ध्येय हेच सारे जग एक वर्गखोली आणि एका खोलीत पूर्ण विद्यापिठ, स्वप्न : देशाला शंभरटक्के साक्षर करण्याचे”

जगातील पहिला असा व्हिडिओ वर्ग जेथे इंग्रजी शिवाय हिंदीमध्येही शिकण्याची सुविधा. . . . इतर भाषेतूनही व्हिडिओ वर्ग घेण्याची तयारी. . . . प्रत्येक मुलाला चांगल्या शिक्षकांच्या माध्यमातून व्हिडिओवर्गाव्दारे जोडण्याचा प्रयत्न. . . . . पाच लाख मुलांना व्हिडिओ वर्गांचा लाभ. . . अवधान माइंड पॉवर’ च्या संचालिका सुरभी  यांनी २०१०मध्ये सुरु केले या क्षेत्रात कार्य. . . . मोठ्या पगाराची नोकरी सोडून मुलांच्या शिक्षणासाठी दिला वेळ. . . 

ध्येय हेच सारे जग एक वर्गखोली आणि एका खोलीत पूर्ण विद्यापिठ, स्वप्न : देशाला शंभरटक्के साक्षर करण्याचे”

Thursday March 24, 2016,

7 min Read

मोठा तो ठरत नाही जो स्वत: साठीच जगतो, स्वत:साठी सारी सुखे तयार करतो, आणि आयुष्यभर आरामात झोपतो. मोठा तोच असतो जो सारी सुखे नाकारून आपल्या आजुबाजूच्यांना मोठा करतो. त्याची व्याप्ती वाढते तेंव्हा आजुबाजूला समाजात बदल होतात. समाज शहरात आणि शहर देशात असते. सांगायचा मुद्दा इतकाच की तो माणूस आपली सारी सुखे त्या लोकांसाठी त्यागतो ज्यांच्या पर्यंत किमान सुविधाही पोहोचत नाहीत. अशातच जेंव्हा शिक्षणाची गोष्ट असते तेंव्हा आमचे लक्ष त्या लोकांवर जाणे आवश्यक असते. असे म्हणतात की, -

विद्या ददाति विनयम विनयाद याति पात्रताम | पात्रत्वाद धनमाप्नोती - धनाद धर्मस्तत: सुखं ||

अर्थ : विद्येने विनय, विनयाने योग्यता, योग्यतेने धन, आणि धनाने धर्म आणि धर्माच्या पालनाने सुखाची प्राप्ती होते. हा सुविचार आहे सुरभी भगत यांचा. हे त्यांचे मोठेपण आहे की त्या स्वत:ला खूप मोठ्या समजत नाहीत. त्या मानतात की शिक्षणाच्या क्षेत्रात त्या जे काम करतात ते खूप मोठे आहे. http://www.univexcellence.com/home/ ‘अवधान माइंड पावर’ च्या संचालिका सुरभी भगत शिक्षणाच्या क्षेत्रात एक अशी कंपनी चालवितात जी जगातील पहिली अशी संस्था आहे जेथे इंग्रजी शिवाय हिंदी मध्येही मजकूर उपलब्ध केला जातो. केवळ मजकूरच नाहीतर व्हिडिओ व्याख्यान दिले जाते. आणि प्रयत्न हाच आहे की, प्रत्येक भाषेच्या मुलांना त्यांच्या पुस्तकातील ज्ञान उपलब्ध करण्याचा, जेणेकरून त्यांना सुलभपणे शिकता यावे, समजता यावे आणि त्यांनी चांगले भवितव्य आणि चांगला भारत घडवावा. सुरभी यांनी ‘युअर स्टोरी’ला एका खास मुलाखती दरम्यान सांगितले की, “ माझे मिशन आहे देशाला शंभरटक्के साक्षर करण्याचे आणि लक्ष्य आहे प्रत्येक मुलाला त्याच्या भाषेत शिक्षण देण्याचे. केवळ पुस्तकी नाहीतर वर्तन आणि संपूर्ण शिक्षण. ज्यामध्ये आजच्या शिक्षणासोबतच वैदिक शिक्षणदेखील असेल कारण आज गरज आहे मुलांना प्राचीनतेशी जोडून आधुनिक बनवण्याची. केवळ आधुनिक बनविल्याने त्यांचा पूर्ण विकास होणार नाही.” 

