ऑनलाईन बाजारपेठेतील सर्व काही मिळण्याचं ठिकाण ‘शॉपलिस्ट’

ऑनलाईन बाजारपेठेतील सर्व काही मिळण्याचं ठिकाण ‘शॉपलिस्ट’

Tuesday October 20, 2015,

4 min Read


सध्याच्या बाजारपेठेत ऍप्लिकेशन्स आणि इ स्टोअर्सची लाट आली आहे. एक ग्राहक म्हणून विविध वस्तुंची खरेदी करण्यासाठी काही ऍप्स सुरु करणं आणि वेगवेगळ्या वेबसाईट्सवरून खरेदी करणं खूप त्रासदायक असतं. त्यामुळेच विविध ऍप्सवर उपलब्ध असलेली उत्पादनं डिजिटल विक्रेते विकत घेण्यास असमर्थ ठरत आहेत, आणि हीच समस्या सोडवण्यासाठी इन्फोसिसच्या चार माजी एक्झिक्युटिव्हजनी निर्माण केली शॉपलिस्ट.

ही संकल्पना एका क्षणात अस्तित्वात आलेली नाही, तर डिजिटल खरेदी सोपी आणि सर्वव्यापी व्हावी ही गरज लक्षात घेवून ही संकल्पना निर्माण झाल्याचं शॉपलिस्टच्या संस्थापकांपैकी एक असलेले गिरीश रामचंद्रा सांगतात. २०१४ मध्ये, शॉपलिस्टनं एक ‘शॉर्टलिस्ट’ नावानं व्यासपीठ निर्माण केलं, यामध्ये प्रकाशक आणि विकासक खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या प्रतिमा, व्हिडीओज, पोस्ट, यादी, बातम्या आणि सोशल शेअर्स यापैकी कोणत्याही गोष्टीवर विकत घ्या अर्थात ‘बाय’(buy)चं बटण देऊ शकतात,


image


ग्राहक आणि किरकोळ विक्रेत्यांना मदत

गिरीशच्या मते, यामुळे ग्राहकांना ऑनलाईन खरेदी करणं सोयीचं होतंच, पण लोक ज्या लोकप्रिय ऍपवर जास्तीत जास्त वेळ घालवतात तिथपर्यंत आपली उत्पादनं पोहोचवणं किरकोळ ऑनलाईन विक्रेत्यांनाही सोयीचं होतं. “ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांनाही त्यांच्या आवडत्या वेबसाईट या सार्वत्रिक खरेदी केंद्रावर एकत्र मिळत असल्यानं ते आनंदी असतात,’’ असं गिरीश म्हणतात..


इन्फोसिसमध्ये असताना हे चारही संस्थापक अनेक संकल्पनांवर एकत्र काम करत होते. “ स्वत:चं काही सुरू करण्यापूर्वी मी इन्फोसिसमध्ये उपाध्यक्ष होतो आणि किरकोळ ग्राहक क्षेत्रातील उत्पादनांवर लक्ष केंद्रित करुन व्यवसाय यशस्वी केला होता. इन्फोसिसमध्ये माझ्या सह संस्थापकांनी तंत्रज्ञान, माहिती विज्ञान आणि ग्राहक प्रतिसाद यात महत्त्वाची भूमिका निभावली होती, ’’ असं गिरीश म्हणतात.

आपण केलेल्या कामामुळे जगातील सर्वोत्तम ई कॉमर्स कंपन्या उदा. नॉर्डस्टॉर्म, टार्गेट, सिअर्स, आदिदास आणि वेटरोज यांना मदत झाल्याचं गिरीश म्हणतात. जागतिक बाजारपेठेबरोबरच आमचं संशोधन गार्टनर, फॉरस्टर, एमआयटी टेक रिव्ह्यू, बिझनेस विक, फास्ट कंपनी यांनीही वापरलं आहे.

शॉर्टलिस्टची तंत्रज्ञानविषयक कामं

टीमने नुकताच बिटा प्रोग्राम सुरू केलाय आणि त्यामुळे बाजारपेठेत एक खळबळ उडाली आहे. भारतातील अग्रणी अशा २० ई कॉमर्स साईट्स एकाच ठिकाणी उपलब्ध असून काही विशिष्ट वस्तुंचे जवळपास १ कोटी बारकोडही तक्त्यांच्या स्वरुपात कोणत्याही ऍपवर तातडीनं खरेदीसाठी उपलब्ध आहेत. आम्ही निर्माण केलेल्या व्यासपीठावर सुरूवातीला ज्यांनी नोंदणी केली त्यात वृत्त देणाऱ्या वेबसाईट, चॅट, मनोरंजन, लाईफस्टाईल, माध्यमातील ब्रँड, ब्लॉग्ज आणि फॅशनचे विविध ट्रेंड दाखवणारे ऍप यांचा समावेश आहे, असं गिरीश सांगतात.

