अनामिक मुलींची ह्रदयद्रावक कहाणी, कशा त्या वेश्या व्यवसायात ढकलल्या गेल्या!

अनामिक मुलींची ह्रदयद्रावक कहाणी, कशा त्या वेश्या व्यवसायात ढकलल्या गेल्या!

Wednesday February 22, 2017,

5 min Read

काही जणींना सोडविण्यात आले, काहींनी आत्महत्या केल्या. काहींना आशा आहे त्यांना मदत मिळेल. काही सोडविल्या जात आहेत. काहीजणी हरवल्या आहेत आणि त्यांचा थांगपत्ता नाही. पण त्यांचा छळ सुरु आहे, बलात्कार होत आहेत आणि प्रताडना सुरु आहे काहीवेळा खूनही केला जात आहे. भारतातील मानवी तस्करीच्या क्षेत्रात भयावह स्थिती आहे. त्यापैकी ब-याच जणांचा छडा पोलिसांनाही लावता आलेला नाही. वेश्या व्यवसायाची शिकार झालेल्या ब-याच जणींना निराशा आणि मानसिक रोगांची शिकार देखील व्हावे लागते. त्यातून त्यांना भितीच्या सावटाखाली आयुष्यभर खितपत राहावे लागते. 

Image source: Women’s Worldwide Web

Image source: Women’s Worldwide Web


ज्यावेळी कुणी विचारणा करते, “ तुमच्या बाबतीत सर्वात दु:खद काय आहे? आणि का?” कोरावरील ही माहिती भयानक आहे ज्यातून भारतात काय चालले आहे त्याची कल्पना येते.

येथे ती माहिती आहे त्यांनी सांगितलेली:

" मला १२व्या वर्षी पळवून नेण्यात आले आणि १७व्या वयापर्यंत वेश्याव्यवसाय करवून घेण्यात आला. माझ्या घराजवळच्या बागेतून माझ्या १२व्या वाढदिवसानंतर मला पळविण्यात आले, ती शेवटची बर्थ डे पार्टी ठरली. मला जाग आली त्यावेळी मी ट्रक सारख्या वाहनात होते, माझे डोळे, हात आणि पाय बांधले होते. तोंडात बोळा कोंबला होता. मला आठवते की त्या वाहनाच्या भिंतीना आदळत थंडीत मला घेवून चालले होते. त्यानंतर मला पुन्हा ग्लानी आली आणि मी अंधा-या खोलीत होते. काही महिलांनी मला स्वच्छ केले आणि खावू घातले. त्यांनी माझ्या तोंडावर उशी दाबली आणि प्रत्येकवेळी मी मदतीसाठी धावा केला. नंतर मला समजले की, त्यांना मालकाकडून मार पडू नये म्हणून त्या असे करत होत्या.मी तरुण होते म्हणून मला डिलक्स खोल्यांतून ठेवण्यात आले.

माझे तारुण्य मोठ्या बंगल्यातील शेखला विकण्यात आले होते, त्याने माझ्यावर अनेक आठवडे बलात्कार केला. त्याच्या सोबत असणा-या सर्वानीच माझ्यावर आळीपाळीने बलात्कार केला. त्यांच्या भोगांसाठीच ते मला डिलक्स रुम मध्ये झोपवित होते. पुरुष येत आणि त्यांना हवे ते करून जात होते. काहीवेळा मी संतापाने झोपू शकत नसे, काहीवेळा शाररिक दुखण्याने झोप येत नसे. काहीवेळा मला आत आलेली माणसे जागे करत असत. काहीवेळा डॉक्टर येवून माझ्या गुप्तांगाची तपासणी करत असत. मला हे आठवते की त्या नंतर मला कुमारी म्हणून पुन्हा नव्या शेखच्या बंगल्यात पाठवले जात असे. माझ्यात माणूसपण केवळ शिल्लक राहिले होते ते मला न्हाऊ घालण्यासाठी आणि खावू घालण्यासाठी येणा-या महिलेमुळेच. त्यांना माझी दया येत असे ज्यावेळी माझी स्थिती त्या बघत. त्या काही वेळा अश्रू ढाळत असत. त्याने मला जाणवत असे की माझ्याशी जे होते आहे ते चूक होत आहे. मी काही पशू नाही. माझे दु:ख खरेखुरे आहे आणि त्या किमानपक्षी हे जाणत होत्या.

एक दिवस मला नव्या खोलीत जाग आली. मी अनेक तास रडले. किंवा आठवडे किंवा महिने. . . .मला माझ्या खोलीत पुन्हा डांबण्यात आले. माझ्या बाजुला त्या महिलांशिवाय मायेने चेह-यावर माणूस म्हणून हात फिरवणारे कुणीच नव्हते. या नव्या खोलीत नव्या मालकासोबत, मला चांगले कपडे घालण्यास शिकवण्यात आले. मेक अप आणि नाच करण्यास सांगण्यात आले. मला अनेक गोष्टी शिकविण्यात आल्या ज्या माझ्या मालकाला सेवा म्हणून हव्या होत्या. येथे शेख ने आंत येणे थांबविले होते. येथे साधारण कपड्यातील पुरुष येत होते. मला यंत्रमानव असल्याप्रमाणे वाटत होते. मला काहीच भावना नव्हत्या, मला हे थांबविता येत नव्हते किंवा बंड करता येत नव्हते, मी केवळ आदेश पाळत होते.

