आकाश दिव्यांच्या उद्योगातून अनेकांच्या जीवनात आशेचे दिप उजळणा-या गोदावरी सातपुते!

आकाश दिव्यांच्या उद्योगातून अनेकांच्या जीवनात आशेचे दिप उजळणा-या गोदावरी सातपुते!

Saturday June 11, 2016,

3 min Read

टाकाऊ पासून टिकाऊ निर्मिती करणा-या अनेकांबद्दल आपण ऐकले असेल पण टाकाऊ कागदापासून मोहक आकाशदिवेही तयार करता येतात हे सांगितले तर तुम्हला आश्चर्य वाटेल ना? वाया जाणा-या कागदांपासून गोदावरी सातपुते या सुंदर मोहक आकर्षक नक्षीकाम केलेल्या आकाश कंदीलाची निर्मिती करतात. या उद्योगातून त्या केवळ आपल्याच कुटुंबाचा उदरनिर्वाह करत नाहीत तर इतर अनेक महिलांनाही रोजगाराची संधी मिळवून देतात. त्यामुळे फारशी चांगली कौटुंबिक पार्श्वभुमी नसलेल्या या महिलांना आता त्यांच्या मुलांच्या उज्वल भवितव्याची तजवीज करता येत आहे.

image


केवळ पतीच्या उत्पनात घराच्या गरजा भागतील अशी परिस्थिती नसल्याने गोदावरी यांनी त्यांचा हा पर्यावरण पूरक उद्योग सुरू केला. त्यासाठी त्यांना फारसा कुणाचा आधार नव्हता आणि छोट्याश्या कौटुंबिक कर्जातून त्यांनी आपला हा उद्योग सुरू केला. व्यापारी बँकेने त्यांच्या उद्योगाला अर्थसहाय्य देण्यास नकार दिला होता.

भारतीय युवा शक्ति ट्रस्टने त्यांना प्रोत्साहन दिेले. त्यांच्या उद्योगाला जवळपास अडीच लाखाचे अर्थसहाय्य, मोलाचा सल्ला आणि मार्गदर्शन त्यांना देण्यात आले. त्यातून गोदावरी यांनी ७९ महिलांचा ३३ लाखापेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असणारा उद्योग उभा केला. आज त्यांच्या उद्योगाचा अमेरिकेत विस्तार करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

image


उद्यमी महिला आणि त्यांचे आकाश कंदील

महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील लहानश्या गावातील अल्प उत्पन्न असणा-या शेतमजूरांच्या घरात त्यांचा जन्म झाला. घरच्या उत्पन्नाला हातभार लागावा म्हणून काही महिलांना सोबत घेऊन त्यांनी छोट्या उद्योगाची सुरुवात केली. दहावीत असतानाच त्यांची शाळा सुटली, वयाच्या १९व्या वर्षी विवाहित आणि गृहिणी बनल्या. मात्र सात जणांच्या वाढत्या कुटूंबाची जबाबदारी वाढली त्यावेळी त्यांच्या भाजीपाल्याचा व्यवसाय करणा-या पतीला कुटूंबाचा भार पेलणे शक्य होते नव्हते. त्यामुळे त्यांनी त्यांना भागीदारीत नवा उद्योग सुरू करण्यास प्रोत्साहनच दिले.

image


“ घरात बचतीचे पैसे नाहीत, समाजाकडूनही काहीच मदतीची अपेक्षा नव्हती. अस कुणी जवळचे नव्हते ज्यांची मदत उद्योग सुरू करण्यास होईल. त्यामुळे उद्यमी होणे हे माझ्यासाठी त्यावेळी दिवास्वप्न पाहण्यासारखेच होते” गोदावरी सांगतात. असे असले तरी आकाश कंदीलांच्या दुकानातील कंदीलांनी त्यांना त्याबाबतचा उद्योग करण्यास प्रेरीत केले. मग त्यांनी या क्षेत्रात उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि काम सुरू केले. उत्सव आणि समारंभात त्यांच्या उत्पादनांना मागणी येऊ लागली.

