भेटा रेखा मिश्रा यांना, अशा पोलिस अधिकारी ज्यांनी एकटीने ४३४ मुलांची सुटका केली!

भेटा रेखा मिश्रा यांना, अशा पोलिस अधिकारी ज्यांनी एकटीने ४३४ मुलांची सुटका केली!

Friday April 21, 2017,

2 min Read

रेखा मिश्रा रेल्वे पोलिसांत २०१४ मध्ये दाखल झाल्या, विनम्र आणि आपल्या कार्यात समर्पित. त्यांनी एकटीने छत्रपती शिवाजी टर्मिनस सीएसटी रेल्वे स्थानकावर मागील वर्षी ४३४ मुलांची सुटका करण्यास मदत केली. जवळपास रेल्वे पोलिसांनी सुटका केलेल्या मागील वर्षातील मुलांच्या निम्मी ही संख्या आहे.


फोटो सौजन्य - द हिंदू

फोटो सौजन्य - द हिंदू


संपूर्णत: लष्करी पार्श्वभूमी असलेल्या कुटूंबातून आलेल्या रेखा म्हणतात की त्यांना नेहमीच मुलांची काळजी घ्यायची शिकवण घरातून मिळाली. त्यांनी सुटका केलेल्या मुलांपैकी बहुतांश मुले यूपी आणि बिहार मधील होती आणि त्यांचे वयमान १३-१६च्या दरम्यान होते. कुणाला मदत हवी आहे हे कसे समजले याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, जी पळून आलेली मुले असतात ती बहुदा शेवटच्या स्थानकामध्येच येतात. “ लहान बालके - मुले आणि मुली – किंवा तरूण मुली तुम्ही त्यांचे निरिक्षण करून सांगू शकता की त्यांच्यात काही तरी वेगळेपणा आहे, आणि कुणाच्या तरी मदतीची ते वाट पाहात आहेत”. अशा मुलांच्या त्या कायम शोधात असतात. त्यांचे मत आहे की याबाबत प्राधान्याने काम केले पाहिजे जे त्यांच्या अधिका-याकडून त्यांना कळवले जाते.

“ मुलांनी तुमच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, ज्यावेळी कुणी सहजपणे घरातून पळून आलेली असतात. त्यापैकी अनेकांना लैंगिक छळाचा सामना करावा लागलेला असतो. त्यातील कित्येकांना पुन्हा घरी जायचेच नसते. त्यामुळे त्यांना काळजीपूर्वक हाताळावे लागते”.

असे असले तरी ४३४ मुलांपैकी, केवळ २८ मुलांच्या पालकांचा ठावठिकाणा शोधता आला आहे. बाकीच्या मुलांचा ताबा बालक कल्याण समितीला देण्यात आला आहे. त्यांच्याकडे अशा मुलांची काळजी घेण्याचे प्रशिक्षण दिलेली माणसे असतात, त्यांच्या मनात काय चालले आहे ते ओळखून ते त्यांचा सांभाळ करतात. संतोषी ढेकळे या चमूच्या सदस्यांपैकीच एक आहेत ज्या कम्यूनिटी कमिटेड डेव्हलपमेंट ट्रस्ट चे काम करतात, त्या म्हणाल्या की, “ वैद्यकीय तपासानंतर, काही प्रक्रिया जसे की, स्टेशन मास्तर यांच्या कार्यालयातील माहिती भरून देणे इत्यादी पूर्ण केली जाते आणि आम्ही मुलांना तपासाकरिता ताब्यात घेतो. आम्ही त्यांच्या पालकांचा शोध घ्यायचा प्रयत्न करतो, जेणे करुन त्यांना पुन्हा त्यांच्या घरी जाता यावे. किंवा आम्ही त्यांना रिमांड होम (सुधारगृह) मानखूर्द येथे किंवा डोंगरी येथे पाठवतो”

रेखा यांनी आता पर्यंत शंभर मुलांची सुटका केली आहे, जेंव्हापासून हे वर्ष सुरू झाले आहे. त्यांच्यामते मुलांची ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे कारण आता सुट्या सुरू झाल्या आहेत. त्यावेळी त्यांना मुलांसोबत तोवर राहावे लागते जोवर त्यांच्या बाबत काही कृती केली जात नाही. कारण त्यांच्यामते ही त्यांची जबाबदारीच आहे.

रेखा या ऍथेलिट देखील आहेत ज्यानी त्यांच्या विभागासाठी राज्यस्तरीय स्पर्धामध्ये भाग घेतला आहे. वरिष्ठ अधिकारी म्हणाले की त्यांनी रेखा यांच्या कामासाठी त्यांना पुरस्कार मिळावा अशी शिफारस केली आहे. (थिंक चेंज इंडिया)

    Share on
    close