एक दिवस खाकी साडीतल्या महिलेने मला ओढले. तीने मला हलवून माझे नाव विचारले. मला समजत नव्हते काय होत होते. मला माहित नव्हते मला काय हाक मारतात. मी रडायला सुरुवात केली आणि मला पळवून नेल्यांनतर पहिल्यांदाच एक सुती कपड्यातील महिला आली आणि मला आलिंगन दिले. त्यांनी मला सांगितले की, त्या मला वाचविण्यासाठी आल्या आहेत. मला इतर महिलांसोबत व्हँन मध्ये बसविण्यात आले आणि पोलिस ठाण्यात नेण्यात आले. मला जाणवले की मी मुंबईत होते. नंतर मला सांगण्यात आले की मला पाच वर्षांपूर्वी पळवून नेण्यात आले होते आणि हैद्राबाद मध्ये ठेवण्यात आले होते.

मला सुधारगृहात पाठविण्यात आले. मला मानसोपचार तज्ञाशी बोलायला सांगण्यात आले. आणि परिक्षाही घेतल्या गेल्या. त्या काळात मला डुप्लेक्स रुम शिवाय एकटे झोपण्यास शिकवण्यात आले. माझ्या जीवनात पोकळी निर्माण झाली, मला अस्वस्थ वाटत असे कारण अनोळखी पुरुष अनेक दिवस मला भेटले नाहीत. मी माझे नवे असुरक्षीत जीवन जगण्याचा प्रयत्न करत होते. मला साधारण आणि प्रतिष्ठेचे जीवन जगता येत नव्हते. मला लक्षात आले की, माझे अनेकदा गर्भपात करण्यात आले होते. त्यामुळे आता मी मुलाला जन्म देण्यास सक्षम राहिले नव्हते.

माझी हाडे एकदा ग्राहकांने मोडली होती त्यामुळे मला अपंगत्व आले होते जे बरे होवू शकत नव्हते. डॉक्टरांच्या मदतीने, मी माझ्या लहानपणीचा पत्ता सांगू शकले. जेंव्हा माझ्या सेवाभावी संस्थेच्या लोकांनी माझ्या घरच्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला तेंव्हा समजले की माझी आई मरण पावली होती. मी हरवल्यानंतर तीने अन्न-पाणी सोडले होते. त्यानंतर माझ्या वडिलांनी आत्महत्या केली होती.

माझ्या सेवाभावी संस्थेने माझ्यासाठी दिल्लीत प्रायोजक शोधले, मी येथे संगणक आणि विदेशी भाषा शिक्षणासाठी आले आणि येथेच राहात आहे. आता मी संगणक केंद्रात शिक्षिका आहे, मी भाड्याच्या खोलीत दोन मुलींसोबत राहाते, माझा प्रियकर आहे जो माझ्यावर प्रेम करतो आणि आदर करतो त्याला माझा भूतकाळ माहिती आहे पण त्याच्या तपशिलात जाताना तो अस्वस्थ होतो. मला कधीतरी आजही झोप येत नाही. मला पुन्हा मागे गेल्याचे भास होतात. मी मध्यरात्रीच त्याला फोन करते आणि तो मला शांत करतो. तो मला सुरक्षित असल्याची हमी देतो.

तो जातीवान पंजाबी आहे त्यामुळे तो मला हसवतो, नाचवितो, प्रणयाची गाणी म्हणतो, मला फिरायला नेतो, आणि माझ्यासाठी चविष्ट मटण बनवितो. तो मला व्यायाम करण्यासाठी आग्रह करतो, कारण मागच्या छळाच्या काळात माझे शरीर दुबळे झाले आहे. तो साधारण मध्यमवर्गिय घरातील आहे त्यामुळे तो माझा भूतकाळ लोकांना सांगत नाही. मला ते समजते पण मला लोकांशी खोटे बोलताना खूप त्रास होतो.

शेवटी प्रॉमिस डे ला त्याने मला मागणी घातली, मी होकार दिला नाही. मी त्याला शोभत नव्हते. तो दिसायला खूप छान होता. प्रामाणिक, सुशिक्षित माझ्याशी मृदूपणे वागणारा. मी तुटलेली, दुषित झालेली आणि कुणाची बायको म्हणून लायक नसलेली होते, त्याने सांगितले की त्याची जबरद्स्ती नाही आणि त्याची माझ्यासाठी वाट पहायची तयारी आहे. आपण मुल दत्तक घेवू आणि माझ्या भुतकाळाचा त्याला काहीच आक्षेप नाही. पण मी त्याची वाट पहाते की त्याने माझ्या पेक्षा छान दुसरी मुलगी पहावी. त्याच्या जीवनात मला ओझे म्हणून रहायचे नाही. हे माझे खोल दु:खी गुपीत आहे,सर्वाचे आभार माझ्यासाठी वेळ काढून वाचल्याबद्दल.”

ती सुटून आल्यानंतरही तिच्या पालकांना भेटू शकली नाही, तिच्या सांत्वनासाठी कुणीही नव्हते. ती केवळ जगायचे म्हणून जगत होती. तिचा भूतकाळ वेगळा होताच पण तिचा वर्तमान त्याहून वेगळा होता. ज्यात तिच्या भविष्याचा साधा विचारही ती करू शकत नव्हती. 

ही ह्रदयद्रावक कहाणी दाखवते की, भारतात अनेक मुली असुरक्षित आहेत, आणि या स्थितीला बदलण्यासाठी आपण सारे काय करतो आहोत? (सौजन्य - थिंक चेंज इंडिया )