आजपर्यंत ज्या सावकारांकडून कर्ज घेत होत्या, आज त्याच महिला सावकारांना देत आहेत, कर्ज!

आजपर्यंत ज्या सावकारांकडून कर्ज घेत होत्या, आज त्याच महिला सावकारांना देत आहेत, कर्ज!

Tuesday April 05, 2016,

4 min Read

महिलांचे अधिकार समाज त्यांना देत नसले तरी, आजच्या महिलांना आपले अधिकार घेणे चांगलेच माहित आहे. तेव्हा वाराणसीत राहणा-या महिला, ज्या कधी सावकारांच्या जाळ्यात फसून त्यांची नोकरी करण्यासाठी विवश होत्या, आज गरज पडल्यास त्या सावकारांना कर्ज देत आहेत, जे कधी लहानशी रक्कम देण्याच्या बदल्यात त्यांच्याकडून मोठे व्याज वसूल करत होते. हे चित्र पालटले आहे, माधुरी सिंह यांनी. गावात राहणा-या महिलांना स्वाभिमानाने जगणे आणि आत्मनिर्भर कसे व्हावे हे आज चाळीस वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून त्या शिकवत आहेत. 

image


माधुरी सिंह यांचा जन्म बिहारमध्ये झाला होता, पदवी घेतल्यानंतर त्यांचे लग्न वाराणसीत झाले. लग्नानंतर माधुरी सन १९९७ मध्ये डॉक्टर रजनीकांत यांची संस्था ‘वूमन वेलफेयर असोसिएशन’ सोबत सामील झाल्या. येथे जवळपास पाच वर्षापर्यंत त्यांनी गावात कुटुंब नियोजनाचे काम केले. मात्र, एका घटनेने त्यांचे आयुष्यच पालटले. त्या सांगतात की, “शंकरपूर गावात एका महिलेने प्रसूतीच्या वेळी सावकार कडून १० टक्क्याने ५०० रुपये कर्ज घेतले होते. व्याज जास्त असल्यामुळे १० वर्षानंतर ती रक्कम ७ हजार झाली, ८०० रुपये त्यांनी पहिलेच परत केले होते. पैसे चुकविले नसल्यामुळे, तो सावकार तिला मजूर बनवू इच्छित होता. तेव्हा मी विचार केला की, एक अशी संस्था बनवावी, ज्याच्या माध्यमातून गरीबांचे जीवन चांगले केले जावे.” 

image


त्यानंतर १२ महिलांसोबत माधुरी यांनी ‘महिला शक्ती’ संस्थेची स्थापना केली. त्यांनी महिलांना सांगितले की, त्यांनी एकवेळचे जेवण खाऊ नये आणि त्यातून जे पैसे जमा होतील, त्यातून त्या सावकाराचे पैसे परत करा. माधुरी सांगतात की, “सुरुवात एक मुठ तांदुळाने झाली, पुन्हा प्रत्येक आठवड्यात पाच रुपये जमा करायला लागले आणि काही वेळेनंतर या रकमेला २०रुपये महिना केले. माधुरी आणि दुस-या महिलांनी सर्वात पहिले सावकारांसोबत संवाद साधला आणि ठाण्यात तक्रार करून त्यांच्याकडून पैसे कमी करून सतराशे रुपयांमध्ये हिशोब बरोबर करून त्या महिलेला ऋण मुक्त केले. हळू हळू त्यांची संस्था वाढू लागली आणि त्यांचे १२ समूह झाले.”

image


वर्ष २०००मध्ये माधुरी यांनी इंग्लंडमधून आलेल्या संस्थेकडून गरीब बँकेच्या छोट्या छोट्या गोष्टी शिकल्या. त्यानंतर कुटुंब नियोजनाचे काम सोडून पूर्ण प्रकारे या कामाला लागल्या. आज त्यांच्या या कामाचा विस्तार ४० गावात झाला आहे आणि त्यात जवळपास २०० गट आहेत. आतापर्यंत त्यांच्याकडे ६ कोटीचा निधी जमा झाला आहे. आज हे लोक आपल्या सदस्यांव्यतिरिक्त दुस-या लोकांना देखील पैसे व्याजाने देतात. 

