प्रतिमाह ३०० दशलक्ष वापरकर्ते असणारे 'वेबएन्गेज'

प्रतिमाह ३०० दशलक्ष वापरकर्ते असणारे 'वेबएन्गेज'

Tuesday April 19, 2016,

5 min Read

२०११ साली जेव्हा अवलेश सिंग आणि अंकित उतरेजा यांनी वेबएन्गेज सुरू करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांच्या टीममध्ये विक्री करण्यासाठी कोणी मुलगा नसल्याने त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. त्यावेळेस अवलेश मात्र या गोष्टी आपण अभियांत्रिकीच्या योग्यतेवर पार पाडू शकतो, या मतावर ठाम होते. चार वर्षे आणि ३२ हजार इन्स्टॉलेशन यशस्वी झाल्यानंतर, अवलेश यांनी आपला शब्द खरा करुन दाखवला आहे. सध्या वेबएन्गेज हे 'बर्रप माफिया' द्वारे निर्मित एक यशस्वी स्टार्टअप आहे.

image


वेबएन्गेज २.० सुरू करताना, कंपनीने मल्टीचॅनल युझर एन्गेजमेंट प्लॅटफॉर्म देऊ केला होता. लेमॅनच्या व्याख्येनुसार, हे एक असे टूल होते जे वेबसाईट तसेच एप्लिकेशनवरील सर्व वापरकर्त्यांना ट्रॅक करणार होते. त्यामुळे क्लाईंट या संपूर्ण चॅनेलवर संदेश पाठवू शकणार होते. जे संकेतस्थळावरील संदेश, पूश नोटीफिकेशन, ई-मेल किंवा टेक्स्ट मॅसेजच्या स्वरुपात असू शकतात. या प्लॅटफॉर्मच्या ग्राहकांची यादी ही मोठी असून, त्यात इबे, फ्लिपकार्ट, पीफिझर, मेकमायट्रीप आणि एमटीव्ही यांसारख्या बड्या कंपन्यांचादेखील समावेश आहे. वेबएन्गेज हे आता कॅपिलरी टेक्ऩॉलॉजीसोबत व्यावसायिक संबंध प्रस्थापित करत आहे. त्याद्वारे त्यांना ओमनी चॅनेल डाटा फ्लो, ऑफलाईन आणि ऑनलाईन जगतातील संपूर्ण माहिती समजणार आहे. कॅपिलरी टेक्ऩॉलॉजी ही बंगळूरूस्थित कंपनी आहे. या कंपनीसोबतची त्यांची सध्याची भागीदारी हे पुढच्या वाटचालीच्या दिशेने योग्य पाऊल आहे. यापूर्वी त्यांनी हैद्राबादस्थित मार्टजॅक या मल्टीचॅनेल कॉमर्स प्रोव्हायडर कंपनीसोबत भागीदारी केली होती. त्यांची ही भागीदारी ऑफलाईन तसेच ऑनलाईन ग्राहकांना एकत्र आणणार असून, त्याद्वारे विक्रेत्यांना अधिक चांगले निर्णय घेता येणार आहेत तसेच ग्राहकांना सर्वोत्तम सेवा पुरवता येणार आहे.

image


अवलेश सांगतात की, 'जेव्हा ग्राहक एखादे उत्पादन कॅपिलरी टेक्ऩॉलॉजीचे प्रोडक्ट इंटिग्रेशनच्या माध्यमातून रिटेल स्टोअरमधुन घेतो, तेव्हा तो त्या कंपनीच्या ऑनलाईन दुकानावर तर जातो मात्र वेबएन्गेज इंटिग्रेशनच्या माध्यमातून. कॅपिलरी इंटीग्रेशनची संकेतस्थळे आता वेबएन्गेजच्या माध्यमातून हाताळता येणार आहेत.' या ऑफलाईन दुकानांचे आता वेबएन्गेजच्या प्लॅटफॉर्मवर अकाऊंट आहे. इन-स्टोअर (ऑफलाईन)मध्ये काहीही घडल्यास ती माहिती गोळा करुन वेब किंवा मोबाईल पुश नोटीफिकेशन पाठवण्यात येते.भारतातील एकूण रिटेल दुकानांपैकी पाच टक्क्यांपेक्षा कमी दुकांनाची ऑनलाईन रिटेल अकाऊंट आहेत. कॅपिलरी टेक्ऩॉलॉजीसोबतच्या भागीदारीमुळे हा दुसरा पैलूदेखील हाताळता आला. हे एक क्रांतीकारी पाऊल असून, सध्या अधिकाधिक रिटेल दुकाने ही ऑनलाईन व्यासपीठावर तसेच मोबाईल एप्लिकेशनवर येत आहेत. अवलेश सांगतात की, 'मी कॅपिलरी टेक्ऩॉलॉजीचे सह-संस्थापक अनीश रेड्डी यांना ओळखत होतो. काही महिन्यांपूर्वी SaaS कार्यक्रमात आमची भेट झाली आणि आम्ही या व्यावसायिक भागीदारीचा पाया रचला. मला आठवते अनीश तेथे मोबाईल तसेच वेबसंदर्भात अनेक प्रश्न विचारत होता. त्यानंतर आम्ही बंगळूरू येथे पुन्हा भेटलो. तेथे आम्ही आमची बोलणी अधिक पुढे नेली आणि मी म्हटले, मी तुझा विक्रीच्या क्षेत्रातील भागीदार व्हायला तयार आहे.' पण हे काही पहिल्यांदा घडत नव्हते. अवलेश काही पहिल्यांदा एखाद्या उद्योजक कंपनीशी भागीदारी करण्याचा प्रयत्न करत नव्हते. ते सांगतात, 'प्रत्येक वेळेस मी भागीदारी करू पाहणाऱ्या कंपनीत मला योग्यता दिसत होती. मात्र दुसऱ्या स्तरावर आमची चर्चा गेल्यानंतर ती फिसकटत होती. यावेळेस आम्ही पुढची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी कॅपिलरी टेक्ऩॉलॉजीकडून टोकन म्हणून काही रक्कम घेतली. या प्रकारे आम्ही या भागीदारीचे गांभीर्य लक्षात घेतले होते. आम्ही आमच्या उत्पादनाचा विकास करण्याकडे अधिकाधिक लक्ष द्यायला सुरू केले.' वेबएन्गेज हे एक SaaS उत्पादन होते, जे ग्राहकांच्यावतीने चालवण्यात येत होते. त्यामुळे कॅपिलरीने आपल्या ग्राहकांच्यावतीने मोहिम राबवण्याची जबाबदारी घेतली.

