उत्तरप्रदेश ते ऑस्ट्रेलियाचा प्रवास करत देशाची आघाडीची गुंतवणूक सल्लागार बनली 'हंसी महरोत्रा'

उत्तरप्रदेश ते ऑस्ट्रेलियाचा प्रवास करत देशाची आघाडीची गुंतवणूक सल्लागार बनली 'हंसी महरोत्रा'

Tuesday January 26, 2016,

4 min Read

हा आर्थिक क्षेत्रातील विशेष तज्ज्ञांबरोबर माझ्या एका तासाच्या मुलाखतीच्या सत्राचा शेवट होता. त्यांची महत्वाकांक्षा नेहमी शेअर ब्रोकिंगच्या क्षेत्रातील एक भाग बनण्याची होती. एका संध्याकाळी उत्तरप्रदेशातील उन्नाव मध्ये राहणारी एक मुलगी, हंसी महरोत्रा ऑस्ट्रेलियात आपल्या पीजी डिप्लोमाच्या वर्गातील स्पीकरकडे चालू लागली आणि त्यांना सांगितले की त्या स्टॉक ब्रोकिंगच्या संदर्भात अधिक माहितीसाठी उत्सुक आहे.


image


आजच्या तारखेला हंसी महरोत्रा या क्षेत्रातील एक प्रसिद्ध आर्थिक सल्लागार आहे. त्यांच्या प्रवासाला सलाम ठोकत त्यांचे धैर्य, दृढ संकल्प. प्रारंभी कॅन्सरच्या आजाराचा सामना करणाऱ्या त्यांच्या वडिलांनी भारताबाहेर जाऊन स्वतःला सिद्ध करण्याचा त्यांना सल्ला दिला होता.

प्रवासाचा प्रारंभ

जुन्या आठवणींना उजाळा देत हंसी यांनी युवर स्टोरीला सांगितले की,

"ऑस्ट्रेलियातील २० वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत मी आजपर्यंत नाईटक्लबच्या आतील नजारा बघितला नाही. मी पूर्णपणे एका छोट्या शहरातील मुलगी आहे जिचे सिडनीमध्ये वास्तव्य आहे’’.

एका बाईंडिंग आणि लॅमिनेशन कंपनीमध्ये काम करण्यापासून ते आठवड्याच्या शेवटपर्यंत बसने उन्नाव ते कानपूरचा प्रवास करून त्या नंतर आपला बीएचा अभ्यासपूर्ण करण्यासाठी दिल्लीतून रेल्वेने प्रवास करणारी हंसी आपल्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी हळूहळू त्या दिशेने वाटचाल करू लागल्या.


image


जेव्हा त्या दिल्लीमध्ये वास्तव्यासाठी आल्या होत्या तेव्हाच वडिलांच्या कॅन्सरच्या आजाराची त्यांना कल्पना आली होती अशावेळी त्यांच्यासाठी पूर्णवेळेच्या अभ्यासाचा प्रश्नच येत नव्हता. हंसी यांनी १८ व्या वर्षी एका सेल्सगर्लच्या रुपात आपल्या कारकिर्दीला प्रारंभ केला. त्यांनी नियमितपणे आपल्या कामाला जाऊन दूरस्थ अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपला अभ्यास सुरु ठेवला.

उन्नाव ते ऑस्ट्रेलियाचा प्रवास :-

त्यांच्या कुटुंबामध्ये काम करणारी ही पहिलीच मुलगी होती, वडिलांच्या निधनानंतर काकांनी त्यांच्या लग्नाचा हट्ट धरला. अशात त्यांना देश सोडून बाहेर जाण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता. त्यांचे आईवडील घटस्फोटीत असून आई ऑस्ट्रेलियामध्ये राहत होती. अशातच हंसी यांनी संधीचा फायदा उठवत परदेशात जाण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन हंसी यांनी वित्त आणि गुंतवणूक यामध्ये पीजी डिप्लोमाच्या कोर्ससाठी प्रवेश घेतला.

उच्चाराच्या चुकांमध्ये सुधारणा :-

त्यांच्या एका अर्मेनियन मित्राने त्यांच्या उच्चारांत होणाऱ्या चुका त्यांच्या लक्षात आणून दिल्या आणि भाषा सुधारण्यास मदत केली. त्यांच्या निशुल्क आयोजित होणाऱ्या प्रत्येक संमेलनात त्या भाग घेत असत. हंसी पुढे सांगतात की, "ते कोणत्याही वेळेस असले तरी मी हजर राहत असे"

वयाच्या २३ व्या वर्षी हंसी यांनी उच्च दर्जाच्या १० कंपन्यांच्या सीईओ यांना पत्र लिहिले की, त्या त्यांच्याकडून काही माहिती मिळवण्यास इच्छुक आहे. त्या दहापैकी फक्त एकाने त्यांच्या पत्राचे उत्तर दिले. भेटीदरम्यान ते महत्वाकांक्षी हंसीवर बरेच प्रभावित झाले. त्यांनी सांगितले की, ते कंपनी सोडत आहे पण सीईओचे पद सांभाळणाऱ्या त्यांच्या सह्संस्थापकाबरोबर भेट घालून देण्यास त्यांनी आश्वस्त केले.

