रचित कुलक्षेत्र यांनी हात गमावले तरी, स्वत:ला उद्योजक बनविण्याचे थांबविले नाही!

1

असे म्हणतात की, तुम्ही जर पुढे जाण्याचा दृढनिश्चय केला तर कठीणातील कठीण प्रसंगातूनही मार्ग काढत पुढे जात राहता. कितीही कठीण प्रसंग आला तरी तो तुमच्या धैर्यासमोर नतमस्तक होतो. याचे असेच एक उदाहरण ठरले आहेत, मुंबईत राहणारे रचित कुलश्रेष्ठ. धैर्य आणि महत्वाकांक्षा यांचे जीवंत उदाहरण आहेत रचित. ‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’ नावाच्या फेसबूक पेजवर त्यांनी आपल्याबद्दल माहिती दिली आहे.

ते लिहितात, ‘जेंव्हा मी पाच वर्षांचा होतो तेव्हा मला कर्करोग झाला. सहाव्या वर्षी डॉक्टरांना माझा उजवा हात कापावा लागला. तो कठीण प्रसंग होता. इतर मुले माझी टवाळी करत असत. मला खेळावेसे वाटे पण मला त्यांच्या तुलनेत तेवढी संधी मिळत नसे. मोठा झालो त्यावेळी मी वस्तुस्थिती मान्य केली, आणि स्वत:च माझ्या हाताची टवाळी करु लागलो.

जेंव्हा गोलकिपींग करून संघाला जिंकून दिले.

रचित म्हणतात, ‘मला फूटबॉल सुरुवातीपासून खूप आवडत होता.त्यामुळे गोलकिपर होण्यासाठी मी रात्रंदिवस मेहनत करत असे. अखेर माझ्या कष्टांचे चीज झाले आणि शाळेत मला गोलकिपर म्हणून निवडण्यात आले. जेंव्हा समोरच्या संघातील प्रशिक्षकांना मी गोलकिपींग करतो आहे हे माहिती झाले तेंव्हा त्या़ंनी घोषणा केली की त्यांचा संघ किमान सहा गोलने जिंकेल. पंरतू मी हैराण झालो नाही. मी माझे कौशल्य पणाला लावले आणि आमचा संघ ४-२ने ती स्पर्धा जिंकली. त्याचवेऴी मला जाणिव झाली की मी प्रयत्न केला तर काहीसुध्दा करून दाखवू शकतो.’

ते सांगतात की, ‘मी सारे काही करण्याचा प्रयत्न सुरू केला.कॉलसेंटर, मूवी रेंटल स्टोर मध्ये काम केले. काही काळ वेटर आणि काही काळ हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणूनही काम केले. मी बारट्रेडींगमध्ये देखील अनुभव घेतला आहे. मी खूप हिंडू लागलो. मी गोव्यात होतो त्यावेळी कविता लिहिण्यास सुरुवात केली. एक नवा अनुभव घ्यावा म्हणून मी ‘कँडी फ्लिप’ नावाच्या सिनेमात सहायक दिग्दर्शक म्हणूनही काम केले आणि त्यावेळी मला हे काम आवडले. त्या नंतर मी ‘सिक्रेट लोकेटर्स’ नावाची स्वत:ची कंपनी सुरू केली जी सिनेमाच्या निर्मिती  प्रक्रियेचे काम करते. आज मी माझ्या स्वप्नातील आयुष्य जगतो आहे.’


ज्या वेळी दुस-यांदा कर्करोगाने ग्रासले.

रचित यांच्या मते सन २०१४मध्ये त्यांच्या कर्करोगाने पुन्हा उचल खाल्ली. पण यावेळी देखील त्यांनी त्यावर मात केली. ‘ जीवनात अशा गोष्टी होत असतात, महत्वाचे हे आहे की आपण त्याचा कसा मुकाबला करतो. मी या सा-या गोष्टी सहजपणे घेऊन त्यातून बाहेर पडणे योग्य समजतो. मला वाटते की, इतरांनीही असेच केले पाहिजे. त्यांनी मला दया दाखवता कामा नये. मी दुर्बल नाही दुस-या प्रकारे सक्षम आहे. लोकांनी हे समजले पाहिजे. मला पहा मी क्रिकेट, चेस, टेबल टेनिस, खेळतो. मी १३,५०० फूट उंचीवर ७५ किलोच्या सामानसह दोनदा चढून गेलो आहे. काय आपल्याला असे अजूनही वाट ते की मला कुणाच्या दयेची गरज आहे?