image


जवळपास पाच वर्षांपासून सुरू असलेल्या वेबएन्गेजकडे सध्या ६० कर्मचाऱ्यांची भक्कम फळी आहे. त्यात सर्वाधिक प्रमाण हे अभियंते आणि डिझायनर्स यांचे असून, उर्वरित कर्मचारी हे सेल्स, कस्टमर सक्सेस आणि विपणन विभागातील आहेत. हे उत्पादन सध्या ३२ हजाराहून जास्त मोबाईल तसेच वेबवर इन्स्टॉल करण्यात आले असून, त्यांच्याकडे एक हजाराहून अधिक पेड कस्टमर्स आहेत. हा स्टार्टअप संपूर्ण जगात पसरला असून, आशियातील ५० टक्के, यूएस आणि यूकेमधील ३० टक्के, लॅटीन अमेरिका १० टक्के आणि उर्वरित जगातील १० टक्के भाग या स्टार्टअपने व्यापून टाकला आहे. ही कंपनी प्रतिमाह ३०० दशलक्षहून अधिक ग्राहकांना ट्रॅक करते.अवलेश सांगतात की, 'बाजारातील परिमाणांपेक्षा आमचा कन्व्हरसेशन रेट हा चांगला असून, आम्ही त्यात अजून २० टक्क्यांनी वाढ केली आहे. आमच्या परिणामांपेक्षा आमचे मूल्यविधान कमी आहे.' अवलेश यांना माहित आहे की, मार्केटमध्ये सध्या त्यांच्यासारखेच काम करणारे अनेक स्टार्टअप्स आहेत. मात्र त्यांच्या कंपनीकडे असणाऱ्या दोन हुकूमी एक्क्यांवर त्यांना विश्वास आहे. त्यापैकी एक म्हणजे जर्नी बिल्डर आणि दुसरे म्हणजे मि. एक्स.

१) जर्नी बिल्डर – हे व्यासपीठ वापरकर्त्यांची संपूर्ण लाईफसायकल ट्रॅक करण्याची परवानगी देत आणि विझ्युअल मॉडेलमध्ये ती सादर करते. या फॉर्मेटमध्ये युझर डाटा आणि कार्यक्रमांची माहिती गोळा केली जाते. तसेच एखाद्याला त्यात कंडिशनल ट्रीगर पॉईंट आणि डिसिजन पॉईंट देता येऊ शकतो. हे एका फ्लोचार्टप्रमाणे असून, त्यात अनेक ‘if and else’च्या अटी आहेत.

२) मि. एक्स (प्रोडक्ट इन बिल्ड फेज) – वेबएन्गेज २.० नंतर कंपनी अजून एका उत्पादनावर काम करत असून, लवकरच ते बाजारात दाखल होणार आहे.

बाजारात सध्या अनेक कंपन्या आहेत, ज्या ओमनी चॅनेल कस्टमर एन्गेजमेंट सोल्यूशन्स देऊ करतात. मात्र त्यापैकी काही कंपन्या वेबएन्गेजप्रमाणे सेवा पुरवतात. मोबएन्गेज आणि क्लेव्हरटॅप हे आमचे मुख्य प्रतिस्पर्धी आहेत. इतर कंपन्या जसे की ट्विस्ट, मेल्टॅग आणि कस्टमर ३६० यादेखील मार्केट शेयरवर नजर ठेऊन आहेत. वेबएन्गेजने पाच लाख डॉलरपर्यंत आपल्या फंडिगमध्ये वाढ केली आहे. सध्या, माजी गुंतवणूकदार हे कन्व्हर्टीबल बॉण्ड्सद्वारे अधिकाधिक पैसा जमा करतात. कॅपिलरी टेक्ऩॉलॉजी ही एक नवी गुंतवणूक आहे. अवलेश सांगतात की, मला माहित आहे या स्तरावर जर मी पैसा खर्च केला तर माझी कंपनी अधिक जोमाने वाढू शकेल. आमच्या आर्थिक परिस्थितीवर यामुळे परिणाम होत होता. मात्र कालांतराने आम्हाला स्थैर्य़ प्राप्त झाले. संदर्भ देणारे लोक हे आमचे ग्राहक गोळा करण्यासाठीचे सर्वोत्तम स्त्रोत आहेत. वेबएन्गेजच्या वाढीकरिता ते एका इंधनाप्रमाणे आहेत. येत्या चार ते पाच वर्षांमध्ये १०० दशलक्ष डॉलर्स महसूल गोळा करण्याचा अवलेश यांचा मानस आहे.

लेखक - आलोक सोनी

अनुवाद – रंजिता परब