बंगळूरू ते लंडन प्रवासाचे स्वप्न, ते देखील एका तीचाकी(टेम्पो)मधून!

बंगळूरू ते लंडन प्रवासाचे स्वप्न, ते देखील एका तीचाकी(टेम्पो)मधून!

Wednesday November 04, 2015,

5 min Read

नवीन राबेल्ली, सध्या बंगळूरू ते लंडन या त्यांच्या प्रवासाच्या तयारीत व्यस्त आहेत. पण त्यांचा हा प्रवास काही सामान्य नसेल. त्यांच्या या प्रवासात त्यांच्या प्रवासाचे साधन एखादे विमान किंवा अन्य कुठले मोठे वाहन नव्हेतर त्यांनी स्वत:च तयार केलेल्या एका विशेष सौरऊर्जा संचलित तीचाकी (टेम्पो) असणार आहे.

बंगळूरू ते लंडनपर्यंत या प्रवासाला त्यांनी ‘प्रोजेक्ट तेजस’ असे नाव दिले आहे. मार्च २०१२ मध्ये अधिकृतपणाने सुरू झालेल्या या उपक्रमाची संकल्पना पूर्णत: नाविन्यपूर्ण आहे; आणि त्याची सुरूवात हैद्राबादच्या त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांतूनच झाली आहे. इलेक्ट्रॉनिक अभियंता असलेल्या आणि साहसीवृत्ती असलेले नवीन फिरण्याची आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी पदवी परिक्षेनंतर ऑस्ट्रेलियात गेले आणि एका ऑटोमोबाइल कंपनीसोबत काम करू लागले. सुमारे साडेपाच वर्षांपर्यंत काम करत राहिल्यानंतर अचानकपणाने प्रवासाच्या वेडाने त्यांना पु्न्हा झपाटले. मग त्यांनी नोकरीला रामराम केला आणि मायदेशी परतण्यापूर्वी न्यूझीलंड आणि दक्षिणपूर्व आशियाची सैर केली. भारतात आल्यावर त्यांनी भारतात इलेक्ट्रॉनिक कारच्या उत्पादनात अग्रणी असलेल्या ‘रिवा इलेक्ट्रॉनिक कार’ कंपनीच्या बंगळूरूच्या कारखान्यात नोकरी सुरू केली.

तेथे काम सुरू असताना त्यांना एक स्विस शिक्षक लुईस पाल्मर यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांनी पर्यावरण आणि सौरऊर्जा या विषयांना आपल्या महत्वाकांक्षेतून सोलरटँक्सी सोबत एक पूर्णवेळ व्यवसाय म्हणून यशस्वीपणे परिवर्तीत केले होते. रिवा मधील एका योजनेच्या प्रस्तुतीसाठी येण्याआधी लुईस आपल्या सोलरटँक्सीतून जगभरात भ्रमण करत होते. त्यांनी या टँक्सीची निर्मीती पर्यावरणाच्या प्रश्नाबाबत जागृती करण्यासाठी आणि हे सिध्द करण्यासाठी केली होती की, इच्छा असेल तर कोणीही व्यक्ती पर्यावरणाच्या प्रदुषणाला थांबवण्यासाठी सकारात्मक कार्य करू शकते, हे काम त्यांनी चार अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसोबत केले होते.

