झटपट खादंती अर्थात क्यूएसआरचा मुंबईत अविष्कार : रिधीमा आणि श्रेयांस विजय यांचे ‘स्टफड्’ !

झटपट खादंती अर्थात क्यूएसआरचा मुंबईत अविष्कार : रिधीमा आणि श्रेयांस विजय यांचे ‘स्टफड्’ !

Thursday October 15, 2015,

3 min Read

सुमारे वीस वर्षांपूवी फास्टफूडची विदेशी संस्कृती आपल्या देशात आली. सर्वसामान्य ग्राहकांना त्याचं आकर्षण असलं, तरी ते खिशाला परवडणारे नव्हते. आता मात्र परिस्थिती सुधारली असून विदेशी पदार्थही प्रत्येकाला परवडणारे आहेत आणि अनेकांच्या आवडीचेही. त्यामुळे या कंपन्यांच्या आऊटलेट्सची संख्या भारतात वाढू लागली आहे. रेस्टारंटमध्ये बसून जेवण करण्यापेक्षा घर ते कार्यालया दरम्यान जेवण करणे पसंत करतात. त्यामुळे क्विक सर्व्हिस रेसटॉरंट(क्यूएसआर) कंपन्या आपली आऊटलेट्स लहान शहरांत सुरू करत असल्यामुळे देशातील तरुण आणि नोकरदार वर्गात फास्ट फूड संस्कृती वाढत आहे.


image


क्विक सर्विस रेस्टॉरंट (क्यूएसआर) असे एक क्षेत्र आहे की आर्थिक मंदीतही या क्षेत्रामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. ही गती पाहता या क्षेत्रात मोठी वाढ होण्याचे संकेत जाणकारांनी दिलेत.

जागतिकीकरण झाले असले तरी अनेकांना जगातील अन्न पदार्थांचे विविध प्रकार खाण्यासाठी मिळत नाहीत. भारतीय अन्नपदार्थ, चायनीज आणि पिझ्झासारखे पदार्थ वगळता इतर अन्न पदार्थांचे विविध प्रकार मिळत नसल्याची मोठी समस्या आहे. हिच समस्या दूर करण्याचा प्रयत्न रिधीमा आणि श्रेयांसने केलाय. रिधीमा सांगते की, आम्हाला शवर्मा खाण्यासाठी बांद्रा ते पवई असा प्रवास करावा लागत होता. असे पदार्थ खाण्यासाठी लोकांची होणारी धावपळ थांबावी आणि त्यांना वेळेवर आणि चांगले असे जागतिक खाद्यपदार्थ मिळवून देण्याच्या उद्देशानेच रिधीमा आणि श्रेयांस विजय या जोडप्याने स्टफड् (QSR) सुरू केले. त्यामध्ये शवर्मा आणि पास्ता सारखे पदार्थ वेळेत मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला लोकांचीही मोठी पसंती मिळत आहे. ताज्या भारतीय खाद्यपदार्थांसोबत परदेशी खाद्यपदार्थांचा लोकांना आस्वाद घेता यावा यावर भर दिला जात आहे. QSRच्या सेवेत विदेशी खाद्यपदार्थ ग्राहकांना रेस्टारंटकडून दिले जात आहेत.


image


श्रेयांस गेल्या आठ वर्षांपासून इन्वेस्टर बँकर म्हणून काम करत होता आणि तो आयआयटी मुबंईचा विद्यार्थी आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेली रिधीमा ही शेयर मार्केटमधील जाणकार. मात्र दोघांनीही त्यांचा जॉब सोडून स्टफड् सारखा एक नविन व्यवसाय सुरू केलाय. सुरवातीला लहान स्वरूपात सुरु केलेल्या आउटलेटला पुढील चार महिन्यातच लोकांची मोठी पसंती मिळली. सध्या कंपनीचे अंधेरी पूर्व, पश्चिम आणि पवईत अशी एकूण तीन आऊटलेटस् आहेत. तिन्ही आऊटलेटस् मध्ये दरोरज सरासरी दीडशेच्या वर ऑर्डरस् येतात. प्रत्येकाचे महिन्याचे सरासरी उत्पन्न हे १० लाखांच्या आसपास आहे. आम्ही ग्राहकांना दिलेली सुविधा पाहता ६० टक्के ग्राहक पुन्हा आमच्या रेस्टॉरंटकडे येत असल्याचा दावा रिधीमाने यावेळी केला...उभय पती-पत्नीने सांगितले की, लोकांना डीनर आणि लंचच्या वेळेत भारतीय खाद्य, चायनीज, पिझ्झाच्या व्यतिरिक्त इतर पदार्थ मिळवून देण्याच्या प्रयत्न करत आहोत. आमचे रेस्टॉरंट खास करून पास्ता आणि शवर्मासाठी प्रसिद्ध आहे. ग्राहकांना रेग्यूलर पास्ता आणि शवर्मा देणारे हे एक एकमेव रेस्टॉरंट असल्याचे रिधीमा सांगते

स्टफड्ला Riqueza Capital कडून मोठा निधी मिळाला असून येत्या १२ महिन्यात आणखी ८ ते १० आउटलेट सुरु करण्याचा कंपनीचा विचार आहे. कंपनीचा ग्राहकांना प्रिपॅकेज खाद्यपदार्थ देण्याचीही योजना कंपनी आखत आहे. जेणेकरून हे तरुण ग्राहक आकर्षित होईल, असा कंपनीचा मानस आहे

फास्ट फूडची पद्धत (क्विक सर्विस रेस्टॅारंट) नावानेसुद्धा ओळखली जाते. या क्षेत्रातली वाढ ही तीस टक्केच्या आसपास आहे जा की भारतातील फ़ूड सर्वीस सेक्टरच्या वाढीचा दर हा दहा टक्के च्या जवळपास आहे. NRAच्या अहवाला नुसार एकूण लोकसंख्येच्या ५० टक्के लोक दर तीन महिन्यातून एकदा तरी हॉटेलात खाणे पसंत करतात तर मोठ्या शहरात महिन्यातून आठ वेळा तरी लोक बाहेरचे अन्नपदार्थ खातात. अमेरिकेत चौदा तर चीनमध्ये नऊ वेळा लोक बाहेर खातात. QSR च्या सेवेत स्टफड् आपले वलय तयार करत असून पुढे हइ वलय आणखी मोठा आकार घेईल असा आत्मविश्वास रिधीमा आणि श्रेयांस यांना आहे