पंतप्रधानांकडून प्रेरित होऊन २७ वर्षीय नरपत सिंह आढा यांनी केवळ दीड महिन्यात बनविली ५६ शौचालय !

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या तरुणांना देशाचे मजबूत आधार असल्याचे सांगतात, तेच तरूण बदल्यात पंतप्रधानांच्या योजनांमध्ये मन लावून लक्ष देत आहेत. त्याचे सर्वात मोठे उदाहरण स्वच्छ भारत अभियान हे आहे. तरुण या अभियानामार्फत दूर अंतरावरील भागाचे चित्र पालटत आहेत. ही कहाणी आहे २७ वर्षाच्या तरुणाची, ज्याने लोकशाही प्रणालीच्या सर्वात लहान एककावर काम करूनही, असे काही करून दाखविले, ज्यामुळे मोठ्यांना देखील एक उदाहरण मिळाले.

वर्ष २०१५च्या फेब्रुवारी महिन्यात पंचायतीच्या निवडणुका झाल्या. राजस्थानच्या सिरोही जिल्ह्याच्या उड ग्रामपंचायतचे एक तरुण नरपत सिंह आढा यांनी देखील निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला. निर्णय देखील लोकशाहीच्या त्या गटाचा ज्याचे जन प्रतिनिधी सर्वात लहान क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहे. ग्रामपंचायतच्या एका प्रभागाच्या प्रतिनिधीचे. निवडणूक लढण्यासाठी त्यांनी गावातील त्या प्रभागाची निवडणूक लढविली, जेथे स्वातंत्र्याच्या सत्तरवर्षानंतर देखील रस्ते, नाले आणि घरात शौचालय देखील बनले नव्हते. 

निवडणूक जिंकून स्वच्छतेचे कार्य

प्रभागाची निवडणूक जिंकल्यानंतर नरपत सिंह यांनी पीएम यांच्या स्वच्छ भारत अभियानामार्फत शौचालय बनविण्याचा निश्चय केला, कारण गावातील या सर्वात मागे पडलेल्या कोप-यात अधिकाधिक घरात शौचालय नव्हते. नरपत सिंह यांनी युवर स्टोरीला सांगितले की, “लोकांच्या घरात शौचालय बनविण्याचा रस्ता इतका सहज सोपा नव्हता. शौचालय बनविण्यासाठी घरी घरी जाऊन लोकांना प्रेरित करताना मला हे जाणवले की, लोकांना शौचालय बनविण्यात रस नाही. मी याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो की, सरकारी अनुदान मिळाल्या नंतर देखील लोक शौचालय बनविण्यासाठी अर्ज का करत नाहीत, तेव्हा माहित पडले की, येथे अधिकाधिक लोकांकडे इतके पैसे देखील नाहीत की, ते कुणाच्याही मदती शिवाय स्वतः शौचालय बनवून सरकारी अनुदानाची आतुरतेने वाट पाहतील”

ते सांगतात की, हे काम सर्वात अधिक कठीण तेव्हा वाटले, जेव्हा त्यांना माहित पडले की, शौचालयासाठी जवळपास पंधरा हजार रुपयाचा खर्च येतो आणि सरकार कडून सबसिडी म्हणून केवळ १२ हजार रुपये मिळतात.

हाच खटाटोप करून सुरुवातीचे तीन महिने गेले. तेव्हा नरपत सिंह यांनी निर्णय घेतला की, जर हे लोक स्वतः नाही बनवू शकत तर, काय झाले. जर मिळून प्रयत्न केला तर, सर्व शक्य होऊ शकते. समाजशास्त्रात पदवी प्राप्त केलेल्या नरपत सिंह यांनी शौचालय स्वतः बनविण्याचा निर्णय घेतला. आपल्या प्रभागात केवळ दीड महिन्यात ५६ शौचालय बनविले आणि ते देखील स्वतः खर्च करून. येथे समाजशास्त्राचे शिक्षण देखील कमी पडले. शौचालय बनविण्यात कामी पडणारे सिमेंट नरपत सिंह यांच्या मित्राच्या दुकानातून उधारीतून आणण्यात आले. दगड, रेती आणि पाणी आणण्यासाठी स्वतःचे ट्रँक्टर आणि गटर खोदण्यासाठी जेसीबी मशीनला लावले. ते सांगतात की, “लहानपणी आजीच्या कथेत समाजाची एकता आणि ताकदीच्या गोष्टी ऐकतच मोठा झालो आहे, त्या गोष्टी उपयोगात आणण्याची हीच वेळ होती. मी आपले सर्व साधने आणि जमापुंजी या कामात लावली होती, मात्र गरजा पूर्ण होत नव्हत्या.”

