यशा पेक्षा अपयशातून आपण बरंच काही शिकतो - सौम्या ननजुन्दी

0

"मला नेहमीच स्वतःच विश्व उभं करायचं होतं," उद्योजक सौम्या ननजुन्दी सांगते. घरातील वातावरण उद्योजकतेला पुरक असल्याने आणि तिचे आई आणि वडील दोघेही उद्योजक होते. तिला माहित होतं, की मोठं झाल्यावर आपल्यालाही आई वडिलांचा वारसा चालवायचा आहे. सध्या सौम्या इंसाईटची मुख्य कार्यकारी अधिकारी आहे.

इंसाईट ही एक पुरस्कार प्राप्त नावाजलेली संस्था आहे. ती एक डिजिटल एजन्सी असून जगभरात काम करण्याऱ्या कंपन्यांना मार्गदर्शन करते. गेल्या नऊ वर्षांपासून इंसाईटने तंत्रज्ञान, आरोग्य, उत्पादन आणि किरकोळ क्षेत्रातील अशा १५० हून अधिक कंपन्याना मार्गदर्शन केलं आहे.

सौम्या ने स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा हे ध्येय ठेवून, इतर कंपन्यांमध्ये काम करायला सुरवात केली. चलता है असं म्हणून स्वस्त बसणं तिला आवडत नाही. सौम्याचा जन्म बेंगळूरू मध्ये झाला आणि ती त्याच शहरात लहानाची मोठी झाली. सौम्याला मार्केटिंग ची पार्श्वभूमी आहे. तिने मैसाचुसेट्स विद्यापीठातून एम बी ए केलं आहे. अमेरिकेत असताना तिने युनायटेड वे इन मैसाचुसेट्स या ना नफा न तोटा या तत्वावर चालणाऱ्या संस्थेसाठी मोठ्या कंपन्यांकडून निधी मिळवायचं काम करत होती. युनायटेड वे इन मैसाचुसेट्स ही अमेरिकेतील सगळ्यात मोठी सामाजिक संस्था आहे.

भारतात परत आल्यावर सौम्या ने निर्वाणामध्ये काम करायला सुरवात केली. ती तिथली चौथी कर्मचारी होती. ही कंपनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत होती. या कंपनीने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात विविध स्थरांवर काम करायला सुरवात केल्याने त्यावेळी बीपीओ क्षेत्राला बराच मोठा फायदा झाला. भारतात १८ महिने राहिल्यानंतर ती पुन्हा अमेरिकेत गेली. निर्वाणाच्या रचनात्मक वर्षात कंपनीचं धोरण ठरवण्यात सौम्याचा महत्वाचा वाटा होता. इतकंच नाही तर उत्पादन त्याची विक्री यासह इतरही महत्वाचे निर्णय तिने घेतले. निर्वाणाची न्यूयॉर्क विभागाची ती प्रमुख झाली होती. त्यामुळे उत्तर अमेरिकेत निर्वाणाचा प्रचार प्रसार आणि कंपनीची व्याप्ती वाढवणं हा तिच्या साठी एक उत्तम अनुभव होता.

" हा अनुभव अतिशय वेगळा आणि छान होता, मी वेगवेगळ्या समूहांबरोबर काम करत होते. त्यांच्या बरोबर काम करण्याच्या अनुभवातून मी बरंच काही शिकले. असं सौम्या सांगते. ती तिकडे पाच वर्ष राहिली. तिच्या दीर्घ वास्तव्यामुळे तिच्या कामाला देशांच्या सीमांचं बंधन राहिलं नाही. या दरम्यान ती दोन्ही देशात सक्रिय कसं राहता येईल हे शिकली. त्यामुळेच ती आज इंसाईटची यशस्वी मुख्य कार्यकारी अधिकारी आहे.

यशस्वीतेचा कान 'मंत्र'

सौम्या मंत्रा च्या माध्यमातून व्यावसायिक झाली. ती एक व्यावसायिक विश्लेषण करणारी संस्था होती. ती आता दुबई आणि भारतात अशा दोन्ही ठिकाणी काम करू लागली. आर्थिक सेवा क्षेत्राशी निगडीत अंदाज वर्तवण्याचं काम मंत्रा ही संस्था करायची.


सौम्याला नेहमीच कंपनीच्या बदलत्या आकडेवारीच आकर्षण असायचं, आणि ती त्या बाबतीत फारच सजग होती. दोन वर्षात तिच्या कंपनीने चांगली प्रगती केली. हा काळ म्हणजे मध्य पूर्वेतील देशात मंदीची लाट होती आणि तिचं स्वप्न पूर्ती करणारी तिची कंपनी तिला बंद करावी लागली.