image


माधुरी आणि त्यांच्या कामाने प्रभावित होऊन, आज अनेक बँक अधिकारी त्यांच्याकडे येतात, हे माहिती करून घेण्यासाठी की, कशाप्रकारे ते या संस्थेला चालवितात. हे सर्व माहित करून घेतल्यानंतर बँकने त्यांच्यामार्फत अनेक लोकांना ऋण दिले आहे. माधुरी यांच्या प्रयत्नांमुळे नऊशे शेतक-यांनी २५ हजारचे ऋण ४ टक्क्यांच्या हिशोबाने घेतले आहे. ८० शेतक-यांना मुद्रा लोन मिळाले आहे, हे १० टक्क्यांच्या दराने मिळते. त्यात काहींनी ५० हजार ऋण म्हणून घेतले आहे. 

image


आपल्या सहा कोटींच्या निधीबाबत त्यांचे म्हणणे आहे की, हा पैसा समूह आणि दुस-या लोकांमध्ये वाटला गेला आहे. माधुरी सांगतात की,“जर कुणी आमचे खाते पाहिले तर, त्यांना हजार दोन हजार रुपयेच मिळतील, कारण, सर्व पैसे वाटले गेले आहेत. समूह आणि समूहाच्या बाहेर सर्वाना दोन टक्क्यांच्या दरानेच पैसे मिळतात. या बाहेरील लोकांमध्ये ते सावकार देखील सामील आहेत, ज्यांच्याकडे या महिला कधी कर्ज घ्यायला जायच्या, मात्र आज आपल्या गरजांना पूर्ण करण्यासाठी त्या सावकारांना त्यांच्या दरवाज्यात यावे लागते. जवळपास पस्तीसशे महिला ‘महिला शक्ती’ समूहामध्ये सामील आहेत.”

कर्ज देण्याच्या पद्धतीबाबत माधुरी सांगतात की, त्या लोकांना त्यांच्या गरजेनुसारच पैसा देतात. पैसे देखील त्या तपासणी केल्यानंतर देतात की, कोण केव्हा कधी पैसे परतवू शकतात. माधुरी सांगतात की, “जर कुणी शेतीसाठी कर्ज घेत असेल तर, आम्ही त्यांना विचारतो की, किती जमिनीत ते कोणती शेती करत आहेत. खत किती टाकाल, शेती त्याची आहे की, अन्य कुणाची. त्यांनतर आम्ही एका वर्षाचा हप्ता बनवून त्यांना पैसे देतो.” त्या सांगतात की, जर कर्ज देताना तपासणी केली नाही तर, अशा परिस्थितीत पैसा वसूल करण्यात समस्या येऊ शकतात.

image


माधुरी यांचा महिला गट  वेगवेगळ्या ठिकाणी पैसे जमा करतात. ही रक्कम ५० रुपये ते २०० रुपयापर्यंत आहे. व्याजाने मिळणारा पैसा सर्व लोकांमध्ये बरोबरीने वाटला जातो, मग त्यांनी कर्ज घेतले असो किंवा घेतले नसो. त्या व्यतिरिक्त जर एखाद्या महिलेकडे गाय- म्हैस आहे आणि त्या दुध विकून पैसे कमवत आहेत, तर त्या पैसे समूहाला कर्ज म्हणून देऊ शकतात, त्यात त्यांना व्याज देखील जास्त मिळते. 

image


भविष्याच्या योजनेबाबत त्यांचे म्हणणे आहे की, आपल्या समुहाचा अधिक विस्तार करून निधी वाढवू इच्छितात. त्या सांगतात की, जे शेतकरी पहिले लहानशा जमिनीवर शेती करत होते, ते शेतकरी आज मोठ्या प्रमाणात शेती करत आहेत. आता ते बँकांकडून समूह कर्जासाठी देखील संवाद साधू इच्छितात. जेणेकरून समूहाच्या लोकांचा जास्तीत जास्त विकास होऊ शकेल. सोबतच लोकांकडून आपल्या बचतीचे क्षेत्र वाढविण्यासाठी देखील सांगत आहेत.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

तीन अशिक्षित महिलांना उभारली करोडोंची कंपनी, १८ गावातील ८००० महिलांना बनविले स्वावलंबी

‘आयआयटी’च्या ‘आंच’ने बदलत आहे ग्रामीण महिलांचे जीवन, मिळत आहे स्वस्थ आणि सुखी जीवन!

चार अशिक्षित आदिवासी महिलांच्या ‘घुमर’ स्वयंसेवी गटाने बनविली कोट्यावधींच्या उलाढालीची कंपनी! जंगलातून सीताफळ आणून विकणा-यांची कामगिरी !

लेखक : हरिश

अनुवाद : किशोर आपटे

    Share on
    close