निस्वार्थपणे मोफत शिक्षणसेवा देणारे स्वामी आणि चीन्नी

निस्वार्थपणे मोफत शिक्षणसेवा देणारे
स्वामी आणि चीन्नी

Wednesday November 25, 2015,

6 min Read

गरिबीला कंटाळून मनात अपेक्षा घेऊन अंकित आणि अमितचे आई-वडील देहराडूनला आले. आज अंकित इन्फोसीस कंपनी मध्ये इंजिनिअर पदावर कार्यरत आहे आणि अमित इंडियन मैरीटाइम्स सेवेत कार्यरत आहे.

मिनाक्षी पाल हीचे लहानपण खूप हालाखीत गेले. ती देहरादून मध्ये एका छोट्या घरात आपल्या आई सोबत रहात होती. एक दिवस अचानक मीनाक्षीच्या आईने जगाचा निरोप घेतला आणि मीनाक्षी मात्र एकाकी पडली आहे . आज ती एका एचआर फर्म मध्ये कार्यरत आहे आणि तिचा एमबीए करण्याचा विचार आहे.

या दोन्ही गोष्टीतल्या मुलांचे स्वप्न पूर्ण करण्यास 'पुरुकुल युथ डेव्हलप्मेंट सोसायटीचे' (PYDS) स्वामी आणि चीन्नीचे मोलाचे सहकार्य आहे.


image


स्वामी आणि चीन्नीच्या त्यागाची गोष्ट

स्वामींची गोष्ट मनाला भावणारी आणि नम्रतेने परिपूर्ण आहे. त्यांचे बालपण लाहोर येथे व्यतीत झाले आणि कॉलेजचा अभ्यासक्रम चेन्नई येथे पूर्ण केला. त्यांनी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट च्या संदर्भातील अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्याच्यात त्यांचे मन रमले. नंतर त्यांनी मित्रांना गुंतवणुकीत मदत केली ज्याचा पुढे विकास झाला आणि घरापासूनच त्यांची समाजसेवेला सुरवात झाली. जेव्हा स्वामी २१ वर्षाचे होते तेव्हा त्यांची ओळख १९ वर्षाच्या चीन्नी बरोबर झाली. त्या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि आपल्या स्वप्नपूर्तीसाठी मुंबई गाठले.

मुंबईने स्वामी आणि चीन्नीला त्यांच्या अपेक्षेपेक्षा भरभरून दिले. त्यांनी इथे भरपूर धन कमावले, मात्र त्रस्त आणि साचेबद्ध शहरी जीवनाला ते कंटाळले होते. स्वामी यांना मधुमेह झाला. स्वामींनी जेव्हा वयाची साठी गाठली तेव्हा डॉक्टरांनी त्यांना ताकीद दिली की, त्यांची दिनचर्या अशीच राहिली तर ते जास्त दिवस जगणार नाही.

डॉक्टरांच्या ह्या चेतावणी नंतर स्वामी आणि चीन्नीने मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आणि हरिद्वारच्या दिशेने प्रस्थान केले मात्र हरिद्वारमध्ये येऊन त्यांचा भ्रमनिरास झाला, त्यांना अपेक्षित असणारी शांतता लाभली नाही. त्या नंतर त्यांनी कुमाऊ, कसौली, नैनितालच्या दिशेने प्रस्थान केले तिथे पण तेथेही त्यांना हवी तशी शांतता अनुभवता आली नाही.

मग ते ऋषिकेशला प्रस्थान करण्यासाठी एका बस मध्ये बसले परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. बसने त्यांना देहराडूनला नेऊन सोडले. इथेच त्यांनी पुढील आयुष्य जगायचे ठरविले. त्यांनी एक छोटेसे घर घेतले आणि सर्वसामान्य जीवन जगू लागले. स्वामींना इथे काही तरी नवीन करण्याची इच्छा होत होती, म्हणून त्यांनी जवळपासच्या गावातल्या मुलांना इंग्रजी शिकवायला सुरवात केली. आता स्वामींनी ८० व्या वर्षात पदार्पण केले आहे.

