महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जपान येथे वाकायामा प्रांतासमवेत सामंजस्य करार

महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी
जपान येथे वाकायामा प्रांतासमवेत सामंजस्य करार

Thursday January 12, 2017,

1 min Read

महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने जपान येथे तेथील वाकायामा प्रांत व महाराष्ट्र राज्य पर्यंटन विकास महामंडळ यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल व वाकायामा प्रांताचे गव्हर्नर योशीनोबु निसीका यांच्या प्रमुख उपस्थितीत जपान येथे हा करार संपन्न झाला.


image


राज्यातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी जपान येथे गेलेल्या शिष्टमंडळात एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक के. एच. गोविंदराज, सह व्यवस्थापकीय संचालक सतिश सोनी, महाव्यवस्थापक स्वाती काळे, प्रकल्प प्रमुख आणि उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जैसवाल यांचा समावेश आहे.


image


मंत्री रावल यावेळी म्हणाले की, महाराष्ट्र राज्य २०१७ हे वर्ष ‘व्हीजीट महाराष्ट्र इअर’ म्हणून साजरे करीत आहे. या पार्श्वभूमीवर या वर्षाच्या सुरुवातीसच महाराष्ट्र आणि वाकायामा प्रांतात दोन्ही राज्यातील पर्यटन विकासाच्या दृष्टीने सामंजस्य करार होत आहे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. या कराराची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने वाकायामा प्रांताचे गव्हर्नर योशीनोबु निसीका यांनी महाराष्ट्राला भेट देण्याचे निमंत्रण यावेळी मंत्री रावल यांनी त्यांना दिले.


image


वाकायामा प्रांताचे गव्हर्नर योशीनोबु निसीका यावेळी म्हणाले की, महाराष्ट्र राज्य हे वाकायामा प्रांतासाठी भारत देशाचे गेट-वे आहे. महाराष्ट्राबरोबर झालेल्या सामंजस्य करारातून दोन्ही राज्यांच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल. पर्यटनाशिवाय उद्योग, आयटी, नगरविकास, तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्येही महाराष्ट्राबरोबर देवाण-घेवाण करण्यास वाकायामा प्रांत उत्सूक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (सौजन्य - महान्यूज)