जर एखादा ग्राहक एका विशिष्ट फॅशन ट्रेंडविषयी वाचत असेल तर त्याच पेजवर ते खरेदी करण्याचा पर्याय शॉर्टलिस्टनं उपलब्ध करुन दिला आहे. तुम्ही खरेदीचं बटण दाबताच संबंधित किरकोळ विक्रेत्याकडून शॉर्टलिस्ट ते उत्पादन तुम्हाला उपलब्ध करुन देतं.

एखाद्या उत्पादनाविषयी सर्व ई कॉमर्स वेबसाईटवर आलेली माहिती एकत्र करुन ती कोणत्याही एका साधनावर किंवा ऍपवर संशोधनासाठी किंवा खरेदीसाठी उपलब्ध करुन देण्याचे काम शॉपलिस्टतर्फे केले जाते. प्रचंड प्रमाणात उपलब्ध असलेली विविध विषयांची माहिती साठवण्यासाठी त्यांनी एक समांतर अशी डाटा प्रोसेसिंग रचना निर्माण केली आहे.

“खरेदीसाठी ई कॉमर्स सेवा उपलब्ध व्हावी याकरीता आमची सार्वत्रिक सॉफ्टवेअर यंत्रणा (API) प्रमाणबध्द आणि कुठेही प्रलंबित न राहता प्रचंड माहिती उपलब्ध करुन देते,” असे गिरीश सांगतात.

निधी आणि विस्तार

शॉपलिस्टच्या यादीत आता वेगाने नवीन श्रेण्या आणि ई कॉमर्स वेबसाईट्सचा समावेश होतोय. तसेच त्यांनी भागीदार म्हणून आणखी विकासक आणि प्रकाशकांना सोबत घेतले आहे. तंत्रज्ञान विषयक कंपनी असल्याने त्यांचा चांगल्या कौशल्य क्षमतेवर भर आहे. त्यामुळे ते तंत्रज्ञान विषयात कुशल असलेल्या लोकांच्या शोधात असतात. प्राथमिक पातळीवर प्रोग्रामिंग आणि विश्लेषणात्मक आव्हानं तो उमेदवार कसे हाताळतो यावरुन त्याचे मूल्यमापन केले जाते. आमच्या या कार्यावर ज्यांच्या विश्वास आहे आणि आमच्या टीममध्ये येतांना ते घेऊन आलेली ऊर्जा आणि महत्त्वाकांक्षा यांचा चांगला वापर करणाऱ्यांनाच आम्ही सोबत घेतो, असं गिरीश सांगतात.

शॉपलिस्टनं नुकतंच कलारी कॅपिटलकडून २ कोटी रुपयांचं भांडवलं उभं केलं आहे. या भांडवलातून आपल्या व्यवसायाचा भौगोलिक विस्तार आणि ग्राहक वाढवण्याची शॉपलिस्टची योजना आहे. शॉपलिस्ट सध्या फॅशन आणि सौंदर्य प्रसाधनांच्या क्षेत्रात कार्यरत आहे पण लवकरच इतर क्षेत्रातही उतरण्याची त्यांची योजना आहे.

यूअर स्टोरीच्या मते...

डिस्कवरी कॉमर्स ( एखादं उत्पादन ठराविक काळाच्या अंतराने ग्राहकाला उपलब्ध करुन देणे, त्याला सभासदत्व देणे) संकल्पना आता भारतात मूळ धरु लागली हे. इन मोबीने नुकतंच डिस्कवरी कॉमर्ससाठी 'Paytm' आणि ऍमेझॉनसोबत भागीदारी करुन 'Miip' हे नवीन दालन खुलं करुन दिलंय. नवीन ८० टक्के उत्पादनांची विक्री ही Miip वरुनच होईल असा या टीमचा दावा आहे.

भारतातील मोबाईल धारकांची वाढती संख्या लक्षात घेता २०२० पर्यंत ऑनलाईन लोकांची संख्या साठ कोटींच्या आसपास जाईल असा अंदाज आहे. गुगलवर सर्च करणाऱ्यांपैकी ६० टक्के लोक मोबाईलद्वारे सर्च करतात. तर फ्लिपकार्टसारख्या वेबसाईट्सवरील खरेदी-विक्रीचे ७० टक्के व्यवहार मोबाईलवरुनच केले जातात.

एशिया पॅसिफिकच्या अहवालानुसार येत्या पाच वर्षात ८० टक्के स्मार्टफोनची विक्री ही आशिया –पॅसिफीक क्षेत्र, मध्य पूर्व आणि आफ्रीका खंडात होणार आहे. तसेच स्मार्टफोनच्या व्यवहारात जवळपास ३.५ बिलियनची भर पडणार आहे. त्याचबरोबर २०२० पर्यंत या उद्योगातील उत्पन्न जवळपास २ हजार ८९७ बिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल. त्यामुळचे डिस्कवरी कॉमर्स यापुढे समर्पक ठरणार आहे.

म्हणूनच यू ट्यूब, ट्विटर, गुगल, पिंटरेस्ट आणि फेसबुकसारखे दिग्गज ऍपच्या खरेदीवर लक्ष ठेऊन असल्याचा अंदाज आहे.

Disclaimer : कलारी कॅपिटल यूअर स्टोरीमधील गुंतवणूकदार आहे.