येथे घर बनविणा-या कामगारांची मदत देखील कामी पडली. नरपत सिंह यांनी त्यांना एका चांगल्या कामासाठी प्रेरित केले आणि सांगितले की, सरकारी अनुदानाचे रुपये मिळताच, त्यांना देयक देण्यात येईल. याची हमी त्यांनी स्वतः घेतली होती. 

हे प्रयत्न कामी आले आणि नोव्हेंबर २०१५पर्यंत त्यांच्या प्रभागात ५६शौचालय बनून तयार झाले. मात्र, समस्या अजून होत्या. आता तर पूर्ण प्रकारे तयार शौचालयांचे चित्र घेऊन अनुदान घेण्यासाठी नरपत सिंह यांना लाभार्थी लोकांसोबत सरकारी कार्यालयाच्या फे-या देखील मारू लागले होते. त्यासाठी नरपत सिंह यांना अनुदानाच्या लाभार्थीला घेऊन रोज पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या कार्यालयात अनेक फे-या माराव्या लागल्या. सरकारी अनुदानाचे पैसे लागू करून देणे, देशाच्या मागे पडलेल्या भागात आज देखील मोठे आव्हान आहे, ही बाब त्यावेळी या लोकांना पहिल्यांदा समजली नाही. मात्र मोटारसायकलवर कार्यालयाच्या फे-या मारून गावाला स्वच्छ ठेवण्याच्या प्रयत्नात असलेला हा तरुण पराभव पत्करण्याच्या मूड मध्ये नव्हता. ते सांगतात की, निराशा झाली. मात्र नवे शौचालय वापरणा-या लोकांच्या चेह-यावर हास्य आणि आशीर्वादासाठी उठलेले हात मला ताकद देत होते. अनुदानातून शौचालय बनविणा-या गावातील ६० वर्षाच्या हुसैन बानो सांगतात की, “प्रभाग पंचांनी जेव्हा मला शौचालय बनविण्यासाठी सांगितले तेव्हा, मी तेव्हा स्पष्ट नकार दिला, कारण माझ्याकडे इतके पैसे नव्हते, की मी घरी शौचालय बनवू शकेन. मात्र त्यांनी सांगितले की, शौचालय बनून जाईल तुम्ही केवळ कागदावर अंगठा लावा.”

हे सांगताना हुसैनी बानो यांचे हात आशीर्वादासाठी उठतात. आशीर्वाद देणा-या अशा लोकांची कधी कमतरता नव्हती. मग त्या ३०वर्षाच्या अपंग जयंतीलाल असोत किंवा ६५ वर्षाच्या एकट्या विधवा महिला फुली देवी असोत. हे लोक आशीर्वाद देखील देतात आणि धन्यवाद देखील नरपत सिंह सबसिडीची थांबलेल्या रकमेची माहिती स्वच्छता अभियानच्या जिल्हा संयोजक चांदू खान यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर अनुदानाचे पैसे लागू होणे सुरु झाले. हळू हळूच परंतु सर्व लोकांना अनुदानाचा रुपया मिळताच त्यांनी त्या पैशांनी आपले प्रभाग पंचांकडून घेतलेले उधार पैसे देखील चुकविले. 

प्रभाग पंचांच्या या कामाची चर्चा राजधानी जयपूरपर्यंत देखील पोहोचली आणि सरकारचे पंचायत राज मंत्री सुरेंद्र गोयल यांना देखील या तरुणाची प्रशंसा करावी लागली. नंतर स्वच्छ भारत अभियानासाठी एका बैठकीसाठी आलेल्या मंत्र्यांनी केवळ नरपत सिंह यांना सन्मानितच केले नाही तर,पंचायत राज विभागात असलेल्या लोकांसाठी या तरुणाला प्रेरणा स्रोत असल्याचे देखील सांगितले. आपल्या घरात भिंतीवर सजलेल्या मंत्र्यांकडून मिळालेल्या प्रमाण पत्राला पाहून ते सांगतात की, “काम करणे मोठी बाब नाही, मात्र महत्वाचे हे आहे की त्या कामाचा फायदा योग्य लोकांपर्यंत कुठल्याही परिस्थितीत पोहोचावे. मी केवळ हेच काम करत नाही की, गरजू लोकांपर्यंत सरकारी योजनांचा फायदा होईल, तर मी या गोष्टीकडे देखील लक्ष देत आहे की, फायदा चुकीचे लोक उचलू नयेत.”

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

... आम्ही आणि तुम्ही शांतीने झोपू शकू, यासाठी जागतात ‘चेतन’!

पोलिस शिपाईची नोकरी सांभाळून रेल्वे अपघातातील ५०० हून अधिक बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या नयना दिवेकर

रात्र गस्तीच्या वेळी तान्ह्या मुलीला सोबत घेऊन जबाबदारी पार पाडणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी 'अर्चना झा'

लेखक : एस. इब्राहीम
अनुवाद : किशोर आपटे