फिटनेस सांभळणारा जगातला पहिला 'सूपर सूट'

एकविसाव्या शतकातील खेळाचा पोशाख

0

सध्याच्या धावपळीच्या युगात आई-वडिल दोघांनाही कामासाठी बाहेर राहावं लागत असल्यानं मुलांचा वावर हा घरातच मर्यादीत राहिला आहे. याचा परिणाम साहजिकच त्यांच्या खेळण्यावरही होतो. कुठे खेळायचं ? या मुलांच्या प्रश्नावर उत्तर आहे, मेडरेट गेम्स. हा आहे जगातला पहिला सुपर सुट. मुलं आणि पालक दोघेही हा सूट घालून खेळू शकतात. त्यामुळे या मुलांचा परस्परांशी संपर्क तर वाढतोच. त्याचबरोबर खेळण्याच्या माध्यमातून मुलांचा शारिरीक विकासही होतो.

या प्रत्येक सूटचे डिझाईन २१ व्या शतकाला साजेसं करण्यात आलंय. आज मुलांचे बाहेर खेळणे-बागडणे जवळपास बंद झालंय. तसंच अनेकांचं खेळणे हे बाग, बेसमेंट, गल्लीतले रस्ते किंवा गच्चीपूरतं मर्यादीत राहिलंय. पण ही सारी ठिकाणं लहान असल्यानं मुलांना नाईलाजाने घरातच खेळावं लागतं.

त्यामुळे मुलांचा स्क्रीन गेम्सकडे कल वाढू लागलाय. मेडरेड गेम्सचे संस्थापक रजत धारीवाल यांनाही नेमकी हीच बाब जाणवली. “आमचा उद्देश मुलांना स्क्रीन गेम्सपासून दूर ठेवणे आहे. सूपर सूट हा भविष्यातला खेळ असेल अशी आम्हाला आशा आहे.” असं मत धारीवाल यांनी सीईएमसमध्ये सूपर सूट लॉन्च करताना व्यक्त केले होते.

“ मैदानावरचे खेळ ( आऊटडोअर गेम्स ) मुलांना नेहमीचआवडतात. शहरीकरण आणि औद्योगिक विकासामुळे त्यांच्या खेळाच्या जागा कमी होत आहेत. तसेच सुरक्षेच्या कारणामुळेही आई-वडिल त्यांना अनेकदा बाहेर खेळू देत नाहीत. मुलांची हीच अडचण ओळखून आम्ही सूपर सूट घेऊन आलो आहोत. यामुळे मुलांना आनंद तर मिळतोच. पण त्याचबरोबर स्वतंत्र राहिल्याचा आनंदही उपभोगता येतो.” असे धारीवाल यांनी स्पष्ट केले.

सूपर सूटच्या दोन गोष्टी खास आहेत. बनियन आणि दास्तान. बनियन शरीरातल्या उष्णतेची नोंद ठेवतेच. त्याशिवाय उष्णतेची प्रकाश आणि ऑडिओ रुपातही जाणीव करुन देते. तर दास्ताने ट्रीगरशी संबंधित आहे. जे खेळात निर्माण होणा-या प्रकाशाची जाणीव करुन देतात.

याशिवाय या सूपर सूटला बाहेरच्या बोट्सचीही मदत मिळते. जी तोडून त्याला नियंत्रितही ठेवता येते. तसंच सूपर सूटच्या एँपमुळे पालक आपल्या मुलांवर लक्षही ठेवू शकतात. या एँपच्या मदतीने मुलं घरात नेमकी कुठे आहेत आणि काय करतायत हे पालकांना समजू शकते. ह्या सर्व गोष्टी ब्लू टूथच्या मदतीनं करता येतात. त्याचबरोबर याच्यामध्ये नव्या पुस्तकांचे डाऊनलोडिंग आणि खेळाला अपग्रेड करण्याची सूविधाही उपलब्ध आहे. ज्यामुळे खेळाडूंचे प्रोफाईल आणि डाटा सांभाळता येतो.

लेखक – हरिश बिश्त

अनुवाद – डी.ओंकार

Related Stories

Stories by Team YS Marathi