अपेक्षेनुसार लुईस यांची ही प्रस्तुती प्रचंड यशस्वी ठरली. मनातून साहसीवृत्ती असलेल्या नवीन यांनी या प्रस्तुतीतून प्रेरणा घेतली आणि आपल्या स्वत:च्या सौरऊर्जा संचालित प्रवासाच्या दिशेने पुढे जाण्याचे मनोमन ठरवून टाकले. जरी सोलरटँक्सीच्या निर्मितीसाठी काम सुरू झाले असले तरी नवीन यांनी या ‘प्रोजेक्ट तेजस’ला भारतीय ओळख देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एका सोलर टँक्सीत बसून जगभ्रमंती करण्याऐवजी भारतीयांच्या परिचयाच्या तीचाकीतून आपला प्रवास करण्याचा विचार पक्का केला. जुलै महिन्यात त्यांच्या सहकारी चमूने एका टूक-टूक (तीचाकी)ची व्यवस्था केली. ते्व्हापासून ते याला सौरऊर्जाचलीत वाहनाचे रूप देण्यात व्यस्त झाले आहेत. नवीन यांना त्याद्वारे ८८०० किलोमीटरचे अंतर कापून बंगळूरू ते लंडनचा यशस्वी प्रवास करायचा आहे.


नवीन आणि सहकारी तीचाकी सोबत

नवीन आणि सहकारी तीचाकी सोबत


नवीन यांनी सांगितल्यानुसार त्यांना आणि त्यांच्या सहका-यांना सौर तंत्रज्ञानासोबत काम करण्याचा कोणताही पूर्वानुभव नव्हता. त्यामुळे त्यांना सुरूवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांनी याकामी मदतीसाठी आपल्या मित्रांना आणि काही स्थानिक कारागिरांना निवडले. अभियांत्रिकीच्या संघात नवीन यांच्याशिवाय मिस्त्री महबूब बाशा आणि एल. मौला तसेच बॉडी फँब्रीकेटर संतोषकुमार सहभागी होते. याशिवाय त्यांना आय ऑटो गँरेज, एस एस फँब्रीकेटर आणि पँरामाउंट इंजिनिअरींग यांचे सहकार्य मिळाले आहे. तेजस प्रोजेक्टच्या बाजार तसेच प्रसिध्दीच्या चमूत एलिसेंडा एलारी पहिसा, हिमांशू सिंह, पालवी रायकर आणि इशानासिंह यांच्यासह गोल्ड टर्टल प्रा. लिमिटेडच्या नवीन गोकूळे यांचा समावेश आहे. त्यांनी यांना ऍनिमेशन आणि व्हिडिओच्या कामाच्या माध्यमातून मदत केली. याशिवाय या ‘प्रोजेक्ट तेजस’ मध्ये राजा रमन, ए. नरसिंहा आणि आर एन स्वामी यांचेही सहकार्य राहिले आहे ज्यांनी या प्रकल्पाला अवासो टेक्नोलॉजीज़ कडून प्रायोजीत करण्यात मदत केली, त्यामुळेच त्यांना एक मोटर यशस्वीपणे विकत घेता आली.

जुलै महिन्यात काम केल्यानंतर चमूने टुक-टुक (तीचाकी)ला एक कार्यशील इलेक्ट्रिक वाहनात यशस्वीपणे रुपांतरीत केले होते जे सध्या तळाला लागलेल्या बँटरीने चालते. निर्मितीच्या पुढील प्रक्रियेत एका ढाच्याला तयार करून त्याच्या छतावर सोलर पँनल लावण्यात आले. एका प्रक्रियेनंतर सोलर टुक-टुक (तीचाकी) आपल्या गरजेनुसार जवळपास ३०टक्के वीज सरळ सूर्यापासून प्राप्त करण्यात यशस्वी होईल आणि आवश्यक असलेली बाकी ऊर्जा लावण्यात आलेल्या बँटरीत संकलित केली जाईल.

नवीन आणि त्यांच्या चमूला हा प्रकल्प येत्या उन्हाळ्यापर्यंत पूर्णत: तयार होण्याची अपेक्षा आहे. आपल्या या सोलर टुक-टुकच्या माध्यमातून दररोज शंभर किलोमीटरचा प्रवास करण्याची अपेक्षा असणा-या नवीन यांना आशा आहे की, ते बंगळुरू ते लंडनच्या ८८०० किलोमीटरच्या अंतरासाठी शंभर दिवसांचा वेळ घेतील. प्रोजेक्ट तेजसचा चमू सध्या आपल्या या वाहनाला कायदेशीर रस्त्यावर काढण्यासाठी भारत सरकारच्या परिवहन आणि राजमार्ग विभागाच्या संपर्कात आहे. नवीन सांगतात की, ‘याच्या पुढचे पाऊल म्हणजे रस्त्यात येणा-या सा-या देशांचा व्हिजा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.’


