“ कुणी घर देता का घर ?”: लाखोंचा प्रश्न, ‘शुभम’चे उत्तर

भारतासारख्या विकसनशील देशात असंघटित क्षेत्रात काम करणा-या कामगारांची, मजुरांची संख्या मोठी आहे. यात स्त्रियांचा सहभागही मोठा आहे. म्हणून भारतातली अनौपचारिक अर्थव्यवस्था मोठी आहे. कायदेशीर मान्यता आणि सुसंगतपणाचा अभाव, म्हणून आवश्यक त्या कागदपत्रांचा अभाव, अशा अनेक समस्यांना मुख्य अर्थव्यवस्थेच्या परिघाबाहेर असलेलं उत्पन्न घेणारा हा मोठा वर्ग तोंड देतो आहे. त्यातलीच त्याला सतावणारी समस्या म्हणजे घराची समस्या. अनौपचारिक क्षेत्रात काम करणारा हा कामगार ख-या अर्थानं विस्थापित झालेला वर्ग आहे. अशा गरजुंच्या घराची समस्या सोडवण्याचा विडा उचललाय शुभम या कंपनीनं. अनौपचारिक क्षेत्रातल्या या गरजू लोकांचं जीवनमान उंचावण्याचा स्तुत्य प्रयत्न करणा-या शुभम या कंपनीची ही कथा.

“ कुणी घर देता का घर ?”:  लाखोंचा प्रश्न, ‘शुभम’चे उत्तर

Tuesday September 08, 2015,

5 min Read

भारतातल्या शहरी विकासाला आणि विकास पावणा-या इतर बाजारांना सतावणा-या प्रमुख समस्यांपैकी एक समस्या म्हणजे विस्थापन आणि पुनर्वसन. गृहनिर्माण विकास वित्तपुरवठा कंपनी असलेल्या शुभमचे एक सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अजय ओक यांना या समस्येबद्दल असं वाटतं की अधिक चांगलं जीवन जगता यावं म्हणून देशभरातल्या लोकांचे जमाव जवळच्या शहरांमध्ये स्थलांतर करतात. यामुळे शहराच्या संसाधनांवर ताण पडतो. “ हातात आवश्यकतेपेक्षाही कमी असलेला निधीच्या माध्यमातून शहरातल्या महापालिका, नगर पालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये केवळ आपल्या क्षेत्रापुरत्याच किमान सोईसुविधा पुरवण्याची क्षमता आहे. बहुतेक शहरांमध्ये कमी किंमतीच्या परवडणा-या घरांच्या तरतुदीकडे साफ दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. स्थलांतर करणारे हे लोक बहुतेक करून अनौपचारिक क्षेत्रात काम करतात आणि म्हणूनच घरासाठी कर्ज मिळवणं हे त्यांच्यासाठी मोठच आव्हान असतं. यामुळं चांगलं आणि सुरक्षित घर मिळवण्याच्या त्यांच्या आशा मावळतात.”

सामान्य़ांच्या स्वप्नांना  आपल्या डोळ्यात सामावणारी दृष्टे वीर

सामान्य़ांच्या स्वप्नांना आपल्या डोळ्यात सामावणारी दृष्टे वीर


आपल्या विस्तारासाठी सुरूवातीच्या टप्प्यातला आर्थिक निधी उभारणीसाठी ओळखल्या जाणा-या ‘सिरीज सी’ च्या माध्यमातून ‘शुभम’ ही कंपनी नुकतीच ‘बिझनेस कॉल टू अक्शन’ ( BCtA) या उपक्रमात सहभागी झाली आहे. ‘बिझनेस कॉल टू अक्शन’ ही औद्योगिक यश आणि प्रगतीसाठी जागतिक स्तरावर काम करणारी एक संस्था आहे. औद्योगिक यशाबरोबरच कंपन्यांचं समावेशक औद्योगिक मॉडेल विकसित व्हावं म्हणून ही संस्था कंपन्यांना स्पर्धेत उतरवते. या संस्थेच्या मदतीनं नव्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी, तसेच भागधारकांना कंपनीसोबत जोडण्यासाठी शुभमनं आपल्या ग्लोबल नेटवर्कचा विस्तार केला आहे. अनौपचारिक क्षेत्राशी संबंधित असलेल्या उत्पन्न गटासाठी गृह कर्ज उभारणं अत्यंत महत्त्वाचं आहे, आणि शुभमचा ‘बिझनेस कॉल टू अक्शन’ ( BCtA) या उपक्रमातला सहभाग याच गोष्टीकडं लक्ष वेधण्याचं काम करतो.