अर्थतज्ज्ञ ते शिक्षणतज्ज्ञ प्रवास

स्वामी गावातल्या मुलांना शिकवायचे. एक दिवस त्यांच्या माळ्याने स्वामी आणि चिन्नी यांना पुरकुल गावातला एक जमिनीचा तुकडा दाखविला. पुरकुल हे गाव हिरवेगार आणि अतिशय सुंदर आहे. चीन्नी यांना गाव आणि जमीन आवडली व त्यांनी ती विकत घेतली. इंग्रजी शिकणाऱ्या मुलांची संख्या वाढतच होती. मुले शाळेनंतर सरळ त्यांच्या कडे जायला लागली. चिन्नी स्वतःच्या घरी मुलांना खाऊ खालायची आणि मुले तिथे आवडीने इंग्रजी शिकायचे. गावातल्या स्रीयांनी स्वामींना अजून काही मुलांना शिकविण्याची प्रार्थना केली व त्यांनी ती मान्य केली. यानंतर त्यांनी २९ मुलांबरोबर एका तबेल्यात आपला वर्ग सुरु केला. परंतू मुलांच्या संख्येत वृद्धी होत गेली तबेला पण पूर्ण भरून गेला. वर्ग संपल्यानंतर मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी त्यांचे पालक यायचे. त्यातल्याच एका स्त्रीने चीन्नीला विचारले की त्यांना पण काहीतरी शिकण्याची इच्छा आहे. मग चीन्नीने त्यांना रजई बनविण्याचे प्रशिक्षण सुरु केले. स्वामींना गावातल्या लोकांनी शाळा सुरु करण्यासाठी कमी खर्चात एक एकर जमीन उपलब्ध करून दिली. शाळा सुरु करण्यासाठी त्यांना अशा ठिकाणाहून पण मदत मिळाली ज्याची त्यांना अपेक्षा नव्हती. अशा प्रकारे ते अर्थतज्ज्ञाचे शिक्षणतज्ज्ञ बनले होते. याकाळात ते योगासन पण करत होते ज्यामुळे त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली.

पुरकुल युथ डेव्ह्लप्मेंट सोसायटी

२००३ मध्ये सेवाभावी संस्थेत पुरुकुल युथ डेवलपमेंट सोसायटीचे परिवर्तन झाले. ही सोसायटी गरीब तरुणांच्या आयुष्यात बदल घडवण्याचे काम करत होती. स्वामी म्हणतात की, " मी मुलांना सर्वश्रेष्ठ शिक्षण देऊ इच्छितो ज्याची या मुलांनी कल्पना पण केली नाही.’’ त्यांच्या शाळेत प्रवेशासाठी रांगा लागत असे, पण त्यांनी फक्त त्याच मुलांना प्रवेश दिला जे गरीब घरातले होते आणि आयुष्यात काहीतरी करू इच्छिणारे होते.


image


आपल्या कामाप्रती आदर असलेल्या स्वामिंनी मित्रांच्या मदतीने फंड जमा केला आणि वर्ष २००६ मध्ये शाळेची इमारत बांधून निवासी शिक्षकांची पण नियुक्ती केली. जवळ जवळ शाळेत भोजनालय, कम्पुटर सेंटर, ई-लॅब, लाईब्ररी,खेळण्यासाठी मैदान आणि योग हॉल पण तयार केला.


image


आतापर्यंतचा प्रवास

स्वामी सांगतात की,’’गरीब घरातून आलेल्या मुलाचं योग्य प्रकारे पालन-पोषण करून त्यांना एक सुरक्षित आणि उत्तम शिक्षण प्रदान करणे हेच आमचे ध्येय आहे.’’ मिड डे मिल हे मुलांना शाळेच्या प्रारंभीच देत होते,पण २००८ पासून विद्यार्थ्यांना ते चार वेळेस जेवण देऊ लागले. शाळेचा मुख्य उद्देश मुलांची जिज्ञासा वृत्तीला प्रोत्साहन देणे होते. इथे शिक्षणाचे नवे उपक्रम राबवले जातात. स्वामींच्या मते ‘करणे, शोधणे आणि अभ्यास हाच आमचा मार्ग आहे. प्रत्येक वर्गात २५ मुले आहे आणि त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले जाते. चार मुलांपासून केलेली सुरवात आज ३३९ मुलांपर्यंत पोहचली आहे. २०११ मध्ये १०वी पर्यंतच्या वर्गाला सीबीएसई(CBSE) ची मान्यता मिळाली व २०१३ मध्ये १२वी पर्यंत मान्यता मिळाली.


पीवाईडीएस मध्ये गुरुकुलच्या नियमांचं पालन करून जास्तीत जास्त अभ्यासाचं वातावरण मुलांसाठी निर्माण केलं जातं. अभ्यासाव्यतिरिक्त मुलांना नृत्य, नाटक आणि योग इ. शिकवून मुलांचा सर्वांगीण विकास घडवून आणला जातो. या शाळेच्या उभारणीला अनेकांचे योगदान मिळाले ज्यांची नामावली कॉलेज आवाराच्या झाडावर लावली आहे.


image


प्रभाव

पीवाईडीएस मधले ८७ मुले पदवीधर झाले त्यातले २३ जण चांगल्या कंपनीत रुजू झाले, ३१ जण वोकेशनल अभ्यासक्रम करीत आहे. १२वी पास विद्यार्थ्याना सोसायटीतर्फे उच्च शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध होते जे नोकरी मिळाल्यानंतर फेडणे बंधनकारक आहे. .नोकरी करणारे काही तरुण सोसाईटीला दान पण देतात. स्वामींच्या मते ‘’आमच्या येथे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनचे प्रमाण चांगले आहे ज्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याची व्यक्तिगत काळजी घेतली जाते. याचे अतिशय चांगले परिणाम दिसत आहे. सगळ्यात मोठा फायदा हा आहे की या समाजाला शिक्षणाचे महत्व पटायला लागले आहे. या व्यतिरिक्त तरूण सुद्धा आपल्या भविष्याची चांगली स्वप्ने बघू लागले आहेत.’’.

आव्हान

स्वामी सांगतात की,’’या वाटेवर चालणे सोपे नव्हते. गरजू मुलांची ओळख आणि दाखला मिळवणे खूप मोठे आव्हान होते. इथे मुलांच्या प्रवेशासाठी पालक बऱ्याच वेळा खोट्या बाबीचा आधार घेत असे. याच्या व्यतिरिक्त आम्ही वैयक्तिकपणे पालकांशी चर्चा करून त्यांच्या पार्श्वभूमीची पण तपासणी करायचो.

या नंतर देणगीच्या समस्येसाठी प्रत्येक एनजीओ (NGO) ला सामोरे जावे लागते. स्वामी सांगतात की पीवाईडीएस(PYDS) ला कधीच सरकारी मदत मिळाली नाही. सोसायटी फक्त वैयक्तिक रुपात मिळालेल्या देणगीवर चाललेली आहे. वर्तमानात सोसायटी कडे साडे सात करोडची संपत्ती आहे. सोसायटीचा वार्षिक खर्च अडीच करोड रुपये आहे. पीवाईडीएस(PYDS) कॅम्पस मुलींचे वसतीगृह बनवण्यासाठी देणगी जमा करत आहे. यामुळे मुलींना उत्तम सुविधा मिळू शकेल. इथे सगळ्या मुलांना मोफत सुविधा उपलब्ध आहे.

स्वामी सांगतात की मागील १५ वर्षात समाजाने आम्हाला खूप मदत केली. समाजातले लोक आमचे सगळ्यात मोठे मदतगार आहे आणि तेच आमच्या कामाची प्रशंसा पण करतात. स्वामी सांगतात की, "आम्हाला जाणवले ह्या क्षेत्रात राहणाऱ्या मुलांना संधी प्राप्त करण्यासाठी सल्ला आणि मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. त्यांना सुरक्षित आशेचा किरण दाखवणे महत्त्वाचे आहे. आम्हाला आशा आहे की आमच्या योगदानाने गरीब मुले भविष्यात चमक दाखवतील. या प्रकारे या मुलांमध्ये शिक्षणाविषयी आस्था निर्माण करून भावी वाटचालीत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

स्वामी आणि चीन्नीचे स्वप्न


image


image


स्वामी पीवाईडीएस(PYDS) च्या भक्कम उभारणीसाठी दिवसभर व्यस्त असायचे. चिन्नी जवळपासच्या १७० पेक्षा जास्त स्त्रियांना भरतकाम,विणकाम तसेच रजई आणि इतर सामान बनवायला शिकवत होती. त्यांनी पुरुकुल स्त्री शक्तीला जीवन देऊन तिथल्या महिलांची सामाजिक संघटना तयार केली. चिन्नी बाजारपेठे प्रमाणे स्वतः डिझाईन शोधून स्त्रियांना सांगतात. १३ सप्टेंबर २०१५ रोजी या स्त्रियांनी हॉटेल व्हाईट हाऊस मध्ये एका दुकानाची यशस्वी सुरवात केल, जिथे स्वामी आणि चिन्नी हे दोघे डेहराडूनला सर्वप्रथम आल्यानंतर मुक्कामी होते. 


लेखक : स्निग्धा सिन्हा

अनुवाद : किरण ठाकरे

    Share on
    close