image


कशी झाली सुरुवात

सुरभी भगत राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील सावर येथे एका अशा परिवारात जन्मल्या जेथे शिक्षणाला सर्वस्व मानले जात होते. त्यांचे आजोबा नेहमी हीच अपेक्षा ठेवत की परिसरातील मुलांमध्ये शिक्षणाबाबत चैतन्य असावे. हेच संस्कार सुरभी यांना त्यांच्या वडिलांनी दिले. हेच कारण आहे की जी गोष्ट संस्कारातून मिळते तिचा परिणाम अचेतन मनात होत असतो. सुरभी सांगतात, “ जेंव्हा मी १२वीच्या परिक्षेआधी ब-याच विषयांना शिकवणी करत असे तेंव्हाच समजले की हे काम किती थकवणारे असते. त्यासोबतच मला समजले की हे किती महाग असते. हे काही मुलांना शक्य असेल, मात्र बहुतांश मुलांना अशक्यच आहे. त्याचवेळी माझ्या मनात ही गोष्ट बसली की काळासोबत असे काहीतरी काम करावे ज्याचा फायदा सर्वच मुलांना होईल. बस ही गोष्ट मला सतत काहीतरी करण्यास प्रोत्साहन देत असे.”

बारावी नंतर सुरभी यांनी राजस्थान विद्यापिठातील संगणक अभियंता पदासाठी शिक्षण सुरू केले. २००२-०६पर्यंत अभियांत्रिकी शिक्षण घेतल्यानंतर सुरभी भगत कँम्पस मुलाखतीव्दारे आयबीएममध्ये नोकरी करू लागल्या. त्या दरम्यान विदेशात काम करण्याची देखील संधी मिळाली. परंतू चार वर्षांच्या नोकरी दरम्यान हा विश्वास दृढ होत गेला की मुलाच्या शिक्षणासाठी वेगळे काहीतरी करावे. सुरभी सांगतात की, “ जग ही वर्गखोली आहे आणि तीच विद्यापीठ आहे’ माझ्या मनात सातत्याने हेच विचार येत होते आणि काहीतरी करावे असे मला वाटत होते ज्यातून एकाच वेळी हजारो मुलांचा फायदा होईल, मुले कुठेही असोत इंटरनेटच्या माध्यमातून आमच्या योजनांचा फायदा घेऊ शकतील”

