मेन्स्ट्रूपीडियाच्या टोल्याने अपवित्रतेचा 'पिरीयड' संपवणा-या अदिती गुप्ता

समाजात ज्या गोष्टीबाबत बोलले जात नाही, जी गोष्ट अपवित्र समजली जाते, ज्या गोष्टीचा विटाळ मानला जातो अशा स्त्रियांच्या मासिक पाळी आणि त्याबाबतच्या समस्यांवर मोकळेपणाने बोलणारी, बेधडकपणे काम करणारी कार्यकर्ती म्हणजे अदिती गुप्ता. स्त्रियांच्या मासिक पाळीबाबत समज, गैरसमज, अपवित्रतेचा समज, स्त्रियांवर लागलेला हा कलंक धुवून काढण्याचे काम अदिती समाजात मोठ्या धडाडीने करत आहे. त्यांच्या सुधारणावादी जनजागृतीचा या कथेच्या माध्यमातून केलेला हा जागर.

मेन्स्ट्रूपीडियाच्या टोल्याने अपवित्रतेचा 'पिरीयड' संपवणा-या अदिती गुप्ता

Friday August 14, 2015,

7 min Read

स्त्रियांच्या मासिक पाळीशी संबंधीत सॅनिटरी उत्पादन म्हटले की आपल्याला 'व्हिस्पर' हे नाव चटकन आठवते. मी जेव्हा वयात आले, तेव्हापासून मी विचार करत आले आहे की व्हिस्पर हे नाव आपल्या भावनांशी जोडले गेले आहे. कुणाला कळू नये म्हणून मासिक पाळीबद्दल नेहमीच दबक्या आवाजात बोलले जाते. "लोणच्याला स्पर्श करू नकोस" हा नियम सतत ऐकावा लागायचा. पण आता तो तथाकथित पवित्रतेचा नियम पूर्णपणे बदलला आहे त्याचे रुपांतर "तिने लोणच्याला स्पर्श केला" असा कानाला जरा बरा वाटेल अशा मंजूळ आवाजात ऐकू येऊ लागलाय. आता आपण प्रसारमाध्यमांवर या निषिद्ध मानलेल्या गोष्टीवर मनमोकळेपणाने बोलतो. ज्यांना मासिक पाळी आली आहे अशा स्त्रियांना स्वच्छतेसाठी काही कपडे वापरावे लागत असत, किंवा तात्पुरत्या उपाययोजनांवर अवलंबून रहावे लागत असे. पण अदिती गुप्ता यांच्यासारख्या व्यक्तीने स्रियांच्या मनातील अपवित्रतेची खंत निघून भविष्यात चांगले दिवस येतील असे आशादायक चित्र निर्माण केले. मेन्स्ट्रूपीडियाच्या संस्थापिका अदिती गुप्ता या त्यांच्या वेबसाईटच्या माध्यमातून मासिक पाळीसंदर्भात स्त्रियांचे आरोग्य आणि स्वच्छतेबाबत समाजाला जागृत करण्याचे अथक प्रयत्न करत आहेत.

मेन्स्ट्रूपीडियाच्या संस्थापिका, अदिती गुप्ता

मेन्स्ट्रूपीडियाच्या संस्थापिका, अदिती गुप्ता


अदिती गुप्तांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेतच, पण त्याहीपेक्षा त्यांचा याबाबतचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी असा आहे. झारखंडमधील गढवा या छोट्याशा शहरात अदिती गुप्तांचा जन्म झाला. तिथेच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. जुन्या विचारांच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढत असताना लहान वयातच मासिक पाळी म्हणजे काहीतरी अपवित्र गोष्ट आहे अशा संस्कारांचा पगडा अदिती गुप्तांवर परंपरेने चालून आला होता. त्यांना पहिल्यांदा पाळी आली तेव्हा त्या १२ वर्षांच्या होत्या.

"मी माझ्या आईला जेव्हा याबाबत सांगितले तेव्हा तिने तात्काळ मला 'अडीच मग' इतक्या पाण्याने अंघोळ करायला सांगितले. अडीच मग पाण्याने अंघोळ केली की मासिक पाळी फक्त अडीच दिवसच टिकते असा तिचा समज होता."

पण खरोखर असे काही झाले नाही. उलट पाळी सुरू असताना माझ्या स्नायूंमध्ये पेटके येऊ लागले होते. आणि मासिक पाळीत असे होणे म्हणजे वाईट असते असा समज होता. दुसरा आणखीएक समज त्यावेळी समाजात रूढ होता. मासिक पाळी सुरू असताना दुसऱ्याच्या बिछान्यावर बसायचे नाही, पुजेच्या ठिकाणाला स्पर्श करायचा नाही, किंवा जे जे काही घरात पवित्र आहे असे समजले जाई अशा कोणत्याही ठिकाणाला किंवा वस्तूला हात लावायचा नाही अशी बंधने माझ्यावर लादण्यात आली. पाळी आलेल्या मुलींना त्यांचे कपडे वेगळे धुवून वेगळ्या जागी वाळवावे लागत होते. त्यांना लोणचे खावूही दिले जात नव्हते आणि स्पर्शही करू दिला जात नव्हता. अशा अवस्थेत जर लोणच्याला स्पर्श केला गेला तर लोणचे खराब होते असा लोकांमध्ये समज होता. "जेव्हा माझी मासिक पाळी संपायची, तेव्हा मला माझे कपडे, चादरी धुवाव्या लागायच्या; त्या खराब झालेल्या नसल्या तरीही. थोडक्यात काय, तर माझ्यासोबत एक अपवित्र आणि अस्पृश्याप्रमाणे व्यवहार केला जात होता. मासिक पाळी संपल्यानंतर सात दिवसांनी मी एकदा का अंघोळ घेतली, केस धुतले की मगच मी पुर्वीप्रमाणे पवित्र होत असे."

अदिती गुप्तांचा हा अनुभव देशातल्या इतर स्त्रियांच्या अनुभवाहून जराही वेगळा नव्हता.

अदितींचे कुटुंब सुशिक्षित आणि सधन होते. त्यामुळे त्यांच्यासाठी सॅनिटरी पॅड विकत घेणे मुळातच कठीण नव्हते. पण प्रश्न असा होता की ते विकत घ्यायला जाईल कोण? कुटुंबातल्या मुलांचे भविष्य आणि कुटुंबाची प्रतिष्ठा धोक्यात घालेल कोण ? हे मोठे प्रश्न होते. पाळी आलेल्या मुलींना, स्त्रियांना साफसफाईसाठी छोटे कपडे वापरावे लागत. वापरानंतर ते गुपचूप धुवून बाथरूमच्या एका कोणत्यातरी घाणेरड्या, दमट अशा काळोख्या कोपऱ्यात ठेवावे लागत असत. आणि त्यात पुन्हा आपली मासिक पाळी घरातल्या पुरूषांना कळू नये यासाठी सतत डोळ्यात तेल घालून कसरत करावी लागत असे.

"आज देखील, बारा वर्षांची मी मलाच आठवलं की माझेच मला खूप वाईट वाटते. ते अनुभव मला आठवतात. अगदी आज सुद्धा, अनेक समाजांमध्ये मासिक पाळीबाबत बोलले जात नाही." - अदिती.

