पैश्यांसाठी झाडू-पोछा करणाऱ्या इंदुमतीताई आज इतर महिलांना बनवत आहेत आत्मनिर्भर

0

अनेकदा लोक स्वतःचा त्रास आणि समस्येतून सुटल्यानंतर, तशीच समस्या दुस-यांवर उद्भवल्यानंतर  त्यांना त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखविण्याचे सोडून, त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र समाजात असेही लोक आहेत, जे दुस-यांच्या आनंदात आनंद आणि दु:खात दु:ख मानतात. दुस-यांच्या समस्येला आपले समजून त्याला दूर करण्यासाठी प्रयत्न करतात. ही कहाणी आहे, इंदुमती ताई यांची, ज्यांनी आपल्या आयुष्यात आर्थिक तंगीचे दिवस पाहिले आहेत, मात्र त्यातून निघाल्यानंतर त्यांनी गेलेल्या दिवसांना विसरण्याचे सोडून, नेहमी त्यांना जिवंत ठेवले आहे. त्या त्यांच्या भागातील अशा अनेक महिलांचा सहारा आहेत, ज्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. तसेच त्या महिलांना केवळ घरगुती कामकाज मिळवून देण्यासाठी कामच करत नाहीत, तर त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी त्यांना लहान- मोठे उद्योग करण्यासाठी देखील प्रेरित  करतात. त्यांच्या प्रयत्नांनी आज अनेक महिलांचे जीवन सुखमय झाले आहे.

भोपाळ मध्ये दशहरा मैदानाजवळ वाणगंगा भागात ६५ वर्षीय इंदुमती ताई यांचे घर आहे. त्यांच्या घराजवळ अनेक झोपड्या आहेत, जेथे हजारोंच्या संख्येने दैनिक मजूरी करणा-या कामगारांचे कुटुंब राहतात. येथील पुरुष मजूरी करतात आणि महिला जवळच्या भागातील घरात साफ- सफाईचे काम करतात. घरातील पुरुषांना जेव्हा अनेक दिवस काम मिळत नाही, तर अशावेळी महिला घर चालवितात. पैशांच्या तंगीमुळे त्यांचे जीवन खूप कठीण होते. घरात त्यांना एखाद्या मोठ्या कामासाठी त्यांना बँकांकडून कर्ज मिळत नाही आणि सावकारदेखील अशावेळी मदत करत नाहीत. सावकारांकडून त्यांना व्याजावर कर्ज देखील मिळाले तरी, ते चुकविणे खूप कठीण होते. अशातच या लोकांना केवळ इंदुमती ताईच मदत करतात. 

लघु उद्योगातून मिळते व्याज रहित कर्ज

इंदुमती ताई लघु उद्योग सहायता समूह चालवितात. त्यांच्या समुहात जवळपास २००महिला सामील आहेत. महिला आपल्या छोटी बचत ताईकडे जमा करतात. या जमा पुंजीतून गरजू महिलांना व्याजाशिवाय कर्ज उपलब्ध करून दिले जाते. कर्ज घेतल्यानंतर महिला हप्त्यांच्या स्वरुपात भरतात. या पैशातून घरात मोठ्या कामांव्यतिरिक्त महिला लहान मोठा व्यवसाय देखील करतात. भोपाळमध्ये वसतिगृहात राहून शिक्षण करणा-या आणि काम करणा-या लोकांसाठी अनेक महिला जेवणाचा डबा करून लहान व्यवसाय करतात. लघु उद्योगातून कर्ज घेऊन आतापर्यंत अनेक महिला आत्मनिर्भर बनल्या आहेत. त्यांच्या घरची परिस्थिती देखील सुधारली आहे. त्यांची मुले आता शाळेत शिकू लागले आहेत. घरात पैशांच्या तंगीमुळे कुठले भांडण होत नाही. त्यांचे जीवन सुखमय झाले आहे. 

गरजूंना देतात काम

शहरात जेथे घरगुती सहायकाची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मोठमोठ्या एजंसी जेथे पैसे घेतात, तेथेच दुसरीकडे इंदूमती ताई हे काम केवळ गरजूंना मदत म्हणून करतात. त्यांच्याकडे त्या भागातील तशाच अनेक महिला घरगुती सहायकांची माहिती असते, ज्यांना कामाचा शोध असेल. इमारतीत राहणारे लोक देखील इंदुमती ताई यांच्या सल्ल्याने ठेवलेल्या घरगुती सहायकावर जास्त विश्वास करतात. त्या व्यतिरिक्त विवाह सोहळा किंवा अन्य आयोजनात घरगुती सहायकांच्या गरजेवर देखील इंदुमती ताई घरगुती महिला सहायकांच्या सेवा उपलब्ध करून महिलांना काम करण्याची संधी देतात.

