ग्रामीण भारताचे चित्र पालटणे हेच ध्येय : झरिना स्क्रूवाला

ग्रामीण भारताचे  चित्र पालटणे हेच ध्येय : झरिना स्क्रूवाला

Wednesday March 16, 2016,

6 min Read

सर्वसामान्यांना सक्षम बनवणे आणि त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी बळ देऊन त्यांचं आयुष्य पालटणे, हे ध्येयचं झरिना स्क्रूवाला यांच्यासाठी चालना देण्याचं काम करतं. त्या आहेत ‘स्वदेश फाउंडेशन’च्या संथापिका, विश्वस्त. ही संस्था 'उत्तमोत्तम सेवा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मुल्य यांचा वापर करून ग्रामीण भारताला सक्षमतेकडे नेण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे.

झरिना आणि त्यांचे पती रोनी स्क्रूवाला यांनी स्वदेश फाऊंडेशन ही संस्था स्थापन केली. सुरुवातीला या संस्थेचं नाव होतं ‘शेयर’ (सोसायटी टू हिल एन्ड रिस्टोर एज्युकेट ). यातील ९०% पैसा हा रोनी यांचा स्वत:चा असतो आणि उर्वरित दानातून येतो. या दान करणाऱ्या कंपन्यांमध्ये टाटा ट्रस्ट, एच एस बी सी आणि आय डी बी आय सारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

स्वदेश ही २००० वस्त्यांमध्ये पोहचली असून, झरिना यासाठी स्वत: विविध भागात फिरल्या आहेत. लोकांना भेटून त्यांच्या समस्या ऐकल्या आहेत. 

image


२०१३ साली ‘हर स्टोरी’ने त्यांची भेट घेतली आणि स्वदेश फाऊंडेशन संदर्भात, त्यातील आव्हानासंदर्भात ,स्वदेश फाऊंडेशन संदर्भातल्या त्यांच्या भावी योजना आणि त्यांच्या आयुष्याबद्दल त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी स्वदेशमुळे झालेल्या प्रभावशील कामांबद्दल त्यांच्याकडून अधिक जाणून घेता आलं. याच मुलाखतीचा काही अंश :

'स्व' पासून घडेल देश

"आमचं ध्येय आहे ते म्हणजे दर पाच वर्षात १ दशलक्ष लोकांना गरिबीच्या गर्तेतून वर आणण्याचे ! हे ध्येय गाठण्यासाठी आम्ही संपूर्ण वर्षभर प्रवास केला आणि संशोधन केलं. आम्ही अनेक स्वयंसेवी संस्थांशी बोललो. तज्ज्ञांची मतं जाणून घेतली समाजसेवकांना भेटलो. त्यांच्याकडून आम्ही जाणून घेतलं की लोकांना मदत व्हावी यासाठी नेमके कोणते उपाय करण्यात आले आहेत आणि सद्य परिस्थितीचा आढावा घेतला. आम्हाला आमच्या कार्यक्रमांची आखणी करता आली आणि आमच्या तत्वांची मांडणी करण्यात मदत मिळाली". त्यांना हे पक्क ठाऊक होतं की, आपल्याला लोकांना गरिबीतून सक्षम धोरण राबवून संपूर्णपणे बाहेर काढायचं आहे. एखादी सामुदायिक धर्मादाय संस्था सुरु करण्याऐवजी आम्ही या कार्यक्रमावर भर द्यायचा ठरवला. स्वदेश अनेकांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी सक्षम बनवते आणि त्यांच्या स्वप्नांना पंख देते.

" लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी सर्वप्रथम त्यांना स्वप्न बघायला आणि ते पूर्ण होतील याची शाश्वती देणं महत्त्वाचं असतं. त्यांनी ज्या आयुष्याचं स्वप्न पाहिलंय ते त्यांना जगण्यासाठी इच्छा निर्माण व्हायला हवी आणि फक्त त्यांच्या स्वत:साठी नाही तर त्यांच्या कुटुंबियांसाठी सुद्धा. त्यांना त्यांच्या मुलांना शिक्षण देता यायला हवं आणि त्यांना नोकरी मिळवून देता यावी. ही साधी मुलभूत स्वप्नसुद्धा तुम्हाला पूर्ण करता येत नसतील तर ती गरिबी आहे. त्यामुळे आम्ही प्रथमत: ही मानसिकता बदलायची ठरवली. त्यांच्या आसपासचं वातावरण," झरिना सांगत होत्या. 

image


३६० अंशी दृष्टीकोन

ग्रामीण सक्षमतेविषयी संस्थेनं अत्यंत समग्र आणि व्यापक असा दृष्टीकोन अंगिकारला आहे. ज्याला ३६० अंशीय दृष्टीकोन असं म्हणता येईल. ज्यामध्ये ५ स्तंभांच्या आधारे वैयक्तिक आणि सामाजिक विकास घडवता येऊ शकेल. हे पाच स्तंभ म्हणजे सामाजिक क्रियाशिलता, पाणी आणि स्वच्छता, शेती आणि उपजीविका, शिक्षण आणि आरोग्य व पोषण !

