१७ वर्षीय तरुणाने सीमेवरील जवानांच्या सुरक्षेसाठी तयार केला रोबोट! 

1

देशाच्या सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना स्वत:चे प्राण वाचविण्यासाठी १७ वर्षांच्या तरूणाने एक रोबोट तयार केला आहे, त्यांचा दृष्टीकोन आहे की सीमेवर मानवी सैनिकाऐवजी रोबोटीक सैनिक तैनात केले तर देशाचे सुपूत्र गमाविण्याची वेळ येणार नाही.

ओडिसाच्या बालासोर जिल्ह्यातील एका नवतरूणाने हा दावा केला आहे की, त्याने असा हार्मोनाइड रोबोट (यंत्रमानव) तयार केला आहे की, कृत्रिम माहितीच्या आधारे काम करतो आणि जवानांना जीव धोक्यात घालून कृती करणे टाळतो.


निलमादाब यांनी पहिल्यांदा सहाव्या वर्गात असताना रोबोट तयार करण्याचे प्रयत्न केले होते.  त्यांचे स्वप्न होते की त्यांना  एक यंत्र मानव बनवायचा आहे. घरची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसातानाही त्यानी हळुहळू विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे ते कौशल्य मिळवले. योग्य वेळी त्यांनी यातील आपली निपुणता सिध्द केली. दिवस रात्र मेहनत घेवून त्यांनी हा रोबोट अखेर तयार केलाच. या नवतरूण वैज्ञानिकाचे नाव आहे नीलमादाब मेहरा.

सुरूवातील निलमादाब यांच्यावर त्यांच्या वडीलांचा विश्वास बसला नाही. आर्थिक स्थिती बेताची असल्याने आणि आजूबाजूचे वातावरण शिक्षणाची व्यवस्था नसल्याचे असल्याने त्यांना चिंता जरुर होती, मात्र निलमादाब यांनी स्वत:हून शिकण्याची इच्छा असल्याने आपल्या आवडीचे ज्ञान मिळवलेच.

निलमादाब यांनी या रोबोटला एटम३.७ असे नाव दिले आहे. त्यांचे मत आहे की हा रोबोट संरक्षण, स्वयंचलीत कार्य मनोरंजनाच्या क्षेत्रातही किंवा उद्योग, शिक्षण अथवा घरगुती कामात मानवी कर्मचा-यांची जागा घेवू शकेल. ज्या कमी वयात इतर मुले या विषयाचा विचार देखील करत नाहीत त्या वयात हे यश निलमादाब यांनी मिळवले आहे. जसा आदेश देवू तशी कामे त्यांंनी तयार केलेला रोबोट करतो. नील तालनगर कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिकतात. या कामाची सुरूवात त्यानी मागील वर्षी जानेवारी महिन्यात केली. त्यात त्यांना वर्षभराचा वेऴ लागला. त्यासाठी सुमारे चार लाखांचा खर्च आला. या रोबोटची लांबी ४.७फूट आणि वजन ३०किलो आहे. एका बेसिक प्रोग्रामिंगच्या तत्वाने हा रोबोट काम करतो. यात १४ सेंसर आणि पाच नियंत्रक आहेत.

निल यांची स्वप्न भरारी

निलमादाब यांना लहानपणापासूनच विज्ञानात रूची होती. वैज्ञानिक खेळणी त्यांना आवडत, तिस-या वर्गात असतानाच त्यांनी त्याचा पहिला प्रकल्प तयार केला होता. सहाव्या वर्गात असताना त्यांनी प्रथम रोबोट तयार करण्याचा अपयशी प्रयत्न केला होता. मात्र त्यांनी ही महत्वाकांक्षा सोडली नाही की असा रोबोट तयार करायचाच. घरची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने त्यांनी आपले शिक्षण सुरु ठेवले आणि मनात या विषयावर काम करण्याचा निर्णय पक्का केला. त्यानंतर जमेल तशी दिवस रात्र मेहनत करून रोबोट तयार करण्याची तयारी केली आणि यश मिळवले. त्यांनी इंटरनेट वरून माहिती घेतली त्यांच्या मते  या रोबोटला तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अधिक खर्चाची गरज आहे, आता मी रोबोटिक्स मध्ये आणखी ज्ञान मिळवेन त्यानंतर मी एक बहुरोटर ड्रोन तयार करत आहे जो महिलांच्या सुरक्षेसाठी काम करेल.’