हंसी सांगतात की, मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की आपल्या बायोडाट्यामधल्या माहितीने काहीच फरक पडत नाही. तर प्रत्यक्ष भेट घेणे महत्वाचे आहे.

प्रारंभी अपयश आणि त्यामागे लपलेले यश :-

प्रारंभी त्यांना एका कंपनीच्या रिअल इस्टेटच्या प्रोजेक्टसाठी जुनिअर विश्लेषकाच्या रुपात तीन महिन्यासाठी कंत्राटी पद्धतीवर काम करण्याची संधी मिळाली. मिळालेल्या संधीचे हन्सीने सोने केले आणि त्याच कंपनीबरोबर १० वर्षापर्यंत काम केले आणि या दरम्यान त्यांनी आपल्या प्रामाणिकपणाने व मेहनतीच्या जोरावर शोधकार्य व विश्लेषकाच्या स्थानापर्यंत पोहचण्यास यश मिळवले.

सन २००० मध्ये आलेल्या डॉटकॉमच्या बोलबाला दरम्यान त्यांच्या कंपनीने शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या एका सहाय्यक कंपनीत गुंतवणूक केली. हंसी यांना या प्रस्तावाच्या योजनेत सकारात्मकता जाणवली म्हणून या योजनेत आपली सगळी गुंतवणूक करून कंपनीच्या व्याप्तीचा निर्णय घेतला. परंतु लवकरच डॉटकॉमची स्थिती खालावली आणि त्याचबरोबर ही सहाय्यक कंपनी बंद पडली.

त्यावेळी या कंपनीला विकत घेण्यात रस असलेले मर्सर यांनी हंसी यांना सुद्धा त्यांच्या कामात सहभागी केले. त्यानंतर त्यांच्यावर भारतीय बाजारातील नियोजनाची जबाबदारी सोपवली.

भारतीय कथा चित्रित करणे :

त्या दरम्यान मर्सर यांना भारतीय बाजारपेठ फारशी परिचित नव्हती. चार वर्षापर्यंत त्यांनी आर्थिक नियोजनाच्या प्रभागाचे निर्माण केले. लवकरच भारतीय बाजारपेठेत जम बसल्यावर त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला आणि भारत व सिंगापूर येथे कार्यालय उघडले. लवकरच हंसी यांनी भारतात आपले लक्ष केंद्रित करून वित्तीय उद्योगात कामाचा निर्णय घेतला आणि मर्सर यांना अलविदा म्हणत भारतात आल्या.

भारतात परतल्यावर एका कंपनीने त्यांच्याशी संपर्क करून भारतात स्वतःचे कार्यालय सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली व त्यांना सुद्धा आपल्या बरोबर काम करण्याचा प्रस्ताव दिला. हंसी यांची द्विधा मनस्थिती झाली. हंसी सांगतात की, ‘मी याच प्रकारे अडीच वर्षापूर्वी एका संयुक्त उद्योगाची स्थापना केली. शेवटी एका वर्षापूर्वी आम्ही विभक्त झालो आणि त्यांनी नमूद केल्याप्रमाणे कंपनी माझ्या ताब्यात आली’.

कंपनीच्या प्लॅटफॉर्म कामकाजाबद्दल माहिती असल्याने हंसी यांनी वित्तीय प्रशिक्षणासंबंधित बी२बी आणि बी२सी असे दोन्ही प्रकारचे प्लॅटफॉर्म तयार केले. बी२बी प्लॅटफॉर्मच्या माध्यमाने गुंतवणूकदारांना वित्तीय सल्लागारांना योग्य प्रश्न विचारण्याची मदत केली जाते.

आपल्या बी२बी च्या माध्यमाने हंसी यांचा सगळा जोर स्त्रियांनी पुरोगामी विचारांना बदलून त्यांना हे समजावण्याचा आहे की हे क्षेत्र स्त्रियांसाठी कठीण नाही. अनेक महिलांमध्ये हा रूढीवादी विचार आणि चुकीचा समज आहे. साधारणपणे स्त्रियांमध्ये आत्माविश्वासाच्या कमतरतेमुळे त्यांना वाटते की आर्थिक प्रबंधनासाठी त्या सक्षम नाहीत म्हणून त्या न रुचणारे लग्नबंधन, चुकीची नोकरी आणि चुकीच्या परिस्थितीमध्ये राहण्यासाठी विवश होतात. मी स्वतःला इथे प्रस्थापित करून या धारणेला बदलण्यासाठी प्रयत्नशील आहे.

लेखिका : सिंधू कश्यप

अनुवाद : किरण ठाकरे