पुनर्वापर करता येणाऱ्या कचऱ्याचे नियोजन करणारे ʻपॉम पॉमʼ

0

दिल्ली सरकारच्या पर्यावरण विभागाच्या मते, राज्यात दरदिवशी आठ हजार ३६० टन घनकचरा जमा होतो. अजून एका अभ्यासाच्या निष्कर्षानुसार, शहरी भारतात प्रतिदिन एक लाख ८८ हजार ५०० टन (म्हणजेच प्रतिवर्षी ६८.७ दशलक्ष टन) घनकचऱा तयार होतो. म्हणजेच प्रत्येक व्यक्ती दर दिवशी ५०० ग्रॅम कचरा तयार करते. त्यापैकी पुनर्वापर करता येईल, अशा कचऱ्याचा वापर करण्याच्या प्रेरणेतून दिपक सेथी आणि किशोर ठाकूर यांनी ʻपॉम पॉमʼ नावाचा स्टार्टअप सुरू केला. जुन्या काळातील भंगारवाल्याच्या कामाप्रमाणे यांचे काम प्रतित होत होते. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या कामासाठी वेब बेस्ड प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला. एक टन जुन्या कागदांचा पुनर्वापर केल्यास १७ झाडांची कत्तल होण्यापासून वाचू शकते. तसेच एका जुन्या एल्युमिनियम धातुच्या कॅनमुळे टेलिव्हिजन तीन तास सुरू राहू शकतो, एवढी उर्जा मिळू शकते. ग्राहकांच्या दारोदारी जाऊन पुनर्वापर करता येण्यासारख्या जुन्या वस्तू जबाबदारीने जमा करणे. त्यांना योग्य ती किंमत देणे, अशी कामे त्यांनी सुरू केली. दक्षिण दिल्लीत त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. तसेच दहा लाख लोकांची घनकचरा निवारणाची समस्या सोडवण्याचे त्यांनी प्रयत्न सुरू केले. परिणामी स्वच्छ भारत अभियानात त्यांनी आपले योगदान दिले.

या स्टार्टअपच्या संस्थापकांना एकत्रितरित्या व्यवस्थापकीय कामाचा जवळपास ४५ वर्षांचा अनुभव आहे. दिल्लीतील घनकचरा नियोजन आणि सांडपाणी व्यवस्थापन करणाऱ्या एसपीएमएल इन्फ्रा कंपनीमागे या दुकडीचा मेंदू कार्यरत होता. मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले दिपक यांनी ऑस्ट्रेलियातील डेकिन विद्यापीठातून २००२ साली व्यवस्थापकीय शिक्षणाची (एमबीए) पदवी घेतली आहे. तर बंगळूरू येथील ख्रिस महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. व्यवस्थापनाच्या कामात त्यांना दशकभराचा अनुभव असून, त्यासोबतच ते एसपीएमएल इन्फ्रा कंपनीचे संस्थापक होते. ५६ वर्षीय किशोर यांनी दिल्ली विद्यापीठातून वाणिज्य शाखेत पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तसेच इंडियन आर्मीमध्ये त्यांनी काही काळ काम केले आहे. पॉम पॉम येथे ते मुख्य कार्य़कारी अधिकारी (चीफ ऑपरेशनल ऑफिसर) म्हणून काम पाहतात. दिल्ली घनकचरा व्यवस्थापनात ते आता पूर्णकालीन संस्थापकाचे काम पाहतात. तसेच एसपीएमएल संघटनेशी संलग्न असलेल्या पाच कंपन्यांचे ते संस्थापक आहेत. किशोर यांच्या मार्गदर्शनाखाली एसपीएमएल कंपनीला सलग तीन वर्षे जीएमआर दिल्ली विमानतळाने ʻबेस्ट सर्व्हिस प्रोव्हाईडरʼ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. ʻघनकचरा व्यवस्थापनात केलेल्या कामाच्या अनुभवातून आम्हाला पॉम पॉमच्या स्थापनेसाठीची प्रेरणा मिळालीʼ, असे दिपक सांगतात. त्यांना दोन गोष्टींची जाणीव झाली. त्यापैकी एक म्हणजे, घनकचऱ्यातून पुनर्वापर करता येण्याजोग्या वस्तू वेगळ्या करण्यासाठी बरेच कष्ट लागत होते. तसेच त्या कामाची गतीदेखील कमी होत होती आणि दुसरे म्हणजे लोकांमध्ये जागरुकतेची कमतरता. ते सांगतात की, ʻपुनर्वापर करता येण्यासारखा टनहून अधिक कचरा टाकून देण्यात येत होता. परिणामी जागोजागी कचऱ्याचे ढिग तयार होत होते. त्यामुळे आम्ही घनकचरा नियोजनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. तसेच पर्यावरणाच्या साखळीची संकल्पना लोकांना समजवून देत होतो. यातून आम्हाला कल्पना सुचली आणि पॉम पॉमचा जन्म झाला. लोकांमध्ये सजगता निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.ʼ या प्रक्रियेचा विकास करण्यासाठी तसेच तिला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत करणाऱ्या अनुभवी लोकांबाबत ते कृतज्ञता व्यक्त करतात. पुनर्वापर करण्यात येणाऱ्या कचऱ्याचे ते इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर वजन करतात, जेणेकरुन ते त्याचा योग्य तो भाव देऊ शकतात. एका फोनकॉलवर घरी य़ेऊन पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंचा योग्य दर देणाऱ्या या पॉम पॉमचे मोबाईल एप्लिकेशन तसेच संकेतस्थळदेखील आहे. या वस्तू जमा केल्यानंतर कंपनी त्यांची विक्री मोठ्या उद्योगधंद्यांना किंवा कारखान्यांना करते. जेथे त्यांचा पुनर्वापर करण्यात येतो.