झारिना यांच्या मते गरिबी ही दोन प्रकारची असते. " एक तर वैचारिक आणि दुसरी भौतिक " पहिल्या पद्धतीची गरिबी ही लोकांना सक्षम बनवून आणि त्यांची मानसिकता बदलून घालवता येते. इथे मानसिक विचार बदललेल्या व्यक्तीला त्याच्यात स्वप्न पाहण्याची आणि पूर्ण करण्याची ताकद आहे, हे उमगू लागतं. त्याच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी हे त्याला पटू लागतं.

हे घडत जेंव्हा तुम्ही त्या व्यक्तीला स्वप्न पाहण्याची ताकद देता. इथं हा ३६० अंशाचा दृष्टीकोन उपयोगी पडतो आणि आयुष्याच्या आरोग्य, शिक्षण अशा विविध टप्प्यावर त्यांना मदत करता येते.

"अनेकांनी आम्हाला एकाच गोष्टीवर किंवा एकाच टप्प्यावर लक्ष केंद्रित करा असा सल्ला दिला." झरिना सांगत होत्या. पण अनेक वर्षांच्या संशोधनानुसार, त्यांच्या असा लक्षात आलं की यासाठी समग्र दृष्टीकोनच उपयोगी ठरणार आहे आणि त्यामुळेच ही ३६० अशांची कल्पना त्यांना सुचली.

आज त्यांच्यासोबत १६०० जणांचा चमू काम करीत आहे. ज्यामध्ये १३०० स्वयंसेवक आहेत आणि ३०० तज्ञ मंडळी आहेत. यातील ९०% सदस्य हे रायगड जिल्ह्यात अगदी तळागाळात जाऊन काम करत आहेत.

स्वदेशमध्ये जबाबदारी हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. संस्था जे काही करते आहे त्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग असणं अत्यंत गरजेचं आहे. उदाहरणार्थ : शौचालय बांधली जातात तेव्हा या बांधकामांना सामुहिक मदत केली जाते. यामध्ये पैशांचा वाटा भले कमी असला तरी त्याचं योगदान महत्त्वाचं ठरतं. कारण त्यामुळे त्यांना जबाबदारीची जाणीव येते आणि हे जे काही काम केलंय त्याची निगा ठेवणं, हे आपल्याही हातात आहे, याची जाणीव त्यांना होते. 

image


प्रभाव :

झरीना यांच्या मते सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे झालेल्या कामाचा प्रभाव मोजणे आणि निरीक्षण करणे. उदाहरणार्थ, प्राध्यापक आणि शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत त्यांनी ६१७५ शिक्षकांना प्रशिक्षण दिलं आणि ज्यामुळे ८५,३२४ विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला. पुढे त्या म्हणतात," पुढील तीन वर्षात आम्ही १२,५०० शिक्षक आणि प्राध्यापकांना प्रशिक्षण देणार आहोत, ज्यामुळे २ लाख विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल "

तरीही याचा फायदा नजिकच्या काळात त्वरित दिसून येणं कठीण आहे. काही योजनांची फळ चाखायला वेळ द्यावा लागतो. पण त्यासाठी त्या योजनेवर किंवा कल्पनेवर विश्वास ठेवणं गरजेचं असतं. झरिना म्हणतात," आम्हाला हे पक्क ठाऊक आहे की इथे आम्ही बदल घडवू इच्छितो आणि ते मुलभूत स्वरूपाचे आहेत. आमच्याकडे एक मजबूत संघ आहे जो सतत चांगलं काम करण्याच्या प्रयत्नात असतो. आमचा आमच्यावर विश्वास आहे आणि प्रभावशील काम घडेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. ज्यावेळी आमच्या योजना काम करत नाहीतं असं लक्षात आल्यास आम्ही पुनश्च मुळापासून सुरुवात करतो."