अधिक वाचा: 'सिरीज सी' मध्ये १२२ कोटी रूपयांचा निधी उभारणारी गुडगाव स्थित शुभम हाऊसिंग फायनान्स कंपनी.


प्रश्न: भारतात अनौपचारिक क्षेत्राच्या उत्पन्नांवर जे लोक अवलंबून आहेत, अशा लोकांच्या घर खरेदीच्या सर्वसाधारण समस्येबाबत काही सांगू शकाल का?


उत्तर: विस्थापनाची समस्या ही अनौपचारिक उत्पन्नामुळं येण्यापेक्षा ती जास्त इन्फॉर्मल टायटल ( रितसर कागदपत्र आणि कायदेशीर बाबींची पूर्तता न करता गुंतवलेल्या पैशातून खरेदी केलेली मालमत्ता) मधून उद्भवलेली आहे. मुदतीच्या स्वरूपातली सुरक्षा नसल्यामुळं ही कुटुंब गुंतवणूक करायला उत्सुक नसतात. विशेषत: भारतात अनौपचारिक क्षेत्रात काम करणा-या लोकांना घरासाठी क्वचितच कर्ज मिळतं. देशातले ५ टक्क्यांहून कमी नागरिक आयकर परताव्यासाठी अर्ज भरतात. भारतात अंदाजे ५५ टक्के लोकांकडे आपलं उत्पन्न सिद्ध करण्यासाठी आवश्यक ती औपचारिक कागदपत्रच नाहीत. आणि याच कारणामुळं अशा लोकांना रितसर कर्ज मिळणं मुश्कील होऊन जातं. मग अशा कुटुंबांना जास्त व्याज दर असलेली आणि अत्यंत कमी कालावधीची कर्जं काढावी लागतात. याचा परिणाम असा होतो की घर विकत घेण्याची त्यांची क्षमता कमी होते आणि नाईलाजानं त्यांना बेकायदेशीर मार्गानं आणि असुरक्षित स्वरूपाची घरं विकत घ्यावी लागतात.

'ये तेरा घर ये मेरा घर'

'ये तेरा घर ये मेरा घर'


प्रश्न: अशा अनौपचारिक ग्राहकांशी त्यांच्या आयुष्याबद्दल चर्चा करणं हाच त्यांना कर्जं उपलब्ध करून देण्याचा मुख्य घटक आहे असं शुभमला वाटतं. तुम्हाला घटक म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे?


