डान्ससाठी काहीही करेल “ टेरेंस लुईस” !

आपल्याच मनाचे ऐकले, छंदातून घडविली कारकीर्द … . . मुलांना नृत्याचे तंत्र शिकवत आहेत टेरंस लुईस.. . . नृत्याला केवळ छंद म्हणून नाहीतर मुख्य प्रवाहातील कारकिर्द म्हणून घडवू पाहतात टेरेंस.

डान्ससाठी काहीही करेल “ टेरेंस लुईस” !

Friday May 13, 2016,

5 min Read

बुगीवुगीने दिवाणखान्यात नर्तकांना एक संधी दिली की ते त्यांच्यातील नैपुण्य जगाला दाखवतील, तर डान्स इंडिया डान्स, नच बलिये आणि झलक दिखला जा सारख्या कार्यक्रमांनी हा प्रघात आणखी पुढे नेण्याचे काम केले आणि घरा-घरात पोहोचविले. या कार्यक्रमांचे वैशिष्ट्य हे राहिले की, या मध्ये भाग घेणारे स्पर्धक आणि पंच सारेच खूप प्रसिध्दी आणि जनतेचे प्रेम मिळवून गेले. प्रसिध्द कोरिओग्राफर टेरेंस लुईस डिआयडी, नच बलिये, हिंदुस्थान के हुनरबाज आणि चक धुम धुम या सारख्या कार्यक्रमातून पंच म्हणून चमकले. त्यांचे वैशिष्ट्य हे आहे की, ते स्पर्धकांना खूपच प्रोत्साहित करतात आणि शेरेबाजी तसेच मदत करत त्यांच्यातील कौशल्य व्यक्त करून घेतात. त्यामुळेच आज त्यांची वेगळी ओळख आहे.

टेरेंस लुईस मायक्रोबायलॉजिस्ट (सुक्ष्मजैववैज्ञानिक) आहेत तसेच त्यांनी हॉटेल व्यवस्थापन या विषयात देखील अभ्यास केला आहे. असे असूनही नृत्याची आवड असल्यानेच त्यांनी परंपरागत व्यवसाय न करता आपल्या मनाचे ऐकले आणि स्वत:साठी ते काम निवडले ज्यात त्यांचे मन रमत असते. त्यामुळे सुरुवातीला त्यांना त्यांच्या परिवाराची नाराजी सहन करावी लागली पण टेरेंस यांना हे माहित होते की, त्यांनी स्वत:साठी योग्य तोच रस्ता निवडला आहे. त्यांची मेहनत, निष्ठा आणि समर्पण यांनी त्यांना आज आपल्या क्षेत्रात अव्वल स्थान मिळाले आहे.

image


टेरेंस मानतात की, जीवनात आपल्यासाठी तेच काम निवडावे जे आपल्याला करावेसे वाटते आणि त्यासाठी मग आपले सर्वस्व पणाला लावा. जे काम नाही पटत ते करु नका.

टेरेंस यांना लहानपणापासूनच नृत्याची खुप आवड होती. पण त्यासाठी अधिकृत शिक्षण वयाच्या १४व्या वर्षी सुरू झाले. एकदा त्यांनी मुंबईत आंतरशालेय नृत्य स्पर्धेत भाग घेतला तेंव्हा तेथे उपस्थित पंच परवेज शेट्टी यांनी त्यांना पाहिले आणि त्यांच्यातील गुणांची पारख केली. त्या स्पर्धेत टेरेंस यांना पहिला पुरस्कार मिळाला आणि त्यासोबतच नृत्य शिकण्याची शिष्यवृत्ती देखील! जेंव्हा जँज बँलेट क्लासेस मध्ये टेरेंस गेले तेंव्हा तेथील शिक्षकही त्यांचे नृत्य पाहून खूश झाले. कारण ते तन्मयतेने मोहक नृत्य करत होते. टेरेंस यांचे मन इथे असे लागले की ते सतत नृत्य करण्याबाबतच येथे विचार करत राहिले.

परवेज शेट्टी यांच्या नंतर अमेरिकन मॉडर्न कन्टेम्पररी शिक्षक जॉन फ्रिमेन यांचा टेरेंस यांच्यावर विशेष प्रभाव राहिला. हा सन १९९६-९७चा काळ होता ज्यावेळी फ्रिमेन त्यांना हॉटन स्टाईल शिकवण्यासाठी आले होते. त्यापूर्वी टेरेंस यांना या नृत्यप्रकाराची जराही कल्पना नव्हती. टेरेंस त्यांच्या स्टाईलने खूपच प्रभावित झाले. त्यानंतर त्यांनी स्वत:ला नृत्यामध्ये समर्पित केले आणि त्यात हरवून गेले.

image


मग टेरेंस यांचे पुढचे नृत्याचे शिक्षण न्यूयॉर्कमधील एलबिन एली शाळेत झाले. ज्यात त्यांनी उन्हाळी प्राथमिकवर्गात भाग घेतला. याशिवाय त्यांचे जे अन्य विदेशी शिक्षक राहिले, ज्यांनी त्यांना पारंगत केले त्यात सुजैन लिंकी आणि नाकुला सोमाना होते.

टेरेंस यांनी आपली कारकिर्द एक नृत्यशिक्षक म्हणून केली. त्यानंतर त्यांनी सेलिब्रेटींना शिकवले. ज्यात माधुरी दीक्षित आणि गौरी खान सारख्यांचा समावेश होता. हळुहळू त्यांना यश मिळत गेले आणि ते प्रसिध्द झाले. त्यावेळी त्यांना एलिक पद्मी यांनी बोलावले. एलिक यांनी टेरेंस यांना एक जाहिरात कोरिओग्राफ करण्यास संधी दिली. त्यासाठी टेरेंस यांना काही नर्तक हवे होते. त्यासाठी त्यानी वेगवेगळ्या महाविद्यालयात स्पर्धा घेतल्या येथूनच पाया घातला गेला त्यांच्या नृत्य संस्थेचा. ज्याचे नांव त्यांनी टेरेंस लुईस कन्टेम्परेरी नृत्यसंस्था असे ठेवले. अशा प्रकारे टेरेंस यांनी सन२००० मध्ये स्वत:ची संस्था सुरू केली. या कंपनीच्या माध्यामातून त्यांचा उद्देश नृत्याला मुख्य प्रवाहात कारकिर्द म्हणून स्थापित करणे हा आहे. परदेशात नृत्य करणे ही कला एक कारकिर्द असते पण भारतात त्याला केवळ छंद म्हणून पाहिले जाते. आणि खूप काही प्रतिष्ठेचेही समजत नाहीत. पण लोकांचे विचार हळूहळू बदलत आहेत. हाच विचार बदलणे टेरेंस यांचे जीवितकार्य झाले आहे. त्यांच्या अभ्यासक्रमात भारतीय नृत्य पध्दतीला कंटेम्पररी पध्दतीसोबत जोडून इंडो कंटेम्पररी पध्दत तयार करण्यात आली आहे. ही पध्दत त्यांची सर्वात महत्वाची पध्दत आहे. आजकाल आपण वेगवेगळ्या नृत्यस्पर्धांमध्ये या पध्दतीला पाहू शकतो. ती लोकांना पसंत देखील पडते आहे. संस्था वेगवेगळ्या प्रकारे नृत्यप्रकार शिकणा-या मुलांसाठी वेगळे अभ्यासक्रमही चालविते. टेरेंस सांगतात की, त्यांच्या प्रत्येक व्यवसायाने त्यांना पुढे जाण्यास आणि उद्यमी होण्यास हातभार लावला आहे. कारण प्रत्येक प्रकल्पामध्ये वेगळे लक्ष्य असते आणि त्यांना सा-याचे समायोजन करायचे असते.

image


टेरेंस यांचे नांव आज केवळ नृत्यशिक्षक म्हणून परिचित नाही. ते देशातील महत्वाचे कोरिओग्राफर सुध्दा आहेत.नर्तक आहेत. ते भारतीय दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमांचे प्रसिध्द पंचसु्ध्दा आहेत. पडद्यामागे ते स्पर्धकांचे सल्लागार म्हणूनही भूमिका बजावतात त्याचवेळी मंचावरील कलाकाराना पंच म्हणूनही सल्ला देताना दिसतात. ते आपली संस्थाही चालवतात. त्याशिवाय मुंबईबाहेर नृत्याची शिबीरेही भरवितात. जेणेकरून मुंबईबाहेरच्या विद्यार्थ्यांनाही नृत्य शिकण्याची संधी मिळावी. याचा अर्थ आता टेरेंस एकाचवेळी अनेक भूमिकांमध्ये दिसू लागले आहेत.

जरी टेरेंस यांना एक शिस्तप्रिय नर्तक आणि चांगले शिक्षक म्हणून मानले जाते तरीही ते स्वत:ला आजही एक विद्यार्थीच असल्याचे मानतात. ते म्हणतात की, “ मी नेहमीच विद्यार्थी होऊन शिकणे पसंत करतो” ते आपल्या संघाला आपल्या यशाचा आधार मानतात. सतत काहीतरी नवे करण्याच्या इच्छा हेच आपल्या यशाचे कारण आहे असे ते मानतात. आणि जीवनात शिस्त आणि अभ्यास या दोन अश्या गोष्टी आहेत ज्यांनी त्यांना कधी थांबू दिले नाही. आज त्यांची संस्था सतत नव्या यशाच्या कमानी उभारते आहे.

टेरेंस नव्या लोकांना सल्ला देतात की, त्यांनी आपल्या कामात प्राविण्य मिळवावे. बाजारात काय चालले आहे यावर नजर ठेवावी. आपला दृष्टिकोन स्वच्छ ठेवावा आणि प्रयत्नरत राहावे उद्देश असा असावा की जेंव्हा आपला संघ उभा करू तेंव्हा लोकांची निवड नीट पारखून करावी.

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा.


आता वाचा :

आपल्या संगीताने नवी चेतना निर्माण करण्याच्या प्रयत्नात सुरज निर्वाण!

नृत्यदिग्दर्शनामध्ये माझ्यातला परफॉर्मर आणि डान्स टिचर नेहमीच वरचढ ठरतो - फुलवा खामकर 

पडदयावरच्या व्यक्तिरेखांना प्रत्यक्ष कलाकारांशी जोडण्याचा प्रयत्न -चैत्राली डोंगरे

लेखक : आशुतोष खंतवाल

अनुवाद : किशोर आपटे