नोकरी सोडली, ई-लर्निंग, व्हिडिओ लर्निंग सुरू केले

हे विचार अंमलात आणण्यासाठी २०१०मध्ये सुरभी यांनी नोकरी सोडली. त्यानंतर हा प्रश्न होता की मुलांना शिकवण्यासाठी मजकूर कुठून येणार आणि कसा? इंग्रजीत तो मिळणे काही प्रमाणात शक्य होते पण हिंदीत तयार करणे कठीण होते. या शोध आणि संशोधनात त्यांचे काही महिने गेले. त्या शिक्षकांना भेटू लागल्या. आधी त्या शिक्षकांना भेटल्या ज्यांनी त्यांना शिकवले होते. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की खूप शिक्षक आहेत जे चांगले शिकवू शकतात पण व्हिडिओ वर्गासाठी सक्षम नाहीत. काही असेही शिक्षक होते जे व्हिडिओ वर्ग चांगला घेऊ शकत होते पण सरकारी नोकरी करत असल्याने त्यांना त्यांची ओळख देता येत नव्हती. खूप प्रयत्न करून त्यांनी काही शिक्षकांना यासाठी तयार केले. त्यातील काही मजकूर तयार करण्यासाठी आणि काही वर्ग घेण्यासाठी. अशा प्रकारे पहिला वर्ग नववी आणि दहावीच्या ई लर्निंग आणि व्हिडिओ वर्गासाठी सुरू झाला. त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्यानंतर अकरावी आणि बारावीसाठी देखील शिकवण्यास सुरुवात झाली. त्यात सर्वात अडचण येत होती व्हिडिओ वर्गातील हिंदी लेखनाबाबत. अनेक शिक्षक चांगले शिकवत मात्र हे आवश्यक नव्हते की हिंदीच्या मात्रा देखील योग्य लिहितील. अशावेळी व्हिडिओ शुटींगमध्ये अनेक अडचणी येत. परंतू हळु-हळू देशाच्या इतर भागातील शिक्षक देखील यामध्ये पारंगत होऊ लागले आणि सुरभी यांचे काम पूर्वीपेक्षा सोपे झाले. लोकांच्या सतत चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आणि २०११मध्ये हिंदी माध्यामात हा वर्ग ६वी ते १२वी करण्यात आला. सुरभी यांचे एकच मत आहे की मुले एकाच जागी ‘दि पॉवर ऑफ ५ ई’ चे परिचित व्हावेत. जे आहेत, इ लेक्चर, इ लर्निंग, इ अवधान, इ टेस्टींग आणि इ क्वेरी सोल्यूशन.

आज स्थिती अशी आहे की, देशाच्या विविध भागात सुमारे पाच लाख मुले या शाळातून इ-लर्निंगचा फायदा घेत आहेत. या अंतर्गत आता दहा हजार तासाच्या व्हिडिओ वर्गाची निर्मिती तज्ञांव्दारे करण्यात आला आहे. जो एक विक्रम आहे.

image


४०देशांसह देशाच्या २०राज्याच्या मंडळाचे अभ्यासक्रम समाविष्ट

राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणाले होते की, “ यशाची पहिली पायरी आहे साधे जीवन आणि उच्च विचार” सुरभि भगत यांना भेटल्यानंतर वारंवार असे लक्षात येते की मोठे कार्य करण्यासाठी त्यांनी स्वत:ला किती संयमित केले आहे. ते योग्य देखील आहे कारण उद्देश जितका मोठा असेल तितक्या सरळ आणि सहज पध्दतीनेच त्याला पूर्ण केले पाहिजे. हे नक्कीच आहे की प्रामाणिक प्रयत्न नेहमीच यशाच्या दिशने घेऊन जातात. हेच कारण आहे की आज त्यांची संस्था ‘अवधान माइंड पॉवर’ ४० देशांच्या मुलांना व्हिडिओ वर्ग उपलब्ध केला आहे. त्यासोबतच भारताच्या २० राज्यात तेथील शिक्षण मंडळे त्यांना जोडली गेली आहेत. याचा अर्थ असा की या वीस राज्यात सहावी ते बारावी दरम्यानचा अभ्यास उपलब्ध करून देण्यात आला आहे. तो देखील दोन्ही भाषातून. सुरभी यांचा प्रयत्न आहे की, प्रत्येक राज्याच्या मुलांना त्यांच्या भाषेत मजकूर उपलब्ध करून द्यावा, त्यांनी सांगितले की पंजाबी गुरुमुखीतून मजकूर देण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. आणि लवकरच मुलांना तो उपलब्ध होईल.

पैसा कुठून येतो

एखाद्या संस्थेचे काम चालविण्यासाठी पैसा हवाच असतो. अशातच मागच्या सहा वर्षात सतत यश मिळवत गेल्यानंतरही सुरभी यांनी स्वत:चा पैसा लावला आहे मुलांना शिकवण्यासाठी त्यांचे म्हणणे आहे की, “ या कार्यासाठी सरकारकडून मदत मागितली पण अद्याप नाही मिळाली. गुंतवणूकदारांकडून पैसा घेण्याची गोष्ट येते तेंव्हा आम्हाला त्यात जागरुक व्हावे लागते. कारण जेंव्हा याबाबत त्यांच्याशी चर्चा होते ते योजनेला व्यावसायिक बनविण्याचा विचार करतात. पण मला शिक्षणाचा व्यवसाय करायचा नाही. मला वाटते की जसे आम्ही याला व्यवसाय म्हणून पाहू हे मिशन संपून जाईल.”