दिपक यांच्या शब्दात सांगायचे तर, ʻप्लास्टिक पिशव्या, ग्लासेस, बॉटल्स ज्या टाकून देण्यात येतात, त्यांचा १०० टक्के पुनर्वापर करता येऊ शकतो. आम्ही फक्त या कार्यातून आमच्या ग्राहकांचे समाधानच करत नाही, तर स्वच्छ भारत अभियान आणि आपल्या समाजाकरिता ते काही योगदान करत आहेत, याची जाणीवदेखील त्यांना करुन देतो.ʼ या संस्थापकांनी सुरुवातीच्या काळात या उद्योगात एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. सुरुवातीला एप्लिकेशन तयार करणे, जाहिरात करणे आणि त्यानंतर वाहने, मनुष्यबळ यांसाठी खर्च करण्यात आला. पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंवर त्यांचा महसूल अवलंबून होता. सध्या त्यांच्याकडे ११ वाहने (एक मोठे टाटा कॅन्टॉर नावाचे वाहन आणि १० मारुती इको गाड्या), ३० कर्मचारी आणि कॉल सेंटर कर्मचारी आहेत. दिल्लीवर त्यांनी सर्वप्रथम लक्ष केंद्रीत केले असून, ते सध्या शाळा आणि रुग्णालयात जनजागृती करत आहेत.

ʻघनकचरा नियोजनात आमचे स्थान अधिक पक्के करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तसेच नवीन परिसर, शहरे यांमध्ये या व्यवसायाचा विस्तार करण्याचा आमचा मानस आहे. ज्यामुळे ग्राहकांना आमची सेवा पुरवणे, अधिक सोपे होऊ शकतेʼ, असे किशोर सांगतात. या व्यवसायातून झालेला नफा आताच सांगणे, घाईचे ठरू शकते, असे त्यांना वाटते. त्यामुळे येत्या काही महिन्यात ते हा आकडा जाहीर करणार असल्याचे सांगतात. जुने रद्दी पेपर, प्लास्टिक यांसारखा कोरडा कचरा जमा करणारे अनेक स्टार्टअप्स या क्षेत्रात तसेच ई-वेस्ट सेक्टरमध्ये आहेत. ते पुढे सांगतात की, ʻहे क्षेत्र खूप मोठे आहे. आम्ही लोकांमध्ये पुनर्वापराबद्दल जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला विश्वास आहे की, जर त्यांना जुन्या वस्तुंचा वापर नव्या वस्तू तयार करताना होऊ शकतो, ही गोष्ट समजली. तर ते देखील आम्हाला सहकार्य करुन या उपक्रमात आपले योगदान देतील. घनकचऱ्याबाबतीतील त्यांचा दृष्टीकोन बदलून जाईल.ʼ कचऱ्याचे वस्तुमान, त्याची किंमत याबाबत ग्राहकांना राजी करणे, आव्हानात्मक असल्याचे दिपक सांगतात. याच गोष्टीवर त्यांना सर्वाधिक वेळ द्यावा लागल्याचे ते सांगतात. ʻजेव्हा आम्ही एका ठराविक वस्तुमानापर्यंत पोहोचत होतो, तेव्हा आम्ही नव्या प्रकल्पाबद्दल किंवा आमच्या व्यवसाय विस्ताराबाबत विचार करत होतो. कॉर्पोरेट जगतातील बड्या कंपन्या, शाळा, बॅंका, विद्यापीठे, इन्स्टिट्युट, सरकारी कार्यालये यांना या उपक्रमात सामील करुन घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोतʼ, असे ते सांगतात. कबाडीवाला, स्कार्पोस, ई-कबाडी, कचरापट्टी आणि कचरे का डिब्बा हे पॉम पॉम यांचे मुख्य प्रतिस्पर्धी आहेत.

लेखक - तौसिफ आलम

अनुवाद - रंजिता परब

Related Stories