बॉबी भाटिया यांच्या ‘ट्रॅकइन्व्हेस्ट’ने बनवले व्हर्च्युअल ट्रेडिंग सोपे

1

बॉबी भाटिया म्हणजे भारतात जन्मलेले आणि कुवेतमध्ये लहानाचे मोठे झालेले  एक मनमौजी  विद्यार्थी होते. १६ वर्षांच्या वयात बॉबी भाटियांनी स्टॅनफोर्डमध्ये यंग स्कॉलर प्रोग्रॅममध्ये भाग घेतला. त्यानंतर ड्यूक विद्यापीठातून त्यांनी आपली पदवी संपादन केली. १९ व्या वर्षी त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. इतक्या छोट्या वयात मिळवलेल्या या यशामुळे बॉबी भाटिया एक प्रेरित आणि महत्त्वाकांक्षी व्यक्ती म्हणून नावारूपाला आली.

आमच्याशी बोलताना बॉबी भाटिया यांनी आपल्या आश्चर्यकारक प्रवासाची कहाणीच कथन केली.

बॉबी भाटियाचे हे कथन त्याच्याच शब्दात ऐकणे प्रेरणादायी आणि मनोरंजक ही ठरेल.

माझ्या कारकिर्दीचे रेखाचित्र

मी अमेरिकेत दोन वर्षांसाठी ‘ऑप्शन ट्रेडिंग’मध्ये काम केले. त्यानंतर १९९५ मध्ये मी हॉगकाँगला गेलो. १९९८ मध्ये मला आशियातील पहिल्या ‘लेवरेज बायआऊट फंड चेस कॅपिटल पार्टनर्स आशिया’ ( जेपी मॉर्गन पार्टनर्स) चा संस्थापक बनण्याची संधी मिळाली. याबरोबर या क्षेत्रातील अनेक देशांचा प्रवास करण्याची आणि आंतरदेशीय देवाण-घेवाण करण्याचा मला विशेषाधिकारही मिळाला.

पुढे ९ वर्षांनंतर ‘जेपी मॉर्गन पार्टनर्स’सोबत मिळालेल्या अनुभवामुळे मला ‘एआयजी’मध्ये व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य गुंतवणूक प्रमुख ही पदे भूषवण्याची संधी मिळाली.

मला माझ्या कारकिर्दीत एक विशिष्ट लक्ष गाठायचे आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेली महत्त्वाकांक्षा माझ्या डीएनएमध्येच होती याची मला चांगली कल्पना होती. माझ्या कारकिर्दीच्या सुरूवातीला माझ्या अनेक वरिष्ठ मार्गदर्शकांनी माझ्यावर विश्वास टाकला, या दृष्टीने मी स्वत:ला खूपच भाग्यशाली समजतो. माझ्या आई-बाबांसोबत कुवेतला जाण्याअगोदर मी भारतात विविध राज्यांमध्ये आणि नंतर अमेरिकेतही राहिलेलो आहे. यामुळे विविध संस्कृतींच्या संपर्कात आलो. त्या विविध प्रकारच्या संस्कृतींनी मला खूपच प्रभावित केले आणि मला घडवले सुद्धा.

पुढे जात रहा

अनेक वर्षे मी विविध कंपन्या आणि उद्योजकांना सल्ला देण्याचे काम करत होतो. हे काम मी खूपच चांगल्या पद्धतीने करत होतो. परंतु मी एक चांगला संचालक म्हणून सिद्ध होऊ शकतो असे माझे मन मला सतत सांगत होते. याच कारणामुळे हे सगळे सोडून मला माझी स्वत:ची कंपनी सुरू करायची होती.

'ट्रॅकइन्व्हेंस्ट'चा जन्म

मी फायनान्समध्ये असताना भरपूर अभ्यास करत होतो. मला आवश्यक असलेली सर्व प्रकारची माहिती मिळवण्यासाठी वेगवेगळ्या व्यासपीठांवर जावे लागत होते. ही माहिती व्यवहार्य किंमतीत मिळवणे ही जवळजवळ अशक्य गोष्ट होती. माझ्या साठी ती एक डोकेदुखीच होती. ही असुविधा टाळण्यासाठी एका जागी सर्व माहिती उपलब्ध होऊ शकेल असे एक टूल तयार करावे असा मी विचार केला. ज्यांना मी सल्ला देण्याचे काम करत होतो अशा अनेक विद्यार्थी आणि ग्राहकांनाही याच समस्येचा सामना करावा लागत होता. मी आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अनेक लोकांशी संपर्क साधत होतो. मी त्यांचा कामातील सच्चेपणा आणि ख-याखु-या कामगिरीबद्दल त्यांच्याशी बोलत होतो आणि विद्यार्थ्यांच्या इंटर्नशीपसाठी शिफारीसही करत होतो.

अशा प्रकारे ‘ट्रॅकइन्व्हेंस्ट’चे बीज माझ्या डोक्यात पडले आणि तेव्हा या माहितीच्या व्यासपीठासोबत एक ‘व्हर्च्युअल गेमींग प्लॅटफॉर्म’ तयार करण्याचा विचार माझ्या मनात आला. या मागे लोकांना ट्रेड करून स्कोअर प्राप्त करता यावेत अशी कल्पना होती. हे व्यासपीठ प्रतिभा ओळखण्याचे एक व्यासपीठ सिद्ध होऊ शकणार होते. अशा प्रकारे ‘ट्रॅकइन्व्हेंस्ट’ची सुरूवात झाली.