" यशा पेक्षा अपयशातून आपण बरंच काही शिकतो आणि तेच मी मंत्रा बंद करायला लागल्यानंतर शिकले. मंत्रा बंद करणं हा माझ्यासाठी सगळ्यात अवघड निर्णय होता, पण मी तो घेतला." असं सौम्या सांगते. कंपनी बंद करण्याची वेळ आली होती, कंपनीला पैशांची गरज होती, पण सौम्या त्यासाठी पैसे उभे करायला तयार नव्हती.

त्याचवेळी सौम्याने नका वाईन्स या कंपनीत पैसे गुंतवले. ही तिच्या वडिलांचीच कंपनी होती. सौम्याचा नका वाईन्स शी जवळचा संबंध होता आणि दुसरा म्हणजे नाका ची नवीन उत्पादन बाजारात आणून त्याचा कर्नाटक आणि अमेरिकेत प्रचार करण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवण्यात आली होती.

सौम्या २०१० मध्ये नका मधून बाहेर पडली, पण तिच्या वडिलांनी एक वर्ष ती कंपनी चालवली आणि अखेर २०११ साली ती विकून टाकली.

इंसाईटची पारख

२०१० मध्ये सौम्याने इंसाईट मध्ये काम करायला सुरवात केली. त्यावेळी इंसाईट डिझाईन क्षेत्रात काम करत होती, त्यानंतर त्यांनी डिजिटल मार्केटिंगवर लक्ष केंद्रित केलं, आणि त्यावेळी सौम्याने कंपनीत अनेक गुंतवणूकदार कसे येतील अशा स्वरूपाच्या कामाला सुरवात केली.

" आम्हाला डोमेन तंत्रज्ञ मिळाल्याने एकाच ठिकाणी आम्हाला अनेक उपाय मिळाले. किंवा अनेकवेळा कंपन्या मार्ग काढण्यासाठी अनेक गोष्टींमध्ये हात घालतात." असं सौम्य सांगते. इंसाईट मध्ये त्यांना सर्वांगीण मदत करेल असं कोणीतरी हवं होतं, प्रत्येकाकडून थोडी थोडी मदत घेऊन मग काम पुढे न्यायचं यामध्ये त्यांना रस नव्हता.

वेगळी कार्यपद्धती

अमेरिका आणि भारतात बराच काळ काम केल्यानंतर तिच्या अनुभवातून सौम्या सांगते की, " या दोन्ही देशांच्या कार्यपद्धतीमध्ये बराच फरक आहे भारतात तुमचे एकमेकांशी वैयक्तिक संबंध कसे आहेत, एका संस्थेत काम करतानाही इतर सहकाऱ्यांशी तुम्ही किती संपर्कात आहात यावर कामाचं स्वरूप अवलंबून आहे. यामुळे इकडच्या कामात अस्पष्टता आहे. अमेरिकेत निर्णय हे अतिशय पारदर्शी पद्धतीने घेतले जातात आणि ते पण निकषांवर आधारित असतात. त्यावर कंपनीची प्रतिष्टा अवलंबून असते, प्रतिष्ठा जपत हितसंबंधातून निर्णय घेतले जातात."

निर्वाणा मधील तिची कारकीर्द ही सगळ्यात महत्वाची होती कारण त्या कामामुळेच तिच्यात आत्मविश्वास निर्माण झाला, असं सौम्या सांगते. यामुळे तिच्या कामाचा दर्जा उंचावला असं झालं नाही तर व्यवसायातील आव्हानं स्वीकारण्याची तिची क्षमताही वाढली.

पाण्यामध्ये माश्याप्रमाने पोहायला तिला आवडतं

ती योगी अरबिंदोची शिश्या आहे. त्यामुळे सौम्याला तत्वज्ञानावर आधारित पुस्तकं वाचायला आवडतात. तिला पोहायला आवडतं आणि त्यामुळे सुरवातीच्या वर्षात ती अनेक जलतरण स्पर्धांमध्ये सहभागी झाली होती.

" मला पाण्यात मासळी बनून पोहायला आवडतं पण माझ्या उंची मुळे मला वयाच्या ११ व्या वर्षी पोहणं सोडावं लागलं." हे ती हसत हसत सांगते.

अध्यात्मा मध्ये तिला रस असल्याने ती खूप वाचन करते. विविध संस्कृतीच्या देशी आणि परदेशी लोकांशी संवाद साधायला तिला आवडतं त्यामुळेच ती उत्साही असते. इतकंच नाही तर तिला फिरायलाही आवडतं.

मुलींनो कार्यमग्न रहा

अनेक प्रयत्नातून यशस्वी झालेली सौम्या आजच्या मुलींना सल्ला देते,' सतत कार्यमग्न रहा आणि वैयक्तिक कारणांमुळे माघार घेऊन नका कारण तुमच्याकडे तो पर्याय उपलब्ध आहे. विविध क्षेत्रात महिलांना उच्च पदावर काम करताना बघायला आवडतं.' असं ती शेवटी सांगते.

लेखिका : सास्वती मुखर्जी

अनुवाद : श्रद्धा वार्डे

Related Stories

Stories by Team YS Marathi