उत्तर: दोन मुख्य मुद्दे स्पष्ट करण्याच्या उद्देशानं आम्ही या कुटुंबांशी संवाद साधला. एक म्हणजे ते जी मालमत्ता विकत घेऊ इच्छित आहेत ती त्यांच्यासाठी योग्य अशी निवड आहे का ? आणि यावेळेला ती मालमत्ता खरेदी करणं त्यांच्या आवाक्यात आहे का ? घरापासून कामाचे ठिकाण किती अंतरावर आहे, उत्पन्न मिळवण्याच्या साधनांवर त्याचा कितपत परिणाम होऊ शकतो, शाळा आणि दवाखाने, हॉस्पीटल्स जवळ आहेत का अशा मुद्यांभोवती आमची चर्चा फिरत होती. या कुटुंबांनी या सगळ्या मुद्द्यांचा व्यावहारिक दृष्टीकोणातून विचार करावा असा आमचा प्रयत्न होता. पैसा कुठून उभा करता येईल, मासिक बचत, एका वेळेच्या खर्चाची त्यांची क्षमता आणि दीर्घकालिन स्वरूपाचा EMI भरण्याची त्यांची जबाबदारी या सगळ्या गोष्टी त्यांची खरीखुरी क्षमता अधोरेखित करते, आणि याच मुद्द्यांवर पुढची चर्चा होती. शिवाय आपल्यासाठी अशा प्रकारचा व्यवहार प्रत्यक्षात आणण्यासाठी ही योग्य वेळ आहे का याबाबतचा महत्त्वाचा निर्णय करण्याची योग्यता आणि क्षमता या चर्चेच्या माध्यमातून त्यांच्यात निर्माण होते.


प्रश्न: कर्जाचे हफ्ते चुकवणं जर एखाद्या ग्राहकाला जमंलच नाही तर तुम्ही काय करता ?


उत्तर: पतपुरवठा करण्याच्या उद्योगामध्ये असे ग्राहक पाहायला मिळतातच ज्यांना कर्ज घेतल्यानंतरच्या काळात त्यांच्या उत्पन्नात घट झाल्यामुळं कर्जाचे हफ्ते भरणं कठीण होतं. आमचा त्यांच्याशी असलेला संबंध हा दीर्घकालिन स्वरूपाचा असल्यामुळं यातून मार्ग शोधण्यासाठी आम्ही कर्जदाराला मदत करतो. कर्जदार आपली हफ्त्यांची रक्कम भरण्यासाठी कशा पद्धतीनं सक्षम होऊ शकतो यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि/किंवा आपली मालमत्ता विकून कर्जदाराला कर्ज फेडता यावं म्हणून योग्य ग्राहक मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. बहुतेक कर्जाच्या प्रकारांमध्ये, कर्जाची जवळजवळ अर्धी रक्कम भरून उरलेली जवळजवळ अर्धी रक्कम ही शुभम कडून मिळत होती. आपला परतावा भरणं अजिबात जमत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये मालमत्ता विकून रक्कम उभी करणं आणि त्यांचा व्यवसाय पुन्हा उभा करणं हे केव्हाही सोपं असतं.

'एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना'

'एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना'


प्रश्न: आपण कोणत्या प्रकल्पांवर सध्या काम करत आहात आणि त्यात नेमक्या कोणत्या आवाहनांना आपल्याला सामोरं जावं लागतय ?


उत्तर: सध्या भारतात आमची व्याप्ती वाढवणं आणि २०१८ पर्यंत ५० हजार कुटुंबांना त्यांचं स्वत:चं चांगलं आणि सुरक्षित घर विकत घेण्यास सक्षम बनवणं हे आमचं उद्दीष्ट आहे. ‘शुभम’ सध्या बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरयाणा, झारखंड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड इथं कार्यरत आहे. आम्ही आशावादी आहोत, कारण आमच्या योजनेचं बाजारात चांगलं स्वागत झालेलं आहे आणि आमचं कर्ज वितरणाचं मॉडेल कसं आहे याचं गेल्या चार वर्षांमध्ये चांगलं परिक्षण झालेलं आहे. आमच्या या प्रयत्नांना चांगलं संस्थांत्मक रूप देणं आणि पद्धतशीरपणे कुटुंबाना फायदा मिळावा म्हणून आमची कार्यक्षमता वाढवणं याकडं आम्ही प्रामुख्याने लक्ष देणार आहोत. गृहनिर्माणाबाबतच्या नेमक्या समस्या काय आहेत आणि त्या सोडवण्याच्या दृष्टीनं शुभम कशा प्रकारचे प्रयत्न करतेय याबाबत जाणून घेण्यासाठी त्यांच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.