महत्त्वाची शिकवण :

झरिना यांनी आपले पती रोनी यांच्यासोबत १९९० साली यु टीवी ची स्थापना केली. अत्यंत जोमाने हा व्यवसाय सुरु होता, त्यानंतर वाॅल्ट डिस्नेनं कंपनी ताब्यात घेतली. झरिना यांनी २०११ साली कंपनी सोडली. गेली दशकभर त्या यु टीवीमध्ये शिकलेल्या उत्तम कामाचा अनुभव स्वदेशसाठी वापरत आहेत. त्या म्हणतात," समाजसेवा आणि यु टीवी या दोन्हीमध्ये शिकण्यासारखं खूप काही मिळालं." यातील काही अनुभवाचे किस्से त्यांनी सांगितले.

समाजाप्रती प्रेम आणि आदर : तुम्ही तुमच्या समुदायाला ओळखायला शिकलं पाहिजे. तुम्ही त्यांच्यावर प्रेम नाही केलत तर तुम्ही त्यांची सेवा करू शकणार नाही, तुम्ही त्यांच्यावर प्रेम नाही केलत तर तुमच्या मनात आदरभाव उत्पन्न होणार नाही आणि त्यासाठी तुम्हीही त्यांच्याबरोबर जास्त वेळ व्यतीत करायला हवा.

उच्च श्रेणी राखण्यावर भर द्या : तुम्ही स्वत: किंवा तुमचा जोडीदार, तुमचे कर्मचारी किंवा मग तुमचा समुदाय असो, उच्च श्रेणी राखण्यावर भर द्या. सर्वांना जबाबदारीची जाणीव करून द्या आणि मग ते जबाबदार राहतात की नाही आणि निकाल वेळेवर देतात, याची खात्री करा.

सहकार्य : मीडिया मध्ये सेल्स, कॅमेरे, एडीट आणि अन्य टीम मिळून जे काही सहकार्य दर्शवतात, त्याचप्रमाणे, प्रभावशील काम होण्यासाठी समाज, कर्मचारी,भागीदार या सर्वांना एकत्रित सहकार्याने काम करणं आवश्यक आहे.

स्टार्टअप्स :

"जेंव्हा लोकांना स्टार्टअप या शब्दाचा अर्थ सुद्धा माहित नव्हता तेव्हा आमची सुरुवात झाली होती. पण आज संपूर्ण जग स्टार्टअपकडे खेचलं गेलं आहे आणि आम्ही जे करत आहोत ते सुद्धा त्याचा भाग बनले आहेत. " त्यांच्या मते स्टार्टअप्समुळे समस्यांचं निराकरण होत आहे, प्रश्नांना तोड मिळते आहे, स्वयंरोजगार सुरु होत आहेत आणि आपल्या देशातील गरीबीवर मात करण्याचा हा उत्तम उपाय आहे. त्यांचा मौलिक सल्ला म्हणजे तुमच्या हृदयाचं ऐका आणि स्वप्नांना सत्यात उतरवा.

महिला :

झरिना प्रचंड आशावादी आहेत आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना त्या थारा देत नाहीत. महिला आणि त्यांची सुरक्षा यावर बोलताना त्या म्हणतात की आज चित्र पालटलं आहे, अनेक महिलांना आपल्या घरातून सहकार्य आणि पाठींबा मिळत असल्याने त्या तक्रार करायला धजावतात. हे एक सकारात्मक पाउल असून हळूहळू घडणारे बदल आपल्याला निश्चितपणे दिसून येतील. तरीसुद्धा पुरुषांच्या हक्कांकडे सुद्धा सकारात्मक दृष्टीने पाहायला हवं अस त्यांना वाटतं. आपली कायदे पद्धती पुरुषांच्या प्रती अत्यंत कठोर असल्याचं त्या म्हणतात आणि या बाबीकडे सखोल दृष्टीने पहायला हवं असं मत त्यांनी व्यक्त करतात.

आनंद साजरा करणंसुद्धा गरजेचं :

आज वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्या आपल्या कुटुंबाला आणि मित्रपरिवाराला धन्यवाद देतात. गेल्या ९ वर्षांपासून त्या विपश्यना करताहेत, साधनेचा एक प्रकार ज्यामुळे तुम्ही अंतर्बाह्य बदलून जाता. जाता जाता त्या म्हणतात," आनंद साजरा करा, जेवढी मजा करता येईल तेवढी करा, सदैव हसा, नाहीतर तुम्ही जे काही करत आहात त्याला काहीच अर्थ उरत नाही.

लेखिका: तन्वी दुबे

अनुवाद : प्रेरणा भराडे 

    Share on
    close