अशी झाली कामाची सुरुवात

ही बाब केवळ दहा वर्षा पूर्वीची आहे. जवळील झोपड्यांमधील दोन महिला इंदुमती यांच्याकडे पैसे उधार मागण्यासाठी आल्या होत्या. एका महिलेला पापड बनविण्याचे काम सुरु करण्यासाठी पैशांची गरज होती, तर दुस-या महिलेला आपल्या मुलाच्या शाळेची फी भरायची होती. त्या दोन महिलांना त्यांच्या ओळखीच्या लोकांनी पैसे देण्याचे नाकारले. इंदुमती ताई यांनी तात्कालिक स्वरुपात त्या दोन महिलांना उधार देऊन त्यांच्या गरजा तर पूर्ण केल्या, मात्र तेव्हापासून या समस्येचे स्थायी स्वरुपात निराकरण शोधण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु झाले. पहिले तर, महिलांनी आपल्या बचतीचे पैसे त्यांच्याकडे जमा करण्यासाठी नकार दिला. खूप समजाविल्यानंतर काही महिलांना स्वयंसहायता समूहात सामील केले आहे. अनेकदा ताई यांनी महिलांकडून स्वतः पैसे जमा केले. नंतर महिला येथे आपले पैसे जमा करायला लागले. जेव्हा त्यांना याचा फायदा मिळाला, तेव्हा त्या भागातील महिला यात सामील होत गेल्या आणि हा समूह वाढत गेला. आज या समुहात जवळपास दोनशे महिला आहेत आणि समुहाची वार्षिक उलाढाल लाखो रुपयांची आहे.

इंदुमतीताई आज आपल्या भागातील काही महिलांसाठी ताई म्हणजेच मोठ्या बहीण बनल्या आहेत. हे त्यांच्या इतरांच्याप्रती असलेल्या करुणामयी व्यवहारामुळे शक्य झाले आहे. त्या प्रत्येकाचे दु:ख आपले मानत, कारण त्यांनी स्वतःच्या आयुष्यात देखील खूप संघर्ष केला आहे. त्या सांगतात की, “या महिलांचे आणि माझे दु:खाचे नाते आहे. ज्या समस्येतून आणि कमतरतेतून आज त्या जात आहेत, मी देखील त्यातून गेली आहे. त्यामुळे त्यांच्या चिंता मला समजतात. त्यांच्या समस्या मला स्वतःच्या समस्या वाटतात.” 

स्वतःच्या परिस्थितीमुळे मिळाली दुस-यांना आत्मनिर्भर करण्याची प्रेरणा

इंदुमती यांचा विवाह केवळ १३ वर्षाच्या असतानाच झाला होता. त्या घरातील सर्वात मोठ्या सून होत्या. पति सुरेश पटेल यांच्याकडे एखादा चांगला रोजगार नव्हता. आपल्या मुलांचे पालन पोषण करण्यासोबतच त्यांच्या डोक्यावर लहान लहान दिरांच्या पालन पोषणाची जबाबदारी होती. परिस्थितीने न घाबरता, इंदुमती यांनी घरात झाडू मारणे, लादी पुसणे आणि जेवण बनविण्याचे काम केले. दीर आणि मुलांना साक्षर करून आपल्या पायावर उभे केले. आज त्यांच्या घरातील सर्व लोक सन्मानकारक नोकरी करत आहेत. मात्र वर्ष २००५ मध्ये त्यांच्या जीवनात पुन्हा एकदा कलाटणी आली होती. त्या गंभीररित्या आजारी पडल्या. डॉक्टरांनी उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च असल्याचे सांगितले. इतके पैसे एकत्र जमा करणे त्यांच्यासाठी शक्य नव्हते. त्यांनी आपल्या नातेवाईकांकडून कर्ज मागितले, मात्र सर्वांनी हात वर केले. मजबुरीने त्यांना खूप मेहनतीने तयार केलेले लहानशे घर विकावे लागले. मात्र या घटनेने इंदुमती यांना एका सामान्य महिलेची विशेष महिला बनविले होते.

आयुष्याने त्यांना जगणे शिकविले. विपरीत परिस्थितीत झगडणे आणि झगडून पुढे वाढणे शिकले. दुस-यांच्या तुलनेत त्यांची सहानुभूती बंद झाली. आता त्यांच्या विचार करण्याच्या आणि समजण्याच्या दृष्टीला पहिलेपेक्षा बदलले होते. त्यांना आता समजले होते की, व्यक्ती सर्वात जास्त कमजोर आणि लाचार तेव्हाच होतो, जेव्हा त्यांच्याकडे पैसे नसतात. त्यानंतर त्यांनी स्वतःसोबतच दुस-यांना देखील आर्थिक संकटातून काढण्याचा संकल्प केला, ज्याचा परिणाम आज संपूर्ण समाजासमोर आहे.

लेखक : हुसैन तबीश
अनुवाद : किशोर आपटे