सुरभी यांनी सांगितले की, इतके नक्कीच करते की या वर्गांना इतर ठिकाणी खूप पैसे घेतले जातात तेथे अवधान माइंड पावर मध्ये फारच थोड्या पैशात शिकवले जाते. ते देखील यासाठी की इंटरनेट आणि मजकूराचा खर्च भागविण्यासाठी. शिक्षकांना पैसे, मजकूर तयार करण्याचा खर्च सर्व सुरभीच करतात. त्यांचे धोरण अगदी स्वच्छ आहे- “आम्ही अशा लोकांना सातत्याने पत्र पाठवतो जे शिक्षणांच्या क्षेत्रात काम करतात. आम्ही असे लोक संस्था यांना भेटून एकत्रित काम करु इच्छितो. पण सत्य हे आहे की इतर संस्थाकडून उत्साहजनक उत्तरे येत नाहीत. आणि जर मिळालाच तर ते पैश्याची मागणी करतात.”

image


पुढील काही वर्षांच्या योजना

सुरभी भगत मुलांच्या स्मरणशक्ति मजबूत करण्यासाठी काम करताहेत. भारताच्या प्राचीन वैदिक विद्या आणि अवधान विज्ञान यांच्या समन्वयातून एक अशी शक्ति तयार करण्याचा प्रयत्न आहे की, मुलांची स्मरण शक्ती वाढेल. अवधान विज्ञानाच्या माध्यमातून शिकलेल्या गोष्टी कायमच्या होत असतात. त्या नेहमीच स्मरणात राहतात. सुरभी यांचे म्हणणे आहे की, त्यांची संस्था शिक्षकांना त्यांच्याशी जोडलेली माहिती देतात, जेणेकरुन व्हिडिओवर्गात या गोष्टी लक्षात राहतील आणि मुलांना जास्त फायदा मिळेल. सुरभी म्हणतात की, “ आमच्या प्राचीन विद्या इतक्या सक्षम आहेत की, त्यांचा योग्य उपयोग केला तर मुलांचे भविष्य आणि देशाचे भाग्य उजळेल. पुरातन आणि आधुनिक दोन्हीच्या समन्वयातून नव्या गोष्टी मुलांसमोर ठेवता येतील”

परिवाराचे सहकार्य आणि सन्मान

म्हणतात की प्रत्येक पुरुषांच्या यशामागे एका स्त्रीचा हात असतो आणि तसेच प्रत्येक यशस्वी महिलेच्या मागे तिच्या कुटूंबाची साथ असते. सुरभी यांच्या या यशाच्या मागे त्यांचे कुटूंब आहे. लग्ना आधी आई-वडिल आणि नंतर पती यांचे सहकार्य मिळाले. त्यांची मेहनत आणि कुटूंबाचा सहकार यातून त्यांना अनेक राष्ट्रीय- आंतर्राष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत ज्यात २००४चा दक्षिण -पूर्व आशिया ईएनजीओ सारख्या पुरस्काराचा समावेश आहे.

Student Website www.bhagatsir.com

Website: www.univexcellence.com

Youtube Channel: https://www.youtube.com/youruniv

या सारख्याच आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

‘डोरस्टेप स्कूल’ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणारी शाळा, साक्षरतेला प्रत्येक स्तरावर पोहोचविण्याचा आगळा वेगळा प्रयत्न! 

लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देण्याचे लक्ष्य

शिक्षण क्षेत्रातील असमानता दूर करण्यासाठी झटणाऱ्या सीमा कांबळे

लेखक : धीरज सार्थक

अनुवाद : किशोर आपटे