काय आहे ट्रॅकइन्व्हेंस्ट?

सामाजिक गुंतवणूक हे एक नवीन चलन आहे. ‘ट्रॅकइन्व्हेस्ट’ हे उत्कृष्ट सोशल मीडिया आणि मोठ्या ट्रेडर्सना जोडणारा दुवा आहे. ‘ट्रॅकइन्व्हेस्ट’च्या माध्यमातून तुम्ही व्हर्च्युअल ट्रेडिंग करू शकता. शिवाय ट्रेडिंगवर पडणारा विविध सेक्टर्सचा प्रभाव देखील ओळखू शकता.

तुम्ही या व्यासपीठावर निनावी राहू शकत नाही. हे व्यासपीठ तुम्हाला आपली ओळख उघड करण्यासाठी उद्युक्त करून सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचे काम करते. तुम्ही तुमच्या युजर कंपन्या आणि आपल्या सहका-यांना या व्यासपीठावर ओळखू शकता. तुम्ही यामध्ये प्रत्येक आठवड्याला १२ हजार संशोधन अहवाल बघू शकता. या व्यासपीठावर भारत, युएस, सिंगापूर, हाँगकाँग, चीन आणि ऑस्ट्रेलियासह सर्वच मुख्य बाजारांचे विस्तृत कवरेज उपलब्ध असते. जसजसे अधिकाधिक लोक या व्यासपीठाचा उपयोग करतील, तसतसे आम्ही या उभरत्या बाजारात ट्रेडिंगच्या पद्धतीत बदल करू हे निश्चित. शिवाय नजिकच्या काळात खरेदी-विक्रीचा किचकटपणा जाऊन या मॉडेलचे नक्कीच सुलभीकरण होईल.

नव्या ‘युआय’सह नोव्हेबरमध्ये लाँच केले गेले व्यासपीठ

उपयोगकर्त्याला ‘साईन-अप’ करण्यासाठी हे व्यासपीठ खुले आहे. वेबसाईट मोफत आहे आणि ती निमंत्रणावर ( इन्व्हिटेशन्स) आधारित आहे. युवरस्टोरीचे वाचक पोर्टलपर्यंत पोचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा उपयोग करू शकतात. या द्वारे या वेबसाईटचा उपयोग करून तुम्ही तुमचे रिअल टाईम स्टॉक मार्केट एनव्हायर्नमेंट प्राप्त करू शकता. आणि या ट्रेडिंग एक्टिविटी रियल टाइम च्या आधारे निवडलेले नेटवर्क आणि मित्रांना ग्राहकांसोबत जोडू शकता हा या वेबसाईटच्या वापराचा सर्वात मोठा फायदा आहे. आपले ग्रॅज्युएशन करत असलेले किंवा मग नोकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या स्थितीचा फायदा उचलण्याची संधी प्राप्त करून देणे हे आमचे सध्याचे लक्ष आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून ते स्टॉक मार्केट काय आहे हे समजून घेऊ शकतात. शिवाय ते संभाव्य कर्मचा-यांचे लक्षही वेधू शकतात. आमच्या विद्यार्थी आपल्या पोर्टफोलिओची कामगिरी, संशोधन आणि चर्चेच्या आधारे विद्यार्थी आमच्या पार्टनरशीप स्पर्धेत भाग घेऊन निवडले जाऊ शकतात.

पुष्कळ लोकांमध्ये एक चांगला ट्रेडर बनण्याची क्षमता असते याची मला खात्री आहे. खरे तर कशा प्रकारे वेगवेगळ्या पार्श्वभूमींमधून प्रतिभा समोर येऊ शकते हे आमचे सध्याचे टॉप ट्रेडर्स सिद्ध करू शकतात. १२ टक्के परतावा मिळवणारी एक भारतीय गृहिणी आमच्याकडे आहे. शिवाय एक इंटर्नशीपच्या अंतिम फेरीत यशस्वी ठरलेल्या एलेक्स डीकू नावाच्या पोलंडच्या विद्यार्थीनीचेही उदाहरण आमच्याकडे आहे.

कोरियाच्या स्पार्क लॅब्ससह मध्य आशिया आणि भारतातील काही प्रतिष्ठित लोकांचे आणि कुटुंबांचे आम्हाला समर्थन आहे.

पुढील २४ महिन्यांच्या कालावधीत दहा लाखांहून अधिक सक्रीय युजर्स बनवण्याचे आमचे लक्ष आहे. परंतु, जेव्हा आमच्या पिढीचा पुढील महान गुंतवणूकदार आम्हाला मिळेल तेव्हाच ख-या अर्थाने आम्हाला आमचा मैलाचा दगड सापडेल.

अधिक माहितीसाठी trakinvest ला भेट द्या.

worked with CNews, ETV Marathi, Mumbai Sakal Daily, IBN Lokmat and Mi Marathi as a Reporter, Senior Reporter / Copy Editor and Associate Editor. Presently working as freelance writer and Translator. Poetry ( Ghazal), singing and writing is my passion.

Stories by sunil tambe