शाळांनी सुद्धा मासिक पाळीबाबत मुलींमध्ये प्रबोधन व्हावे यासाठी प्रयत्न केले. पण असे असले तरी शाळेतही पाळी हा काहीतरी घाणेरडा, अपवित्र प्रकार आहे, हा समज पुसला गेला नाही. याचे एक उदाहरणही देता येईल. बहुतेक मुलींना १२ व्या वर्षी म्हणजे सातव्या इयत्तेत असताना पाळी येते. पण शाळेत मात्र इयत्ता नववी पर्यंत मासिक पाळी हा विषय लागू करण्यात आला नव्हता. इतकेच कशाला, जीवशास्त्र शिकवणारे आमचे एक आवडते शिक्षक होते, ते मोकळेपणाने मित्रासारखे बोलायचे. त्यांनी सुद्धा मासिक पाळी आणि मुलाचा जन्म कसा होतो याबाबतचे धडे न शिकवता पूर्णपणे गाळले होते. 

या गोष्टी लक्षात घेतल्या तर असे जाणवते की, "आम्ही जाणते होऊ लागलो तेव्हापासूनच आम्ही आमचे शरीर, आमचे स्वत:चे हक्क कसे नाकारायचे हेच शिकलो होतो. लहान मुलींचा विनयभंग असो, मासिक पाळी असो, गरोदरपणा असो, किंवा मग शरीर संबंध असो, या गोष्टीही आम्ही अनुषंगाने नाकारत आलो. मुलांना स्पर्श करणे आणि मिठी मारणे या साध्या साध्या गोष्टीही आम्हाला लज्जास्पद आणि विचित्र वाटायच्या." 

दुसऱ्या शहरात एका बोर्डींग स्कूलमध्ये मी प्रवेश घेत असतानाची गोष्ट मला आठवते. त्यावेळेस मला पाळी आली होती. मला स्वच्छतेसाठी कपड्यांच्या तुकड्यांची व्यवस्था करावी लागत असे. त्या शहरातल्या माझ्या मैत्रिणींच्या जेव्हा ही गोष्ट लक्षात आली तेव्हा त्यांनी मला केमिस्टच्या दुकानातून आधुनिक सॅनिटरी नॅपकिन विकत घ्यायला सांगितले.

" म्हणून मग मी औषधाच्या दुकानात गेले आणि लाजत लाजत ब्रांड नेम असलेले सॅनिटरी नॅपकिन्स मागितले. दुकारनदाराने ते नॅपकिल एका पेपरमध्ये गुंडाळले आणि काळ्या पॉलिथीन बॅगेत घालून मला दिले. मी तेव्हा१५ वर्षांची होते. त्यावेळी मी पहिल्यांदाच हे सॅनिटरी नॅपकिन्स वापरत होते." 

अदिती जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन करत होत्या, त्यावेळी त्यांना तुहीन नवाचा तरूण भेटला. पुढे त्या दोघांचे लग्न झाले. नंतर पुढे तुहीन त्यांच्या कार्यातला एक चांगला भागीदार सुद्धा बनला. पुष्कळदा ते एकाच प्रोजेक्टवर एकत्र काम करत असत. तुहीनला फक्त एक लहान भाऊ होता. घरात कुणी मुलगी नसल्याने तुहीनला पाळीबाबत काही विशेष असे माहिती नव्हते. पाळीबाबत जे काही शाळेत जुजबी शिकवले होते, तितकेच. दर महिन्याला अदितीला मासिक पाळी दरम्यान काय सहन करावे लागत होते हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले, तेव्हा तुहीनने पाळीबाबत माहिती गोळा करायला सुरू केली. शिवाय अदितींना मदत होईल या उद्देशाने मासिक पाळीच्या दिवसात काय काळजी घ्यावी, परिस्थिती कशी हाताळायला हवी याबाबतही त्यांनी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला.

शाळकरी मुलींमध्ये  मासिक पाळीबाबत  जनजागृती

शाळकरी मुलींमध्ये मासिक पाळीबाबत जनजागृती


अदिती म्हणतात, " पाळीबाबत ज्या गोष्टी मला माहीत नव्हत्या, अशा अनेक उपयोगाच्या गोष्टी तुहीनने मला सांगितल्या. माझ्यासारख्या सुशिक्षित मुलीला जर पाळीबाबत महत्त्वाच्या गोष्टींची माहितीच नसेल, तर मग आपल्या समाजात अशा लाखो मुली असणार ज्यांना पाळीची स्थिती कशी हाताळायची असते याची जराही कल्पना नसेल. " हे लक्षात घेत मासिक पाळीबाबत समाजात जागृती घडवणारा एक मोठा प्रोजेक्ट अदितींनी हाती घेतला. याच रिसर्च प्रोजेक्टने मेन्स्ट्रूपीडियाचा पाया घातला." 