बंगळूरू ते लंडन

बंगळूरू ते लंडन


सध्या नवीन यांनी स्वत:ला पूर्णत: या कार्यात झोकून दिले आहे. आता ते लंडनला पोहोचण्याच्या प्रयत्नांना मूर्त स्वरूप देण्यात व्यस्त आहेत. त्यांचा हा प्रवासही सोलरटँक्सीप्रमाणेच ऐतिहासीक होण्याची शक्यता आहे. सोबतच नवीन यांचा प्रयत्न आहे की, ते त्यांच्या या प्रवासाला समाजात या ऊर्जैच्या स्वच्छस्वरूप आणि शक्तीबाबत जागृती आणण्यासाठीचा प्रयत्न म्हणून प्रचलित करु इच्छितात. “ हे वास्तवात व्यवहार्य आहे,” ते सांगतात. “ जर माझ्या सारखा एखादा साधारण व्यक्ती गँरेजमध्ये हे तयार करून भारत ते लंडन पर्यंतचा प्रवास करण्याचे स्वप्न पाहतो तर भविष्यात प्रत्यक्षात असे घडताना पाहणे मोठ्या प्रमाणात शक्य आहे.”

या सोलर टुक-टुकला प्रत्यक्षात रस्त्यावर उतरण्याआधी या चमूला काही खास कामे करणे अद्याप बाकी आहे. सध्या ‘प्रोजेक्ट तेजस’ या प्रवासाच्या यशस्वी फलश्रुतीसाठी काही प्रायोजकांच्या शोधात जोरात कामाला लागला आहे. आमच्या सोबत मुलाखतीदरम्यान नवीन यांनी आपल्या आवडीबाबत सांगितले की, टुकटुकवर सोलर पँनल लागल्यानंतर ते दोन्ही बाजूला प्रोयोजकांचे लोगो आणि रंगांचे प्रदर्शन करण्यास उत्सुक आहेत.

एकीकडे ते सफल प्रवासाच्या तयारीला लागले आहेत, आणि दुसरीकडे त्यांना हे देखील चांगल्याप्रकारे माहिती झाले आहे की, सौर ऊर्जेला आता अजून खूप मोठा प्रवास करायचा आहे. जरी हे तंत्रज्ञान सहजपणाने उपलब्ध आहे तरीही ते जैविक इंधनापेक्षा कमी खर्चाच्या स्पर्धेत मागे पडले आहे. नवीन म्हणतात की, “या उर्जेला वापरात आणण्याच्या संधी उपलब्ध आहेत. भारतात तर सर्वाधिक. अश्या प्रकारे आमच्यासमोर मोफत वापराचा उर्जेचा पर्यायीस्त्रोत आहे बस गरज आहे ती हे ठरवण्याची की आम्ही तो कसा प्रभावीपणाने वापरू शकतो”. जसजसे तंत्रज्ञान सुधारत जाईल आणि किंमती कमी होत जातील या सौरआंदोलनाचे यश या बाबीवर अवलंबून असेल की, देशातील पर्यावरणासाठी जागृत असलेल्या ग्राहकांचा त्याला कसा प्रतिसाद मिळतो. आपल्या या प्रवासाच्या माध्यामातून नवीन सामान्य लोकांना याचसाठी प्रेरित करण्याचा मानस ठेवतात. जसे की रीवाच्या बैठकीच्या खोलीत एका प्रस्तुतीदरम्यान ते सांगत होते. आणि एका स्वच्छ ग्रहाच्या दिशेने चाललेल्या आंदोलनालाही एक गती देऊ इच्छित होते.