना स्टार्टअपची कल्पना सुचली व त्यांनी Thebakerymart.com ची स्थापना केली. या संस्थेच्या संस्थापिका ज्योती शंकर यांनी युअर स्टोरीला सांगितले की, “प्रत्येक बेकर जो उत्तम व चविष्ट केक बनवतो पण लोक त्यापासून अनभिज्ञ राहतात त्यांच्यासाठी मी एक व्यावसायिक बाजारात नवीन संधी उपलब्ध करून देणार आहे. एखादा बेकर जर प्रसिद्ध असेल तर आम्ही त्यांना http://www.thebakerymart.com या व्यासपीठामार्फत जोडून त्यांचे उत्पादन हजारो गिऱ्हाईकांपर्यंत पोहचवण्याची संधी उपलब्ध करवून देतो.”

image


'बेक माय मार्ट'ची एक कहाणी –

ज्योती सांगतात की, “त्यावेळेस आम्हाला जाणवले की आपण पण ऑनलाईन मार्केट तयार करावे ते अशा ग्राहकांसाठी जे जवळच्या बेकरी दुकानातून बेकरी उत्पादन विकत घेतात. ज्यांना ऑनलाईन व्यापाराची काहीही माहिती नसते अश्या ग्राहक व बेकरीवाल्यांमध्ये आम्ही एक दुवा साधण्याचे काम करू इच्छितो.”

ज्योती सांगतात की, “thebakerymart.com एक रेटिंग विभाग असेल ज्यात ग्राहकांद्वारे मिळालेली पसंती ठरवेल की बेकरला बाजारात पसंतीच्या कोणत्या विभागात स्थान मिळाले आहे. याचा अर्थ एकदम स्पष्ट आहे ते म्हणजे ज्या बेकरला जास्त रेटिंग मिळेल त्याचा केक ग्राहकांच्या पसंतीला जास्त उतरला आहे.”

image


लोकांमध्ये http://www.thebakerymart.com वरील डिझायनर केकच्या आवडीबद्दल ज्योती सांगतात की जर आम्हाला १०० केकची ऑर्डर मिळाली तर त्यातील फक्त १० केक हे साधे असतात व बाकी ९० केक हे डिझायनर असतात.

स्वतःचा स्टार्टअप सुरु करण्याआधी दोघांनी बाजारामध्ये निरीक्षण करून अनेक विक्रेत्यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. दोघांना या निरीक्षणानंतर हे कळले की विक्रेते ऑनलाईन बद्दल ऐकून आहेत पण ते इंटरनेट स्मार्ट नसल्यामुळे आपले केक ऑनलाईन विकू शकत नव्हते व आपला बाजार ऑनलाईन करू शकत नव्हते. ज्योती व तन्मय यांनी आपल्या विचारांना व्यवसायामध्ये परिवर्तीत करण्याचे काम सुरु केले. सहसंस्थापक ज्योती व तन्मय सांगतात की, “आमच्या वेबसाईटचा उद्देश हा सगळ्या केक विक्रेत्यांच्या फायद्यासाठी आहे जिथे ते आपला केक ऑनलाईन विकू शकतील व आपल्या दुकानाची जाहिरात करू शकतील. अश्याप्रकारे आम्ही बेकरी विक्रेता व ग्राहकांमधील दरी कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत.”

image


केकच्या किंमती ह्या त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या साधन-सामुग्रीवर आधारित असतात. केकची ऑर्डर बुक करतांना आपण आपल्या मनाप्रमाणे कोणतीही डिझाईन ऑर्डर करू शकता. ज्योती या डिझाईनला पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे तुमच्या मुलांची केक पार्टी निश्चितच मजेदार बनेल.

thebakerymart.com सध्या बीटा मॉडेल चालवत असून दिल्लीच्या एनसीआर मध्ये केकची ऑनलाईन ऑर्डर पूर्ण करीत आहे. सध्या पूर्ण कारभारावर ज्योती देखरेख करीत आहे व साईट व्यवस्थापनापासून ते विक्रेता यांच्या व्यवस्थानापर्यंत सगळा कारभार त्या स्वतःच सांभाळत आहेत.

image


तन्मय हे साईट स्ट्रक्चर व अन्य तांत्रिकी बाबींमध्ये ज्योती यांची मदत करतात. सध्या कंपनी सरासरी ३०० किलोग्रॅमची ऑर्डर पूर्ण करीत आहे. कंपनीला जास्त ऑर्डर डिझाईन व भन्नाट केकच्या कल्पकतेमुळे मिळतात. आपल्या स्वप्नांना आकार देऊन पुढे वाटचाल करणाऱ्या ज्योती कामाचा समतोल साधतांना सांगतात की काम तर गरजेचे आहे पण घरची जबाबदारी व आपल्या चार वर्षाच्या मुलीकडे लक्ष देणे तेवढेच गरजेचे आहे. या सगळ्यांचा समतोल साधून ज्योती thebakerymart.com ला जगातील उत्तम व्यासपीठाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या ध्येयात त्यांचे पती व संस्थेचे सहसंस्थापक तन्मय शंकर यांची मोलाची साथ आहे.

वेबसाईट - thebakerymart.com

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

अवघे ८२ वर्षे वयमान, पंचवटीच्या अन्नपूर्णेची कहाणी : 'सीताबाईची मिसळ' !

खवय्यांसाठी शेफ आणि ब्रँड अँम्बॅसॅडर विकास खन्ना यांचा ‘जुनून’!

'द ग्रीन स्नॅक्स': आरोग्याशी नाही तडजोड, स्वादालाही नाही तोड

लेखक – एस.इब्राहीम

अनुवाद - किरण ठाकरे