अदितींच्या या कामाला मिळालेला प्रतिसाद खूपच जबरदस्त असा होता. पाळीबाबतचे समज गैरसमज आणि नैतिकदृष्या अपवित्रतेचा समज तोडून टाकण्याबाबतचा त्यांचा सांस्कृतिक दृष्टीकोण मुलींमध्ये, पालकांमध्ये आणि शिक्षणतज्ञांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वीकारला गेला. इतकेच नाही, तर जनजागृतीसाठी सुरू केलेल्या त्यांच्या वेबसाईटला दर महिन्याला लाखभर लोक भेट देऊ लागले. विशेष म्हणजे याच महिन्यात प्रकाशित झालेले 'मेन्स्ट्रूपीडिया कॉमिक' दक्षिण अमेरिका आणि फिलीपिन्सला हलवण्यात आले आहे. या कॉमिकला खूप चांगला प्रतिसाद लाभला. इतका, की या कॉमिकचे आठ वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये आणि तीन परदेशी भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी अनेक स्वयंसेवक एका पायावर तयार झाले आहेत. लवकरच संस्थेचे एक ऑडिओ-व्हिडिओ अॅप देखील येत आहे. 

अदिती वयात आल्या तेव्हापासून गोष्टी बदलायला सरूवात झाली. " आता जास्तीत जास्त लोक या विषयाबद्दल बोलायला लागल्याचे दिसत आहे. विविध क्षेत्रातल्या लोकांनी या विषयावर अनेक लेखही लिहिले आहेत. आपल्या मुलींना याविषयी चांगली माहिती व्हावी म्हणून आईवडिल आणि आजोबा मेन्स्ट्रूपीडिया कॉमिक विकत घेऊ लागले आहेत." पाळीबाबत कुणाला सांगू नकोस, बाबा किंवा भावंडांनाही काही सांगू नकोस अशी शिकवण जेव्हा वयात आलेल्या मुलीला दिली जाते, तेव्हापासून पाळीबाबत गुप्तता पाळण्याचा प्रकार सुरू होतो. अशा प्रकारे वयात येणाऱ्या मुलांनाही पाळीबाबत काही माहिती होत नाही. आपला भाऊ, मुले, वडिल, प्रियकर आणि नवरा या सर्वांनाच पाळीबाबत माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.

"जसे आम्ही मेन्स्ट्रूपीडियायचे काम सुरू केले तेव्हापासून हळूहळू आमच्यात या कार्याविषयी एक आत्मविश्वास निर्माण होऊ लागला." - अदिती.

विशेष म्हणजे लोक अगदी मनापासून ही संस्था आपली स्वत:ची आहे असे समजूनच मेन्स्ट्रूपीडियाचे काम करू लागले आणि आपापल्या समाजात पाळीबाबतचा अपवित्रतेचा बट्टा पुसण्यासाठी प्रयत्न करू लागले. अदिती म्हणतात, " या कामासाठी लोकांमधून निधी गोळा करण्याची मोहीम आम्ही सुरू केली. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत गेला. त्यामुळे या कामासाठी पावले उचलण्याबाबतचा आमचा विश्वास अधिक वाढला. हे काम करत असताना लोकांनी आम्हाला आपुलकीने सांगितलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक गाणे, तसेच पाळीबाबतच्या खुळचट समजुतींच्या विरोधात उठणारा प्रत्येक आवाज आम्हाला आमच्या कामासाठी आणखी बळ देत राहतात."