‘टिच फॉर इंडिया’तून जय मिश्रा यांची गरीबांच्या शिक्षणासाठी धडपड!

‘टिच फॉर इंडिया’तून जय मिश्रा यांची गरीबांच्या शिक्षणासाठी धडपड!

Sunday December 13, 2015,

5 min Read

जय मिश्रा यांच्या आयुष्यातील १६ वर्ष खूपच हलाखीची होती. त्या दरम्यान ते एका झोपड्यात रहायचे. त्यांचे कुटुंब इतके गरीब होते की, त्यांच्या आयुष्यातील मुलभूत गरजा जसे, खाणे-पिणे, कपडे आणि घराचे छप्पर देखील त्यांच्या नशिबी नव्हते. इतकी गरिबी असूनही जय यांच्या वडिलांची इच्छा त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण देण्याची असायची. जय आपल्या वडिलांना स्वतःचा आदर्श मानत असत. त्यांच्या वडिलांनी नेहमीच त्यांच्या शिक्षणावर भर दिला. अत्यंत गरिबी असूनही त्यांनी जय यांच्यामध्ये एक उमेद जागवून ठेवली की, त्यांनी आपल्या कर्मावर विश्वास ठेवला पाहिजे आणि शिक्षणावर लक्ष दिले पाहिजे. त्यांनी नेहमीच जय यांना योग्य दिशा दाखविण्याचे काम केले. जय यांच्या वडिलांनी पीडब्ल्यूडी(सार्वजनिक बांधकाम विभाग) मध्ये एका शिपायाच्या नोकरी पासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि मेहनतीच्या बळावर ते ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापक पदापर्यंत पोहोचले. त्यांनी जय यांना एक सांगितले की, शिक्षण हे एकमेवच असे साधन आहे, जे माणसाचे आयुष्य बदलू शकते. हिच बाब जयच्या डोक्यात नेहमीसाठीच बसली आहे.

जय यांनी टीच फॉर इंडिया क्लबमध्ये शिक्षक म्हणून शिकविण्यास सुरुवात केली. उत्तर प्रदेशच्या जौनपुर मध्ये जय यांचा जन्म झाला आणि त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण देखील तेथूनच घेतले. पैशांची समस्या देखील होती, मात्र ते हतबल झाले नाहीत, त्यांनी आपले शिक्षण सुरूच ठेवले. त्यांनी यांत्रिक अभियांत्रिकी मध्ये ८९ टक्के गुण मिळवले आणि महाविद्यालयात त्यांना तिसरे स्थान प्राप्त झाले. चांगले गुण असूनही त्यांना नोकरी मिळाली नाही. कारण, त्यांचे १० वी च्या वर्गातील गुण चांगले नव्हते. एका सामान्य माणसासाठी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतरही नोकरी न मिळणे खूपच दुख:दायी अनुभव असू शकतो. मात्र, त्यांनी याला खूपच सकारात्मक घेतले. आयुष्याचे प्रत्येक आव्हान त्यांना एक रस्ता दाखवते. त्यांना आधीपासूनच देशासाठी आणि येथील लोकांसाठी काहीतरी करायचे होते. त्यांना लोकांच्या समस्याचे समाधान शोधायचे होते आणि हेच त्यांच्या सकारात्मकतेचे कारण देखील होते.

image


जेव्हा जय अभियांत्रिकी शिक्षणाच्या अखेरच्या वर्षात होते, तेव्हा त्यांना टीच फॉर इंडिया बद्धल माहिती मिळाली. जेव्हा जय यांनी या व्हिजन बद्धल माहिती घेतली तेव्हा त्यांना हे खूप पसंतीस पडले. या मोहिमेचे व्हिजन होते की, एके दिवशी भारताचे सर्व मुलं खूप चांगले शिक्षण घेतील. त्यावेळी ते एक शोध प्रकल्प ‘क्वालिटी ऑफ हायर एज्युकेशन इन इंडिया’ वर काम करत होते. त्यांनी जेव्हा या विषयावर विचार केला तेव्हा, त्यांना माहित पडले की, हे शक्य आहे. मात्र, त्यासाठी स्वतःवर विश्वास आणि वचनबद्धता असणे गरजेचे आहे. त्याचवेळी त्यांनी ‘टिच फॉर इंडिया’ व्हिजन साठी आपल्याकडून काहीतरी सहयोग करण्याचा विचार केला. जय सांगतात की, ते स्वतः गरीब होते. केवळ हेच कारण नव्हते की, ते या प्रकल्पात सामिल होवून काहीतरी करू इच्छित होते, शिवाय त्यांना देशातील सर्व मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे असे देखील वाटत होते.

image


अशाप्रकारे सन २०१३ मध्ये जय टीच फॉर इंडिया मध्ये सामिल झाले. ते मानतात की, लवकरच असा दिवस येईल की, प्रत्येक मुलगा चांगले शिक्षण प्राप्त करेल. टिच फॉर इंडिया प्रकल्पात सामिल होवून जय यांना सन्मानित झाल्यासारखे वाटत आहे. त्यांना या दिशेने अधिकाधिक काम करायचे आहे. जेणेकरून ही मोहीम यशस्वी होईल. ते या प्रकल्पात प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम करत आहेत. जय यांच्या या कामामुळे त्यांचे वडील जे नेहमी शिक्षणावर भर द्यायचे, ते खूप खुश आहेत.

जय मानतात की, त्यांनी कुठल्याही मोठ्या कंपनीत नोकरी करण्याला प्राथमिकता न देवून गरीब मुलांसाठी काम करण्याचा विचार केला, जो त्यांचा खूपच चांगला निर्णय होता. एक बहुराष्ट्रीय कंपनीची नोकरी बँक बॅलन्स वाढवू शकते, चांगले आयुष्य देखील देवू शकते, मात्र जो आनंद आणि संतुष्टी जय यांना येथे काम करून मिळते, त्यामुळे त्यांना खूपच अधिक सन्मानित झाल्यासारखे वाटत आहे. जेव्हा ते लहान लहान मुलांना भेटतात, त्यांना शिकवतात, त्यांचाशी गप्पा मारतात, त्यांच्यासोबत जेवतात, ते क्षण त्यांच्यासाठी खूपच सुखद असतात. या क्षणांचा जय खूपच आनंद घेतात.

image


जय यांच्या मते, प्रत्येक मुलगा वेगळा असतो. प्रत्येक मुलात एक विशेष गोष्ट असते. मात्र जेव्हा ते एकत्र येतात, तेव्हा सुंदर जग निर्माण होतं. जय यांनी शिष्यवृत्ती मिळाली तेव्हा ३२ मुलं या अभियानांतर्गत जोडली गेली आणि आज ३६० पेक्षा अधिक मुले या शिष्यवृत्तीचा फायदा घेत आहेत. या मुलांना जय मित्र देखील मानतात. ही मुलं खूप गरीब आहेत. या मुलांना आयुष्यातील मुलभूत गोष्टी मिळणे देखील कठीण असते. यातील अधिकाधिक मुलं मिड डे मिल (माध्यान्ह भोजन)च्या जीवावर जगतात. अनेकदा लहान-लहान मुलं त्या जेवणाला बांधून आपल्या घरातल्यांसाठी देखील घेऊन जातात. कारण, त्यांच्या घरात जेवण नसते. या मुलांना प्रेम देणारे आणि काळजी घेणारे देखील कोणी नसतात, ज्याची त्या मुलांना गरज आहे. कारण, आई-वडील घर चालविण्यासाठी दिवस-रात्र काम करत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे मुलांसोबत वेळ व्यतीत करण्यास पुरेसा वेळ नसतो. मुलांसोबत वेळ व्यतीत केला पाहिजे, याचा देखील त्यांचे आई-वडील विचार करत नाहीत.

मुलांमध्ये सर्वात चांगली गोष्ट ही असते की, मुलं चांगल्या गोष्टीमुळे खूप लवकर प्रभावित होतात आणि वाईट गोष्टींमुळे देखील प्रभावित होतात. त्यासाठी आपले हे कर्तव्य आहे की, आपण मुलांसमोर अधिकाधिक चांगले उदाहरण मांडले पाहिजे.

ही मुले जय यांच्यासोबत आपला आनंद आणि दु:ख मांडतात. आपल्या दिनचर्येपासून मित्रांपर्यंत आणि आपल्या घरच्या समस्यांना देखील ते जय यांना सांगतात. कारण, जय केवळ त्यांचे शिक्षक म्हणूनच नाही तर त्यांचे मित्र बनून त्यांच्या गोष्टी ऐकतात आणि त्यांना मदत देखील करतात. जय या गोष्टीकडे देखील लक्ष ठेवतात की, मुलांच्या मानसिकतेचा देखील विकास झाला पाहिजे. त्यांच्या मध्ये समजदारी निर्माण व्हावी, याचा देखील जय विचार करतात.

भविष्यात जय यांना आपल्या गावात एक शाळा सुरु करायची आहे. सोबतच जय यांना राजकारणात देखील प्रवेश करायचा आहे, कारण त्यांना अधिकाधिक मुलांची मदत करायची आहे. शिष्यवृत्ती दरम्यान जय यांनी पुण्यात “परिवर्तन” संस्थेची सुरुवात केली. ही संस्था मुलांसाठी काम करते. परिवर्तन मार्फत ते एक मासिक परिषद घेतात, ज्यांचे नाव त्यांनी ‘संवाद’ ठेवले आहे. ज्यात ते मुलांच्या आई-वडिलांशी संवाद साधतात. शिष्यवृत्ती दरम्यान त्यांनी पाच संवादाचे कार्यक्रम आयोजित केले, ज्यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

लेखक : आशुतोष खंतवाल

अनुवाद: किशोर आपटे.