व्यापारी बँकेला कर्जसहायासाठी प्रस्ताव देण्याचा काहीच उपयोग झाला नाही तेंव्हा गोदावरी यांनी सन २००९ मध्ये एका नातेवाईकाकडून ३५ हजार रुपयांची उचल घेतली. त्यातून त्यांनी ग्राहकांना दाखवण्यासाठी नमुना आकाशकंदील केले. असे असले तरी त्यांच्या उत्पादनांत वैविध्य नसल्याने उद्योगात अडचणी येत होत्या.

image


गोदावरी यांनी नंतर भारतीय युवा शक्ति ट्रस्ट (बी वाय एसटी) यांच्याशी संपर्क केला. त्यांनी मार्गदर्शन करण्यासाठी आणि १.८ लाख रुपयांच्या अर्थसहायासाठी मागणी केली. पुण्यात त्यांच्या स्टार्टअपची सुरुवात करण्याचा त्यांचा प्रस्ताव होता. काही महिने प्रतिक्षा केल्यावर आणि आकाशकंदिलांचे नमुने दिेल्यांनतर, अनेक दुकानदार तसेच विक्रेते यांना संपर्क केल्यानंतर त्यांच्या आकाश कंदीलांना मागणी मिळण्यास सुरुवात झाली.

सध्या गोदावरी यांच्या अनोख्या वैविध्यपूर्ण आकाश कंदीलांना महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून मागणी असतेच शिवाय सुरत गुजरात मध्येही मागणी असते. स्थानिक भागात त्यात स्वत:च विक्रेत्यांना दिवे पुरविण्याचे काम करतात, तर राज्याच्या अन्य भागातील विक्रेत्यांना त्या पुरवठादारांमार्फत दिवे पुरवितात. आता त्यांनी हळुहळु त्यांच्या आकाश दिव्यांचे उत्पादन वाढविले आहे.आणि भारतभर त्या त्यांची विक्री करण्याच्या प्रयत्नात आहेत. बी वाय एसटी ची याकामात त्यांना मदत होते आहे. एका स्थानिक दलालामार्फत त्यांनी अमेरिकेतही त्यांच्याउत्पादनाचे नमुने पाठविले आहेत. येत्या काही महिन्यात त्यांना तेथूनही प्रतिसाद मिळेल असा विश्वास आहे. सण उत्सवात आणि लग्न समारंभात त्याच्या आकाशदिव्यांना चांगली मागणी असते. वेगवेगळ्या वीस प्रकारच्या वैविध्यपूर्ण शंभरपेक्षा जास्त दिव्यांचे नमुने त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. आणि जरी त्याचे उत्पादन सण उत्सवासाठीच्या हंगामा पुरते असले तरी त्याची निर्मिती वर्षभर चालते. आकाशदिव्यांच्या या रंगबिरंगी व्यवसायातून लोकांच्या जीवनात आनंद फुलवताना पर्यावरणाचा समतोल राखण्याचे मोलाचे कामही त्या करतात शिवाय आपल्यापेक्षा असहाय असलेल्या महिलांना रोजगार देऊन त्यांच्या घरातल्या चुली जळण्यासाठी हातभार लावतात याच त्यांच्या कामाची दखल म्हणुन त्यांना युवा भारतीने सन्मान देखील बहाल केला आहे.

सौजन्य : भारतीय युवा शक्ती ट्रस्ट, पुणे. http://www.bystonline.org/

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

तळागाळातील वीणकाम कारागिरांना रोजगाराची संधी देणारे ʻबायलूʼ

यशा पेक्षा अपयशातून आपण बरंच काही शिकतो - सौम्या ननजुन्दी

एक अशी बँक जिने सरकारी मदतीशिवाय महिलांना बनविले आहे स्वावलंबी, गावातल्या महिलांना जिथे कर्जात दिले जातात गहू!

    Share on
    close