दोन हजारांपेक्षा जास्त अंधांच्या जीवनात प्रकाश दाखवणा-या मीरा बडवे यांचे ‘निवांत अंधमुक्त विकासालय’!

दोन हजारांपेक्षा जास्त अंधांच्या जीवनात प्रकाश दाखवणा-या मीरा बडवे यांचे ‘निवांत अंधमुक्त विकासालय’!

Thursday December 10, 2015,

5 min Read

जे लोक जगातील वेगवेगळे सुंदर रंग बघू शकत नाहीत, त्यांना ‘त्या’ स्वप्ने दाखवत आहेत. जे नेत्रहीन लोक आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारू इच्छितात, त्यांच्या त्या प्रेरणा बनत आहेत, त्या आहेत मीरा बडवे. दोन दशकांपासून नेत्रहीन मुलांचे भविष्य साकारण्याचे मौल्यवान काम करणा-या मीरा यांनी आज दोन हजारापेक्षा अधिक नेत्रहीन मुलांचे पुनर्वसन केले आहे. हे मुलं नृत्य, संगीत आणि सॉफ्टवेअर इंजिनियरिंग पर्यंत अशा अनेक विषयात आपली कारकीर्द घडवत आहेत. बेकरी चालवत आहेत, वाचनालय सांभाळत आहेत. मीरा बडवे यांच्या “निवांत अंध मुक्त विकासालय” च्या माध्यमातून शिक्षण घेणारे मुलं विभिन्न कारकिर्दीत आपले नाव प्रसिद्ध करत आहेत. मीरा यांच्या हाताखालून शिक्षित झालेली मुलं आज ८ हजारापासून ते ८० हजारापर्यंत मानधन कमवत आहेत. याच वर्षी त्यांच्या ५२ नेत्रहीन मुलांची वेगवेगळ्या बँकेत नियुक्ती झाली आहे. विशेष बाब ही आहे की, त्यापैकी ३० पेक्षा जास्त मुलं अधिकारी पदासाठी नियुक्त झाले आहेत.

image


“ज्यांच्या पंखात बळ असते, ते आकाशाची उंची गाठू शकतात. मात्र, जे जमिनीवरच राहिलेत त्यांच्यासाठी आम्हाला जगायचे आहे.” हे विचार आहेत, पुण्याजवळ राहणा-या मीरा बडवे यांचे. ज्या मागील दोन दशकांपासून नेत्रहीन लोकांना आपल्या पायावर उभे राहाण्यास शिकवत आहेत. इंग्रजी साहित्यात एमए आणि त्यानंतर बीएड करणा-या मीरा यांनी “निवांत अंध मुक्त विकासालय” सुरु करण्यापूर्वी अनेक वर्षे महाविद्यालय आणि शाळेत शिकविण्याचे काम केले. एकदा मीरा आपल्या पतीसोबत पुण्यातील गोरेगाव येथे असलेल्या नेत्रहीन लोकांच्या एका शाळेत गेल्या. जेथे त्यांनी अनेक लहान लहान मुलं पाहिली. त्याच दरम्यान एक मुलगा त्यांच्याकडे आला आणि त्याने त्यांना मिठी मारली, हा विचार करून की, त्याची आई त्याला भेटायला आली आहे. मात्र जेव्हा त्या मुलाला खरे समजले तेव्हा, तो रडायला लागला. या गोष्टीने मीरा यांच्या मनाला खूपच हळवे केले. ज्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला की, महाविद्यालयात मुलांना शिकविण्याचे काम सोडून अशा नेत्रहीन मुलांसाठी काहीतरी करावे.

image


त्यानंतर त्या स्वयंसेवक म्हणून या नेत्रहीन मुलांमध्ये सामील झाल्या आणि त्यांना इंग्रजी भाषा शिकवायला लागल्या. सलग तीन वर्षापर्यंत नेत्रहीन मुलांना शिकविल्यानंतर त्यांना समजायला लागले की, या नेत्रहीन मुलांना शाळेत जितक्या मदतीची गरज नसते, त्यापेक्षा अधिक गरज तेव्हा असते, जेव्हा हे वयात येतात. कारण, तेव्हा त्यांना घरातले आणि समाज देखील स्वीकारत नाही. अशाचप्रकारे एके दिवशी मीरा यांची भेट आपल्या घराजवळच्या रस्त्यावरील एक नेत्रहीन मुलगा सिद्धार्थ गायकवाड यांच्याशी झाली. जो जवळपास १०-१५ दिवसांपासून उपाशी होता. त्या मुलाला २० वर्षापूर्वी त्याच्या आई-वडिलांनी नेत्रहीन शाळेत सोडले होते, त्यानंतर ते त्याला परत घेण्यासाठी आले नाहीत. मीरा यांच्यामते, त्या मुलाची तब्यत इतकी खराब होती की, तो व्यवस्थित चालू देखील शकत नव्हता. ज्यानंतर त्या त्याला आपल्या घरी घेऊन आल्या. तेव्हा मीरा यांना त्या गोष्टीची जाणीव झाली,ज्याचा सामना नेत्रहीन लोक करत असतात. त्यानंतर त्यांनी सिद्धार्थ यांना केवळ शिकवलेच नाही तर, त्याला आपल्या पायावर उभे देखील केले. तसेच त्याला मुलाचे प्रेम देखील दिले. या घटनेनंतर मीरा यांच्या जीवनाने असे वळण घेतले की, आज त्या २०० पेक्षा अधिक नेत्रहीन मुलांच्या आई आहेत, त्या त्यांच्या कुटुंबातीलच एक आहेत.

image


आज मीरा यांनी दोन हजारपेक्षा अधिक नेत्रहीन मुलांचे पुनर्वसन केले आहे. मीरा यांचे म्हणणे आहे की, “ त्या लोकांना देखील आपल्या इच्छा आकांक्षा असतात. त्यासाठी मला समाजाशी खूप झगडावे लागले.” आज त्यांनी शिकविलेले तीन नेत्रहीन मुलं पीएचडी करत आहेत, तर काही मुलं कायद्याचे शिक्षण घेत आहेत. स्वतः मीरा यांनी जवळपास १४ वर्षापर्यंत या नेत्रहीन मुलांना २२ विषय शिकविले आहेत.” “निवांत अंध मुक्त विकासालय” ची आपली एक प्रिंटींग प्रेस देखील आहे, जेथे प्रत्येकवर्षी २ लाखापेक्षा अधिक पेपर ब्रेल लिपीत छापले जातात. मीरा सांगतात की, त्यांची संस्था उच्च शिक्षणावर विशेष भर देते. येथे ब्रेल लिपीत छापलेली पुस्तके महाराष्ट्राच्या अनेक महाविद्यालयात शिकविली जातात. ज्याला संस्था मोफत मध्ये ही पुस्तके देतात. मीरा यांच्या मते, जेव्हा मी या मुलांवर काम करण्यास सुरुवात केली, तेव्हा आमच्या शिक्षण व्यवस्थेत अशा मुलांसाठी एकही शब्द ब्रेल लिपीत नव्हता.” मात्र आज त्यांच्याकडे देशभरातील अनेक मुलं आपल्या गरजेनुसार, पुस्तके मिळविण्यासाठी पत्र लिहितात. ज्यानंतर हे लोक त्यांच्या गरजेला लक्षात घेऊन पुस्तके छापतात. मीरा सांगतात की, “ नेत्रहीन लोकांसाठी ‘ब्रेल गेटवे ऑफ नॉलेज’ आहे. त्यांचासाठी हा ज्ञानाचा दरवाजा आहे.

image


“निवांत अंध मुक्त निवासालय” ची स्वतःची एक चॉकलेट कंपनी आहे. ज्याचे नाव “चॉको निवांत” आहे. जवळपास चार वर्ष जुनी या कंपनीचे संचालन नेत्रहीन लोकच सांभाळतात. या कंपनीत ३५ ते ४० नेत्रहीन लोक काम करतात आणि जेव्हा त्यातील कुणाची नोकरी बाहेर कुठे लागली तर, त्यांची जागा नेत्रहीन मुलं घेतात. आज “चॉको निवांत” एक ब्रांड बनला आहे. म्हणूनच कंपनी क्षेत्रात त्यांनी बनविलेल्या चॉकलेटची खूप मागणी आहे. मीरा सांगतात की, यावर्षी केवळ दिवाळी असल्या निमित्ताने “चॉको निवांत” ने जवळपास ४ लाख रुपयांचा व्यवसाय केला.

image


या संस्थेची एक सॉफ्टवेयर कंपनी देखील आहे, ज्याचे नाव ‘टेक विजन’ आहे. ज्याला सिलकॉन वॅली कडून विभिन्न प्रकल्प मिळतात. विशेष बाब ही आहे की, कंपनीला चालविणा-या नेत्रहीन लोकांनी त्या लोकांना आपल्याकडे नोकरी दिली आहे, जे बघू शकतात. मीरा सांगतात की, ज्या समाजाने त्यांना नाकारले होते, हे मुलं त्यांनाच आपल्यात सामावून घेत आहेत. हीच या मुलांची विशेष बाब आहे, की त्यांच्या याच जिद्दी पुढे मी आज नतमस्तक आहे.” संस्थेची स्वतःचे एक ब्रेल लिपीचे वाचनालय देखील आहे. ज्याचे नाव “व्हिजन अनलिमिटेड” आहे. या वाचनालयात ५ हजारापेक्षा जास्त पुस्तके ब्रेल लिपीत लिहिलेली आहेत आणि ही सर्व पुस्तके उच्च शिक्षणाची आहेत. आज या वाचनालयाच्या १७ शाखा महाराष्ट्राच्या विभिन्न शहरात काम करत आहेत. जेणेकरून छोट्या छोट्या गावात राहणा-या नेत्रहीन मुलांना देखील उच्च शिक्षण प्राप्त होऊ शकेल. येथे गरजेनुसार ब्रेल लिपीत लिहिलेल्या पुस्तकांना ठेवण्यात आले आहे.

image


आज मीरा यांचे पति देखील आपला व्यवसाय सोडून त्यांच्यासोबत मिळून नेत्रहीन लोकांना आत्मनिर्भर करण्याचे काम करत आहेत. म्हणूनच पति-पत्नीची ही जोडी आई-वडीलांची जबाबदारी सांभाळत केवळ वयात आलेल्या नेत्रहीन लोकांचे पुनर्वसनच करत नाही तर, हे लोक त्यांचा विवाह देखील करून देतात. निवांत मध्ये राहणारे मुलं १८ वर्षापासून २५ वर्षापर्यंतच्या मधील आहेत. निवांत मध्ये शिकणारे मुलं स्वतः तर शिकतातच सोबतच दुस-यांना शिकविण्याचे देखील काम करतात. येथे प्रत्येक नेत्रहीन मुलांना कामाचे वाटप केले गेले आहे. हेच कारण आहे की, आज या नेत्रहीन मुलांमध्ये आत्मसम्मान एखाद्या सामान्य व्यक्तीपेक्षा कमी नाही.

लेखक : हरिश बिश्त

अनुवाद : किशोर आपटे