‘आयआयटी’च्या ‘आंच’ने बदलत आहे ग्रामीण महिलांचे जीवन, मिळत आहे स्वस्थ आणि सुखी जीवन!

‘आयआयटी’च्या ‘आंच’ने बदलत आहे ग्रामीण महिलांचे जीवन, मिळत आहे स्वस्थ आणि सुखी जीवन!

Thursday February 18, 2016,

3 min Read

दक्षिण दिल्लीच्या भाटी माइंस गावात राहणा-या ३०पेक्षा अधिक महिला मागील एक वर्षापासून खूप आनंदी आहेत, कारण आता त्यांना जेवण बनविताना शेगडी मधून निघणा-या धुरामुळे त्रास होत नाही. त्या व्यतिरिक्त कमी इंधनानेच त्यांचे पूर्ण जेवण बनते, ज्यामुळे त्यांना जास्त इंधन जमा करण्याचा खटाटोप देखील करावा लागत नाही. या महिलांचे घर आता पहिलेपेक्षा स्वच्छ राहू लागले आहे. कारण कमी धुरामुळे घर काळे देखील पडत नाही. झाले असे की, या महिला आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांच्या ‘आंच’ या प्रकल्पाअंतर्गत बनविण्यात आलेल्या धूर रहित शेगडीचा वापर करतात. धूर रहित शेगडीचा वापर केल्याने या महिलांचे आयुष्य बदलत आहे.

image


जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) च्या संशोधनानुसार जगात ४३ लाख लोक शेगडीतून निघणा-या धुरामुळे अकाली मृत्यू पावतात. गरिबीमुळे भारतात लोकसंख्येपैकी एक मोठा भाग जेवण बनविण्यासाठी अद्यापही पारंपारिक शेगडीवरच अवलंबून आहे, जी महिलांच्या स्वास्थ्यासाठी मोठी समस्या आहे. ‘आंच’ प्रकल्पात सामील असलेल्या जयंत नहाटा यांनी युवर स्टोरीला सांगितले की, " या समस्येशी झगडण्यासाठी आयआयटी दिल्लीच्या २७ विद्यार्थ्यांनी अनेक शेगडींचा शोध घेतला आणि अखेर फिलिप्सच्या बनविण्यात आलेल्या एका धूर रहित शेगडीला संशोधित करून ४० टक्के खर्च कमी करून महिलांना वापरण्यासाठी उपलब्ध करून दिल्या.

आयआयटी मधून ड्यूल मोड मध्ये बायो इंजिनियरिंग आणि बायो टेक्नोलॉजी मध्ये एमटेक करणा-या नहाटा यांनी सांगितले की, आम्ही दिल्लीतील तीन गाव भाटी, माइन्स, चांदन होला आणि खरक मध्ये या धूर रहित शेगड्या लावल्या आहेत. चांदन होला आणि खरक गावात तर या शेगड्या दिल्ली सरकारच्या मदतीने महिलांना उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्याव्यतिरिक्त गाजियाबाद, उदयपुर आणि उत्तराखंडच्या मुन्सियारीच्या ग्रामीण महिलांना देखील ही शेगडी उपलब्ध करून देत आहेत. नहाटा यांनी सांगितले की, आता आम्ही या प्रकल्पाला दुस-या राज्यात घेऊन जाऊ इच्छितो, ज्यासाठी आम्हाला देणगीची गरज आहे.

image


पाच ग्रामीण महिला करत आहेत कमाई

‘आंच’ प्रकल्पात सामील भाटी माइन्सच्या रेश्मा, शांती, सुनिता आणि कलावती सहित पाच महिला कमाई देखील करत आहेत. येथे राहणा-या रेश्मा पहिले मजुरी करायच्या. मात्र आता धूर रहित शेगडी बनवून त्यांची चांगली कमाई होत आहे. रेश्मा यांनी सांगितले की,

या प्रकल्पात सामील झाल्यानंतर आमच्या जीवनात खूप सकारात्मक बदल झाले आहेत. पहिले जर घरात कुणी आजारी होत असेल तर, औषधासाठी देखील पैसे नसायचे. मात्र आता आम्ही आमच्या मुलांना चांगले शिक्षण देण्याचा देखील विचार करायला लागलो आहोत.

image


एका शेगडीमुळे होते ३५० रुपयाची कमाई

रेश्मा यांनी सांगितले की, आम्ही एका दिवसात दोन शेगड्या बनवतो. एका शेगडीमुळे ८५० रुपये मिळतात. ज्यात जवळपास ५०० रुपयांची सामग्री लागते. प्रत्येक शेगडीचे ८ भाग होतात आणि त्याला सिमेंट, डस्ट, जीरा रोडी, सळया आणि लोखंडाच्या जाळीचा वापर केला जातो.

आयआयटी मधील विद्यार्थ्यांच्या समजदारीने केवळ महिलांना नवे जीवनच मिळाले नाही तर, त्यामुळे त्यांना रोजगार देखील मिळत आहे. आजारांपासून सुटका तर आहेच, सोबतच कुटुंबाच्या चांगल्यासाठी विचार करणे आणि मुलांना चांगली शिक्षा देण्याची परिस्थिती देखील बनली. ‘आंच’ चे सदस्य आशा करतात की, त्यांची ही ‘आंच’ संपूर्ण देशाच्या महिलांपर्यंत पोहोचावी आणि त्यांना स्वस्थ आणि सुखी जीवन मिळावे.

आणखी काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

पाणी शुद्ध करण्याची अनोखी पद्धत, नववीतील विद्यार्थीनी ललिताची आगळीवेगळी कमाल...

आदिवासींच्या सेवेसाठी नोकरीला दिला पूर्णविराम, मोबाईलद्वारे करत आहे त्यांच्या समस्येचे समाधान

सकारात्मक बदलांचे दूत घडविणारा 'प्रखर भारतीय'

लेखक : अनमोल

अनुवाद : किशोर आपटे