भारतातील सर्वात तरुण सामाजिक उद्यमी शरद सागर यांना बराक ओबामांचे व्हाईट हाउस मध्ये आमंत्रण

1

फोर्ब्सच्या ३० वर्षाखालील ३० यशस्वी व्यक्तींच्या यादीत पटण्याचे २४ वर्षीय सामाजिक उद्यमी शरद विवेक सागर यांचा समावेश करण्यात आला. शरद यांना अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी आमंत्रित केले आहे. व्हाइट हाउस मध्ये प्रथमच आयोजित होणाऱ्या फेस्टिवल ऑफ़ आइडियाज़मध्ये डेक्सटेरिटी ग्लोबलचे संस्थापक सीईओ शरद सागर यांना जगातल्या निवडक प्रभावशाली सामाजिक उद्यमी त्याचबरोबर युवा नेतृत्वाबरोबर सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे.

“ ओबामा ज्यावर्षी राष्ट्रपती म्हणून निवडून आले, त्याच वर्षी डेक्सटेरिटीची स्थापना झाली. ओबामांचा माझ्यावर सर्वाधिक प्रभाव आहे. माझ्यासाठी ही गौरवाची गोष्ट आहे की, मला व्हाइट हाउस मध्ये विशेष सभेसाठी बोलावले आहे.” शरद सांगतात.

मे २०१६ मध्ये टफ्ट्स यूनिवर्सिटीच्या स्थानिक समारंभात भाषण देणारे पहिले भारतीय असणारे शरद यांना पुढील शिक्षणासाठी हॉर्वर्ड यूनिवर्सिटीने आमंत्रित केले होते, मात्र त्यांचे आमंत्रण नाकारत ते बिहारमध्ये शैक्षणिक क्षेत्रात विकास साधण्याच्या दृष्टीने निघून आले. डेक्सटेरिटी या संस्थेच्या डी2सी प्रोजेक्टच्या माध्यमातून बिहारच्या प्रतिभाशाली मुलांना विश्वस्तरीय शिक्षण संस्थानांमध्ये प्रवेश परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी शरद यांनी पुढाकार घेतला आहे.  बिहारला आल्यानंतर तीन महिन्याच्या आताच त्यांना ओबामांचे बोलावणे आले. ओबामा यांनी व्हाइट हाउस मध्ये जागतिक स्तरावरील युवा नेतृत्वासाठी प्रथमच विशेष सम्मेलन “साउथ बाय साउथ लॉन: व्हाइट हाउस फेस्टिवल ऑफ़ आइडियाज़, आर्ट आणि अॅक्शन” चे आयोजन करण्याचे ठरवले. या संमेलनात उद्यमशीलता तसेच नाविन्यपूर्ण विचार किवा संकल्पना याविषयीचे आपले विचार मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. व्हाइट हाउस कडून जगातल्या हजारो युवा नेतृत्वामधून केवळ काही निवडकच युवकांना आमंत्रण पाठविले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार शरद एकमेव भारतीय आहे, ज्यांना हा बहुमान मिळाला आहे.

पटनाचे श्रीकृष्णापुरीचे निवासी बिमल कांत प्रसाद यांचा मुलगा शरद १६ वर्षाचा असतानाच त्याने २००८मध्ये डेक्सटेरिटी ग्लोबलची स्थापना केली. डेक्सटेरिटी दरवर्षी भारत तसेच अन्य दक्षिण आशियाई देशातल्या १२ लाख मुलांपर्यंत शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध करून देत आहे. जानेवारी २०१६मध्ये शरद बिहारचे पहिले उद्यमी बनले ज्यांचा फोर्ब्सच्या ३० वर्षाखालील ३० यशस्वी व्यक्तींच्या यादीत समावेश करण्यात आला. सर्वात प्रभावशाली युवा उद्यामिंच्या यादीतदेखील शरद भारतात सर्वात अव्वलस्थानी आहे. २०१३मध्ये रॉकेफेलर फाउंडेशनच्या ‘100 नेक्स्ट सेंचुरी इनोवेटर्स’ च्या यादीमध्ये देखील त्यांचा समावेश करण्यात आला. अमेरिकेत अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेल्या शरद यांनी तिथल्या नामवंत हार्वर्ड, टफ्ट्स, आयआयएम, आयआयटी विश्वविद्यालयात भाषण केले आहे. 

सौजन्य : थिंक चेंज इंडिया

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा.