माऊंट एव्हरेस्टवर पोहोचण्यासाठी ज्याने अस्थमाचा पराभव केला त्या बंगळुरूमधील मुलाला भेटा

0

बंगळूरू मधील मुलगा, सत्यरुप सिध्दांत ज्याला महाविद्यालयात असताना अस्थमाचा त्रास होता. जो नेहमी सोबत इन्हेलर बाळगत असे आणि लहानश्या अंतरासाठी देखील धापा टाकत धावत नसे. असे सत्यरूपने बराच काळ केले. तोपर्यंत जो वर त्याला जगातील सर्वात उंच माऊंट एव्हरेस्ट सर करण्याची संधी मिळाली नव्हती.

एका वृत्तानुसार सत्यरुपला हे जाणवले की अस्थमामुळे त्याच्या जीवनातील आनंदाला तो मुकतो आहे, त्यामुळे त्याने त्यावर विजय मिळवण्यासाठी लढायचे ठरविले. त्याने महाविद्यालयात असताना पळायला, पोहायला आणि श्वासाचे व्यायाम करायला सुरुवात केली. अशाच एका वेळी त्याच्या लक्षात आले की इन्हेलर नसले तरी त्याचे काही अडत नाही, हळूहळू त्याने स्प्रे वर अवलंबून राहणे कमी केले.

जसजसे त्याला बरे वाटायला लागले, सत्यरुपने प्रॉन्स सारखे पदार्थ खायला सुरूवात केली. ज्यातून त्याला लहानपणी अस्थमाची लक्षणे जाणवायला सुरूवात झाली होती. त्याच्या ब-याचश्या गोष्टी ज्यातून अस्थमा बळाऊ शकत होत्या आणि डॉक्टर वडील त्याला तसे न करण्याचा सल्ला देत होते. पण सत्यप्रकाश सांगतात की त्यांची पध्दत त्यांच्या कामी येत होती आणि चार वर्षात त्यांनी अस्थमावर विजय मिळवला होता.

आरोग्याबाबत आत्मविश्वास आल्यानंतर, सत्यरुप यांनी तामिळनाडू मध्ये पर्वतमलई येथे २००८मध्ये गिर्यारोहण केले. यातून त्यांना आणखी काही कठीण चढाया करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. लहान असताना सत्यरुप यांनी सिक्कीम आणि दार्जिलंग ला सुट्टी घालविली होती आणि नेहमीच डोंगरकड्याचे त्यांना आकर्षण होते.

एव्हरेस्टच्या बेसकॅम्पला त्यांनी २०१०मध्ये भेट दिली आणि स्वत:शी निश्चय केला की एक दिवस ते सुध्दा हा चढाव चढतील कोणत्याही अडथळ्याशिवाय. त्यांनतर त्यांनी या दिव्यासाठी प्रशिक्षण आणि सराव सुरू केला. मागिल वर्षी त्यांनी एव्हरेस्ट सर करण्यासाठी लोकवर्गणीतून २०लाख रुपये जमा केले. पण नेपाळ येथे झालेल्या भयानक भूकंपामुळे आणि हिम वादळांमुळे त्यांच्या चमूला माघार घ्यावी लागली. त्यांनी पुन्हा जाऊन गिर्यारोहकांच्या सराईत संघात भाग घेतला जे जगातील अव्वल समजले जातात.

आणखी सकारात्मक गोष्टी माहिती करून घेण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा.